Shivaji Maharaj Speech in Marathi 2024 : शिवजयंती निमित्त भाषण मराठी/19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण/छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेनुसार

Shivaji Maharaj Speech In Marathi : सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय मित्रांनो आज आपण शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी भाषण कसे करायचे ते जाणून घेणार आहोत.शिवजयंतीचे भाषण कसे करायचे सुरुवात कशी करायची भाषण करते वेळी कोणती काळजी घ्यायची आहे हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने सुटसुटीत Shivaji Maharaj Speech In Marathi थोडक्यात सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहुयात थोडक्यात सविस्तर माहिती.

शिवजयंती निमित्त भाषणाची सुरुवात अशी करा.

आज 19 फेब्रुवारी 2024 वार सोमवार आज महान पराक्रमी श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना सर्वात प्रथम मानाचा मुजरा.आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने उपस्थित असलेले मान्यवर, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे येथे जमलेले सर्वच मान्यवर गुरुजन आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज शिवजयंती त्यानिमित्त मी आपल्यापुढे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही गोड करून घ्यावेत अशी विनंती. किवा तुम्ही माझे हे दोन शब्द गोड करून घ्याल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो किंवा करते.

Shivaji Maharaj Speech In Marathi : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्य नव्हते भरपावसात शत्रूला घाम फुटेल असे छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रचंड उर्जा त्यांच्या ठिकाणी होती.हवेचाही वेग कमी पडेल असा त्यांचा वेग होता.अन्यायाच्या बाजूने त्यांचा लढा होता.असे शिव छत्रपती शिवाजी महाराज लाखात एक नाही तर जगात एक होते.आज 19 फेब्रुवारी 2024 आज शिवरायांची 394 वी जयंती आहे.महाराष्ट्राच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून आजही शिवरायांचा नाद घुमतो आहे, मोजक सैन्य सोबत घेऊन शत्रूलाही झुकायला भाग पाडले असे स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी मावळ्यांचा जिव की प्राण, गोरगरिबांचा रक्षण कर्ता, शेतकर्यांचा कैवारी, जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज होय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.जिजाऊ शहाजी राजे भोसले यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. शहाजी राजे आणि जिजाऊ माँ साहेब यांनी कोणत अस पुण्य केल होत त्यांच्या पोटी असा दैदिप्यमान सुर्याचा जन्म झाला होता.तर माँ साहेब जिजाऊ यांना स्वराज्याचे सुरु असलेले हाल देखवत नव्हते.

Shivaji Maharaj Speech In Marathi : गुलामगिरी त्यांना पसंत नव्हती.त्यासाठी त्यांनी भगवान शंकराची आराधना केली माँ तुळजाभवानीची आराधना केली की स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करणारा पुत्र या स्वराज्याला हवा आहे ते तुम्हीच स्वतः अवतार रुपाने माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली म्हणूनच शिवरायांना भगवान शंकराचा अवतार समजले जाते. माँ साहेब जिजाऊ यांनी शिवरायांवर बाल वयातच कुशल पद्धतीने संस्कार करून‌ शिवरायांसारखे एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले अशा या आदर्श मातेला मानाचा मुजरा.

स्वराज्याची स्थापना आणि घोडदौड.

जिजाऊ माँ साहेबांच्या देखरेखीखाली शिवरायांवर योग्य संस्कार झाले.जिजाऊ माँ साहेबांनी शिवरायांना जे स्वप्न दाखविले त्याच प्रमाणे शिवरायांनी घोडदौड केली. स्वराज्याच्या रक्षणार्थ त्यांनी शत्रूशी तुफान लढा दिला. त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण ते किंचीतही डगमगले नाहीत ऊलट त्यांनी स्वराज्य निर्मितीचे कार्य अविरतपणे सुरुच ठेवले.

Shivaji Maharaj Speech In Marathi : त्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे काम हाती घेतले आणि त्यांनी आपल्या सोबत हत्तीच्या ताकदीचा एक एक मावळा पारखून आपल्या सोबत घेतला.पहाडासारख्या छातीचे बाजीप्रभू देशपांडे, बाजीप्रभूचे नाव उच्चारताच अंगावर शहारे उमटतात असे बाजी प्रभू विशाळगड पावनखिंडीतला त्यांनी दिलेला आठवा म्हणजे समजतात बाजीप्रभू कोण होते ते. असेच तानाजी मालुसरे, जिवा महाला, सुर्याजी, मुरारबाजी, शिवा काशिद, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, कोंडाजी फर्जंद, तसेच मुस्लिम समाजाचेही मावळे शिवरायांसोबत होते सिद्दी हिलाल, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम हा तर शिवरायांचा अंगरक्षक होता असे अनेक मावळे शिवरायांसोबत होते आणि नुसते सोबत नव्हते तर जीवाला जीव देणारे होते.

Shivaji Maharaj Speech In Marathi : “आठवा तो प्रताप आठवा ते मावळे ” मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दिली मनाला उभारी झाले घ्योड्यावरती स्वार केली हर हर महादेव गर्जना आणि पुन्हा फिरून नाही पाहिले मागे केले जीवाचे रान राखला शिवरायांचा मान जीवाला जीव देत उभे केले स्वराज्य असे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा.

आठवा शिवरायांचा प्रताप,

आग्र्याहून शिवरायांची सुटका, अफझल खानाची बोट तोडली, शाहिस्तेखानाची फजिती, प्रताप गडावरील पराक्रम, तानाजी मालुसरे यांचा यांचा प्रताप,गड आला पण सिंह गेला. पन्हाळगडाला वेढा, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन बाजीप्रभूंनी अडवलेली पावनखिंड, असे अनेक पराक्रम वाखाणण्याजोगे आहेत.शिवाजी महाराज हे फक्त नुसते राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते, प्रजेच्या व्यथा ते जाणत होते म्हणूनच त्यांना जाणता राजा असेही म्हटले जाते.

Shivaji Maharaj Speech In Marathi : प्रजेवर अन्याय करणार्यांना त्यांनी चोख शिक्षा दिली.आणि जीवाला जीव देणार्यांवर प्रेमही तितकेच केले.शिवरायांनी कर्तव्य दक्ष भुमिका पार पाडली.शिवरायांनी शक्ती बळा पेक्षा युक्ति बाळाला जास्त प्राधान्य दिले.स्वराज्याच्या गवताच्या काडीलाही धक्का त्यांनी लागू दिला नाही.

“स्त्रियांचा आदर”

“वडिलधाऱ्याची कदर ”

” शत्रूचा काळ ”

” मावळ्यांचा जीव की प्राण ”

“जिजाऊचा धुरंधर”

” छत्रपती शिवराय ”

Shivaji Maharaj Speech In Marathi ‘

दुर्दैवाने छत्रपती शिवरायांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि एक महान योध्दा काळाच्या पडद्याआड झाला.आदर्श, कर्तव्यदक्ष, पराक्रमी, प्रजाहितकारी, अशा महान कर्तुत्ववान राजा बद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात अशा या थोर शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. 

हर हर महादेव…जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩

 

हेही पाहायला विसरू नका 👇

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024 

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : शिवजयंती साजरी करताय मग हे समजून घ्या? अन्यथा काही उपयोग नाही?

 

Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती/शिवजयंती केव्हापासून साजरी केली जाते आणि कोणी सुरवात केली जाणून घ्या सविस्तर माहिती

फेसबुक

 

 

x