20/12/2023 वार बुधवार आज Sant Gadge baba पुण्यतिथी. गाडगे बाबा हे थोर समाजसुधारक व स्वच्छतेचे महत्त्व जगाला सांगणारे, अंधश्रद्धेला बळी पडू नका स्वावलंबी जीवन जगा असे अनेक संदेश त्यांनी जगाला दिले तर जानून घेऊयात त्यांच्या विषयी सविस्तर…!
कोण होते गाडगे बाबा.
संत गाडगे बाबा हे थोर समाज सुधारक होते साधे राहणीमान आणि उच्च विचार हा त्यांचा मुख्य बाणा. गावोगाव फिरून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे पण त्या अगोदर संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करणे. ते म्हणायचे तुमच्या कष्टाचे अन्न आणि मी ते कसे सेवन करु. म्हणून मी अगोदर तुमच गाव झाडून स्वच्छ करणार तेव्हाच मला तुमच अन्न खाण्याचा अधीकार आहे तो पर्यंत नाही.
Sant Gadge baba : हातात झाडू आणि डोक्यावर फुटक खापर. त्याच झाडूने गाव झाडून काढायचे आणि त्याच डोक्यावरच्या खापरात लोकांनी वाढलेले अन्न सेवन करायचे.अंगावर फाटके कपडे, फाटके धोतर आणि फाटकाच सदरा तोही मळालेला असा त्यांचा पेहराव.
गाडगे बाबांचा जन्म आणि कार्य.
संत गाडगे महाराज यांची ओळख लोक त्यांना गाडगे बाबा या नावाने ओळखायचे. त्यांचा जन्म महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी २३ फेब्रुवारी १८७६ साली झाला. संत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर तर वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आणि त्यांच्या आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे आहे. त्याच बालपण मामांच्या गावी गेल.
Sant Gadge baba : संत गाडगे बाबांना लहान पणापासूनच समाज कार्याच वेड होत. किर्तन करणे आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे हा त्यांचा दिनक्रम होता. गावात गेलकी पहिल गाव झाडून काढायच त्यांच्याकडे बघून लोकही त्यांना झाडू लागायचे. आणि यातून ते देशाला स्वच्छतेचा संदेश द्यायचे.
अगोदर आपण करायचे आणि नंतर लोकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगायचे.रात्रभर देवळात, गावात जिथे जागा मिळेल तिथे थांबायचे, किर्तन, भजन, करायचे, आणि सकाळ झाली की पुन्हा दुसऱ्या गावाचा रस्ता धरायचे.
संत गाडगे बाबांचे कीर्तन
समाज प्रबोधन करत करत ते गावोगावी फिरायचे. किर्तन करायचे आणि त्या माध्यमातून समाजातील रुढी परंपरेचा अभ्यास करुन. चुकीच्या रुढी परंपरेला विरोध करायचे.अंधश्रद्धेला बळी पडू नका. चुकीच्या रुढी परंपरा बंद करा. स्वावलंबी जीवन जगा. कुणाचा द्वेष करु नका. कुणाचा क्रोध करु नका. कुणाची हिंस्सा करु नका.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण जीवन चरित्र अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
Sant Gadge baba : समाजातील दांभिक पणा आणि चुकीच्या रुढी परंपरेवर ते खडसावून टिका करायचे. अडानी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगायचे. चारित्र्यहीन जीवन जगू नका. गोरगरीब, दिनदलीत समजातील अज्ञान, अंधश्रद्धा, स्वच्छतेचे महत्त्व, समाज सुधारणा समाजप्रबोधन,सुखा समाधानाचे जीवन जगा असा अनमोल संदेश संत गाडगे बाबांनी जगाला दिला आहे.असे महान कार्य गाडगे बाबांनी केले.
एक आदर्श व्यक्तिमत्व संत गाडगे बाबा.
