Mahashivratri 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण देवाधिदेव महादेव यांची महाशिवरात्री कधी आहे? महाशिवरात्री या दिवशी काय करावे? आणि हा उत्सव कुठे कुठे साजरा केला जातो? कसा साजरा केला जातो? या दिवसाचे काय महत्त्व आहे? अशा इतर गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महाशिवरात्री 2024 रोजी.
या वर्षी Mahashivratri 2024 पंचांगा प्रमाणे माघ कृष्ण त्रयोदशी 8 मार्च 2024 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च 2024 रोजी वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटा पर्यन्त असेल पण महाशिवरात्री ही 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
Mahashivratri 2024 : महाशिवरात्र हा दिवस भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह दिवस मानला जातो.हा दिवस शंकर पार्वतीचा विवाहाचा म्हणून साजरा केला जातो.या दिवशी भगवान महादेवाचे भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात.नव्हे नव्हे सर्व देव लोक सुद्धा या दिवशी भगवान महादेवाची पुजा करतात.कारण महादेव हे तिन देवान पैकी एक मुख्य आहेत.ब्रम्ह, विष्णू आणि महादेव या तिन देवतांनी मिळून या पृथ्वीची रचना केली.आणि तिघांनी तिन कार्य हाती घेतले ते म्हणजे ब्रम्ह देव हे निर्माते आहेत, भगवान विष्णू हे पालनकर्ते तर भगवान महादेव हे या पृथ्वीचे संहार कर्ते असल्याचे समजले जाते.
महाशिवरात्री कशी साजरी केली जाते?
महाशिवरात्री ही देशात विविध ठिकाणी साजरी केली जाते विशेष करून देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारा ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री साजरी केली जाते.ते बारा ठिकाण 1) सुरटी सोमनाथ – गुजरात 2) मल्लिकार्जुन – आंध्रप्रदेश 3) महाकालेश्वर – मध्यप्रदेश 4) ओंकारेश्वर – मध्येप्रवेश 5) वैजीनाथ – महाराष्ट्र 6) भिमाशंकर – महाराष्ट्र 7) रामेश्वर – तामिळनाडू 8) नागनाथ – महाराष्ट्र 9) विश्वेश्वर – उत्तर प्रदेश 10) त्र्यंबकेश्वर – महाराष्ट्र 11) केदारनाथ – उत्तराखंड 12) घृष्णेश्वर – महाराष्ट्र या बारा ठिकाण विशेष करून महाशिवरात्री साजरी केली जाते आणि ठिकाणी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात.
Mahashivratri 2024 : देवाधिदेव महादेव यांचा महाशिवरात्री हा उत्सव संपुर्ण जगभरात साजरा केला जातो. तसेच विविध राज्यात वेगवेगळ्या ठिकाणीही मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जाते.कारण भगवान शंकराचे मंदिर प्रत्येक देशात पाहायला मिळतात.तेही पुरातन काळातील, सर्वात पुरातन मंदिर कोणते पहाण्यास मिळत असतील तर महादेवाचेंच आहेत. तेही मोठमोठ्या राजा महाराजांनी बांधलेले आहेत. तर काही ठिकाण आजही असे आहेत त्या बद्दल कुणालाच सांगता येत नाही की हे मंदिर कुणी आणि केव्हा बाधली आहेत.
भगवान महादेवांची आराधना.
महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमी पेक्षा पहाटे स्नान करून ओल्या अंगाने भगवान महादेवाचा अभिषेक करावा.शक्य नसल्यास भावपूर्ण अंतःकरणाने साधे जल अर्पण कले तरी भगवान शंकर प्रसन्न होतात.भगवान महादेवांची इतर वेळेस केलेल्या पुजे पेक्षा महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली पुजा ही अधिक पटीने फळ प्राप्त करून देते. या दिवशी भगवान शंकर प्रत्येक शिवाच्या ठिकाणी वास्तव्य करतात.म्हणून महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे.भगवान महादेव हे दैवत अत्यंत कृपाळू आहे, आणि सर्वात भोळी देवता मानली जाते.त्यांची तुम्ही श्रद्धेने जर आराधना केली तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.भगवान शंकराला बेल पत्र अतिशय प्रिय आहे. श्रद्धेने बेल पत्र अर्पण केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात.ईबुद, बेलपत्र, दुध, तांदूळ अक्षदा, धुपारती, 108 बेल पत्र अर्पण करावे त्याच बरोबर ओम् नमः शिवाय या मंत्राचा जप करावा भगवान महादेव प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात.
Mahashivratri 2024 : आणि जितके कृपाळू तितकेच रागीटही आहेत.त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर त्या ठिकाणी कोणतीच शक्ती कार्य करु शकत नाही.भल्याभल्यांना त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागते. अगदी देवीदेवतांपासून राक्षसा प्रयंत्न त्यांना घाबरतात.त्याच्या तिसर्या डोळ्यात भयंकर सामर्थ्य आहे. एका क्षणात सर्व जाळून भस्म करण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे.कारण पृथ्वीचा संहार करणे त्यांच्याकडे आहे. पण विनाकारण कुणालाही त्रास देणारे नाहीत. अति केल की त्याचा नाश ते करतात.भगवान महादेव हे उग्र रूप धारण करणारे आहेत.तितकेच प्रेमळ देखील आहेत.
Mahashivratri 2024 : शिव भोळा चक्रवर्ती | त्याचे पाय माझे चित्ती || १ || वाचे वदता शिव नाम | तया न बाधी क्रोध काम || २ || धर्म अर्थ काम मोक्ष | शिव देखता प्रत्यक्ष || ३ || एका जनार्दननी शिव | निवारी कळीकाळाचे भेव || ४||
भगवान शंकराची आरती
लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा | विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा | लावण्य सुंदर मस्तकी भाळा | तेथुनी जल निर्मळ वाहे झुळझूळा || १ ||
जय देव जय देव जय शिवशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || धृ ||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमणांच्या माळा | विभुतिचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा || २ || जय देव जय देव….!
देवी दैत्य सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ उठिले | ते त्वा असुरपणे प्राशन केले | निळकंठ नाम प्रसिद्ध झाले || ३ || जय देव जय देव…!
व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | शतकोटीचे बीज वाचे उच्चारी || ४ || जय देव जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा.
‘ Mahashivratri 2024 ‘
हे पण वाचा 👇
शिव जयंती साजरी करताय मग हे समजून घ्या अन्यथा काही उपयोग नाही अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा