Swami Vivekanand jayanti 2024 : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष माहिती आणि त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

थोर विचारवंत Swami Vivekanand jayanti आज आहे.भारताचा स्वाभिमान आणि गौरवशाली जीवन, प्रेरणादायी विचार,व्यापक दृष्टी,त्यांनी जगाला दिलेला अनमोल संदेश.जगाच्या पाठीवर स्वतःच्या देशाची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंती निमित्त अधिक माहिती आपण पाहणार आहोत.

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त.

स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. Swami Vivekanand jayanti चा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना पुष्पहार आणि गुलाल समर्पित केला जातो तसेच त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते.

Swami Vivekanand jayanti निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात.सांस्कृतिक, धार्मिक, धर्मग्रंथ, क्रीडा, स्पर्धा, योगा अशा विविध. प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.तसेच शाळा, कार्यशाळा,महविद्यालय, ग्रामपंचायत, मंत्रालय, विद्यापीठ, विविध राज्यात त्यांची जयंती साजरी केली जाते.त्यानित्ताने विद्यार्थ्यांचे भाषणांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

स्वामी विवेकानंदांचा जन्म.

स्वामी विवेकानंदांचा जन्म दिवस १२ जानेवारी १८६३.वार सोमवार ( पौष कृष्ण सप्तमी) त्यांचा १९ व्या शतकातील कार्यकाळ.भारत कोलकत्ता सिमलापल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांना नरेंद्र दत्त असेही म्हणतात. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी.स्वामि विवेकानंदांचे शिक्षण हे कोलकत्ता मेट्रोपॉलिटन स्कुल, प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकत्ता या ठिकाणी झाले. त्यानी विद्यालयीन पदवी पुर्ण केली.

Swami Vivekanand jayanti : ते म्हणायचे शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण जीवनाचा विकास करते.शिक्षण असेल तर मनुष्य कुठेच नडत नाही.त्यांना संगीताची आवड तसेच संगीताचे ज्ञानही त्यांना होते.योगा अभ्यास आणि त्यामुळे बलदंड शरीरयष्टी त्यांना लाभली होती.

त्यांना लिखाण आणि वाचणाची भयंकर आवड होती.त्यांच धर्म ग्रंथांच वाचण होत, गीता, भागवत, रामायण, उपनिषद, तर्कसंग्रह वृत्ती, जिज्ञासू तरुण तडफदार, धर्म रक्षक, संन्यासी जीवन,उत्तुंग व्यक्तिमत्व, महान तपस्वी तत्त्वज्ञ, थोर विचारवंत, कुशाग्र बुध्दीच्या जोरदार एक आगळा आणि वेगळा ठसा त्यांनी उमटवला.एक वेगळ व्यासपीठ निर्माण करुन देशाला उच्च ठिकाणांवर नेऊन ठेवलं.

Swami Vivekanand jayanti : त्यांना आयुष्य फार कमी मिळाल.पण जेव्हढ मिळाल तेव्हढ्याच कालावधीत त्यांनी महान क्रांती केली.आणि इतिहासातल्या पाणावर सुवर्ण अक्षरांनी आपल नाव कोरुन ठेवलं.धर्म ग्रंथाचे गाढे अभ्यासक, धर्म निष्ठा, गुरु निष्ठा, देश प्रेम, तरुणांचे प्रेरणास्थान.शारीरिक, मानसिक,आध्यात्मिक, सामर्थ्यवान, आणि जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन. विविध गोष्टीने त्यांचे जीवन प्रेरणादायी ठरले आहे.

स्वामी विवेकानंद शालेय शिक्षण.

स्वामी विवेकानंद यांचे शालेय शिक्षण पुर्ण झाले.आणि त्यांचे वडीलांचे अकास्मित निधन झाले.लहान वयात वडिल गेले त्यामुळे स्वामी विवेकानंद पोरके झाले.वडिलांचा आधार नाहीसा झाला.आणि घरातली जबाबदारी त्यांच्यावर पडली. काळ कठीण होता.त्यांची मनोवृत्ती काय करावे काही कळेना असे झाले.पुढे स्वामी विवेकानंदांनी काही दिवस नोकरी केली.पण मनात मात्र वेगळच काही होत, नोकरीत मन लागत नव्हते. १८८० मध्ये ते एका पक्षाचे सदस्य झाले. 

