व्यवसाय विषयक प्रस्तावित संकल्पना
vyavsay : नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांच्या मनात एकच प्रश्न अनेक वेळा येतो तो म्हणजे ग्रामीण भागात व्यवसाय कोणता करावा आणि जर तुम्हीही ग्रामीण भागात व्यवसाय कोणता करावा या विचारात असाल किंवा तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर या पोस्टमध्ये मी तुम्हाला 10 फिरते vyavsay सांगणार आहे जे तुम्ही अतिशय कमी गुंतवणूकीत सुरु करु शकता.
त्याकरता तुमच्याकडे संयम अतिशय महत्त्वाचा आहे.एखांदा व्यवसाय हा लवकर नावारुपाला येतो तर एखांदा व्यवसाय सेट व्हायला थोडा उशीरही लागु शकतो. कोणताही व्यवसाय तुम्ही आज सुरू केला आणि उद्या लगेच जोमात चांलला पाहिजे असे कधी होत नाही म्हणून धीर न सोडता चिकाटीने प्रयत्न करीत रहाणे एक दिवस नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.
मित्रांनो व्यवसाय करायचाय पण कोणता करु काही सुचत नाही.आणि त्यासाठी भांडवल पण नाही.तर खास तुमच्यासाठी ही सविस्तर माहिती आहे.
कोणताही vyavsay करायचा म्हटल की पहिला विषय येतो तो म्हणजे भांडवलाचा, व्यवसायाची मनात खुप इच्छा आहे पण त्यासाठी योग्य सल्ला आणि भांडवल प्रत्येकाजवळ असेलच असे नाही.इच्छा असतांना पैशाअभावी विलाज चालत नाही.
मित्रांनो आपल्याकडे पैसा नसेल तर समाजात आपल्याला झिरों किमंत असते.कोणताही vyavsay छोटा किंवा मोठा नसतो त्यासाठी फक्त जिद्द,आणि चिकाटी असावी लागते व (कोणत्याही कामाची लाज बाळगुन चालत नाही.लाज बाळगून एक दिवस उपाशी मराव लागेल)
आपल्याला दोन पैशाची गरज पडल्यावर कोणीच मदत करीत नाही.आपल्यालाच काहीतरी तडजोड करावी लागते. एक वाक्य आहे ना ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ या सर्व गोष्टींची परवा नसेल तर यश तुमच्या हातात आहे.
तर आपण आज तेच पाहणार आहोत कमी गुंतवणूक करुन काही vyavsay करता येतात का? त्याची यादी खालील प्रमाणे.
लाकडी तेल घाना
आज आरोग्याची काळजी घेन अत्यंत गरजेच आहे. ज्याच आरोग्य निरोगी त्याच सर्वच भारी. सकस आहार आज राहीलेला नाही.आणि नित्योपयोगी आहारात तेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आज विचार जर केला तर तेल हे शुद्ध राहीलेल नाही.मग ते कोणतही तेल घ्या. सर्व ठिकाणी भेसळ पाहायला मिळते. म्हणून आज शुद्ध लाकडी घान्याच्या तेलाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. आणि हे तेल आरोग्यास लाभदायक आहे.
यामध्ये सुर्यफुल, शेंगदाणे, करडी, मोहरी, सोयाबीन, तिळ, खोबर, बदाम, अशा विविध प्रकारचे तेल तुम्ही तुमच्या लाकडी घान्यात तयार करु शकता. आणि त्याची पॅकिंग 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम 1 किलो अशा स्वरूपात पॅकिंग करून बाजारात परिसरात त्याची मार्केटिंग करु शकता.
हा vyavsay करण्यासाठी तुमच्याकडे भांडवलाची गरज आहे आणि भाडवला बरोबरच अनुभवाची आवश्यकता आहे. या व्यवसायाची संपूर्ण माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्याकरता स्वतःची जागा असावी. किंवा तुम्ही ग्राहकांना त्यांनी आणलेल्या कच्च्या मालाचे तेल तयार करून देऊ शकता. या तेलाला बाजारात प्रचंड मागणी आहे आणि इतर तेला पेक्षा भावही चांगला मिळतो.
