दोन पक्ष गटाचा आरोप प्रत्यारोप
कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत जायच नाही. लोकसभा आढावा बैठकीमध्ये शरद पवारांचा कार्यकर्त्यां समोर निर्धार.तर अजित पवारांसोबत केवळ ईडी सीबीआयच्या भितिने जाणारे लोक आहेत शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला.
maharashtra sarkar news : शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचा अनेकदा प्रयत्न कलेत चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा.
यशवंतराव चव्हाण साहेबही विचार करत असतील की भाजपच्या विचारांसोबत माझा फोटो कसा. अजित पवार गटाने वापरलेल्या चव्हाणांच्या फोटोवर शरद पवारांचा जोरदार टोला.
अजित दादांवर टिका करणे टाळले पाहिजे बैठकीत काही पदाधिकाऱ्यांची मत आहेत तर टिका केली नाही तर सोबत आहोत हा मॅसेज जाईल वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांना समज.
शरद पवारांनीच माढा लोकसभेची जागा पुन्हा लढावी. लोकसभा आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची जोरदार मागणी तर शरद पवार 2014 रोजी माढा लोकसभेचे खासदार होते.
maharashtra sarkar news : अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात परत येण्याची आमदारांची ईच्छा जयंत पाटलांचा दावा.मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याचीही प्रतिक्रिया.
अनेक पक्ष महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक. सर्वांना विश्वासात घेत जागा वाटपाबाबत चर्चा करु जयंत पाटलांच वक्तव्य.
शिरूर मधुन अमोल कोल्हेंना उमेदवारी जाहीर करा. शिरुर मधील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी. शरद पवार शिरुर लोकसभेचा आढावा घेत असतांना पदाधिकार्यांची ही मागणी.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बैठक.बैठकी दरम्यान विविध विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती.
ललित पाटील खळबळजनक दावा.
ललित पाटील प्रकरणातून अनेकांचे संबंध बाहेर येतील आणि बोलणार्यांचे तोंड बंद होतील गृहमंत्री फडणवीसांचा इशारा.
ससुन मधून पळालो नाही तर मला पळवल गेल. याच्या पाठीमागे कुणाकुणाचा हात सगळ बाहेर काढणार. अटकेनंतर ड्रग्स माफिया ललित पाटीलचा खळबळजनक दावा.
maharashtra sarkar news : ललित पाटीलला पळवण्यासाठी गाड्या कुणी अरेंज केल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल.
ललित पाटीलला अटक नव्हे तर मॅनेज करुन पकडल गेलय कॉग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुणे पोलिसां ऐवजी सीआयडीकडे तपास देण्याची धंगेकरांची मागणी.
ललित पाटीलचे ज्या नेत्यांसोबत फोटो आहेत त्या सर्वांची चौकशी होईल विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांच हे मोठ विधान.
maharashtra sarkar news : ललित पाटील प्रकरणात मंत्री दादा भुसे, शंभुराजे देसाईंची नार्को टेस्ट करा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी.
मी कोणत्याही चौकशीस तयार माझ्यावरील आरोप खोटे अंधारेंचा बोलविता कोण दादाभुसे यांचा हा सवाल.
ललित पाटीलची नार्को टेस्ट करा त्याचे चाळीस गाव धुळ्यातील कनेक्शन सोधा एकनाथ खडसेंची मागणी.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणार्या आनखी दोन आरोपींचा ताबा पुणे पोलिस घेणार असल्याची माहिती.
चाळीस दिवसांनंतर मराठा समाजाच आंदोलन सरकारला झेपणार नाही. एकतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा.
मनोज जरांगे पाटलांच सरकारला आव्हान
आंदोलना मागे शरद पवारांचा हात असेल तर सिद्ध करा. आंदोलन दोन पावल मागे घेतो मनोज जरांगे पाटलांचा सदावर्तेंच्या आरोपांवर प्रतिउत्तर.
ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याच सगळ्याच पक्षांच स्वप्न पण आम्ही एकमेकांच्या अंगावर जाणार नाहीत मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.
maharashtra sarkar news : जरांगे पाटलांच हे आंदोलन थांबावं यासाठी सरकार सकारात्मक आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर निलम गोऱ्हे यांच हे भाष्य.
