Latest news : पहा दिवसभरातील महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी/देशभरातील 50 हेडलाईन्स

दिवसभरातील सुपरफास्ट 55 हेडलाईन्स 

Latest news : मिरवणूकी मधल्या डिजेच्या आवाजावरून राज ठाकरे भडकले. उत्सव साजरे झाले पाहिजेत पण काही गोष्टीच भान ठेवूनच उत्सव साजरे करावेत.असा राज ठाकरे यांचा गणपती मंडळांणा इशारा.

सण उत्सवाच्या काळात चुका झाल्या असतील पण त्या सुधारण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे.डिजेची नियमावली पाळली पाहिजे असी उदय सामंतांची प्रतिक्रिया.

तपास यंत्रणां त्यांच काम करते त्याला राजकीय स्वरूप देऊ नये अनेक नेत्यांना नोटीस आली.उत्तर दिल की विषय संपतो असी अजित पवारांची प्रतिक्रिया.

राज्यातील राजकीय घडामोडी 

कॉग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या सुत गिरणीवर छापे मारी. काल 40 तास कसुन चौकशी आज पुन्हा आयकर विभागाकडून चौकशी होणार.

Latest news : आमदार सुमन ताई पाटील आणि रोहित पाटील यांच आज आमरण उपोषण टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमरण उपोषण.

नाशिक जिल्हा कांदा लिलाव आजही बंदच

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संपावर ठाम.कांदा व्यापार्यांचा बंदचा आजचा सलग 13 वा दिवस.नाशिकच्या बाजार समिती मध्ये आजही कांद्याचे लिलाव होणार नाहीत.

Latest news : नाशिक मधील गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली कांदा कोंडी चिघळणार.शेतकरी संघटना करणात लोक प्रतिनिधींना विनंती तर तोडगा न निघाल्यास पाच ऑक्टोबरपासून केला आंदोलनाचा इशारा.

आज गांधी जयंती निमित्त

इंडिया आघाडीच आज मुंबईमध्ये ” मै भी गांधी ” आंदोलन भाजपाच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा.

आज महात्मा गांधीची 154 वी जयंती. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठाण्यात टोल नाका मनसे आक्रमक

ठाण्यामध्ये टोल वाढी विरोधात मनसेचे आंदोलन. टोल दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास उपोषण करणार मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला इशारा.

Latest news : सुधीर मुनगंटीवार आज ब्रीटण दौऱ्यावर लंडनमध्ये शिवरायांच्या वाघ नख्या संदर्भात करार करण्या संदर्भात हा दौरा असल्याची माहिती.

राष्ट्रवादी शरद पवार यांचे वक्तव्य 

6 तारखेला निवडणूक आयोगा समोर उपस्थित राहणार आणि माझ्या सोबत वकील सुद्धा उपस्थित राहणार. आमची बाजू आम्ही मांडू शरद पवारांची माहिती.

Latest news : राष्ट्रवादी संस्थापक अध्यक्ष कोण हे जनतेला माहिती. जे लोक भाजपा सोबत आहेत ते राष्ट्रवादी सोबत असुच शकत नाहीत असा शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला.

राष्ट्रवादी अध्यक्ष आणि चिन्हं

राष्ट्रवादीच चिन्ह आमच्याकडेच राहणार प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी सांगितले की अजित पवार हेच अध्यक्ष अस धनंजय मुंडेंच वक्तव्य.

Latest news : अजित पवारांसोबत पक्ष संघटनेतील 80 टक्के पदाधिकारी आणि लोक प्रतिनिधी जुना व्हिडिओ दाखवून पक्ष आणि चिन्ह मिळेल अस वाटण म्हणजे…मुगेरीलाल के हसीन सपने. असी सुरज चव्हाणांची टिका.

राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंच वक्तव्य 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट नाही कश्मिर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांना माहीती आहे की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत अस सुप्रिया सुळेंच वक्तव्य.

माझी कोणाही सोबत वयक्तीक लढाई नाही.माझी वैचारिक लढाई. भाजपा माझ्या विरोधात उमेदवार देणारच त्याच स्वागतच असी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

शिवरायांच्या वाघ नख्यावरुन हल्ला बोल.