कच्च्या मालापासून तेल आणि पेंढ तयार होते. तर शेतकरी वर्गात या पेंढीचा सुद्धा चागला खप होतो. म्हणजे यातून वेस्ट काहीच जात नाही. आणि तुम्ही इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकता. हा व्यवसाय करुन तुम्ही यातून लाखो रुपये महिना घेऊ शकता.
आटा पिठ आणि बेसन पीठ पॅकिंग
हा व्यवसाय रोजच्या जीवनात नित्योपयोगी आहे. बाराही महिने हा व्यवसाय करण्यासारख्या आहे. हा व्यवसाय तुम्ही कुठेही सुरू करु शकता. आणि हा व्यवसाय महिला पुरुष कोणीही करू शकता. गहू आटा पिठ घरगुती, हॉटेल, किंवा मोठमोठ्या ढाब्यावर वापरला जातो.
त्याची घरच्या घरी पॅकिंग करून बाजारात, परिसरात, मार्केट मध्ये जाहिरात करुन मार्केटिंग करु शकता. याची पॅकिंग 1किलो, 3किलो, 5किलो, 10किलो, 20किलो, 30किलो असी करु शकता. आणि तुम्ही तुमच्या नावाचा ब्रॅण्ड करुन तुमच्याच नावाचे लेबल लावू शकता.
बेसन पिठाला प्रचंड मागणी आहे.हरभरा बेसन पीठ, वटाण बेसन पीठ, चिंचुका बेसन पीठ, सोयाबीन बेसन पीठ, इतर या पिठाला हॉटेल व्यवसायात प्रचंड मागणी आहे. वडापाव सेंटर, घरगुती सणासुदीला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मागणी आहे.
हा vyavsay सुरू करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी. सर्वात प्रथम तुमच्या कडे पिठाची गिरणी असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट पॅकिंग मशिन, आणि गहु आणि हरभरा डाळ. आणि व्यवसायासाठी लागणारी जागा. घरबसल्या दोन ते चार जन हा व्यवसाय सांभाळून शकता. अशा प्रकारचा व्यवसाय सुरू केला तर आज जोमात चालतो आणि नफाही चांगला मिळतो.
चहा पावडर छोटा व्यवसाय मोठा नफा
भारतातील जवळपास सर्वच लोक चहा पितात.नुसती चहा पावडर विकुन लोक करोडपती झाले आहेत.तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरुन चहा पावडर विकायचा vyavsay सुरू करु शकता.
किंवा आठवडे बाजारात तुम्ही तुमचा चहा पावडर विक्रीचा स्टॉल लावू शकता.सात दिवसाचे सात बाजार फिक्स ठेवायचे.यातुन तुम्ही तुमचे कस्टमर जॉईन करु शकता.ग्राहक कायमचे धरुन ठेऊ शकता.
महत्वाची गोष्ट तुम्ही जी चहा पावडर विकणार आहात ती चांगल्या कॉलिटीची असावी, टेस्टेड, सुगंधी असावी ग्राहकांना आवडणारी असावी.भलेही तुम्हाला त्यातुन कमी नफा मिळाला तरी चालेल पण माल खराब नसावा.माल खराब असल्यास ग्राहक टिकून राहणार नाहीत.आणि हा vyavsay जरी आपल्याला छोटा वाटत असला तरी देखील हा व्यवसाय छोटा नाही.
या व्यवसायात चांगली मार्जींग आहे आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त काही भांडवलाचीही आवश्यकता नाही अगदी कमीत कमी गुंतवणूक करुन तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता.
खारे शेंगदाणे,फुटाणे, फिरता गाडा
एखांदी छोटीशी हातगाडी वापरुन तुम्ही शेंगदाणे फुटाणे विक्री चा व्यवसाय सुरू करु शकता. या व्यवसायात भरपूर नफा आहे. आणि हा व्यवसाय भारतभर प्रचलित आहे.
