Laghu udyog list : महिलांसाठी घरगुती उद्योग / घर बसल्या व्यवसाय ही एक सुवर्णसंधी / घरबसल्या काम पाहिजे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी 2023

घरगुती व्यवसायांची कल्पना 

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी घरगुती व्यवसाय. महिलांना घर बसल्या करता येतील असे काही व्यवसाय. आपण अशा अनेक महिला बघतो कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावर असते.घर सांभाळता सांभाळता काही वेळेस आर्थिक जबाबदारीचा भार पेलावत नाही.

Laghu udyog list : अशा वेळी काय करावे काही सुचत नाही.कुटुंब आणि मुलांचा वाढता खर्च यासाठी गरज असते ती पैसाची आणि आजकाल तर पैशाशिवाय काहीच होत नाही.अशावेळी बाकीचे काम सांभाळून घरगुती एखांदा व्यवसाय सुरू करावा असी एक कल्पना डोक्यात असते.ती म्हणजे व्यवसायाची पण व्यवसाय करावा कोणता तर अशा महिलांसाठी laghu udyog list हा एक उत्तम पर्याय आहे.

महिलांच्या डोक्यात अनेक युनिक आणि भन्नाट कल्पना असतात.काम करण्याची हटके दृष्टी त्यांच्याकडे असते.विविध प्रकारचे कला कौशल्य आणि वेळेच योग्य नियोजन त्यांच्याकडे असते.

या सर्व गोष्टी एकत्र आल्या तर कोणतीही महिला व्यवसाय क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.अशा महिलांना घरातच व्यवसाय करण्यासाठी आम्ही काही कल्पना सुचवत आहोत. खालील प्रमाणे काही घरगुती व्यवसाय.

महिलांसाठी घरबसल्या ऑनलाईन व्यवसाय

घर बसल्या व्यवसाय आणि तेही महिलांसाठी. आज या गोष्टी सोशल मीडिया आणि इंटरनेट मुळे अतिशय सोप्या झालेल्या आहेत.सद्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यासाठी गरज आहे ती तुमच्या कलाकौशल्याची आणि तुमच्यात असलेल्या कलेची. पहिल्या काळात या गोष्टी अवघड होत्या पण आता तसे राहिले नाही.आता तुमच्याकडे इंटरनेट हाताळण्याचे योग्य ज्ञान असेल तर तुम्ही हा व्यवसाय करु शकता.

laghu udyog list : तुम्ही घर बसल्या काहीही बनवा, तुम्हाला जे बनवता येईल ते बनवा,जे तयार करता येईल ते करा आणि घर बसल्या त्याची मार्केटिंग करा.घरोघरी जाऊन विकण्याची पहिल्यासारखी गरज नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग अधिकच जवळ आलेल आहे. घर बसल्या तुम्ही तुमची वस्तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकू शकता.

किंवा होलसेल भावात खरेदी करून ऑनलाईन त्याची मार्केटिंग करु शकता. ह्या गोष्टी ज्यांना जमल्या ते आज घर बसल्या लाखो रुपये महिना कमवतात. त्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर ऑनलाईन मार्केटिंग शिकून घेणे अतिशय गरजेचे आहे.

Laghu udyog list : अमेझॉन, फ्लिपकार्ट, ई कॉमर्स या सारखे इतर प्लॅटफॉर्म आज अवलेबल आहेत. अमेझॉन तर एक नंबरचा प्लॅटफॉम आहे. यावर तुम्ही तुमच्या प्रोडक्ट ची जाहिरात करु शकता. यावर तुम्हाला तुमची उत्पादने, वस्तूंची विक्री करुन देणारे कस्टमर मिळू शकतात. साबण, मेणबत्ती, पॅकिंग वस्तू, मग ते काहीही असू द्या. होममेड पदार्थ, कलात्मक वस्तू, पेंटिंग, भेट देण्या योग्य आकर्षक वस्तू असे अनेक प्रकार यात येतात. यातुन तुम्ही चांगली कमाई करु शकता.

