सर्व प्रथम सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण थोर संत. आणि महान कवी श्री संत Santaji jagnade maharaj punyatithi निमित्ताने जगनाडे महाराज यांचे संपूर्ण जीवन चरित्र पाहणार आहोत.चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी २०२४
महान संत संताजी जगनाडे यांची पुण्यतिथी ९ जानेवारी २०२४ रोजी आहे.संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष करून कीर्तन भजनाचे महाराष्ट्रभर साजरे केले जातात.
Santaji jagnade maharaj punyatithi : तेली समाजात त्यांचा जन्म झाला असून घरात विठ्ठल भक्तीचे बालकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यामुळे बालवयातच धार्मिक संस्कार त्यांच्यावर झाले आणि कीर्तन भजनाची आवड निर्माण झाली पुढे तुकाराम महाराजांची भेट झाली आणि जीवनाचा उद्धार झाला.त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लेखणाचे महान कार्य केले. तसेच तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्या पैकी ते एक होते.
श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म.
श्री संताजी महाराज जगनाडे हे श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे लेखक आणि टाळकरी म्हणून त्यांचे नाव आहे.श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ महाराष्ट्र पुणे मावळ प्रांतात सुदुंबरे या गावी झाला. त्यांचे वडील विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई विठोबा जगनाडे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
Santaji jagnade maharaj punyatithi 2024 : त्यांच्या घराण्यात श्री विठ्ठलाची भक्ती आणि वडीलो पार्जीत तेलाचा व्यापार, तेलाचा व्यवसाय, तेलाचा घाणा त्यांच्याकडे होता. वडील विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे संताजीवर बाल बुद्धीवर ते धार्मिक संस्कार झाले.आणि घरातल्या परमार्थीक वातावरणात ते वावरत होते.व्यवसाय अधिक परमार्थ कीर्तन भजनाची आवड त्यांना जडली.व्यवसायात वडीलांना मदत करीत करीत जवळपास कुठे कीर्तन भजनाचा कार्यक्रम असला की ते आवर्जून कीर्तन ऐकण्यासाठी जात असायचे.
जगनाडे महाराज यांचा बाल विवाह.
शाळा शिकत शिकत कालांतराने हळूहळू व्यवसायाच्या लिखापडीचे काम वडील त्यांना करायला लावायचे.लिहिता वाचता यावे इतकेच त्यांचे शिक्षण झाले.घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टींची कमतरता नव्हती.त्या काळात बाल वयातच मुला मुलीच लग्न करण्याची प्रथा होती.आणि अशातच संताजी जगनाडे महाराज यांचा विवाह वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच यमुनाबाई यांच्याशी झाला.
Santaji jagnade maharaj punyatithi : वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच संताजी जगनाडे महाराज यांच्यावर प्रपंचाची जबाबदारी पडली आणि ते संसाराच्या बेडीत अडकले.आणि त्यांचा संसार अगदी थाटामाटात सुरू झाला. आता त्यांचे लक्ष संसार, वडिलोपार्जित व्यवसाय आणि अधूनमधून जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे कीर्तन भजनाला जायचे. आणि हळूहळू त्यांच्या वृत्तीत बदल होऊ लागले. त्यांना प्रपंचाची ओढ कमी झाली आणि परमार्थाची आवड निर्माण झाली.कदाकाळी कीर्तन नसले की त्यांना बेचैन व्हायचे.
त्या काळात एक धगधगता सुर्य.
त्या काळात सर्वत्र समाजात अशांततेच वातावरण पसरल होत.अडाणी समाज विनाकारण अंधश्रद्धेला बळी पडू लागला, समाजातील प्रख्यात पंडित, समाजाच दाईत्व करणारे त्यां काळचे समाज कार्यकर्ते गोरगरीबांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचे आणि ते म्हणतील तोच कायदा आणि ते म्हणतील तीच सुव्यवस्था, दुसर्याच वर्चस्व त्यांना सहन होत नसायचे.
Santaji jagnade maharaj punyatithi : आणि त्याच काळात एक धगधगता सुरू या समाजात वावरत होता. त्या धगधगत्या सुर्याला या अडाणी समाजाची आणि त्यांच्यावर आलेल्या कठीण परिस्थितीच्या ज्वाळा सहन होत नव्हत्या, उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हत्या तोच धगधगता सुर्य म्हणजे संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यावेळी तुकाराम महाराजांचे ठिकठिकाणी कीर्तन व्हायचे.
Santaji jagnade maharaj punyatithi :आणि तुकाराम महाराज कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करायचे.चुकीच्या रुढी परंपरेवर तुकाराम महाराज सडकावून कठोर शब्दात प्रहार करायचे. कीर्तन आणि अभंगाच्या माध्यमातून समाज कार्य करत करत विठ्ठल भक्तीचे महत्त्व जगाला समजावून सांगायचे.असे कार्य तुकाराम महाराजांचे सुरु होते.
संताजी जगनाडे महाराज गुरु भेट.