पुरावे मागणे ही त्यांची परंपरा राऊतांनी शिवरायांच्या वंशजाकडे पुरावे मागितले त्यामुळे मी बाल बुद्धीला उत्तर देत नाही. वाघ नख्यांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा टोला. ( Latest news )

वाघ नख्यावर आक्षेप घेणारे हे अफजलखानला आदर्श मानणारे असा मुख्यमंत्र्यांचा संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा.

आदित्य नाम तो सुना होगा

याज आदू बाळाणे सरकारला सळो की पळो करून सोडलेल आहे. अस आदित्य ठाकरेंच हे प्रतिउत्तर.

वाघ नख आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, सेना हीच खरी शिवरायांची, सेना फोडून भाजपाने ती बोथट केली असे संजय राऊतांचे टिकास्त्र.

आदित्य ठाकरेंचा फारच मॅऊ मॅऊ सुरू झालाय भाजप नेते नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा.

Marathi news today : आमच्यावर टिका करायचा त्यांचा त्यांना पगार मिळतो त्याच्यावर मी जास्त बोलत नाही असे आदित्य ठाकरेंचे नितेश राणेंना प्रतिउत्तर.

घटणाबाह्य मुख्यमंत्री आदित्य नावाला घाबरले छत्रपती संभाजी नगरमधील आदित्य नावावरुन आदित्य ठाकरेंची शिंदेवर टिका. आदित्य नाम तो सुना होगा अस म्हणत आदित्य ठाकरेंची डायलॉग बाजी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबई पालिका अधिकार्यांची कान उघडणी. दिवसातून पाच वेळा मुंबईतील टॉयलेट स्वच्छ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

Marathi news today : मुंबईच्या कुलाबा कोळी वाड्यामध्ये पाहणी करताना राहुल नार्वेकर संतापले. इथे मक्तेदारी चालणार नाही. मी सर्वांना सोबत घेऊन चालतो. विकास कामाबाबत मी खपून घेणार नाही.असे नागरिकांना नार्वेकरांचे आव्हान.

सुप्रिया सुळेंची ICE बद्दल प्रतिक्रिया ( Latest news )

भाजपाच्या विरोधात बोल्ल की त्याला ICE कारवाई केली जाते. ICE म्हणजे इन्कम टॅक्स इडी, सीबीआय यात काही नवल नाही यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

पंकजा मुंडे कारखाना पाहतायत, कारखाना उभारायला पाहिजे लोक वर्गणी जमा करून GST द्यायचा विचार अस धनंजय मुंडेंच वक्तव्य.

मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

छगन भुजबळांना अनेक वेळा मराठ्यांनी मदत केली मनोज जरांगे पाटलांच वक्तव्य.तर ओबीसींनीही आमच्या भावना समजून घ्याव्यात. नांदेड येथील सभेत मनोज जरांगे पाटलांच वक्तव्य.

अर्धवट आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाहीत. मराठा आरक्षण मिळू नये म्हणून पाच सहा जणांनी ठेका घेतलाय असी मनोज जरांगे पाटलांची टिका.

Marathi news today : नांदेडच्या अर्धापूर येथे मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडली या सभेला मोठ्या संख्येने मराठा समाजाचा प्रतिसाद.

हिंगोली वसमत येथे आज मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार ही सभा तब्बल 16 एकर परिसरात आज पार पडणार आहे.

राजकीय ठळक बातम्या

अतुल बेनकेंच्या घरी शरद पवारांची भेट. शरद पवार आणि बेनके यांच्यात चर्चा. अजित पवारांच्या जवळचे अशी बेनकेंची ओळख.

Marathi news today : भाजपाची ओबीसी हक्कासाठी जनजागृती यात्रा नसून ती ओबीसींची फसवणूक करणारी यात्रा आहे. विजय वडेट्टीवार यांची भाजपावर टिका.

लाल बागचा राजा सोन चांदी लिलाव.