घर बसल्या वेब डिझायनिंग

महिलांसाठी वेब डिझायनिंग हा एक घरगुती उत्तम पर्याय आहे. आज आपण पाहतो ऑनलाईन खरेदी विक्री जास्त प्रमाणात चालते. आणि विक्रेत्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मधला मार्ग आहे तो म्हणजे वेबसाईट. आणि त्यासाठी अनेक उद्योजक हे आपली वेबसाईट तयार करत आहे. ऑनलाईन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी खरेदी विक्रीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करत असतो.

laghu udyog list : प्रोडक्ट खरेदी विक्री अशा कोणत्याही व्यवहारासाठी ग्राहक वेबसाईट वर संपर्क साधू शकतात. वेबसाईट तयार करणे आणि त्यासाठी गरज असते ती वेब डिझायनरची ही काम तुम्ही घर बसल्या करुन पैसा कमावू शकता.

घरगुती पॅकिंग व्यवसाय

मित्रांनो घरगुती पॅकिंग व्यवसाय आज काल अतिशय चर्चेत आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या किराणा स्टोअर्स मध्ये गेलात तर त्याठिकाणी तुम्हाला पॅकिंगच्या अनेक वस्तू दिसतात.100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो. आणि आपण त्या पॅकिंगच्या वस्तू खरेदीही करतो. पण आपण कधीच याचा विचार करत नाहीत की ही जी पॅकिंग आहे. ती कोणी केली असेल आणि ती आपल्या पर्यंत आली कशी असेल याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला मिळाली ना बास विषय संपला.

laghu udyog list : पण मित्रांनो तुम्ही देखील ते करु शकता आणि तेही घर बसल्या. मसाला पॅकेट्स, 100 ग्रॅम 250 ग्रॅम 500 ग्रॅम 1 किलो ची रेडीमेड पॅकिंग ही घरगुती छोटे मोठे व्यावसायिक महिला, पुरुष यांच्याकडूनच घरगुती बनवून पॅकिंग करून बाजारात मार्केटिंग करतात.

तर मित्रांनो तुम्हालाही अगदी तसच करायच आहे. लाल तिखट, धणा पावडर, तिखट मिरची पावडर, हळच पावडर, कांदा मसाला पावडर, लसूण पेस्ट, लसूण मसाला पावडर, चिवडा मसाला पावडर, वरण मसाला, भाजी मसाला, असे अनेक प्रकार आहेत ते तुम्ही घरीच तयार करायचे आहेत. मसाला निवडणे, बारीक करणे, पेस्ट करणे, पॅकिंग करणे आणि तुमच्या नावाचा ब्रॅण्ड करणे, तुमच्या नावाचा लेबल लावून जवळच्या हॉटेल, ढाबा , किराणा, मार्केट मध्ये त्याची विक्री करणे मार्केटिंग करणे.

घरगुती खानावळ

आज काल चवदार आणि घरगुती भरवश्याच जेवण मिळण कठीण आहे. शहरी भागात अनेक जन अशा जेवणाच्या शोधात असतात. नोकरदार, कामगार, बेरोजगार, यांना जर घरगुती शुद्ध जेवण मिळाले तर ते दोन पैसे शिल्लक घेतले तरी द्यायला तयार होतात.

अस तर भारतीय महिला चवदार स्वयंपाक बनवण्यात अतिशय तरबेज असतात. ह्या सर्व गोष्टी अवघड वाटत असल्या तरी त्या अगदी सहज करु शकतात. अगदी साध्या साध्या प्रयोगातून त्या वेगवेगळी पाककृती बनवत असतात. आणि हीच त्यांची आवड व्यवसायात रूपांतरित करु शकता.

laghu udyog list : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारसा वेगळा खर्चही करण्याची आवश्यकता नाही. आपल्या रोजच्या जेवणातूनच याची सुरुवात करायची आहे. गरजेनुसार हळूहळू यात वाढ करु शकता. भलेही सुरवातीला दोन, तीन, चार, पाच, दहा टिफीन (डबा) पासून सुरुवात करा जसजशी तुमच्या खानावळीची जाहिरात होईल तशी तशी त्यात वाढ होऊ शकते. आणि महिन्याकाठी तुम्ही यातून चांगली कमाई करु शकता .

