Jarange Patil Mumbai : ठरल्याप्रमाणे आरक्षण मिळाले का? पहा संपूर्ण सविस्तर माहिती 2024

नमस्कार बांधवांनो आता आपण पाहणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळाल पण किती मिळाल आणि कुणाला मिळाल का सर्वांनाच मिळाल, सरकारने दिलेल्या आदेशानुसार आणि Manoj Jarange Patil यांना मान्य असलेल आरक्षण मिळाल का? किंवा सरकारने दिलेले आरक्षण योग्य आहे का? या सर्व बाबतीत सविस्तर माहिती खालील दिल्याप्रमाणे…!

भांगे साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांची झालेली चर्चा.

मुंबई वाशी शिवाजी महाराज चौकात सभेच्या वेळी सरकारने दिलेल्या आदेश मनोज जरांगे पाटील यांनी समाजापुढे वाचून दाखवले ते आसे.सरकारच्या वतीने चर्चा झाली आरक्षणाच्या मुद्द्यावर, शासनाकडे आपण काही मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यांसाठी आपण सर्व जण मुंबईला आलो होतो.प्रशासनाच्या वतीने एकमेव मा.सुमंत भांगे साहेब चर्चैचा सारासार निर्णय घेऊन आपल्या पर्यंत आले आणि त्यांनी एकुण झालेल्या निर्णयानुसार त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे आहेत या सर्व बाबतीत त्यांनी सकाळी सांगितले आणि आमच्याकडून सुद्धा ते अर्धवट वाचण्यात आल होत.कारण वाचण्याला तेव्हढा पण नव्हता अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

त्यांची काय भुमिका आहे आणि आपली काय आहे याबद्दल चर्चा झाली.मनोज जरांगे पाटील म्हणाले आपली भूमिका अशी होती की जर 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. मराठा ओबीसी आरक्षणात आसलेल्या, तर ते प्रमाण पत्र तुम्ही वाटप करा, ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात त्यात नोंद नेमकी कोणाची आहे.याची माहिती जर करायची असेल तर त्या ग्रामपंचायत ला नोंदी मिळालेले कागदपत्रे चिकटवले पाहिजेत.तरच माहिती होईल की माझी नोंद इथे आहे.तरच तो अर्ज करु शकल प्रमाणपत्र घेण्यासाठी. यावर त्यांनी अस सांगितल होत की काही जणांनी अर्ज केले नाहीत.त्यावर Manoj Jarange Patil म्हणाले की आता त्याला जर नोंद मिळालेली माहितीच नसेल तर तो अर्ज करणार कसा.त्यासाठी सरकारने ती नोंद ग्रामपंचायत मध्ये लावण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली.

54 लाख उमेदवारांना प्रमाणपत्र.

त्यावर त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला की ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत.ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण मुंबईकडे निघाल्यापासून गावागावात त्यांनी शिबिर सुरू केलेत.ज्या नोंदी मिळाल्यात त्या सुद्धा ग्रामपंचायत ला लावण्यास सुरुवात केली आहे.54 लाख नोंदी मिळाल्यात आणि 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळतील.कारण नोंदी मिळाल्यात म्हटल्यावर प्रमाणपत्र मिळणारच आहेत.अस आपण ग्राह्य धरु अस Manoj Jarange Patil म्हणाले.

ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या संपूर्ण परिवाराला प्रमाणपत्र देण्यात येतील.कारण कायदाच सांगतो त्यांच्या परिवाराला दिल्या पाहिजेत.त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारांवर प्रमाणपत्र देण्यात यावेत.जस की एक नोंद मिळाली काही जणांना एका नोंदीवर सत्तर जनांना लाभ मिळाला काही जणांना 200 काहींना 250 तर काहींना एका नोंदीवर 170 जणांना फायदा झाला.पण मनोज जरांगे पाटील म्हणाले की समजा एका नोंदीवर पाच जरी फायदे झाले तरी महाराष्ट्रातला दोन कोटी मराठा आरक्षणात जातोय. हे झाले दोन मुद्दे किलेर.

एक नोंदीवरून संपूर्ण कुटुंबाला.