संत गाडगे बाबा हे भारतखंड महाराष्ट्र राज्यातील एक प्रखड व्यक्तीमत्व होते. म्हणून त्यांना राष्ट्रसंत गाडगे बाबा असेही म्हटले जाते. धर्म गुरु. संत थोर समाजसुधारक अशा त्यांचा परिचय ते २३ फेब्रुवारी १८७६ ते २० डिसेंबर १९५६ या कालावधीत त्यांनी प्रचंड प्रमाणात समाज कार्य केले.
Sant Gadge baba : साधे राहणीमान आणि उच्च विचार असे त्यांचे राहणीमान होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला.हातात झाडू आणि डोक्यावर फुटक खापर, अंगावर फाटका सदरा आणि धोतरही फाटकेच तेही मळालेले, पण मनाने मात्र अतिशय स्वच्छ. हेतू अत्यंत निर्मळ, आणि कार्य अतिशय महान.
Sant Gadge baba : गरिबीत जगावे कसे, शिक्षणाचे महत्त्व अडाणी लोकांना पटवून दिले. काही वेळा त्यांनी सामाजिक न्यायासाठी लढा लढवला, कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अस्पृश्यता नष्ट केली, ढोंगी पणा त्यांना आवडत नसायचा.
Sant Gadge baba : अंधश्रद्धा, अज्ञान, पाखंडी पणा, मानसातला देव ओळखा, व्यसनांच्या आहारी पडू नका स्वावलंबी जीवन जगा. सावकाराकडून कर्ज काढू नका.असे अनेक संदेश त्यांनी जगाला दिले.त्यानी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी घालवले.
संत गाडगे बाबा जीवन कार्य
कीर्तनातून कीर्तनाला आलेल्या लोकांना चालू कीर्तनात ते प्रश्न करायचे आणि त्या प्रश्नातूनच समाजात जनजागृती करायचे. यासाठीच गाडगे महाराजांनी कीर्तनाचा मार्ग निवडला. आणि त्यांचे उपदेशही अगदी साध्या सोप्या शब्दात असायचे.
Sant Gadge baba :समाजाच्या अगदी सहज गळी उतरतील असेच प्रश्न असायचे. अज्ञान, दुर्गुण, दोष, चोरी करु नका. सावकाराकडून कर्ज काढू नका. व्यसनांच्या आहारी पडू नका. देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करु नका. जातीभेद नष्ट करा.असा पद्धतीने ते समाजप्रबोधन करत असायचे.
खर्या देवाला ओळखा खोट्या देवांच्या नादी लागू नका.
अंधश्रद्धेला बळी पडलेल्या समाजाला देवा बद्दल चुकीची धारणा असलेल्या समाजात जन जागृती करुन. मुर्तीच्या देवाची पूजा करण्यापेक्षा मानसातच देवाला शोधा.अगोदर मानसातला देव समजून घ्या नंतर दगडातला देव शोधा. खरा देव मानसात आहे. तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || असा संदेश गाडगे बाबांनी अखंड जगाला दिला.
Sant Gadge baba : गाडगे बाबा नेहमी भजन करायचे त्यांच्या आवडीच भजन आजही प्रसिद्ध आहे. ते म्हणायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला… गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अस भजन ते करायचे.
Sant Gadge baba : समाज कार्य करत असतांना लोकांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालये उभारली. दिन, दुबळे, अनाथ, अपंगांसाठी गाडगे बाबांनी आपल संपूर्ण जीवन खर्ची केल.
संत गाडगे बाबांचा समाजाला आग्रह
संत गाडगे बाबा ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी म्हणायचे. बापाहो शाळा शिका..विद्या हेच सर्वात मोठ धन आहे. ज्याले विद्या नसेल त्याले गरिबीचे चटके सहन करावे लागतात. त्याले खटार्याचा बैल म्हटले जाते.
sant gadge baba : बापांनो लेकाहो आतातरी सुधारा… आणि तुमच्या लेकराले शिक्षण द्या. पैसा नसेल तर एकवेळ जेवनाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा. बायकोला लुगड कमी पैशाच घ्या. पण मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. असे गाडगे बाबांनी समाजात जनजागृती करण्याचे महान कार्य केले. गाडगे बाबांच्या विचारांनी समाजात जनजागृतीचे महान कार्य केले आणि समाजालाही त्यांचे विचार पटत होते.