शिवणकाम उत्तम घरगुती व्यवसाय महिलांसाठी

शिवण काम ही कला आहे.पुर्वी महिला घरीच शिवण काम करायच्या त्यावेळी मुली आणि महिला जास्त काही प्रशिक्षण न घेता हे काम करायच्या पण आता तस राहील नाही.आताच्या घडीला शिवण या क्षेत्रात काही महिलांनी चांगलीच प्रगती केली आहे.

Laghu udyog list : चांगल प्रशिक्षण जर घेतल तर या व्यवसायात चांगला स्कोप आहे.आजकाल या क्षेत्रात फॅशन डिझायनर असलेल्या महिला खुप पैसा कमवत्यात.आजच्या घडीला फॅशनला खुप महत्व आहे फॅशन आणि मॅचींग हा अतिशय महत्वाचा भाग आहे.

महिलाचा विचार केला तर प्रत्येक साडीवर महिला त्या साडीवर मॅच होईल असाच ब्लाऊज शिवत असते म्हणजेच मॅचिंग आणि साध्या ब्लाऊजची सीलाई पण खुप आहे.आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये म्हणाल तर मग विचारुच नका फक्त आपण त्यात नवीन काय देऊ शकता.

डिझाईन कॉलेटी आणि नवीन फॅशन असेल तर सर्वसाधारण डिझाईन ब्लाऊजची सीलाई २०० रुपये आहे. २०० ते २००० रु. पर्यंत एका एका ब्लाऊजची सीलाई आहे.मग त्यात साधे ब्लाऊज,अस्तरचे ब्लाऊज, डिझाईन ब्लाऊज,मुलींचे ड्रेस,फॅशन ड्रेस अनेक प्रकार आहेत.

Laghu udyog list : कालांतराने तुम्ही यात हळूहळू वाढ करु शकता.याच क्षेत्रात तुम्ही महिलांना रोजगार मिळवून देऊ शकता.तुम्ही या व्यवसायात जेव्हढ डोक लावाल तेवढ थोडच आहे.

फक्त तुम्ही तुमच्या ग्राहकांना कशा पद्धतीने हॅंडल करु शकता हे तुच्यावर अवलंबून आहे.या सर्व गोष्टीच तुम्ही योग्य नियोजन ठेवल तर तुम्ही या व्यवसायातून घर बसल्या ५० ६० हजार रुपये महिना किंवा त्याहीपेक्षा जास्त कमावू शकता.त्यामुळे शिवण काम Laghu udyog list हा व्यवसाय महिलांसाठी अतिशय उत्तम व्यवसाय आहे.

मेहंदी काढणे घरगुती व्यवसाय…

महिलांसाठी हा एक उत्तम मार्ग आहे.तुम्ही जर या विषयात परफेक्ट असाल किंवा तुम्ही मेहंदी डिझाईन चा कोर्स केला असेल किंवा काही महिलांना या विषयात आवड असेल तर अशा महिला कुठेही कोर्स न करता काही महिलांना अंगचीच कला असते अशा महिला या क्षेत्रात भाग घेऊ शकता.

Laghu udyog list : तुम्ही तुमच्या कलेच रुपांतर घरगुती व्यवसायत करु शकता.उत्सव, लग्न सोहळा, सणसमारंभात मेहंदी काढली जाते.अनेक महिलांना मेहंदी काढण्याचा सराव नसतो अशा वेळी तुम्ही त्यांची मदत करु शकता.

यात तुम्ही मेहंदी कोण तुम्ही तुमचे वापरु शकता.किंवा मेहंदी क्लास तुम्ही घेऊ शकता.या व्यवसायात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डिझाईन आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊन त्यानुसार व्यवसायात नेहमी बदल करीत राहणे.

आणि ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सर्विश कशी देता येईल याचा विचार करणे,त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो.शिवाय या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. झिरों भांडवल कसलाही खर्च न करता हा Laghu udyog list व्यवसाय सुरू करु शकता.

