अर्धवट आरक्षण नको सरसगट द्या मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारकडून दिरंगाई होत असल्याने राज्यात मराठा आंदोलन वेगळ वळण घेत असल्याच दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारला धारेवर धरत मराठा समाज एकवटल्याचे पहायला मिळत आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे त्यामुळे सकल मराठा समाज पेटुन उठला आहे.
Manoj jarange patil news : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन महिन्यापासून सुरू असुन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण दोन टप्प्यात देऊ असी भुमिका मांडली मात्र सरकारच्या या भुमिकेला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुर्णपणे विरोध दर्शविलेला आहे.
Manoj jarange patil news आम्हाला अर्धवट आरक्षणाची लालुच दाखवू नका. नुसत एका विभागासाठी आरक्षण मी मान्य करणार नाही. द्यायचच असेल तर सरसगट आरक्षण द्या. आम्हाला अर्धवट आरक्षण नको. सरसगट आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा कुणबी नोंदीच्या आधारे ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी आहेत सरकार त्यांनाच कुणबी प्रमाण पत्र देण्याच्या तयारीत मुख्यमंत्र्यांची घोषणा असल्या तरी हे मनोज जरांगे पाटील यांना हे मान्य नाही.
उपोषणाचा आजचा सातवा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आजचा सातवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. बोलायलाही त्यांना आवसान राहीलेल नाही. त्यांची प्रकृती पुर्णपणे असक्त अवस्थेत दिसत असल्याने त्यांना भेटायला आलेल्या
मराठा बांधवांनी त्यांना पाणी पिण्यास आग्रह धरला मात्र त्यांनी चुचवले की मला आग्रह करु नका माझ्या पेक्षा माझ्या समाजाच भवितव्य महत्वाच आहे. पण जास्तच आग्रह आणि प्रेमा पोटी मनोज जरांगे पाटील यांना दोन घोट पाणी पिण्यास भाग पडले.
Manoj jarange patil news मराठा समाजाला आरक्षण द्यायचच असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाण पत्र देऊन आरक्षण देण्यात यावे. अर्धवट आरक्षण किंवा फक्त मराठवाड्या पुरत म्हणाल तर ते मी मान्य करणार नाही. तसा GR आला तर तो फाडून टाकण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पुर्णपणे विरोध दर्शविला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली
राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा कालावधी वाढत चालला आहे. दिवसेनदिवस त्यांची प्रकृती खालावली चालली आहे. त्यांची तब्येत जास्तच बिघडत चालली असून यावरुन मराठा बांधव आक्रमक होतांना दिसत आहेत.
मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी वाटत असून सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. या सर्व भावना लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्यात यावे अन्यथा सरकारला हे महागात पडू शकते.तसेच राज्यभरात त्याचे काही प्रमाणात उद्रेक होतांना दिसत आहेत.
परंतु Manoj jarange patil यांनी सांगितले की मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेत चालू आहे.आपल्याला जो उद्रेक होतांना दिसत आहे त्याच्या पाठीमागे त्यांचेच कार्यकर्ते असावेत. आमच शांततेत चालू असलेल आंदोलन त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न असावा अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तसेच मराठा बांधवांनाही जरांगे पाटलांनी ताकीत केली की जाळपोळ कोणीही करु नका. उग्र आंदोलन करु नका. मी समाजाच्या शब्दाच्या पुढे नाही आणि तुम्हीही शब्दाच्या बाहेर जाऊ नका. आरक्षणासाठी आत्महत्या कोणी करु नका. तुम्ही जर उद्रेक केला तर मला उपोषणावेळी त्रास होतो.
उग्र आंदोलन नको नाहीतर मलाच निर्णय बदलावा लागेल
मला उग्र आंदोलनाची एकही बातमी माझ्या कानांवर येता कामा नये अन्यथा मलाच वेगळा निर्णय घ्यावा लागेल. सरकार कस आरक्षण देत नाही तेही मग तिसर्या टप्प्यात कळेल असाही इशारा जरांगे पाटलांनी केला.
Manoj jarange patil news : गेले अनेक वर्षांपासून आपला समाज अन्याय सहन करत आलेला आहे. आपली मुल मुली नोकरी पासून वंचित राहीलेली आहेत.इथुन मागे त्यांच भविष्य धुळीस मिळाल आहे. त्याच विचाराने हा लढा सुरू आहे. आपली मुल शिक्षण घेऊन अशिक्षित राहीलेली आहेत. त्याच एकमेव कारण आपल्याला आरक्षण नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.