यासाठी लागणारा कच्चा माल सर्वत्र सहज उपलब्ध होतो.तुम्ही या vyavsay संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती करून घेऊ शकता.अगदी कमी खर्चात हा व्यवसाय उभा राहतो.
कटलरी व्यवसाय आठवडे बाजार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवलाची आवश्यकता नाही.अगदी 10 हजार रुपयात तुम्ही व्यवसाय सुरू करु शकता.
कटलरी हा vyavsay जरी आपल्याला किरकोळ वाटत असला तरी ह्या व्यवसायात एक ते दोन पट नफा आहे.पाच रुपयाची वस्तू दहा ते पंधरा रुपयाला विकली जाते.
हा धंदा नासका नाही पाच दहा दिवस हा व्यवसाय बंद राहीला तरी या वस्तू खराब होत नाहीत.मग त्यामध्ये अनेक वस्तू आहेत. टिकली, पावडर, आरसा, टाचण, पिना अशा अनेक वस्तू आहेत.
फिरते नाष्टा सेंटर
आज भारतात खवय्याचा विचार केल्यास असे दिसून येते की जवळ जवळ सर्वच जन जिभेचा लाड पुरवतात.
याप्रमाणे तुम्ही चटपटीत फिरते नाष्टा सेंटर हा व्यवसाय सुरू करु शकता.लोकांना फक्त जे हव आहे ते जर तुम्ही त्यांना दिले तर तुम्ही तुमच्या vyavsayat लवकरच प्रगती करु शकता.
कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो सुरवातीला तुम्ही जास्त पदार्थ बनवू नका एक दोनच पदार्थ बनवा पण चवदार चटकदार सर्व शब्द कमी पडतील असे तुम्ही बनवू शकता.
आणि एकदा का लोकांना तुमच्या नाष्टाची चटक लागली की मग हा vyavsay चांगल्या पद्धतीने चालवू शकता.हळुहळु तुम्ही यात वाढ करु शकता.आजकाल असे धंदे करणारेच सक्सेस आहेत.म्हणुन तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता आणि महिन्याला चांगली कमाई करु शकता.
आईस्क्रीम व्यवसाय सुरू करा
हा व्यवसाय चार ते सहा महिनेच असतो पण या चार सहा महिन्यात तुम्ही वर्ष भराची कमाई करु शकता.
कमी खर्चात हा vyavsay सुरू करता येतो.याला जास्त काही अट्टाहास करावा लागत नाही.खेड्या सारख्या ठिकाणी फिरुन दिवसाकाठी दोन तीन खेडे फिरुन, लग्न सराईत,यात्रेत, वेगवेगळ्या उत्सवाच्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करुन चांगला नफा मिळवू शकता. किंवा तुमच्याकडे भांडवल असेल तर तुम्ही आईस्क्रीम चा स्टॉल उभारु शकता. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. अमोल सारख्यांच प्रोडक्शन तुम्ही युज करु शकता. किंवा इतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता.
फिरुन भाजीपाला विकणे
आजचा जमाना हा अतिशय धावपळीचा जमाना आहे.इथे आज वेळेला फार महत्त्व आहे.भाजी मंडईत जाने आणि भाजीपाला आनने इतका वेळ कुणाकडे नाही.आज लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या आणि घरपोच असतील तर चांगलच आहे.
तुम्ही गल्लोगल्लीत फिरुन भाजीपाला विकू शकता.भाज्या हा vyavsay आणि अतिशय उत्तम मार्ग आहे.भाजी हा घटक मानसाच्या जीवनातला एक महत्वपूर्ण घटक आहे.
भाजीपाला घरात नसेल तर गृहिणीला घरातले दुसरे काही कामच सुचत नाही.म्हणुन ह्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही भाजीपाला हा व्यवसाय सुरू करु शकता.
घरोघरी जाऊन दुध देने
जवळ जवळ प्रत्येक घरी दुध हे लागतेच.दुधाशिवाय भागतच नाही.घरी साधा पाहुणा आला तरी चहा करता दुध लागते.आणि रोजच्या घरच्या चहालाही दुध लागतेच.