घरबसल्या कागदी पेपर पिशव्या बनवणे

प्लॅस्टिक कॅरिबॅगला देशभरातून बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळ त्याला दुसरा पर्याय काहीतरी पाहिजेच.त्याशिवाय भागतच नाही. त्यामुळे कॅरिबॅग किंवा पिशवी हा जो प्रकार आहे त्याला विशेष महत्त्व आहे.त्यामुळे कागदी पिशव्यांच्या वापरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Laghu udyog list : तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग ठरु शकतो.आगामी काळात कागदी पिशव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.अशा वेळी तुम्ही या संधीच सोन करु शकता.

सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खुप आहे.अनेक मोठे व्यावसायिक आणि दुकानदार प्लॅस्टिक ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापरण्यास परवानगी देत आहे. अशा वेळी तुम्ही या व्यवसायातून चांगली कमाई करु शकता.

कागदी पेपर पिशव्या बनवून तुम्ही यातुन एक चांगली कमाई करु शकता.आजकाल पेपर बॅग मॉल, शॉपिंग सेंटर,कापड दुकान, वेगवेगळ्या शॉपच्या ठिकाणी कागदी पिशव्या वापरल्या जातात.तुम्ही असे काही मार्केट शोधून येथे ठोक विक्री करून सुरवातीला महिन्यांकाठी २५ ते ३० हजार रुपये कमावू शकता.

व्यवसायासाठी लागणारा खर्च…

Laghu udyog list : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे अनेक गोष्टींची आवश्यकता नाही.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ पेपर रोल, पॉलिमर स्टिरीओ, फ्लेक्स कल्हर आणि पेपर पिशव्या बनविण्यासाठी लागणारी मशिन इत्यादीची आवश्यकता असते.पेपर बॅग मशीनची किंमत ३ लाख रुपया पासून असते.तुमच्या बजेट नुसार तुम्ही त्याची निवड करु शकता.

तुमच्या कडे भांडवल नसेल तर ?

सुरवातीला जर तुमच्या कडे ही मशिन खरेदी करण्यासाठी बजेट नसेल तर तुम्ही हाताने देखील कागदी पिशव्या बनवू शकता.कागदी पिशव्या घरी बनवणे अतिशय सोपे आहे.यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य पेपर रोल,गोंद, कात्री आणि पंचींग मशिन त्याची किंमत कमी असते.इतर काही किरकोळ गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय घरबसल्या सुरू करु शकता.

Laghu udyog list : गृह उद्योग करण्यासाठी सरकारी कर्ज योजना.जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचाच असेल तर तुम्ही या व्यवसायासाठी सहज कर्ज मिळवू शकता.केंद्र सरकार नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया मार्फत कर्ज देत आहे.यासाठी तुम्ही अर्ज करु शकता.

घरातुन विविध वस्तुंची विक्री

आजकाल एखांदा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकानच असणे गरजेचे नाही.कारण कोणताही बिझनेस घरातुन करता येतो.पहिली गोष्ट यातुन तुमचे भाडे आणि लाईट बिलाची बचत होते.त्यामुळे तुम्ही तोच पैसा भांडवलात गुंतवू शकता.आणि थोडक्यात तुम्ही तुमचा व्यवसाय घरबसल्या सुरू करु शकता.

घरगुती व्यवसायाला जास्त गुंतवणूकीची आवश्यकता नसते.यासाठी घरातुन तुम्ही जो व्यवसाय सुरू करु इच्छिता तो तुम्ही अगदी सहज व्यवसायाची सुरुवात करु शकता.त्यासाठी पहिल पाऊल उचलने महत्वाचे असते ते म्हणजे धाडस आणि धाडसाशिवाय तुम्ही कांहीच करू शकत नाही.

सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला सर्वत्र प्रसारित करु शकता. प्रसारमाध्यमाचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायांसाठी करु शकता.आजकाल सर्वांची ओढ ही प्रसारमाध्यमाकडे जास्त आहे.

Laghu udyog list : या माध्यामाचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकता.या मुळे घरातुन व्यवसाय करणे पहिल्या पेक्षा अतिशय सोपे झाले आहे.फक्त तुमच्याकडे या सर्व गोष्टींच परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा

 

येथे क्लिक करा 👇

घरबसल्या पैसा पाहिजे असेल तर करा हे व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये महिना तेही कुठेही आणि कुणालाही करता येतील असे व्यवसाय खास सर्वांसाठी 

 

फेसबुक

 

x