सर्वांच्या प्रतिक्रियेनंतर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया – Manoj Jarange Patil Maratha Arakshan 2024

नमस्कार बांधवांनो काल सरकारने Maratha arakshan सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.मराठ्यांचे लाडके संघर्ष योद्धा Manoj Jarange Patil Maratha Arakshan  मुंबई वरुन अंतरवाली सराटी येथे पोहचल्यावर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.महिलांनी त्यांना ओवाळून औक्षण केले.आणि त्यानंतर त्यांनी समाजाच्या मनातल्या शंका दुर होण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…!

जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली की तुम्ही छगन भुजबळ आणि सदावर्ते काय म्हणाले याकडे लक्ष देऊ नका.भुंकणारे भुंकतच असतात.सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्षच देऊ नका.त्यांचा उद्योग आणि धंदाच तो आहे.सरकारनी सर्वांसी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मग त्यात वकील, जज्ज, घटना तज्ज्ञ, सर्व मंत्रीमंडळ, मग त्यात सर्वच आले. इतक्या सहजा सहजी हा निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे कोणी काहीही म्हणू द्या तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : तुम्ही उल्हास बापट साहेबांची प्रतिक्रिया बघा, तुम्ही उज्ज्वल निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा, अस मनोज जरांगे पाटील म्हणाले पुढे ते म्हणाले की भुजबळ आणि सदावर्ते म्हणजे निव्वळ वाया गेलेल्या केश आहेत.हे म्हणजे सडलेल्या भाजीपाल्यासारखे आहेत आणि यांच आपण मनावर घेतल तर आपल्या लेकरांच वाटोळ होईल.हे जर अस म्हणत असतील तर अस समजा आपल आता पक्क आहे.समाज काय मुर्ख नाही, अभ्यासक काय वेडे नाहीत, आणि वकिलांनी एका एका शब्दांचा कीस पाडलाय रात्र रात्र जागून.त्यामुळे कोणी काहीच चिंता करण्याच काम नाही. कायदा पारित झाला झाला यात काही बदल होणार नाही तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

च्यालेंज कोणीही करू द्या.

च्यालेंज कोणीही करू शकतो पण निर्णय पक्का असल्यामुळे कोणी काहीही केल तरी त्याला काहीच होणार नाही.विरोध करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण समजा माझी जमीन माझ्या नावावर आहे सातबार्यासह पण एखांदा म्हटला की ही जमीन माझी आहे तर तो न्यायालयापर्यंत जाऊ शकतो तक्रार करु शकतो.त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. समजा नुसती जमीन आहे पण ती जमीचा सातबाराच त्याच्या नावावर नाही मग मात्र त्याला धोका आहे. इथ जमीनीचा सातबारा पक्का असल्यामुळे काही चिंता करण्याच काम नाही.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : सग्यासोयर्यांची आद्य सुचना आणि त्याचा आद्यदेश आला त्याच आता कायद्यात रूपांतर होणार आहे. त्यामुळे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला आहे.वळवळ करण्याची गरज नाही आणि आता यांच कुणाच ऐकण्याची आवश्यकताच नाही अस Manoj Jarange Patil म्हणाले.आणि मराठ्यांनी यांच केव्हा ऐकावा आणि मराठे यांच ऐकून घेणारही नाहीत.

जरांगे पाटलांचा पाच महिन्याचा संघर्ष.

अंतरवाली सराटी येथे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की या पाच महिन्यांच्या संघर्षाने मराठा समाजाला बरच काही दिल आहे.बाकीच राहुद्या सद्या किमान 57 लाख मराठ्यांच्या आयुष्य आज उज्ज्वल झाल.त्यांना त्यांच्या हक्काची भाकरी मिळाली.क्युरेटी पीटिशनमुळ जर ते ओपण कोर्टात आले तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठ्यांच कल्याण होणार आहे.57 लाख नोंदी पैकी एका नोंदीच्या आधारांवर चार पाच जणांना जरी आरक्षण मिळाल तरी दोन कोटी मराठे आत्ताच आरक्षणात गेले समजा अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : सग्यासोयर्यांच्या माध्यमातून एकही maratha arakshan पासून लांब राहत नाही.पाच महिन्यांचा संघर्ष मराठ्यांच्या आयुष्याचे कल्याण करुन गेला.आणि हा संघर्ष माझा ऐकट्याचा नाही तर माझ्या संपूर्ण मराठा बांधवांचा आहे. मराठा बांधवांच्या एकीमुळेच हे शक्य झाल आहे. मी एक निमित्त आहे.विरोधक आणि हितचिंतक हे दोन्हीही या दुनियेत आहेत. त्यामुळे त्याची काळजी आपल्याला करायची गरज नाही.जो कायदा दोन महिन्यांपासून सरकार त्याला टाळाटाळ करत होत शेवटी त्यांना तो मान्य करावाच लागला आहे. आणि आमच्या हक्कासाठी जे कराव लागत तेच आम्ही केल तेही लोकशाहीच्या मार्गाने आणि लोकशाहीचा अधिकार सर्वांना आहे.