Swami Vivekanand jayanti : धार्मिक वृत्तीचे स्वामी विवेकानंदांनी एकदा महर्षी देवेंद्र नाथांना प्रश्न केला की तुम्ही कधी देव पाहिला आहे का? त्यांच्या अशा प्रश्नाने महर्षी देवेंद्र नाथ चक्रावून गेले. त्यावेळी महर्षी देवेंद्र नाथांनी स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे घेऊन आले आणि त्यांच्या  प्रश्नाचे  उत्तर रामकृष्ण परमहंस यांनी दिले.उत्तर ऐकून स्वामी विवेकानंद प्रेरित झाले आणि  त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना गुरू करुन घेतले.

गुरु कडे राहुन गुरु सेवा, धर्म ग्रंथांचा अभ्यास, योगाची साधना, ध्यान धारणा केली. रामकृष्ण परमहंस त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि पुढे १८८५ दरम्यान रामकृष्ण परमहंस यांना कर्करोगाने ग्रासले पण स्वामी विवेकानंदांनी गुरु सेवा सोडली नाही.त्यामुळे गुरु शिष्याचे संबंध अधिक बळकट झाले.

धर्म परिषद १८९३ शिकागो ग्रंथ संमेलन.

ज्यावेळेला शिकागो या ठिकाणी १८९३ ला जागतिक धर्म परिषदेचे ग्रंथ संमेलनाचे आयोजन झाले त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि त्या परिषदेला गुरु आज्ञावरुन स्वामी विवेकानंद उपस्थित राहिले. त्यावेळी हिंदुंचा धर्म ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता हा सर्व धर्म ग्रंथांच्या खाली ठेवण्यात आला होता.त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी भाषणात सांगितले होते की हिंदुंचा धर्म श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली जरी वाटत असला तरी खालुन एक नंबरला आहे आणि त्याला जर बाजूला केले तर वरचे सर्व ग्रंथ ढासळतील.

Swami Vivekanand jayanti 2024 : म्हणून हिंदुंचा धर्म ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता सर्वात श्रेष्ठ आहे.त्यामुळे तो कुठेही ठेवा मधी ठेवला तर सर्वांना धरुन आहे सर्वात वरती ठेवला कलशस्थानी आहे. त्यावेळी सर्वांनी स्वामी विवेकानंदांचे हे चातुर्य पाहुण लोकांनी टाळ्या वाजवल्या. वैदिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक स्वामी विवेकानंद यांच्या व्याख्यानातून शांतता आणि सहिष्णुता दिसून येत होती. देश प्रेम , एकनिष्ठता, त्यामुळे स्वामी विवेकानंद लोकप्रिय झाले.

रामकृष्ण परमहंस मठाची स्थापना .

रामकृष्ण परमहंस यांच्या आवडीचा शिष्य कोण असेल तर स्वामी विवेकानंद.पण रामकृष्ण परमहंस शारीरिक आजाराने त्रस्त होते.अशा वेळी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांचा वारसा पुढे चालू ठेवला.कालांतराने रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले.त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी कोलकत्ता वराहनगर या ठिकाणी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

Swami Vivekanand jayanti : त्यानंतर त्यांनी बाहेरचे दौरे केले वेगवेगळ्या प्रांतात जाऊन व्याख्यानाच्या माध्यमातून धर्माचे कार्य केले.एक में १८९७ ला रामकृष्ण मिशनची स्थापना करुन त्रस्त आणि गोरगरिबांना आश्रा दिला.शाळा, विद्यापीठ, विद्यालय, स्थापना करत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ध्येयवादी होते, ध्येयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत चालत रहा असे त्यांचे विचार होते.

स्वामी विवेकानंद यांचा संपूर्ण जीवन प्रवास.

स्वामी विवेकानंद हे मुळचे पश्चिम बंगालचे रहिवासी त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला तर त्यांचे निधन ४ जुलै १९०२ रोजी झाले. म्हणजे त्यांना केवळ ३९ वर्षाच आयुष्य मिळाल. त्यांच संपूर्ण खर नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे आहे.पाश्चात्य संस्कृती आणि तत्वज्ञानाची सांगड त्यांनी घातली.

Swami Vivekanand jayanti : सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून सार निवडून काढले. शालेय शिक्षण पुर्ण झाले.२८७९ ला तक्रशास्र, इतिहास, तत्वज्ञान इतर विषयाचा अभ्यास झाला.त्यांचे B A शिक्षण १८८४ मध्ये पुर्ण केले.त्यांनतर वडील वारले सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली संसार करावा मुलबाळ हे त्यांच्या डोक्याबाहेरच होत.