गणेश उत्सवाच्या काळामध्ये लाल बागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या सोने चांदीच्या दागिन्याचा लिलाव. जवळपास 35 लाख पेक्षा जास्त रक्कम लिलावातून मंडळाकडे जमा. लिलाव प्रसंगी काही वस्तूंच्या बाबतीत लोकांचे आकर्षण. Latest news

दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बैठकीमध्ये छत्तीसगड मधील 69 जागांवर चर्चा.निवडनूक समितीचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित.

निवडणूक चळवळ उभारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पुण्याच्या दौऱ्यावर. पुणे विमानतळवरील विस्तारीत नवीन टर्मिनरच मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन.

Latest news : ठाकरे गटानंतर मनसेच अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा. नवनीत राणांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार. वंचित बहुजन आघाडीचे सुजित आंबेडकर यांची माहिती.

धाराशिव मध्ये आमदार जगजितसिंग राणांनी  5 हजारहून कोटी निधी आडल्याने नागरी सत्कार आमदार शहाजी बापू पाटलांच्या हस्ते सत्कार.

कोल्हापूरात छत्रपतींच्या स्मारक जागेवरून वाद.

कोल्हापूरात आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक सागर चाळके भिडले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेवरून खडा जंगी.

Latest news : गडचिरोली मध्ये बाईक रॅली द्वारे कुणबी समाजाचे शक्तिप्रदर्शन 5 ऑक्टोबरला गडचिरोली मध्ये महामोर्चा काढण्याचा डाव. रॅली द्वारे घोषणा बाजी करत सरकारचा निषेध.

राज्यात पावसाचा कहर

रत्नागिरीच्या खेड तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस. खेड शहरात सखल भागांमध्ये पाणी. तर जगबुडी नदीन धोक्याची पातळी ओलांडली. नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.

कोल्हापूरच्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस तर वारणा धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

Marathi news today : सांगली सिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये ढग फुटी दृश्य पाहण्यास मिळाल. जोरदार पाऊस नदी नाल्यांना पुर. तीन तासांमध्ये तब्बल 161 मिली मिटर पावसाची नोंद.

राज्यात दुष्काळाचे सावट

राज्यात पाणी टंचाईवर टांगती तलवार.राज्यातील 32 धरणात 79 टक्केच पाणी साठा तर पाच जलाशयामधील पाणी साठा 80 टक्क्यांहून कमी.

Latest news : मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भमध्ये आज पावसाचा अंदाज. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा.

पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण 100 टक्के भरल्याने निघुडघर परिसरातील नागरिकांनी धरणाच्या पाण्याच विधिवत जल पुजन केल.

पुण्यातल्या भोर मधील विसगाव खोर्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ओढे नाल्यांना पुर आल्याने ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास.

रत्नागिरीचा मार्लेश्वर धबधबा

रत्नागिरीच्या मार्लेश्वर धबधब्याच रौद्र रूप आल समोर. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधुन ओसंडून वाहतोय मार्लेश्वर धबधबा.

सातार्यामध्ये संततधार पावसामुळे पाटण, ढेबेवाडी, वाग नदीचा पुल पाण्याखाली.त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनकडून.

नाशिक नांदगाव आदिवासी समाज भडकला.

नाशिकच्या नांदगावमध्ये आदिवासी संघटनांचा रास्ता रोको. धनगर समाजान आदिवासी जमातींमध्ये घूसखोरी करु नये. तसेच आदिवासींच्या धनगर समाजाला लागू केलेल्या सवलती बंद कराव्यात या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक.

Marathi news today : भंडारा येथील कारधा मधील टोल नाका तब्बल 13 वर्षांनंतर अशोक टोल नाका बंद. महामार्गाच्या कामासाठी टोल नाका शासनाकडे हस्तांतरित.

धुळ्यातील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून धुळे – दादर एक्स्प्रेसला तीन महिन्यांची मुदतवाढ. आता 2 जानेवारी 2024 पर्यंत धावणार धुळे – दादर एक्स्प्रेस.

पावसामुळे नागरीकांचे बेहाल.