संताजी महाराज हे तुकाराम महाराज समकालीन संत होते. त्यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांची किर्ती सर्वत्र पसरली होती.अशातच एक दिवस तुकाराम महाराज संताजी जगनाडे महाराज यांच्या सुदुंबरे या गावी कीर्तनाला गेले असता या कीर्तनाला संताजी जगनाडे महाराज आले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांचे संपूर्ण कीर्तन अगदी जीव लावून ऐकले आणि त्यांच्या ते मनातच बसले.तुकोबारायांच हे कीर्तन ऐकून संताजीवर मोठा प्रभाव पडला.
Santaji jagnade maharaj punyatithi : व त्यांनी संसाराचा त्याग करण्याचे ठरवले पण त्यावेळी श्री तुकाराम महाराज यांनी संताजींना सांगितले की संसारात राहूनही परमार्थ करता येतो. त्यासाठी संसार सोडण्याची काहीच आवश्यकता नाही – संसारी असावे असोनी नसावे | भजन करावे वेळोवेळा || आणि या गुरु उपदेशाने संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचे टाळकरी म्हणून सामिल झाले.तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकर्या पैकी ते एक होते.
श्री तुकाराम महाराज अभंग गाथा.
तुकाराम महाराजांचे ज्या ज्या ठिकाणी कीर्तन होतील त्या त्या ठिकाणी संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या सोबत राहू लागले.आणि सोबत राहता राहता संताजी जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लिखाण करु लागले.तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडले एक एक शब्द अभंग रुपाने ते टिपून ठेऊ लागले.अस करता करता चार कोटी अभंगाची गाथा तयार झाली.संताजी महाराज यांचा कालखंड १६२४ ते १६८८ असा आहे.
Santaji jagnade maharaj punyatithi : पण त्याच काळात सालोमालो नावाचे स्वतःला संत म्हणून घेणारे ते तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या नावावर करायचे म्हणजेच तुकाराम महाराजांच्या अभंगाचे शेवटचे चरण तुका म्हणे काढायचे आणि त्या ठिकाणी सालोमालो म्हणे अस जोडायचे.आणि त्यावेळी समाज त्यांना मानू लागला पण ज्या वेळेस सत्य समाजाच्या नजरेत आले तेव्हा समाज त्यांचा धिक्कार करु लागला.
अभंग गाथा पाण्यात बुडवला.
आणि तुकाराम महाराजांच्या नावाचा जय जय कार करु लागले. पण तुकाराम महाराजांचे हे वर्चस्व समाजातील त्या काळच्या ब्राह्मण पंडितांना सहन होत नसायचे. त्याकाळचे शास्राचे गाढे अभ्यासक रामेश्वर भट यांना तुकाराम महाराजांची किर्ती कानावर आली आणि रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना अभंग करण्यास विरोध केला. सुद्रांना वेद अध्ययनाचा अधिकार नाही. त्यांना ईश्वरा प्रयत्न जाण्याचा अधिकार नाही.
Santaji jagnade maharaj punyatithi : म्हणून तुकाराम महाराजांचा छळ केला आणि त्यांचे अभंग इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवण्यात आले त्या वेळी श्री तुकाराम महाराजांनी चौदा दिवस इंद्रायणी नदीच्या काठावर धरने धरले आणि पांडुरंगाचा धावा केला त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंगाने तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यावर तारुण वर आणले असी ही तुकोबारायांच्या अभंगाची गाथा आहे.
गुरुचा धावा आणि अंतिम काल.
आणि महान संत संताजी महाराज जगनाडे यांच्या बद्दल बोलायच झाल तर ते जातीने तेली होते. पण त्यांनी जे कार्य केले ते अतिशय महान आहे. आज आपण श्री संत तुकाराम महाराज यांचे जे अभंग पाहतो ते कुणामुळे असतील तर ते संताजी महाराज जगनाडे यांच्या मुळेच आहेत.त्यांनी लिखाण केले म्हणून ते अभंग आज आपण पाहतोय.
Santaji jagnade maharaj punyatithi : ज्या वेळी तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन झाले त्यावेळी तुकाराम महाराज संताजींना भेटून गेले नाहीत. ही खंत मनात होती म्हणून संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराज यांचा धावा केला पण तुकाराम महाराज आले नाहीत. संताजीची ही गुरु भेटीची शेवटची इच्छा होती. शेवटी तुकाराम महाराजांना वैकुंठाहून यावे लागले त्यावेळी संताजी जगनाडे महाराजांनी आपला देह ठेवला असी अख्यायिका आहे.
संताजी जगनाडे महाराज यांचे अभंग.