मुख्यमंत्र्यांचा जरांगे पाटलांना फोन.

मुंबई वरून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पोहचल्यावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना फोन केला आणि झालेल्या सर्व गोष्टींचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले आणि जरांगे पाटलांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.आणि जरांगे पाटलांनी देखील मुख्यमंत्र्यांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.अस जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : बाकी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशावर विस्वास आहे.आणि त्यांना कायद्याच ज्ञान आहे.सर्व गोष्टीं त्यांना माहीत आहेत.त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो काय इतक्या सहजासहजी घेतलेला नाही.सर्वांशी चर्चा करून, कायद्याचा विचार करुनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे काळजी करण्याच काम नाही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

टिका करणारे आणि जळक्या वृत्तीचे.

आम्हीच खंबीर आहोत.कुणाला कितीही उड्या मारुद्या काही फरक पडणार नाही.ते प्रत्येकच गोष्टीला आडव पडतय मी उपोषणाचा अर्ज दिला होता त्यावरुनच ते कोर्टात गेल होत.यावरुनच लक्षात येत की ते कोणत्या लायकीच आहे.यावर जरांगे पाटील म्हणाले की ते निव्वळ वाया गेलेली केश आहे. ते म्हणजे जे गावोगावी फिरून सायकलीवर व्यवसाय करणारे जे असतात त्यांच्यावरही ते केस करु शकत कशामुळे तर यानी मला ही वस्तू दिली नाही म्हणून.इतकी गेल्याली केश आहे ती त्यामुळे त्याच काहीच मनावर घेऊ नका अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan :जे मराठ्यांना आडव येणार त्यांना सरळ करणार म्हणजे करणार…मग ते कोणीही असो.त्याच्या गोळ्या संपल्या असतील त्यामुळेच ते अस करतय म्हत्वाच म्हणजे त्याच स्वप्नच भंगल त्याला वाटत होत मराठे ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाही.मराठे ओबीसी आरक्षणातही गेले आणि सग्यासोयर्यांचाही कायदा पारित झाला. आता नुसत तो माझ्या चपक्यात येऊ द्या त्याचा कार्यक्रमच झाला समजा अस जरांगे पाटील म्हणाले.त्याला सरळ करणार म्हणजे करणार त्याला सुट्टी नाही.त्याच्या इतक वाटोळ मराठ्यांच कोणीच केल नाही म्हणून त्याला सुट्टी नाही.आम्ही भेद करीत नाहीत भेद फक्त तोच करतोय एकटाच.मराठ्यांची नियत साफ आहे हे त्याला माहिती नाही ओबीसी बांधव आणि आम्ही आजही एकच आहोत आजही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

विखुरलेला मराठा समाज आणि एकीची दाखद.

यावर Manoj Jarange Patil म्हणाले की अनेक दशकानंतर माझा हा मराठा समाज एकत्रित झाला आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे.माझा मराठा समाजाच्या भावना कोण ऐकून घेणारा नव्हता आणि गोष्ट लक्षात आली तसा प्रतिसादही समाजाने मला दिला. मराठा समाज हा कुणाचही ऐकायला तयार नव्हता आणि तो इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित झाला आहे हेच यांना देखवत नाही.म्हणून ते जळतात बाकी काही नाही.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : आतापर्यंत माझ्या मराठा समाजाचा सर्वांनी नुसता कामापुरता वापरच करुन घेतला आहे पण आता तस राहीलेल नाही आता मराठा समाज जागृत झाला आहे. माझ्या समाजाची एकी मला टिकून ठेवायची आहे.एकीचे बळ हे फार मोठी शक्ती आहे.आतापर्यंत एकी नव्हती आता एकी आहे. आणि त्यामुळेच हे ऐव्हढ मोठ काम झाल आहे अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil Maratha Arakshan : बाकी पुढेचे निर्णय काय घ्यायचे आहेत त्या संदर्भात उद्या 29 /12/2024 ला दुपारी बारा वाजता मिटिंग होईल आणि त्यानंतरच पुढचे निर्णय घेतले जातील अस मनोज जरांगे पाटील.

हे पण वाचा 👇

मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत पण ठरल्याप्रमाणे सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत का? पहा सविस्तर.

 

Facebook

 

x