Manoj jarange patil news : सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत ५० दिवस झाले तरी देखील सरकार यावर कोणताच ठाम निर्णय घेण्यास तयार होत नाही. आज देऊ उद्या देऊ अस करत करत ५० दिवस होऊन गेले तरी सरकार कोणतीच तडजोड करत नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. टाळाटाळी करत आहे.असा संभ्रम निर्माण झाला आहे.
टिकणार आरक्षण हा काय प्रकार आहे
मराठा समाजाला न्यायालयात टिकणार आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा समाजाला शब्द. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत.
आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैज्ञानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या समितिचा अहवाल उद्या.
Manoj jarange patil news : मंत्रीमंडळ बैठकीत स्विकारला जाईल. समितीने आतापर्यंत १ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ नोंदी तपासल्या असून मराठा कुणबीच्या नोंदी ११ हजार ५३० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासतांना उर्दू आणि मोडी लिपीतील नोंदी आढळल्या त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे काम सुरू आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देत पदाचा राजीनामा
अशातच अनेक आमदार खासदार यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याकारणाणे मराठा समाज आक्रमक होतांना दिसत आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी हेमंत गोडसे यांनी केली आहे.
Manoj jarange patil news : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा विधान सभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.लक्ष्मण पवार हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आमदार आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजीनामा दिला असल्याची माहिती.
Manoj jarange patil news : मराठा आरक्षणापायी अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. वेळ पडली तर राजीनामा द्यायला तयार आहोत. मतदान तुम्ही केल आहे, तुम्ही सांगाल तिथे उभा राहायला तयार आहे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया.
मनोज जरांगे पाटलांनी पुर्णपणे समाजासाठी वाहून घेतल आहे. त्यांचा त्याग साधा नाही. हे वाखाणण्याजोगे आहे. आमचा त्यांना पुर्णपणे पाठींबा आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर यावर उपाय योजना करुन आरक्षण मार्गी लावावे अस झिरवळकर म्हणाले.
राज्यात मराठ्यांचा आक्रोश मोर्चा
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच दुसऱ्या टप्प्यातल उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. तर राज्यात काल काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Manoj jarange patil news : बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ झाल्याची घटना घडली. तसेच राजकीय वर्तुळात याचे काही प्रतिसाद उमटत आहेत. शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनीही सरकारला इशारा दिला आहे.
आमदार सुहास कांदे म्हणाले की कुठल्याही जातीबद्दल बोलनार नाही मात्र मराठा समाजाच्या मुलावर अन्याय होत आहे. शिकूनही शेवटी शेतीच करावी लागत असेल तर मराठा तरुणांनी काय करायचे. म्हणून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे.
Manoj jarange patil news : मुख्यमंत्र्यानी बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात चांगलीच चर्चा होईल. जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच उपोषण सुटत नाही आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गावात जाणार नाही.वेळ पडली तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. असी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी दिली आहे.
हे सरकार निव्वळ निर्दयी
राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाज हा शांततेत आंदोलन करतोय पण सरकारने मराठा समाजाचा अंत पाहण्याच ठरवलय. सरकारने डोळे मिटून नुसती बघ्याची भूमिका घेत असतांना वाटत आहे. त्यामुळे मराठा समाज आता संतप्त झालेला दिसत आहे.
Manoj jarange patil news : राज्यात विविध ठिकाणी जाळपोळ, आडवाआडवी, तोडफोड, गावबंदी, रास्ता रोको, असे अनेक प्रकार पाहण्यास मिळत आहेत. हा थांबावा वाटत असेल तर सरकारने तातडीने याकडे दुर्लक्ष न करता आरक्षण संदर्भात निर्णय घ्यावा मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशीच मराठा बांधवांची मागणी आहे.
तिथे मणिपूर जळतोय इथे महाराष्ट्र पेटतोय आणि मोदी भाषण करुन जातायत?
ज्यांना अपात्रतेची भिति आहे तेच राजीनामे देत आहेत. आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिले तरी त्यांना काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदी मेरी माटी मेरा देश म्हणत असतील आणि देशातल्या माणसाला काही किंमत नसेल तर त्या नुसत्या जाहीरातीला काहीच अर्थ नाही.