मुंबईच्या चुना भट्टीमध्ये सकल मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांचा सत्कार करण्यात आला तर महिलांनी केल जरांगे पाटलांच औक्षण.
maharashtra sarkar news : जालन्याच्या सुनील कावळेंची मुंबई मध्ये आत्महत्या खचू नका, लढाई अर्ध्यावर टाकून जावू नका मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील यांच मराठा समाजाला आवाहन कुणीही आत्महत्या करु नका असा सल्ला.
सरकारने आमचा आता अंत पाहू नये. मराठा समाजाला आरक्षण द्याव अन्यथा सरकारला आता आमच आंदोलन पेलणारही नाही आणि झेपणारही नाही अशा शब्दात जरांगे पाटलांचा सरकारला इशारा.
राज्यातील राजकीय ताज्या घडामोडी
शरद पवार आज लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड आणि जालना लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार.
maharashtra sarkar news : NCP पक्ष फुटी नंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार अनंतराव पवार इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनासाठी पवार कुटुंब एकत्र. 22 ऑक्टोबरला भिगवण मध्ये कार्यक्रमाच आयोजन.
बारामती मतदार संघात लागलेत सुनेत्रा पवार यांचे बॅनर. सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देतांना बॅनरवर संसदेचा फोटो बॅनरवर सुनेत्रा पवार यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा असा उल्लेख.
जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणातील 4 आरोपींना जामीन. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएम पीएल कोर्टाकडून जामीन मंजूर हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे आणि अरविंद सिंग यांना जामीन.
maharashtra sarkar news : विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेंची भेट. वडेट्टीवार आणि मुखमंत्र्यांमध्ये चाळीस ते पन्नास मिनिट चर्चा कंत्राटी भरती मराठा आरक्षण तसेच ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती.
जगाच्या पाठीवर एकच राज्य असेल जिथे दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत राज ठाकरेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला खोचक टोला.
मी आतल्या आत धुमसतोय एकदिवस सर्व बाहेर काढेल मनसेच्या इंजिनची वाफ बाहेर काढेल राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही इशारा.
आदित्य ठाकरेंकडून मुंबई हायकोर्टात कॅव्हेट याचिका दाखल. दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणी होणार्या आरोपावरून बाजू ऐकून घेण्याची मागणी. 20 ऑक्टोबरला पुढील सुनावणीची शक्यता.
सुप्रीम कोर्टात स्पिकिंग ऑर्डर मध्ये नोंदवलेले आक्षेप धक्कादायक अपात्रते विषयी लवकर निर्णय घ्यावा लागेल जितेंद्र आव्हाड यांच सुप्रीम कोर्टातील सुनावणी नंतर ट्विट.
ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश.
maharashtra sarkar news : शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गद्दार गटात सामील झाल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुभांगी पाटलांचा मीना कांबळीवर निशाणा.
शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे महाराष्ट्राचा दौरा करणार. लोकसभा निवडणूकीची जय्यत तयारी करण्यासाठी आणि महिलांच संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती.
अकोल्यात सम्यक विद्यार्थी आणि वंचित युवा आघाडीचा मोर्चा. नोकर भरतीसाठी खाजगी काय आणि पेपर फुटी विरुद्ध कायदा करण्याची आंदोलकांची मागणी.
नाशिकच्या निफाड मधील ब्राह्मणगाव विंचूर मध्ये छगन भुजबळांना गाव बंदी. मराठा आरक्षणाला भुजबळ विरोध करत असल्यान भुजबळांना गाव बंदी करण्यात आली आहे.
मोदींची नक्कल करणाऱ्यांना ऑक्टोबर 2024 मध्ये उत्तर मिळेल भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सुषमा अंधारे यांना इशारा.
हॉस्पिटल आहे की मस्करी. प्राण्यांच हॉस्पिटल वाटायला लागलय नार्वेकरांनी अधिकार्यांना झापल. राहुल नार्वेकराकडून मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाची पाहणी.
दिवसभरातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा
संतोष बांगर यांच्याकडून पीक विमा या कंपणी अधिकार्यांना दम. शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा माझ्या एव्हढा वाईट कुणी नसेल संतोष बांगर यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल.
राज्यात शेती व्यवसायांवर मोठ संकट. अधिक टेक्नॉलॉजी आल्यास शेती व्यवसायातील अडचणी कमी होऊ शकतात अस देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य.
