Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा/संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा निमित्त संपुर्ण माहिती

नमस्कार बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आणि त्र्यंबकेश्वर यात्रा.निवृत्तीनाथ महाराजांनी कोणत्या साली समाधी घेतली आहे तसेच समाधी घेऊन किती वर्ष झाले,निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा किती तारखेला आहे व यात्रा किती तारखेला असते.sant nivruttinath maharaj yatra 2024 समाधी सोहळा यात्रा कशा स्वरूपाची असते, या यात्रेला साधारण कधी सुरुवात होते त्या निमित्त संपूर्ण थोडक्यात माहिती

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024

निवृत्तीनाथ महाराज कार्यकाळ.

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई यांचे थोरले बंधू आणि गुरु देखील होते.वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी.विठ्ठलपंत कुलकर्णी हे मुळचे आपेगावचे आणि रुक्मिणी या आळंदी देवाची सिद्धोपंताची कन्या. विठ्ठलपंत हे आळंदीला आले त्यांच व्यक्तिमत्त्व पाहुण त्यांचा रुक्मिणीसी विवाह झाला पण त्यांचे संसारात मन रमेना म्हणून त्यांनी संन्यास घेतला आणि काशिला निघून गेले पण विठ्ठलपंत हे सांसारिक असल्याचे त्यांच्या गुरुंना समजले तेव्हा रामानंद स्वामींनी विठ्ठलपंतांना संसारी परत पाठवले.

sant nivruttinath maharaj yatra 2024 : विठ्ठलपंत परत आळंदीला आले आणि सुखाचा संसार करु लागले.पुढे त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, आणि मुक्ताबाई असे ही चार भावंडे.त्यात निवृत्तीनाथांचा जन्म इ.स.१२७३ शके ११९५ आळंदी देवाची सिद्धबेट या ठिकाणी झाला.पुढे समाजाने त्यांना वाळीत टाकले आणि संन्यास्याची पोर म्हणून त्यांना हिणवू लागले. समाजाने त्यांचा नितांत छळ केला.पुढे ही चार भावंडे आणि आई वडील. त्र्यंबकेश्वर ला तिर्थभ्रमण करण्यासाठी आले असता त्या ठिकाणी घनदाट अरण्यातून मार्ग क्रमण करीत असता व्याघ्राच्या डरकाळीने त्या भांवडाची पळापळ झाली आणि त्यात निवृत्तीनाथाचा रस्ता चुकला पुढे ते रस्ता शोधत शोधत पुढे वाट काढत होते तेव्हढ्यात त्यांना एक गुफा लागली आणि निवृत्तीनाथ त्या गुफेत सिरले.

निवृत्तीनाथांना गुरु उपदेश.

निवृत्तीनाथ महाराज ज्या गुहेत सिरले त्या गुहेत गहिनीनाथ वास्तव्याला होते.निवृत्तीनाथ गहिनीनाथा समोर येऊन उभा राहिले तेव्हा गहिनीनाथ निवृत्तीनाथांना म्हणू लागले आलास बाळ मीच त्या वाघाला तुझ्याकडे पाठवले होते तुला बोलावून आणण्याकरिता किती वर्षांपासून मी तुझी वाट पाहत होतो. गहिनीनाथ म्हणाले आज खर्याअर्थाने मी धन्य झालो. गहिनीनाथांनी निवृत्तीस जवळ बोलावले आणि मस्तकावर हात ठेवून गहिनीनाथांनी संपूर्ण मागची कहाणी निवृत्तीनाथांना सांगितली.भगवान शंकरापासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, आणि पुढे निवृत्तीनाथ अशी ही एक गुरु एक शिष्य परंपरा. गहिनीनाथांच्या सान्निध्यात राहून निवृत्तीनाथांनी साधना केली.गुरुकडे राहून ज्ञान ग्रहण केले.आणि परत आळंदीला आले…

sant nivruttinath maharaj yatra 2024 : आणि तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिले इथपर्यंत एक गुरु एक शिष्य नाथ परंपरा होती पण पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ही एक गुरु एक शिष्य नाथ परंपरा मोडीत काढली आणि आपल्या जवळ असलेल ज्ञान सर्वांना घेता याव म्हणून संपूर्ण विस्वाला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान वाटुन टाकल.ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील गिता सर्वसामान्यांना कळावी म्हणून गिता या ग्रंथाचे मराठी भाषेत विश्लेषण केले.गिता अलंकार नाम ज्ञानेश्वरी | आणि ब्रम्हानंद लहरी प्रगट केली.

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी.

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे धाकटे बंधू ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीस्त झाले त्यानंतर सोपानदेव आणि शेवटी मुक्ताबाई यांच्या समाधी नंतर निवृत्तीनाथांनी आळंदी सोडली आणि नाशिक त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी पर्वताच्या सान्निध्यात जेष्ठ वद्य एकादशी ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली.

sant nivruttinath maharaj yatra 2024 : निवृत्तीनाथांनी फार मोठे कार्य केले. आई वडिलांचे देहांत प्रायश्चित,समाजाने त्यावेळी त्यांना खुप त्रास दिला पण त्यांनी नेहमी जगाचे कल्याणच चिंतिले.आणि तोच खरा साधू असतो तोच खरा संत असतो.त्यांच वर्णन कराव तेव्हढ थोडच आहे. श्री निवृत्तीनाथांचे चरणी | शरण एका जनार्दननी ||

निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा.

६ फेब्रुवारी २०२४ वार मंगळवार एकादशी रोजी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आहे.या वर्षी निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत.नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे.त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थान कमिटीच्या वतीने केले जाते.कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, जागर, संगीत भजन, आठ दिवस अगोदर ग्रंथ पारायण मोठ्या प्रमाणात होत असतात.

sant nivruttinath maharaj yatra 2024 : आलेले भाविक कुशावर्त गोदावरी स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन निवृत्तीनाथांचे दर्शन घेतात.निवृत्तीनाथांच्या दर्शनाने धन्य होतात.२१ किलो मीटर ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा करतात. या सोहळ्याला देशभरातून साधु, संत, योगी, तपस्वी, फडकरी, वारकरी, भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. विविध संतांच्या पालख्या सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होतात.वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या मुक्काम दर मुक्काम करीत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येतात.मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.परिसरातील भाविक या यात्रेत सहभागी होतात. भाविक यात्रेत खरेदीचा आनंद घेतात.आणि एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी.काही द्वादशी नंतर माघारी परततात तर काही भाविक त्रयोदशी नंतर.असा हा सोहळा दर वर्षी पार पडतो.

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024′

 

हे देखील पहा 👇

 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि संपूर्ण जीवन चरित्र सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Facebook

 

 

x