नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की सरकारने सकाळी जे शिष्टमंडळ पाठवल होत त्या शिष्टमंडळाची आणि Manoj Jarange Patil यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे.त्या संदर्भात नेहमी काय चर्चा झाली आणि सरकारचा नेमका निर्णय काय आहे ते आपण पाहणार आहोत.
सरकारची सकारात्मक भूमिका.
मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात जेव्हा चर्चा झाली त्यावेळी Manoj Jarange Patil यांच्याकडे 5 ते 6 आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले.त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमक काय बोलणार आणि ऐव्हढ्यावरच माघार घेणार का मोर्चा पुढे आझाद मैदानाकडे वळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पण शिवाजी महाराज चौकात सभा चालू असताना मात्र काही तांत्रिक कारणांमुळे Manoj Jarange Patil यांच्या सभेचा टाईमिंग पुढे ढकलला गेला म्हणजेच दुपारी दोनच्या नंतर ते जाहीर करणार म्हणून सांगण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण.
मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत असे दिपक केसरकर यांनी सांगितले.मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबई वाशी सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेला निर्णय हा सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.मुंबईत आझाद मैदानावर पोहोचण्याच्या अगोदरच सरकारचा निर्णय सकारात्मक आलेला आहे.
Manoj Jarange Patil : त्यावेळी शिवाजी महाराज चौकात अलोट गर्दी पाहायला मिळाली.लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक रिकाम्या हाताने आम्ही मागे जाऊ देणार नाहीत हा आमचा पहिल्यापासून शब्द होता आणि आम्ही पाळला आहे अस दिपक केसरकर म्हणाले.तसेच सकाळी आकरा वाजल्यापासून Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती.
मनोज जरांगे पाटलांचे आदेश.
ज्या वेळी मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली आणि चर्चा संपल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी लगेचच मराठा समाज बांधवासी संवाद साधला आणि त्यावेळी Manoj Jarange Patil म्हणाले की आता सर्वानी वाशी शिवाजी चौकाकडे रवाना व्हा आपण शिवाजी चौकात सरकारचा निर्णय काय आहे त्यावर तिथे सभा घेऊ आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देण्यात येईल आणि त्या नंतरच पुढचा निर्णय काय तो घेतला जाईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर मात्र त्यावेळी वेगळेच हावभाव होते, आणि त्यांच्या मनात त्यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिसुन येत होते.ज्यावेळी मनोज जरांगे पाटील वाशी शिवाजी चौकात पोहचले आणि सभा स्थळी हजर झाले त्यावेळी मात्र Manoj Jarange Patil सर्वांना आवाज पोहचत नव्हता.त्यामुळे म्हणाले की तुम्हा सर्वांन पर्यन्त सरकारने दिलेला संदेश पोहचणे गरजेचा आहे. आणि तुम्हाला आवाज नाही आला तर पुन्हा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून आपण अगोदर माईक सिस्टीम व्यवस्थीत जोडून घेऊ आणि त्यानंतरच सभा घेऊ म्हणजे एक तासा नंतर आपण चर्चेला सुरुवात करु तोपर्यंत सिस्टीम जोडण्यात येईल.
मराठा आरक्षण आणि सरकारची धावपळ.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत त्या मुळे सरकारची देखील झोप उडालेली पहायला मिळत आहे.हा ऐव्हढा मोठा जनसमुदाय पाहुण सरकारची धावपळ उडाली आहे.आणि म्हणून सरकारने चर्चा करण्यासाठी आपले शिष्टमंडळ आज तातडीने Manoj Jarange Patil यांच्याकडे वाशी एपीएमसी मार्केटमध्ये या ठिकाणी चर्चा करण्याकरता पाठवण्यात आले. आणि ज्यावेळी चर्चेला सुरुवात झाली आणि काही वेळातच मनोज जरांगे पाटील सरकारचा निर्णय घेऊन मराठा समाजाकडे हजर झाले.
तर शिष्टमंडळच्या वतीने सकारात्मक माहिती पाठवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.या संदर्भात मनोज जरांगे पाटील शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन सरकारच्या जीआरची माहिती देणार आहेत.या जिआर मध्ये नेमक काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई वाशी शिवाजी महाराज चौकात सभेच्या वेळी सरकारने दिलेल्या आदेश मनोज जरांगे पाटील यांनी समाजापुढे वाचून दाखवले ते आसे.सरकारच्या वतीने चर्चा झाली आरक्षणाच्या मुद्द्यावर, शासनाकडे आपण काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यांसाठी आपण सर्व जण मुंबईला आलो होतो.प्रशासनाच्या वतीने एकमेव मा.सुमंत भांगे साहेब चर्चैचा सारासार निर्णय घेऊन आपल्या पर्यंत आले आणि त्यांनी एकुण झालेल्या निर्णयानुसार त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत या सर्व बाबतीत त्यांनी सकाळी सांगितले आणि आमच्याकडून सुद्धा ते अर्धवट वाचण्यात आल होत.कारण वाचण्याला तेव्हढा पण नव्हता अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.
त्यांची काय भुमिका आहे आणि आपली काय आहे याबद्दल चर्चा झाली.मनोज जरांगे पाटील म्हणाले आपली भूमिका अशी होती की जर 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. मराठा ओबीसी आरक्षणात आसलेल्या, तर ते प्रमाण पत्र तुम्ही वाटप करा, ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात त्यात नोंद नेमकी कोणाची आहे.याची माहिती जर करायची असेल तर त्या ग्रामपंचायत ला नोंदी मिळालेले कागदपत्रे चिकटवले पाहिजेत.तरच माहिती होईल की माझी नोंद इथे आहे.तरच तो अर्ज करु शकल प्रमाणपत्र घेण्यासाठी. यावर त्यांनी अस सांगितल होत की काही जणांनी अर्ज केले नाहीत.त्यावर Manoj Jarange Patil म्हणाले की आता त्याला जर नोंद मिळालेली माहितीच नसेल तर तो अर्ज करणार कसा.त्यासाठी सरकारने ती नोंद ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली.
हे देखील पहा 👇