Mahashivratri 2024 : सर्वांना हर हर महादेव आज महाशिवरात्री विशेष फल प्राप्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? महादेवाला काय आवडते, काय केल्याने भगवान महादेवांची आपल्यावर सदैव कृपा राहील, कोणत्या गोष्टींच दान कराव? कोणत्या गोष्टी करु नये हेच आपण Mahashivratri निमित्ताने जाणून घेणार आहोत.
महाशिवरात्री शुभ पवित्र पर्वकाळ.
8 मार्च 2024 महाशिवरात्रीचा शुभ पावण पवित्र पर्वकाळात करा या गोष्टी सुखसमृद्धी तुमच्या घरात नांदेल. आज महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे.विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त जोरदार तयारी सुरू आहे.भारतवासीयांचा हा एक आनंदाचा क्षण आहे.आणि या महत्त्वाच्या शुभ तिथिला भाविक मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवांची आराधना, पुजा अर्चा करतात, भगवान महादेवांचा महाभिषेक करतात. Mahashivratri या दिवसाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. देवाधिदेव महादेव हे दैवत अत्यंत कृपाळू आणि शक्तिशाली दैवत मानले जाते.
भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी Mahashivratri हा अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ मानला जातो. आणि या महत्वपूर्ण पर्वकाळात केलेली साधना ही फलंदायी ठरते.या दिवशी भाविक भगवान महादेवांची आणि पार्वती मातेची मनोभावे पूजा करतात.पार्वती ही सती आहे भगवान महादेवांची अर्धांगींनी आहे.भगवान महादेवांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर पार्वती मातेची आराधना महत्वाची ठरते. आणि विस्वात जेव्हढ काही ज्ञान आहे हे भगवान महादेवा पासून आलेल आहे अशी आख्यायिका आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी करा या गोष्टी.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांच्या पुजेला जेव्हढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व गोरगरिबांवर केलेली दया, गरजवंताला केलेली मदत ही ईश्वराला मान्य होते, म्हणून या दिवशी आपल्या कुवतीनुसार दान करावे अनादर कुणाचा करु नये, नाहीच दान करता आले तर किमान जे दान करणारे आहेत त्यांना नाव ठेऊ नये उलट त्यांना सहकार्य करता आले तर करावे.Mahashivratri च्या दिवशी दान केल्याने भगवान महादेव प्रसन्न होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतील, संकट दूर होतील, सुखाचा मार्ग सापडेल म्हणून महाशिवरात्रीच्या पावण पवित्र पर्वकाळात करा या गोष्टी सुखसमृद्धी तुमच्या घरात नांदेल.
- तर कशाचे दान केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतील तर या दिवशी जल म्हणजेच पाणी जो तहानेने व्याकूळ झालेला आहे त्याला पाणी द्या असे केल्याने भगवान महादेवांना पिंडीवर जल अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होते.म्हणून या दिवशी पाठी वाटप करावे.
- त्याचप्रमाणे या दिवशी भगवान महादेवांच्या पिंडीवर दुध अर्पण करावे असे केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृध्दी येते असे केल्याने आपले चंद्र बल बळकट होते.म्हणून भगवान महादेवांना Mahashivratri ला दुध अर्पण करावे विशेष पुण्य प्राप्त होते.दुध, तुप दानाने दरिद्री नाहीसी होते आणि आपल्या घरात बुद्धिमान मुल जन्माला येतात.
- महाशिवरात्रीच्या दिवशी तिळाचे दान करावे असे केल्याने पितृदोषाची कृपा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दोषाचा काही प्रमाणात प्रभाव कमी होतो.Mahashivratri च्या दिवशी तिळ दान केल्याने शनिदोषही दुर होण्यास मदत होते.कारण शनी देवांचे गुरु हे भगवान महादेव आहेत.
- महाशिवरात्रीच्या या पर्वकाळात गरजू लोकांना वस्त्र दान केल्याने दारिद्रय दूर होते. त्यांच्या जीवनातला कठीण काळ निघून जातो सुखसमृद्धीचे दिवस येऊ लागतात.अडचणी दूर होऊन द्रव्याची प्राप्ती होते आर्थिक स्थिती सुधारु लागते पैशाची कमतरता भासत नाही.
महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका?
- काय करावे आणि काय करू नये
- Mahashivratri च्या दिवशी सकाळी लवकर शुभ मुहूर्तावर स्नान करावे तेही सुर्योदयाच्या अगोदर.
- शक्य झाल्यास ओल्या अंगाने भगवान महादेवाला शुभ मुहूर्तावर जल अर्पण करून रुद्राभिषेक करावा.
- 108 वेळा भगवान महादेवांच्या ओम् नमः शिवाय या मंत्राचा जप करावा मन प्रसन्न होऊन समाधान लाभेल.
- भगवान महादेवांना पिंडीवर 108 बेल पत्र अर्पण करावे असे केल्यास भगवान महादेव प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात.कारण बेल पत्र हे महादेवांना सर्वात जास्त आवडते.
- Mahashivratri ला दिवसभर एकादशी प्रमाणे उपवास करावा फलाहार करुन किंवा उपवासाचे पदार्थ सेवन करुन शक्य झाल्यास नुसत जल प्राशन करून जमल्यास निरंकार उपवास केल्यास अती उत्तम.
- महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही अन्न सेवन करु नये हिंदू असाल तर आणि दुसर्यालाही अन्न सेवन करण्यास भाग पाडू नये.
- महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नये.फाटके तुटके वस्त्र परिधान करू नये या दरिद्री येते स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि जल दान करावे.
- महाशिवरात्रीच्या दिवशी टाळा या चुका नेहमी प्रमाणे उशीरा पर्यंत झोपू नये.सकाळी उशीरा पर्यंत झोपणे हे अशुभ लक्षण आहे.
- महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान सेवण करु नये.याने घरात लक्ष्मी नांदत नाही.
- महाशिवरात्रीच्या दिवशी तामसी आहार टाळावेत उदाहरणार्थ कांदा, लसूण, इतर तामसी पदार्थ टाळावेत.
- महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रम्हचारी व्रताचे पालन करावे. सात्विक आहार क्रोधावर नियंत्रण ठेवावे वाचाळ बोलू नये.अन्यथा पुढचा जन्म पशू योनीला प्राप्त होतो.
हे देखील वाचा 👇