संत गाडगे बाबांचे विचार
संत गाडगे बाबांना समाजाच्या व्यथा सहन होत नव्हत्या ते नेहमी म्हणायचे भुकेल्या जीवाला अन्न, ताहानेनी व्याकुळ झालेल्यांना पाणी आणि उघड्यानागड्यांना वस्त्र. अशिक्षितांना शिक्षण, रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गोरगरिबांच्या मुला मुलींच्या लग्नाला सहकार्य केल्याशिवाय राहू नका.
sant gadge baba : समाज हाच आमच्यासाठी देव आहे. आणि हीच आमची देव पुजा आहे. हीच ज्ञानाची जोत त्यांनी समाजात पसरवली. जनहितार्थ त्यांनी त्यांच संपूर्ण जीवन समाजकार्यातच घालवल.
संत गाडगे बाबा परिश्रम
संत गाडगे महाराज जीवन जगत असतांना त्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. गाडगे महाराजांच बारा वर्षे अज्ञातवासात आयुष्य गेल.पोटाची पर्वा न करता, अंगावरच्या कपड्यांची तमा न बाळगता, अंगावर चिंध्या आणि मस्तकी पागोटे नाहीतर उलटे खापर.
Sant gadge baba हातात झाडू. खेडोपाडी जाऊन गावची गाव स्वच्छ करायचे.त्याच बरोबर समाज कार्य करत करत लोकांची मन देखील स्वच्छ करण्याचे काम गाडगे बाबांनी केले.
गाडगे बाबा जीवन प्रसंग
एकदा समाज कार्य करत असतांना त्यांच कीर्तन चालू होत. आणि चालू कीर्तनातच त्यांना निरोप आला की बाबा तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावला आहे. आणि जेव्हा गाडगे बाबांना हे समजले की आपला एकुलता एक मुलगा मरण पावला आहे. तेव्हा कीर्तन चालूच होत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला… गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.
Sant gadge Baba : त्यावेळी बाबांच्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब न येऊ देता बाबांनी सांगितले की अरे… किती मेले कोट्यानकोटी काय रडू एकासाठी. बाबा म्हणाले आरे जगात किती जन्माला येतात आणि किती मरतात.त्याच कर्म त्याच्या संगे.आणि पुढे कीर्तन चालूच राहिले.
असा मोठा त्याग त्यांच्या ठिकाणी होता. साधू हा जगाच्या हितासाठीच जीवन जगत असतो. त्याच्या जीवनात कितीही संकटं आले तरी त्या संकटातून बाहेर कसे पडायचे असा संदेश साधू जगाला देत असतो.तोच खरा साधू आहे. तोच खरा संत आहे.
संत गाडगे बाबा देहावसान
संत आणि समाजसुधारक अशा दोन्हीही वृत्ती त्यांना शोभणार्या होत्या. कारण संत त्यांनाच म्हणतात. जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा | देव तेथेची जानावा || रंजल्या गांजल्यांच्या दिन दुबळ्यांच्या व्यथा ओळखणारे ते होते. म्हणून खरोखर ते संत आणि समाजसुधारक म्हणाल तर त्यांनी त्यांच संपूर्ण जीवन समाजकार्यातच घालवल होत.
Sant Gadge baba : संत गाडगे बाबांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर वडगाव जिल्हा अमरावती २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. आणि त्यांनी दिलेल्या संदेशातून त्यांच्याच स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रकल्प २००० ते २००१ पासून सुरू करण्यात आला आहे.
AFQ ( sant gadge baba)
१) संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे?