भारताला लुटणाऱ्या ब्रीटणला आपण मागे टाकलय अर्थव्यवस्थेचा दाखला देत देवेंद्र फडणवीसांचे हे उद्गार.
maharashtra sarkar news : केंद्र सरकारची साखरे वरील निर्यात बंदी बाबत मोठी घोषणा. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची केंद्राची घोषणा यात कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखरेचा समावेश.
राज्यात एक राज्य एक गणवेश शासन निर्णय जाहीर. पुढील वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती.
ऐन सणासुदीच्या काळात मुंबईतील टॅक्सी कॅब संघटनांचा बंदचा इशारा. टॅक्सी कॅब वर आधारित वाहतूक दारांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी.
maharashtra sarkar news : पंतप्रधान कोण या चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रश्नाला राहुल गांधी अस उत्तर. रत्नागिरीतल्या गुवाघर मध्ये श्रूंगार तळी बाजार पेठेतला हा प्रकार तर बावनकुळे दोन दिवसांसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर.
भाजप नेते राम शिंदे आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके एकत्रित प्रवास. सुजय विखेंना शहदेण्यासाठी एकत्रित प्रवास केल्याची चर्चा.
जळगाव ताजी अपडेट
जळगावच्या मुक्ताईनगर मधील बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन घोटाळ्यात एकनाथ खडसेंवर कारवाई होणार आमदार चंद्रकांत पाटलांचा दावा.
एकनाथ खडसे मुळेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर आरोप.
maharashtra sarkar news : शरद पवार गटाकडून बारामती इंदापूर मध्ये पक्ष बांधणी. बारामती तालुका अध्यक्ष पदी जगताप तर इंदापूर तालुका अध्यक्ष पदी तेजस पाटील यांची निवड.
बनावट नोटा संदर्भात नागपूरात ATS ची कारवाई. हसनबाग परिसरात ATS ची शोध मोहीम.
ड्रग्स हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
सोलापूरातील चिंचवळी एमआडीसी ड्रग्स फॅक्टरी कारवाई नंतर आनखी एक कारवाई. मोहोळ तालुक्यातील देवडी फाटा येथे पुन्हा ड्रग्स पकडले. दोन आरोपींकडून तीन किलो ड्रग्स पोलिसांनी केल जप्त.
maharashtra sarkar news : ड्रग्स हटवा नाशिक वाचवा म्हणत कॉग्रेसचे नाशिक मध्ये मानवी साखळी आंदोलन. तर या आंदोलना मध्ये कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी.
पुण्याच्या खडकवासला धरणात मुदत संपलेले औषध फेकल्याचा प्रकार समोर. औषध फेकून पाणी दुषित करण्याचा अज्ञातांचा प्रयत्न तर धरणात कचरा टाकणार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी.
विविध जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी
गोंदियाच्या देवडी परिसरातील घरात फ्रिजचा स्फोट होऊन घराला आग लागली. तर सरपंचासह गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठा अनर्थ टळला.
maharashtra sarkar news : गोंदिया तिरोडा तालुक्यातील पांझरा गावाजवळ खाजगी रुग्णवाहिका उलटली. दोन जन किरकोळ जखमी सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही.
भंडारा जिल्ह्यात पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित. शेतकरयांना पीक विमा देण्याची मागणी.
नंदुरबार जिल्ह्यात कापसाला गेल्या महिना भराच्या तुलनेत दोन हजार रुपये कमी भाव त्यामुळे शेतकरी चिंतेत. कापसाला चांगला भाव देण्याची मागणी.
maharashtra sarkar news : धुळे जिल्ह्यात बाजरी कापणीला सुरवात तर पाऊस कमी झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता.
परभणीच्या पाथरी येथील शाळा संचालकांच उपोषण जिल्ह्यातील अनाधिकृत इंग्रजी शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषण.
परभणी जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग. पावसा अभावी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात घट.
धुळे जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र घटणार. पावसा अभावी या वर्षी पीकांच मोठ नुकसान झाल्यान शेतकरी चिंतेत.
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण
ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांसह मोक्का लागण्याची शक्यता. ड्रग्स रॅकेटसी संबंधित 5 गुन्हे दाखल असल्यान मोक्का लागण्याची शक्यता.