Swami Vivekanand jayanti : पुढे रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली आणि गुरुच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळाली.सनातन हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.आणि रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी धर्माचा प्रचार सुरू केला.स्वामी विवेकानंद अतिशय बुद्धिमान होते.कोणतीही गोष्टीची परिपूर्ण माहिती करून घेणे हा त्यांचा गुण होता.

पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास.

त्यांची जी तळमळ होती ती काही वेगळीच होती. त्यांना खर्याअर्थाने आत्मज्ञानाची ओढ होती.स्व कल्याणा बरोबर ते जनकल्याणही चिंतित होते.पाश्चात्य तत्वज्ञानाची भुक त्यांना लागली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला.हिंदी मराठी, बंगाली, तामिळ, इंग्रजी, संस्कृत अशा विविध भाषा त्यांना येत होत्या, त्यांची स्मरणशक्ती अतिशय प्रबळ होती.

Swami Vivekanand jayanti 2024 : तांत्रिक आणि बौद्धिक ज्ञानाचा जीवनात फारसा प्रभाव पडत नसतो म्हणून त्यांनी आध्यात्मिक तत्वज्ञान आत्मसात केले. गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे राहून आत्मज्ञानाची प्रचिती आली.डोगरा एवढे ग्रंथ त्यांनी अभ्यासले आणि त्याचे विलक्षण लक्षण त्यांच्या चेहऱ्यावर उमटू लागले.त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या वागण्यातून प्रकाशाचे तरंग उमटू लागले.

या सर्व आध्यात्माचा अभ्यास करताना स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न मनात आला की जर सर्व जग त्या देवाच्या कृपेनेच चालते तर तो देव कसा असेल आणि तो कुठे असेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले पण समाधान कारक उत्तर त्यांना कुठेच मिळेना.

रामकृष्ण परमहंस यांची भेट.

१८८१ ला रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली आणि स्वामी विवेकानंदांना आता केव्हा गुरुला प्रश्न विचारीन असे झाले होते मात्र त्यांना राहवलेच नाही आणि स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना प्रश्न विचारला आणि उत्तराची वाट पाहू लागलो तेव्हढ्यात रामकृष्ण परमहंस म्हणाले अरे आत्ताच कसली घाई झाली तुला अजून बरेच काही करायचे आहे. मात्र तुझ्या प्रश्नाच उत्तर तुला नक्की मिळेल तेव्हा स्वामी विवेकानंदांना आनंद झाला रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना अनुग्रह दिला आणि स्वामी विवेकानंद गुरु सेवेत रममाण झाले.

Swami Vivekanand jayanti in marathi: रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीने स्वामी विवेकानंदांचे जीवन धन्य झाले. शिष्य गुरुच्या शोधत होताच मात्र गुरु देखील योग्य शिष्याच्या शोधात होते. बुद्धिमान, धाडसी, व्यक्तिमत्त्व असणारा शिष्य त्यांना हवा होता आणि स्वामी विवेकानंदांच्या रुपाने त्यांना मिळाला.आणि रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना शिष्य म्हणून स्वीकार केला.रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात राहून ध्यान, धारणा, तप साधना केली आणि स्वामी विवेकानंदांना परमोच्च ज्ञान मिळाले.

Swami Vivekanand jayanti : पुढे रामकृष्ण परमहंस यांना रोगाने ग्रासले त्यांच्या दुःख प्रसंगी स्वामी विवेकानंदांनी त्यांची साथ सोडली नाही. आणि रामकृष्ण परमहंस यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. १८८६ मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले त्यावेळी सर्व शिष्य परिवार दुःखाने व्याकुळ झाला. स्वामी विवेकानंदांना अति दुःख झाले. पुढे स्वामी विवेकानंदांनी १८९७ ला रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करु लागले.

स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध भाषण.

११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील आर्ट इन्स्टिट्यूटशनमध्ये जागतिक लेवलची संसद भरली होती.जागतिक कोलंबियन प्रदर्शनाचा तो एक भाग होता.त्यावेळी त्यांनी भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.त्यावेळी Swami Vivekanand यांना भाषण करण्यासाठी आमंत्रित केले गेले त्यावेळी स्वामी विवेकानंदांच्या मुखातून पहिले शब्द बाहेर पडले आणि त्या..

