Pandharpur wari 2024 : आतुरता पंढरीच्या वारीची | वारी म्हणजे काय? का करावी वारी? काय होत वारी केल्याने?

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 29 जून 2024 रोजी आहे. 30 जून ला माऊलींचा पालखी सोहळा पुणे च्या दिशेने वाटचाल करणार आहे.आषाढी pandharpur wari म्हटल की वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. वर्षभर वारकरी वारकरी वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. केव्हा वारीला जाईल आणि केव्हा एकदाचा विठूरायाला डोळे भरून पाहील अशी मनामध्ये ओढ निर्माण झालेली असते.शरीर आणि मन पवित्र करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वारी.वारी म्हणजे काय? वारी काय करते?  का करावी वारी? हा लेख खास तुमच्यासाठी एक वेळ शेवटपर्यंत नक्की वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल.चला तर मग पाहूयात आषाढी वारी निमित्त बरेच काही.

आतुरता आषाढी वारीची.

आषाढी वारी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. वारकऱ्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण म्हणजे वारी.वारीला जायच म्हटल की वारकऱ्यांच्या चेहर्यावर एक आगळावेगळा आनंद पहायला मिळतो. होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी || ज्या प्रमाणे वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेले असतात त्याच प्रमाणे देवाला सुद्धा वारकऱ्यांच्या भेटी ओढ लागलेली असते.

pandharpur wari 2024 : तो सुद्धा भक्तांची वाट पाहत उभा आहे.वाट पाहे उभा भेटीची आवडी – देवाला भक्ताशिवाय आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही.झाली का माऊली वारीची तयारी, चला माऊली वारीला. चला माऊली चला माऊली हे शब्द कानावर पडले की मन अगदी भारावून जात. माऊलींच्या जय घोषात वारकरी नाहून जातात.

लाऊनी मृदंग श्रृती टाळ घोष | सेऊ ब्रम्ह रस आवडीने || वारकरी आणि वारी या दोघांचे घनिष्ठ संबंध आहेत. वारी हा वारकऱ्यांचा सण समजला जातो. वारीचा आनंद म्हणजे तो शब्दात वर्णन करण्यासारखा नाही. जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठेच नाही.

pandharpur wari 2024 date : हा सुख सोहळा स्वर्गी नाही.स्वर्गीचे अमर ईच्छीताते देवा | मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा || स्वर्गातले देव सुद्धा या सोहळ्याची अपेक्षा करतात असा हा सोहळा आहे.याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय वारीचा आनंद कळणार नाही. म्हणून एकदा तरी आषाढी वारी करावी.

वारी म्हणजे काय?

वारी म्हणजे अनेक विकारावर वार करते त्याचे नाव वारी, चिंता वारी दुःख निवारी त्याचे नाव वारी, जेथे श्री आणि पुरुष असा भेदभाव उरत नाही त्याचे नाव वारी. सर्वांच्या मुखात एकच शब्द माऊली… माऊली… माऊली त्याचे नाव वारी.वारीला घरुन निघतांना वारकरी घरादाराची चिंता करत नाहीत त्याचे नाव वारी.वारकऱ्यांच्या आनंदाचा क्षण म्हणजे वारी. सुख दुःखाचा आठव नाठव म्हणजे वारी.

pandharpur wari : जाईन गे माये तया पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया || ज्या प्रमाणे मुलगी माहेरी जाण्यासाठी आतुर झालेली असते कधी माहेरी जाईल आणि केव्हा एकदाची आईला भेटेल अगदी त्याच प्रमाणे वारकऱ्यांच्या मनाची अवस्था झालेली असते त्याचे नाव वारी.नाही पोटाची चिंता नाही झोपेची चिंता त्याचे नाव वारी. नाही पावसाची चिंता नाही उन्हाची चिंता त्याचे नाव वारी.

का करावी वारी?

का करावी वारी? काय शिकवल वारीने आम्हाला? काय दिल वारीने आम्हाला.आषाढी पंढरपूरची वारी काय करते तर वारी आपल्याला बरच काही देऊन जाते.जन्म आणि मरणाचा फेरा चुकवते म्हणून करावी वारी.देवाची भेट घडवते म्हणून करावी वारी. मानसाला आत्मनिर्भर बनवते म्हणून करावी वारी.

Ashadhi pandharpur wari : असेल त्या परिस्थितीत राहायला शिकवते म्हणून करावी वारी.जीवनाचा अर्थ शिकवते म्हणून करावी वारी.दुसर्यावर विसंबून न राहता स्वतःची काम स्वतः करायला शिकवते म्हणून करावी वारी.वारी स्वातंत्र्य शिकवते. वारी मानुसकी शिकवते. वारी प्राणी मात्रावर प्रेम करायला शिकवते.

मानसातला देव ओळखला शिकवते वारी. निसर्गावर प्रेम करायला शिकवते वारी.आनखिन बरच काही शिकवते आम्हाला आषाढी वारी.म्हणून मानसाच्या जन्माला आला आहेस. ईतका सुंदर मनुष्य जन्म मिळाला आहे ना मग मरणाच्या अगोदर एक तरी आषाढी pandharpur wari आणि कार्तिकी आळंदी वारी केलीच पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन वारी केली नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. सुखालागी करीसी तळमळ | तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ||१|| मग तू अवघाची सुखरुप होसी | जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ||२||

पंढरीचे वारकरी कोण?

जे खरे वारकरी असतात त्याला हाडाचे वारकरी म्हणतात. जे महिन्याचे वारकरी असतात त्यांना निष्ठावान वारकरी असे म्हणतात.जे कधीच आळंदी पंढरपूरची वारी चुकवत नाहीत ते वारकरी. एखाद्या वर्षी वारी घडली नाही तर त्यांना मरणाच्या पलीकडे दुःख होत ते वारकरी. जे कधीच एकादशी चुकवत नाहीत ते वारकरी.

pandharpur wari : आषाढी कार्तिकी पंढरीची वारी | साधन निर्धारी आण नाही ||हरिपाठ, कीर्तन, भजन, आषाढी कार्तिकीची वारी हे वारकऱ्यांच्या जीवनातील नित्य संध्या आहे. वारी केल्याने शरीर पवित्र होत तसेच मन देखील पवित्र होत.म्हणून जीवनात एकदा तरी करावी वारी.

!! अभंग !!

पंरीसी जारे आल्यांनो संसारा | दिनाचा सोयरा पांडुरंग ||१||

वाट पाहे उभा भेटीची आवडी | कृपाळू तातडी उतावीळ ||२||

मागील परिहार पुढे नाही शीन | झालिया दर्शन एक वेळ ||३||

तुका म्हणे नेदी आनिकांचे हाती | बैसला तो चित्ती निवडेना ||४||

pandharpur wari 2024

चला हो पंढरीसी जाऊ | जीवाच्या जीवलगा पाहू ||

!! जगात भारी पंढरीची वारी !!

हा पण लेख वाचा तुम्हाला नक्कीच आवडेल 👇

 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदी यात्रा या वर्षी लाखो वारकरी माऊलींच्या सोहळ्याला उपस्थित गजबजून गेली आळंदी.

Facebook

 

 

x