घरातील लहान मुलांना, कोणाला खाण्याची सवय असते, तर वेगवेगळ्या कारणांसाठी दुधाचा वापर केला जातो.म्हणून तुम्ही घरोघरी जाऊन दुध vyavsay सुरू करु शकता.
दुध व्यवसाय हा अतिशय जोमात चालतो आणि घरोघरी जाऊन विकलेल्या दुधाला दरही चांगले मिळतात.
शेतकर्याकडुन तुम्ही दुध खरेदी करु शकता किंवा शक्य असल्यास तुम्ही गाय म्हैस पालन करुन दुध व्यवसाय चालवू शकता.
रेडीमेड कपड्यांचा आठवडे बाजार करणे
रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय देखील एक चांगला मार्ग आहे.मानसाच्या जीवनातील महत्वाच्या तीन गरजा पैकी ही एक मुलभूत गरज आहे.कपडे सर्वांनाच लागतात.म्हणून तुम्ही रेडीमेड कपड्यांचा vyavsay सुरू करु शकता.
त्याकरता सुरवातीला तुमच्याकडे एक बाईक असणे गरजेचे आहे.बाईकवर गठ्ठा बांधायचा आणि सात दिवसांचे सहा आठवडे बाजार तुम्ही करु शकता.या व्यवसायात नुकसान नाही. दुसरी गोष्ट नफा चांगला मिळतो. होलसेल माल खरेदी करायचा आणि खर्च वजा करून तुम्हाला परवडेल अशा भावत विकणे.
वेगवेगळे मसाले बनवून विकणे
रोजच्या आहारात मसाल्याला विशेष महत्त्व आहे.मशाल्याशिवाय कोणतीच भाजी होत नाही.तुम्ही हा मसाला व्यवसाय सुरू करु शकता.
मशाल्यामध्ये अनेक प्रकार आहेत.वेगेवेगळ्या प्रकारचा मसाला vyavsay तुम्ही घरी तयार करु शकता.त्या करता लागणारे साहित्य,मसाल्याचे पदार्थ,मिरची हे सर्व तुम्ही महिना पंधरा दिवसाचा कच्चा माल एकदाच खरेदी करून ठेऊ शकता.
आणि जसा पाहिजे तशा प्रकारे तुम्ही तो तयार करून, वेगवेगळ्या बाजार, घरोघरी जाऊन, खेड्या पाड्यात जावून तुम्ही या मसाल्याची विक्री करु शकता. हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे आणि चांगली कॉलेटी दिली तर तुम्ही या व्यवसायात चांगली प्रगती करु शकता.
सीजनेबल फ्रुटचा व्यवसाय करणे
या व्यवसायात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता फक्त कोणत्या वेळी कोणता व्यवसाय करायचा याचा अभ्यास करून घ्यावा लागेल.
केळी च्या सीझनमध्ये केळी विकणे,पेरुच्या सीझनमध्ये पेरु विकणे, आंब्याच्या सीझनमध्ये आंबा विकणे,डाळींब, चिक्कु, सफरचंद, किंवा इतर फळे असतील ज्या त्या सीझनमध्ये त्या त्या फळांची विक्री करणे.
अशा प्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता आणि सीझन प्रमाणे व्यवसाय करण्यात ज्या त्या सीझनमध्ये त्या त्या फळाला दरही चांगले मिळतात आणि चांगला नफा तुम्हाला होऊ शकतो.
आम्हाला आशा आहे की वरील पैकी एखांदा फिरता vyavsay तुम्हाला आवडला असेल.मी फक्त फिरत्या व्यवसायाची थोडक्यात कल्पना मांडलेल्या आहेत.
जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही.तुम्ही जर ठरवलच तर वरील पैकी कोणत्याही एका व्यवसायात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
vyavsay : हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये करून जरूर कळवा आणि तुम्हाला आमच्याकडुन आनखीन कोणत्या व्यवसायाची उद्योगाची माहिती पाहिजे आहे का ते सुद्धा कळवा. आम्ही नक्कीच ती देण्याचा प्रयत्न करु…🙏
येथे क्लिक करा 👇