जर 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांची वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय.त्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केल्याचा शासन निर्णय देण्यात आला आहे.नोंदी मिळाल्यात म्हटल्यावर वंशावळ जोडून त्यांना ते मिळणारच आहेत असे सांगण्यात आले.ज्या 54 लाख नोंदी मिळाल्यात त्यांच्या प्रमाणपत्राची वाटप सुरू आहे. आणि त्यांच्या परिवाराला मिळण्यासाठी त्यांनी अर्ज करणे गरजेचे आहे तर त्यांना मिळतील अस सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ परिवारातल्या एकाची नोंद मिळाली आहे तर त्यांच्या परिवाराला मिळण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.Manoj Jarange Patil हे जबाबदारीने करायच आहे.आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कस देतील.म्हणून अर्ज करणे गरजेचे आहे.

54 लाख नोंदी पैकी 37 लाख प्रमाणपत्र वितरित.

सरकारने सांगितले 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत.त्यावेळी त्यांनी सांगितले की 54 लाख पैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले आहेत. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की ही यादी त्यांनी माझ्याकडे दिली आहे.आणि ही यादी सर्वांना हॉटसापवर टाकण्यात येईल.त्यावर Manoj Jarange Patil म्हणाले की मग बाकीच्यांच काय तर त्यांची वंशावळ जोडायच काम सुरू आहे अस त्यांच मत आहे.त्यासाठी समिती गठीत केली आहे.आता 54 लाख नोंदीचा मुद्दा किलेर झाला.

वरच्या राहिलेले अंदाजे दहा ते पंधरा लाख जे काय असतील ते.त्यांना सुद्धा लगेच देऊ पण आता ज्या लोकांना मिळालेत त्यांचा डाटा पण आपण मागीतलेला आहे अस Manoj Jarange Patil म्हणाले.नेमके दिलेत कुणाला.54 लाख लोकांपैकी 37 लाख लोकांना मिळालेत राहीलेल्यांना सुद्धा देण्यात येतील असे सांगण्यात आले.अर्ज केल्यास त्यांना लगेच प्रमाणपत्र देण्यात येतील.

शिंदे समिती रद्द करण्या बाबत.

Manoj Jarange Patil म्हणाले की महत्वाची गोष्ट शिंदे समिती ही रद्द करायची नाही.या समितीने काम करत राहायच आणि नवीन नोंदी मिळतात का त्याचा शोध करीत राहायच आहे.कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापाडल्या आहेत.महाराष्टभर या समितीने काम सुरू ठेवायच आहे.त्याकरता त्यांनी दोन महिने मुदतवाढ केली आहे आनखिन

सग्यासोयर्यांना प्रमाणपत्र वितरित करण्या बाबत.

तिसर काम सगळ्यात महत्त्वाच ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही.त्याच्या गणगोतातील सग्यासोयर्यांना देखील त्याच प्रमाण पत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायच आहे.आणि त्याचा आद्यदेश आम्हाला पाहिजे अस Manoj Jarange Patil म्हणाले.शासन निर्णय आम्हाला पाहिजे.सोयर्यांना त्याचा फायदा होणार नाही म्हणून आम्हाला हा आद्यदेश पाहिजे.तो आद्यदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे.54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख लोकांच्या परिवाराला. आणि सग्यासोयर्यांना द्यायच असेल तर कारण त्यांच्याकडे नोंद नाही.

ज्यांच्याकडे नोंद नाही मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांकडून शपथ पत्र करून द्यायचय की हा माझा सोयरा आहे.आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायच आहे.चौकशी करून खरा पाहूणा असेल तरच द्या अन्यथा देऊ नका.त्याकरता 100 रुपयांच्या बॉंडवर जर घेतल तर पैसे किती चालले अस Manoj Jarange Patil म्हणाले.ते पेपर मोफत करा अशी मागणी आहे.आणि त्यांनीही मान्य केले आहे.

मराठा समाजावर केलेले गुन्हे मागे.

