नमस्कार मित्रांनो सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वत्र चर्चा सुरू आहेत.आणि आता Manoj Jarange Patil यांचा मोर्चा काल वाशी एपीएमसी मार्केटमध्ये पोहचलेला आहे. परंतु त्यांना तिथपर्यंत जाण्यास काय काय अडथळे आले आहेत ते आपण पाहिलच आहे.आज या मोर्चाचा सातवा दिवस आहे.तर आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाच्या आरक्षण संदर्भात ठळक महत्त्वाच्या घडामोडी त्या पुढील प्रमाणे..!
सरकार शिष्टमंडळासी झालेली चर्चा.
ज्या सरकारच शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली आणि चर्चा करून मनोज जरांगे पाटील बाहेर आले आणि त्यांनी धडक समाजासी चर्चा सुरू केली त्यावेळी ते म्हणाले की मी माझ्या समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी पुढचा निर्णय घेऊ शकत नाही.जेव्हा मी माझ्या समाजाशी चर्चा करेल तेव्हाच मी माझा अंतिम निर्णय काय असेल तो जाहीर करेल.
आत Manoj Jarange Patil सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चे नंतर मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि सरकारची काय भुमिका आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.शिवाजी चौकात मी तुमच्याशी संवाद साधणार आणि त्या नंतरच निर्णय घेतला जाणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.त्या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना शिवाजी चौकाकडे निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारच शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला.
26 जानेवारी रोजी सकाळी 9 च्या दरम्यान सरकारच शिष्टमंडळ मुंबई वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.सरकारच शिष्टमंडळ काही मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे.पण त्या अगोदर Manoj Jarange Patil यांनी त्यांच्या वकिलांसी चर्चा केली की नेमक आपल्या मागण्या काय आहेत आणि सरकारचा निर्णय काय असेल या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी जरांगे पाटील थांबलेले आहेत APMC मार्केटमध्ये त्याच ठिकाणी शिष्टमंडळानी जरांगे पाटलांची भेट घेतली सरकारच्या वतीने मंगेश चिवटे आणि त्यांचे काही अधिकारी येताना काही महत्त्वाची कागदपत्र सोबत घेऊन आले आहेत.
सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.त्याच दरम्यान Manoj Jarange Patil आणि सरकार शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे आता मात्र सर्वाचे लक्ष या चर्चेकडे लागलेले आहे. आता नेमका काय निर्णय सरकारचा असेल. का पुन्हा तेच. आणि यावर मनोज जरांगे पाटलांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर धडकणार.
अंतिम निर्णय काढण्याच्या प्रयत्नात सरकार असल्याचे दिसून येत आहे.परंतु जर का तोडगा काढला नाही तर मात्र मी आझाद मैदानावर जाणार या मतावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. जरी कोर्टाने आम्हाला नोटीस दिली असली तरी आमचा ऐनवेळेला नाविलाज आहे.
आम्ही या अगोदर दिड महिना आधीच सुचना दिल्या होत्या तसेच ज्यावेळी आम्ही अंतरवाली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली होती त्याही वेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी कोर्टात आदेश दाखल केले होते मात्र आता आम्हाला कोर्ट सांगतय की तुम्हाला आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. आता आम्ही काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नाहीत ऐन वेळी आम्ही हा एव्हढा मोठा जनसमुदाय घेऊन कुठे जाणार म्हणून आम्ही आझाद मैदानावरच जाणार आणि उपोषणाला बसणार असल्याचे Manoj Jarange Patil म्हणाले.
आणि तशी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे.काही प्रमाणात मराठा बांधव आझाद मैदानावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. स्टेज तयार करण्यात आले आहे.सर्व प्रकारची जय्यत तयारी करण्यात आली आहे.आणि लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत.आता कोणीही विरोध केला तरी Manoj Jarange Patil यांचा मोर्चा आझाद मैदानावरच धडकणार आहे.अस सर्वांच्याच वतीने सांगण्यात येत आहे.
यावर Manoj Jarange Patil म्हणाले की अनेक दशकानंतर माझा हा मराठा समाज एकत्रित झाला आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे.माझा मराठा समाजाच्या भावना कोण ऐकून घेणारा नव्हता आणि गोष्ट लक्षात आली तसा प्रतिसादही समाजाने मला दिला. मराठा समाज हा कुणाचही ऐकायला तयार नव्हता आणि तो इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित झाला आहे हेच यांना देखवत नाही.म्हणून ते जळतात बाकी काही नाही.
Manoj Jarange Patil Maratha Arakshan : आतापर्यंत माझ्या मराठा समाजाचा सर्वांनी नुसता कामापुरता वापरच करुन घेतला आहे पण आता तस राहीलेल नाही आता मराठा समाज जागृत झाला आहे. माझ्या समाजाची एकी मला टिकून ठेवायची आहे.एकीचे बळ हे फार मोठी शक्ती आहे.आतापर्यंत एकी नव्हती आता एकी आहे. आणि त्यामुळेच हे ऐव्हढ मोठ काम झाल आहे अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हे देखील पहा 👇