Swami Vivekanand jayanti २०२४ : शब्दांनी सर्वांच्या ह्रदयाचा ठाव घेतला.टाळ्यांचा कडकडाट झाला.स्वामी विवेकानंदांनी सुरवातच इथे जमलेल्या माझ्या तमाम बंधु आणि भगिनींनो या वाक्याने केली.पुढे स्वामीजींनी एक ते दोन तास भाषण केले पण सर्वत्र शांतता पसरली होती. सर्वांनी लक्ष पुर्वक भाषण ऐकले आणि या भाषणाने सर्व जण प्रभावित झाले.त्यांच्या विचारांने सर्व जण मोहित झाले.

Swami Vivekanand in marathi: भाषणाची संधी मिळाली म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करत आणि सहिष्णुता आणि सर्व धर्म समभाव, एकात्मता अशी प्रत्येकाची भावना असावी.राग, द्वेष कुणाचा करु नका,मतभेद करु नका, सर्वांना आनंदाने जगा आणि जगू द्या असा महत्वाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून सर्व जगाला दिला.आणि सर्वांच्या ह्रदयात घर करून बसले.त्या नंतर त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली आणि लाखो लोकांना त्यांनी प्रेरित केले.

१८९७ ला Swami Vivekanand भारतात परतले.तिथुनपुढे त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार भारतवासीयांठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले.अनेकांना त्यांचा वारसा लाभला. सामाजिक शैक्षणिक जीवनावर आधारित गोरगरिबांना आश्रय दिला.त्यांचे प्रेरणादायी विचार लोकांना जाग करीत होते.अफाट व्यक्तिमत्त्व आणि गडगंज ज्ञानाची साठवण त्यांच्याकडे होते.

स्वामी विवेकानंदांचे विचार.

Swami Vivekanand jayanti :

  • उठा जागे व्हा आणि संघर्ष करा ध्येयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका.
  • विश्वातील सर्व शक्ती तुमच्या जवळ आहे.आपण उगीचच आपल्या डोळ्यांवर हात ठेवून रडतो की सर्वत्र अंधार आहे.अरे प्रकाश तुझ्याच जवळ आहे जरा डोळे उघड.
  • तुमच्यात अंतरीक बदल झाले पाहिजेत,अंतरज्ञान वृध्दिंगत झाले पाहिजे, ज्ञान तुमच्या जवळच आहे फक्त दृष्टी नाही, स्वतः सारखा दुसरा गुरु नाही, आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःला जागे करा.
  • संघर्ष करा आणि जोखीम पत्कारा, विजयी झालात तर नेतृत्व करा आणि पराजय झाला तर मार्गदर्शन करा.
  • मी कुठेतरी कमी आहे हा भयंकर रोग आहे. तुम्ही आहात याची जाणीव करून घ्या, तुम्ही आहात तर हे जग आहे.

‘ Swami Vivekanand jayanti ‘

  • मोकळ्या मनाने काम करा.तुमच्यातल्या विचारांना चालना द्या, जिथपर्यंत तुमचे विचार तुम्हाला घेऊन जातील तिथपर्यंत जा.अववयांना हळूहळू सवय लावा, आणि तुमच्या विचारांना आत्मसात करा.
  • नेहमी खर बोला खर बोलने हाच सर्वात मोठा दागिना आहे.आणि हाच सर्वात मोठा धर्म आहे. जे खर आहे ते क्रांती करत आणि खोट तिथेच लुडबुड करीत बसत.
  • उभे रहा, धीट व्हा आणि दोष स्वतःच्या खांद्यावर घ्या. दुसर्याला दोष देत बसू नका, चिखलफेक कुणावर करु नका.
  • सेवा करा फळ नक्कीच मिळेल.ज्या प्रमाणे आई बाळाची काळजी घेते त्याप्रमाणे वृद्धांची सेवा करा.कोणतही काम निष्काम भावनेने करा मोबदला नक्कीच मिळतो.
स्वामी विवेकानंद यांचे निधन.

Swami Vivekanand jayanti : स्वामी विवेकानंद यांना अतिशय कमी आयुष्य मिळालं ते केवळ ३९ वर्ष जगले. पण त्यांनी अगदी कमी कारकिर्दीत फार मोठी क्रांती केली. ४ जुलै १९०२ रोजी स्वामी विवेकानंद हे अनंतात विलीन झाले.

हे पण वाचा 👇

राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती आणि त्या निमित्ताने त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Facebook

 

x