नांदेडच्या नायगाव मधील कृष्णरकडे जाणाऱ्या पुलाचे काम विस्कळीत झाल्याने. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम रखडल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त.

Latest news today : रत्नागिरीच्या मंडणगडमधील केळवत घाटामध्ये दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प. केळवत घाटामध्ये लागल्या होत्या वाहणांच्या मोठ्या रांगाच रांगा.

पालघरच्या नागझरी जवळ सराफाला लुटण्याचा प्रयत्न दोन अज्ञातांनी बंदुकीतून तीन राऊंड फायरिंग केल्याने उडाली खळबळ.

प्राथमिक शाळा वाचवा शिक्षकांचा आक्रोश.

छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकात शिक्षकांची निदर्शन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध समस्याच आंदोलन शेकडो शिक्षकांचा आंदोलनात सहभाग.

भंडार्यामध्ये शिक्षक आणि पालकांचा एल्गार मोर्चा. राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी आम्हाला फक्त शिकू द्या आणि जिल्हा परिषद शाळा टिकू द्या अशा मागणीला शिक्षकांचा आक्रोश.

सातार्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा आक्रोश मोर्चा. शाळा समुह योजनेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम रोखण्यासाठी शेकडो शिक्षक मोर्चात सहभागी.

Latest news : रत्नागिरी मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा आक्रोश मोर्चा शैक्षणिक काम कंत्राटी भरती विरोधात आंदोलन प्राथमिक शिक्षकांचा मोठ्या संख्येन आंदोलनात सहभाग.

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत नाशिक मधील शिक्षकांची शैक्षणीक काम रद्द करावीत. कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करावा अशा मागण्यासाठी आंदोलन.

जालन्यामध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.राज्य सरकारनी प्राथमिक शाळांच खाजगीकरण करु नये इतर मागण्यासाठी आंदोलन.

गोंदिया मध्ये शेकडो शिक्षकांचा आक्रोश मोर्चा. शैक्षणिक काम बंद करण्यांची शिक्षकांची मागणी.

पुण्याच्या जेजुरी येथे दत्तक शाळा योजनेच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांची प्रश्न यात्रा सरकारणी कुठल्याही प्रकारे शाळांच खाजगीकरण करु नये विद्यार्थ्यांची मागणी.

अमरावतीच्या धामणगाव शहरामध्ये स्वच्छतेची जागर रॅली. महात्मा गांधींच्या वेशभूषेमध्ये लहान लहान बालकांनी दिले स्वच्छतेचे महत्त्व.

राज्यातील इतर काही घडामोडी 

अमरावतीच्या नागरवाडी मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सेवा अभियान बच्चु कडूंच्या हस्ते अभियानाची सुरुवात.

पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीतील जनरल मोटर्स कंपणीचे कामगार आक्रमक. गांधी जयंतीचा मुहूर्त साधत कामगारांच बेमुदत साखळी उपोषण सुरू तर आकरा तारखेला तळेगाव एमआयडीसी ठप्प करण्याचा आमदार शेळकेंचा इशारा.

सातार्याच्या कराड तालुक्यातील पुनर्वसीत वाघेश्वरी गावात प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा करार तहसील कार्यालयावर मोर्चा.

पुण्यात शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षा निमित्त मावळा जवान संघटनेकडून परिषद आयोजन तामिळ नाडू पंजाब शिवाजी राजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन.

Latest news : सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार. मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये चाळीस गावांच आयोजन तर समारोप सभा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात होणार.

बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर. अनुसुचित जमातींची संख्या 19.65 टक्के तर अतिमागासवर्गीयांची लोक संख्या 36.1 टक्के इतकी.

पुण्यात मराठी रंगभूमी संस्थेच्या वतीने संगीत नाट्य महोत्सवाच आयोजन या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती.

नाशिकमध्ये घोटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे 19 गायींची सुटका. अवैधरित्या कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारा संबंधित ट्रक पोलिसांच्या ताब्यात.

 

हे देखील वाचा 👇

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर टाका एक नजर आणि जानून घ्या आजच्या सविस्तर बातम्या.

 

Facebook

 

x