Santaji jagnade maharaj punyatithi :
१) सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो | आवघ्या जनांनो सावध व्हारे ||१|| काळाचिये उडी पडेल बा जेव्हा | सोडविणा तेव्हा माय बाप ||२|| संतु तेली म्हणे सावध कोण झाला | देहासहीत गेला तुकावाणी ||३||
२) तुजशी ते ब्रम्हज्ञान काही आहे | किंवा भक्तीमाय वसे पोटी ||१|| काय तुझ्या मागे कोण तुज सांगे | काय ते अभंग जाणितले ||२|| घाणाची घेऊनी बैसलासी बुधा | जन्म पाठिमागा का गेला ||३|| तुका म्हणे सर्व सांग तु मजला | सांगतो तुजला संतु म्हणे ||४||
३) भक्ती ते माऊली माझे नच पोटी | जाणे उठा उठी देवराया ||१|| भक्ती या भावाची करुनिया लाट | आलिंगितो तीस रात्रंदिन ||२|| संतु म्हणे आपुल्या कृपेचा प्रसाद | द्यावा वारंवार मजलागी ||३||
Santaji jagnade maharaj punyatithi :
४) मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा | मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर ||१|| मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव | मज मागे निद्रा आहार सांगे ऊमा सारंगधर ||२|| किर्तीविणा कांही मागे ते राहिना | संतु सांगे खुणा तुकयाशी ||३||
५) ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग | देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ||१|| त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही | प्राण जातो यमापाशी दुःख होते ते मायेशी ||२|| संतु म्हणे असा अभंग गाइला | पुढे चालू केला देहावरी ||३||
६) सगुण हा घाणा घेऊनि बैसलो | तेली जन्मा आलो घाणा घ्याया ||१|| नाही तर तुमची आमची एक जात | कमी नाही त्यात अणुरेनू ||२|| संतु म्हणे जाती दोनच त्या आहे | स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ||३||
७) जन्मलो मी कुठे सांगता नये काही | निरंजन निराकार आधार नव्हता ठायी ||१|| तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही | जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ||२|| असाच हा जन्म पाठी मागे गेला | पुन्हा नाही आला कदा काळी ||३|| संतु म्हणे वनमाळी | चुकवा जन्माची हे पाळी ||४||
८) आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडियला मन पवणाचा ||१|| भक्ती हो भावाची लाट टाकियली | शांती शिळा ठेविली विवेकावरी ||२|| सुबुद्धीची वढ लावोनी विवेकास | प्रपंच जोखड खांदी घेतीयेले ||३|| फेरे फिरो दिले जन्मवरी | तेल काढियेले चैतन्य ते ||४|| संतु म्हणे मी हे तेल काढियेले | म्हणुनी नाव दिल संतु तेली ||५||
Santaji jagnade maharaj punyatithi 2024 :
९) सद्गुरूवाचोनी दाखविना कोणी | संसार मोहनी पडली असे ||१|| संसार करुनी पाचरी ओळखिल्या | उद्दरोनी नेल्या तुकोबाने ||२|| संतु म्हणे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने || पाचरी बसविल्या घाण्यामाजी ||३||
१०) मनोभक्तीची करुनी लाट | गुरुकृपेचा बसविला कंठ ||१|| आंगावरी घेऊनी नेट | दाखवीली वैकुंठीची वाट ||२|| अशी ही संतु तेल्याची लाट | कळीकाळाची गांड फाट ||३||
११) मन मोहाची करुनी खुटी | लाठीस ठोकली बळकटी ||१|| फिरे गरगरा लाठी भोवताली | ध्यान जाईना लाठीवरी ||२|| संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी | पहा उठा उठी अगोदर ||३||
Santaji jagnade maharaj punyatithi
१२) खुटीनें प्रताप कोणास दाखवीला | दशरथ राजाला आणि नारदाला ||१|| दशरथाचा अंत खुंटीनेच केला | नारद तो झाला नारदीच ||२|| संतु म्हणे अशिही खुंटी ती मोलाची | विश्वाच्या तोलाची एकटीच ||३||
१३) अशिया खुंटीला धरु नये हाती | करिल ती माती सर्वत्रांची ||१|| असेच खुंटीने गोपीचंदन फसविले | धातुचे पुतळे जळोनिया गेले ||२|| संतु म्हणे माझ्या घाण्याची ही खुटी | सद्गुरुवांचोनी सोडवीना मिठी ||३||
१४) क्षमा शांती दया नराचिये देही | दुष्ट तया काही करीत नाही ||१|| जरीही कोणाशी राग फार आला | तरी तु धरीरे शांती फार ||२|| संतु म्हणे शांती ज्यांनी सोडीयेली | तेथे उडी आली यमाजाची ||३||
Santaji jagnade maharaj punyatithi :
१५) जन्मोनिया इहलोकी काय केले | पुष्कळच ते धन मिळविले ||१|| आणिक मिळविले वतनवाडिशी | रांडा आणि पोरा आवघ्याशी ||२|| संतु म्हणे तुम्ही मागे ते सरावे | मरावे परि किर्तीरुपे उरावे ||३||
१६) संसार करीता जन्म वाया गेला | काळ न्याया आला आवचित् ||१|| सोडी सोडी यमा मज क्षणभरी | घरातील ठेवा दाखवूदे तरी ||२|| संतु म्हणे यम कसा तो सोडविल | नाडील आवघ्याशी सावध व्हारे ||३||
१७) आम्ही तो आहोत या देशीचे वाणी | आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्ही ||१|| तुका विकी सौदा आणिक मिरची | संतु विकी तेल लागुनी चुरशी ||२|| तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे | तुकयाशी खुण पटली असे ||३||
Santaji jagnade maharaj punyatithi :
हे देखील पहा.👇