मराठा समाजावर केलेले सगळे गुन्हे मागे?अंतरवाली सराटी सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे आहेत.मागे घेऊ सांगण्यात आले आहे मात्र त्याचे लेखी पत्र नाही.वंशावळी ज्या जुळायच्या आहेत त्याबाबत काहींचे आडनाव जुळत नाहीत.त्या संदर्भात त्यांनी तशी समिती गठीत केली असल्याचे कळते आहे. त्यांनी त्या वंशावळी शोधायच्या आणि त्यांनी त्यांचे काम करुन घ्यायचे आहेत.अशी एक समिती त्यांनी गठीत केली आहे.Manoj Jarange Patil

क्युरेटी पीटिशन संदर्भातले आरक्षण.

क्युरेटी पीटिशन चा विषय कोर्टात आहे.त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सग्यासोयर्यांच्या ह्याच्यातुन समजा एखादा हुकला तर? आणि सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण रद्द केल आहे आणि जी क्युरेटी पीटिशन दाखल केलेली आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि जर कदाचित एखांदा मराठा विसरून राहीला जुळल नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली आहे.

Manoj Jarange Patil : १००% ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सर्व क्षेत्रातल १००% शिक्षण मोफत करण्यात याव.आणि क्युरेटी पीटिशनच्या माध्यमातून आरक्षण मिळेपर्यंत हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहेत.आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही त्या करायच्या नाहीत.नाहीतर जर तुम्हाला त्या शासकीय भरत्या करायच्या असतील तर आमच्या जागा राखीव ठेऊन करायच्या आहेत.

मुलींचे शिक्षण आणि राखीव जागा.

त्यावर सरकारने असे सांगितले की राज्यातील मुलींना केजीटु पीजी शिक्षण शासनाचा निर्णय निर्गमित करण्यात येत आहे असे सांगण्यात आले आहे.पण मुलींना म्हणाले आणि मुल दिले सोडुन.यावर Manoj Jarange Patil म्हणाले की सरकार कुठतरी अर्धवट ठेवतच आहे.आमच्या जागा राखीव ठेवा आणि त्यांच्या त्यांना द्या हे अडवणार नाहीत.कुणाच नुकसान व्हाव हे आमच धोरणच नाही जरांगे पाटील म्हणाले.पण आमच्या जागा सोडून.मुलींना दिल आणि मुल तसेच ठेवले याचा सुद्धा शासन निर्णय होईल.शासनाने निर्णय चांगले घेतले आहेत पण हे तेव्हढ लक्षात घ्याव आणि याच्यात त्यांनी लवकरात लवकर बद्दल करावा तेही लवकरात लवकर आम्हाला कळवावे अशी विनंती.

दोन महिन्याचा कालावधी सरकारने घेतला

आपण अशी मागणी केली होती पण त्यांनी सांगितले की टप्प्या टप्प्यान देऊ दोन महिन्यांच्या मदतीवर.आनखीन आपल्या काही मागण्या होत्या त्यात मेन आरक्षणाची मागणी आहे.बाकीच टप्प्या टप्प्यान घेऊत अस ते म्हणाले आहेत.त्यावर Manoj Jarange Patil म्हणाले की हा जो अहवाल आलेला तो मी आनखिन पुर्ण वाचलेला नाही ते पुर्ण रातभर वाचणार आहे.आणि ज्यांना यात काही बदल करावा अस वाटत असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करायला या पुन्हा फिरून यात चुक होता कामा नये अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.आपले वकील आणि मी यावर आनखिन चर्चा करणारच आहोत असे जरांगे पाटील म्हणाले.

आणि मागील काही रखडलेल्या कामांनाही चालणा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.तसेच कोपर्डीच्या खटल्या बाबतही विषय मांडण्यात आला आहे.यावर बाकी मी रात्रभर हा आदेश वाचून घेतो आणि पुन्हा काही अडचणी आहेत का ते पाहतो आणि तुम्हाला सर्वांना सांगतो अस Manoj Jarange Patil म्हणाले.आणि हे जे यश मिळाल आहे ते आपल्या या आंदोलनामुळे यश आलेल आहे अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे देखील पहा 👇

आताची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Facebook

 

x