Manoj jarange patil news : तिथे मणिपूर जळतय इथे महाराष्ट्र पेटतोय आणि नरेंद्र मोदी नुसत पोपळ भाषण करुन जातात असा उद्धव ठाकरे यांचा सरकारला जोरदार टोला.
स्वराज्य जळत असतांना यांना प्रचार महत्वाचा वाटतो.
काल मुख्यमंत्र्यानी उपसमितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते ही खेदाची बाब आहे. एका उपमुख्यमंत्र्याला डेंग्यू झालाय आणि दुसरे उपमुख्यमंत्री पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला रवाना झाले. महाराष्ट्र जळत असतांना यांना प्रचार महत्वाचा वाटतो का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.लोकशाही धोक्यात असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करतय असही ते म्हणाले.
केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा न्याय मिळालाच पाहिजे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा गडकरी, कराड, गोयल, यांनी हा मुद्दा केंद्रात मांडावा. यावर केंद्रात तोडगा
Manoj jarange patil news : आरक्षणावर मार्ग काढा आम्ही तुमच्या सोबत. मी मनोज जरांगे पाटील यांनाही विनंती करतो की तुम्ही टोकाच पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या मानसाची या राज्याला देशाला गरज आहे.मी राज्य सरकारला आवाहन करतो की आरक्षणावर लवकरात लवकर मार्ग काढा आम्ही तुमच्या सोबत आहोत. उद्धव ठाकरे यांचा इशारा.
छत्रपती शाहू महाराज यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
Manoj jarange patil news : मराठा आरक्षणाला छत्रपती शाहू महाराज यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आपल्या लढ्याला हत्तीच बळ मिळाल आहे. छत्रपती शाहु महाराज म्हणाले की आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग आता तर आम्हाला कुणाला भिण्याच कारणच नाही. अस मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटलांचा समाजाला शब्द
महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. हा आमचा शब्द आहे. आरक्षण घेणार तेव्हाच शांत होणार आज छत्रपती शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच हे वक्तव्य आहे.
Manoj jarange patil news : मनोज जरांगे पाटील म्हणतात की माझी सरकारला आनखीन विनंती आहे की विशेष अधिवेशन बोलावून समितिचा अहवाल घ्यावा. २००१ च्या कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. आधार म्हणून तुम्हाला ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या पुरेशा आहेत.
आता कोणताही बहाणा करून टाळा टाळी करु नये. समाज येडा नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा. अर्धवट आरक्षण आम्ही मान्य करणार नाहीत.
राज ठाकरे यांच मनोज जरांगे यांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भात मनोज जरांगे यांना पत्र पाठवले आहे. तुम्ही तात्काळ उपोषण थांबवाव असी विनंती या पत्रातून केली आहे.
Manoj jarange patil news : इथली राजकीय व्यवस्था भंकस आहे त्यांना तुम्ही ज्या विषयाच्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्या कोणत्याही गोष्टीच यांना काहीच घेणंदेणं नाही. उपोषण सोडा तब्येतीची काळजी घ्या आपल्याला आनखीन बरच काही करायच आहे. अस आवाहन राज ठाकरे यांनी केल आहे.
मराठा आरक्षण शमविण्यासाठी पडद्या मागून राजकारण
मराठा आरक्षणाला हिंसक वळण लावण्यामागे वेगाने हालचाली सुरू होतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उपसमितीची पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तात्काळ कुणबी प्रमाण पत्र देण्यात येतील असी घोषणा करण्यात आली होती.
मात्र त्यानंतरही मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरुच ठेवले महाराष्ट्रातील सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र मिळाल पाहिजे असी मागणी लावून धरली आहे.
Manoj jarange patil news : या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला . मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळ जवळ २४ मिनिट चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांना तब्येतीचीही काळजी घेण्यास सांगितले तर मनोज जरांगे पाटलांनी आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाहीत. आम्हाला सरसगट आरक्षण द्या अस या प्रसंगी जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
हा आरक्षणाचा मुद्दा आता जास्तच शिगेला पोहोचला आहे त्यामुळे आता सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे लवकरात लवकर मराठा आरक्षणचा प्रश्न सरकारने मार्गी लावावा असीच सगळ्यांची मागणी आहे.
हे देखील वाचा 👇