संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सध्या जय्यत तयारी आळंदी मध्ये सुरू आहे.आषाढी वारी 2024 या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या रथाच्या बैलजोडीचा मान कुणाला मिळाला आहे.त्याच प्रमाणे या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या बैलजोडीची निवड करण्यात आलेली आहे.त्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते.कुणाला हा मान दिला जातो आणि Palakhi Sohala 2024 चा मान कुणाला मिळाला आहे ते आपण या लेखात पाहणार आहोत.
संत ज्ञानेश्वर महाराज 2024 बैलजोडीचा मान.
आषाढी वारीचा सोहळा म्हटल की अनेक साधू संतांच्या पालख्या आषाढी वारीला पंढरपूरला दर वर्षी जात असतात. दर वर्षी बैलजोडीचा मान हा वेगवेगळ्या कुटुंबाला मिळत असतो. ज्याला हा मान मिळतो तो अगदी आनंदाने या सेवेचा मानकरी होतो.ज्याला हा मान पाहिजे त्याला नंबर लावून अनेक वर्षे वाट पाहून या सेवेचा लाभ मिळतो. कुऱ्हाडे, घुंडरे, वहीले, भोसले, रानवडे आणि बरकडे या कुटुंबांना हा मान मिळत असतो त्या पैकी या वर्षी कुऱ्हाडे कुटुंबाला रथाच्या बैलजोडीचा मान मिळालेला आहे.
आषाढी वारी 2024 या वर्षी बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परीवाराकडून 7 अर्ज संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडे आले होते.तर या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी या वर्षी माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान कुऱ्हाडे कुंटुंबीयांच्या हौस्या आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे.Palakhi Sohala 2024 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चांदीच्या रथाला या वर्षी आळंदी गावचे वस्ताद श्री शहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बैलजोडीला हा मान मिळालेला आहे. हौस्या आणि बाजी असे या बैलांचे नाव आहेत.
Palakhi Sohala 2024 : तब्बल 25 वर्षांनी हा मान मिळाला असल्यामुळे कुऱ्हाडे परीवारात आनंदाच वातावरण आहे.बाजी आणि हौस्या ही बैल जोडी आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत आळंदी असा हा प्रवास करणार आहेत. माऊलींच्या रथासाठी खास कर्नाटक राज्यातून ही बैल जोड बोलावून घेतली आहे अस शहादू बाबुराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. तब्बल साडे सहा लाख रुपये किंमतीची ही बैल जोड खरेदी केल्याचे म्हटले जाते आहे.
हौस्या आणि बाजी या वर्षाचे मानकरी
Palakhi Sohala 2024 श्री शहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने हौस्या आणि बाजी ही बैल जोडी माऊलींच्या रथाचे मानकरी ठरले आहेत.या वर्षाचा बैलजोडीचा बहुमान शहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या कुटुंबीयांना मिळाल्याने कुऱ्हाडे कुटुंब आनंदाने या सेवेसाठी तत्पर असुन माऊलींच्या सेवेचा मान मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजतात.
Palakhi Sohala 2024 : या बैलांची वेळेच्या वेळी व्यवस्थित निगा राखली जाते. त्यांच्या खानपानाची योग्य ती काळजी घेतली जाते. तसेच डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाते. रोज सकाळी चालण्याचा, धावण्याचा सराव करुन घेतला जातो. बैलांना कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घेतली जाते.अशी अनेक पद्धतींनी बैलांची काळजी घेतली जाते.
बैल जोडीची निवड कशी केली जाते?
आषाढी वारी 2024 रथासाठी बैल जोडीची निवड स्वतः संस्थान समितीच्या वतीने भेट देऊन पाहणी केली जाते. यात निवडीचे काही निकष ठरवले जातात. उंची जवळपास सहा फूट वशिंडापर्यंन्त असावी.बैलाचे वजन साडेपाचशे ते सहाशे किलो, बैलांचा रंग पांढरा शुभ्र, शेपटीचा गोंडा, लांबसडक असावी,
Palakhi Sohala 2024 : बैलांचा रुबाबदारपणा, शिंग उंच टोकदार, डोळे, शेपूट, बैलाची चाल, गरीब, मवाळू, शांत स्वभावाचा, शरीर यष्टी, तसेच पशू वैद्यकीय अधिकार्याचा दाखला पाहीला जातो. बैलाची भार वाहून नेण्याची क्षमता, मारका बैल नसावा कारण संपूर्ण पालखी सोहळा हा गर्दीतून वाट काढत चाललेला असतो त्यामुळे शांत स्वभावाची बैलजोडी निवडली जाते.
संत तुकाराम महाराज रथाची बैल जोडी 2024.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाच्या बैल जोडीची निवड करण्यात आली आहे.देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत देहू असा हा पालखीचा प्रवास असणार आहे. संत तुकाराम महाराज रथाच्या बैलजोडीचा मान या वर्षी लोहगावच्या श्री सुरज खांदवे परिवाराचे हिरा आणि राजा तर नांदेड गावचे निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला या वर्षाचा मान मिळाला आहे तसेच रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्याचा मान टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या आणि संद्या या बैलजोडीला Palakhi Sohala 2024 चा मान मिळालेला आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या रथाच्या बैलासांठी तब्बल 26 बैल जोड्यांची मागणी होती त्यापैकी 3 बैल जोड्यांची निवड करण्यात आलेली आहे. तीन पैकी दोन बैलजोड्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासाठी तर एक बैल जोड नगार्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख व संस्थान कमिटी विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, व भानुदास महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.
Palakhi Sohala 2024 या वर्षाचे मानकरी.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली जि. पुणे येथील सुरज ज्ञानेश्वर खांदवे यांच्या हिरा आणि राजा या बैलजोला रथ ओढण्याचा बहुमान मिळालेला आहे. तर नांदेड ता. हवेली जि. पुणे. गावचे निखिल सुरेश कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीचा अर्ज होता. त्याचप्रमाने पालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्याचा मान टाळगाव चिखलीचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या आणि संद्या या बैलजोडीला मान देण्यात आला अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.
Palakhi Sohala 2024 : आषाढी वारीची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. देहू संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याची पुर्व तयारी सुरू आहे. देशभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोय-सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली आणि त्यावेळी वारकऱ्यांच्या सुखसुविधेसाठी सर्व विभागीय अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातून येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीच गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा 👇