पैसे घेऊन ललित पाटीलांनी ससुन रुग्णालयात मुक्काम वाढवला. मॅनेज केलेल्या पोलिसाला दिड तासात परत येतो. अस सांगून फरार झालो ललित पाटीलचा चौकशी मधून खुलासा.
maharashtra sarkar news : ससून रुग्णालयामधून पळून गेल्यानंतर ललित पाटीलांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्याच उघड झाले. नाशिकच्या समृद्धी महामार्गावर ललित पाटील छत्रपती संभाजी नगरच्या माळीवाडा टोल नाक्यावर उतरला आणि तिथून तो चाळीस गावला गेल्याची माहिती समोर.
ड्रग्स माफिया आपल्याला पळवल आस स्वतः सांगतोय. फडणवीसांच गृहमंत्री म्हणून डोक ठिकाणावर आहे का? फडणवीसांना नैराश्यानी ग्रासल्याच दिसतय राऊतांचा निशाणा.
ड्रग्स विरोधात सरकारने कडक ॲक्शन घेन गरजेच आहे. ड्रग्स प्रकरण गृहमंत्र्यांनी उघड कराव सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.
देवेंद्र फडणवीसामध्ये हिंमत असेल तर 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत संजय राऊतांकडून दादा भुसे आणि शंभुराज देसाईंच्या राजीनाम्याची मागणी.
लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांची घालमेल
शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमच्या संपर्कात अजित पवार यांच्या गटातील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा.
अजित पवारांच्या माढा दौर्याला सकल मराठा समाजाचा विरोध. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अजित पवारांच्या दौर्याला विरोध.
maharashtra sarkar news : बावनकुळेंची शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर टिका. शरद पवार आता पार्टी शिल्लक राहिली का ते शोधतात तर 2024 नंतर उद्धव ठाकरे हम दो हमारे तीन असी स्थिती असेल बावनकुळेंच वक्तव्य.
भाजपला उद्धव ठाकरेंची भिती म्हणून पक्ष फोडावे लागतात. उद्धव ठाकरेंच नाव घेतल्याशिवाय भाजपला कोणी विचारत नाही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचा भाजपवर हल्लाबोल.
नाना पटोलेंची दोनदा दिल्ली वारी. तरीही महाविकास आघाडी सोबत जागा वाटपावर हाय कमांड कडून स्पष्टता नाही. तीन्ही पक्षाचे नेते एकत्र निर्णय घेण्याची शक्यता.
शिवसेनेनं मागच्या वेळी 22 जागा लढवल्या यावेळी देखील त्या 22 जागांसाठी आमचा आग्रह राहणार प्रतापराव जाधवांचा दावा.
अहमदनगर मधील भाजप नेत्यांमध्ये अहमदनगर दक्षिण आणि अहमदनगर उत्तर असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. विखे पाटलांच्या मतदार संघात मोठे कार्यक्रम होत असल्याने दक्षिण भागातील भाजपच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त.
दोन तीन नेत्यांचा पक्ष असल्याने पक्ष वाढीसाठी संघर्ष यात्रा काढतायत रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर खासदार सुजय विखे पाटलांची टिका.
maharashtra sarkar news : स्वतःला हिंदूत्व वादी समजणारे एका महिलेला घाबरतात रश्मी ठाकरे तिथे आल्यानंतर तुम्ही घाबरून लाईट, पंखे बंद केले. संजय राऊतांची शिंदे गटावर टिका.
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर कात्रज मध्ये मनसेच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाच उद्घाटन करणार तर पदाधिकाऱ्यांसी संवाद देखील साधारण.
एकमेकातला वाद चिघळला.
धमक्या ड्रग्स माफियांना द्या फडणवीस म्हणाले बोलणार्यांची तोंड बंद होतील म्हणजे मला अडकवणार का? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना उद्देशून सवाल.
maharashtra sarkar news : शंभुराजे देसाई मला धमकी देतायत का ? माफी सोडा एक शब्दही मागे घेणार नाही सुषमा अंधारेंचा इशारा.
राज्य सरकारकडून दुष्काळ तपासणीच काम सुरू 15 जिल्ह्यांतील 42 तालुक्याचा कृषी विभाग करणार सर्वे महिना अखेर राज्य सरकारला देण्यात येणार अहवाल.
एक दिवसीय विश्व चषकात आज भारत बांगलादेशशी भिडणार पुण्यात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार भारतीय संघ चौथ्या विजयासाठी सज्ज.
येथे क्लिक करा 👇
आजच्या ताज्या बातम्या राजकीय घडामोडींवर आधारित महासुपरफास्ट डेली न्यूज अपडेट