समाज त्यांना गाडगे बाबा या नावाने ओळखत होता. संत गाडगे बाबा असेही म्हटले जायचे, तर त्यांचे मूळ नाव हे डेबुजी झिंगराजी जानोरकर असे आहे तर त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे आहे. तरी पण ते संत गाडगे बाबा या नावानेच प्रसिद्ध आहेत. थोर समाजसुधारक, प्रबोधनकार संत गाडगे बाबा.
२) संत गाडगे महाराजांचा जन्म कुठे झाला?
थोर समाजसुधारक संत गाडगे महाराजांचा जन्म दिनांक २३ फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. आणि त्यांचे बालपण हे मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. आई वडिलांची परिस्थिती अत्यंत गरिब त्यामुळे ते १२ वर्ष मामांच्या गावीच राहिले. आणि लहानपणापासूनच त्यांना समाजातील रुढी परंपरा.रितीरीवाज दिसत होते आणि त्यांना ते पाहवत नव्हते. आणि ते विचार करायचे हे असे का, आणि याच गोष्टींचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. पुढे त्यांनी थोर समाज कार्य केले.
३) संत गाडगे महाराजांनी कोणती चळवळ सुरू केली?
संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज सेवा आणि समाजातील रुढी – परंपरा, रिती -रिवाज, अज्ञान, अंधश्रद्धा, आणि अस्पृश्यता नष्ट व्हावी. असा सामाजिक लढा त्यांनी लढवला. मुलांना शिक्षण घेता यावे. समाजातील अज्ञान नाहीसे व्हावे अशा प्रकारची चळवळ संत गाडगे महाराजांनी सुरु केली आहे.
४) संत गाडगे महाराजांचे कार्य काय होते?
गोरगरिबांची दुर्दशा ओळखून त्यांनी त्यांच्यासाठी पुणे ,आळंदी, देहू, पंढरपूर, नाशिक या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून शाळा उभारल्या. ज्यांना राहायला घर नाहीत जे रस्त्यावर जीवन जगतात त्यांच्यासाठी अनाथाश्रम बांधले.अपंग आणि गोरगरिबांसाठी अन्नछत्र सुरू केले.गोहत्या थांबवण्यासाठी त्यांनी विदर्भात गोरक्षक केंद्र उभारले.असे अनेक महान कार्य त्यांनी केले आहे.
५) संत गाडगे बाबांचे प्रारंभिक जीवन?
त्यांच्या जीवनातील वाटचाल ही समजातील अज्ञान अंधश्रद्धा रूढी परंपरा रितीरिवाज याकडे पाहण्याची त्यांची पद्धत आणि त्यांचाच त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम. डोळ्याला समाजातील या गोष्टी पाहवत नव्हत्या आणि मग त्यांनी जे या गोष्टींच्या विरोधात प्रहार सुरू केले आणि मग कठोर टिका करत लोकांनी सरळ ऐकले नाही तर मग त्यांच्यांच भाषेत त्यांना समजावून सांगणे. त्यांचा जन्म हा धोबी कुटुंबात झाला आणि त्यांनी ते समाज कार्य केले आहे ते अविस्मरणीय आहे.
६) संत गाडगे बाबा विचार काय होते?
संत गाडगे बाबांचे विचार हे अत्यंत साधे आणि सोपे होते. समाजाला ते जो उपदेश करायचे तोही अगदी साध्या सोप्या भाषेत असायचा, व्यसन करु नका, कर्जबाजारी होऊ नका, देव धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्यांची हत्या करु नका. जातीभेद नष्ट करा, अस्पृश्यता नष्ट करा, देव दगडात नसून तो माणसांत आहे असे अनेक विचार ते कीर्तनाच्या माध्यमातून समाज कार्य करत होते. असे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांनी त्यांच संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केल.
Sant Gadge baba
|| गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ||
हे पण वाचा 👇
कार्तिकी एकादशी संजीवन समाधी सोहळा येथे वारकऱ्यांची मांदियाळी २०२३