gondavalekar maharaj punyatithi 2024 : ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी आणि श्री गोंदवलेकर महाराज चरित्र

ब्रम्हचैतन्य gondavalekar maharaj punyatithi निमित्त उत्सव सोहळा आणि संपूर्ण जीवन चरित्र.आपण पाहणार आहोत श्रीक्षेत्र गोंदवले हे सातारा जिल्हा माण तालुका.दहिवडी ते म्हसवड महामार्गावर, दहिवडी पासुन ८ ते १० किलोमीटर अंतरावर. सातार्यापासून ७० किलोमीटर अंतरावर गोंदवले हे गाव आहे. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी.

या वर्षी ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची ११० वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असुन गेल्या २७ डिसेंबर पासुन महाराजांच्या पादुकांचे पूजन करून कोठी पुजनाने प्रारंभ होत असतो. मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा ते कृष्ण दशमी या कालावधीत श्री gondavalekar maharaj punyatithi मुख्य दिवस ६ जानेवारी २०२४ रोजी आहे.

या शुभ दिवशी पहाटे मंगलमय समयी महाअभिषेक करून ५ वाजून ५५ मिनिटांनी श्रींच्या समाधीवर हार, फुले, गंध, अक्षदा, तुलसी पत्र श्री चरणी अर्पण केले जाते.त्यानिमित्ताने गाईच पुजन केले जाते. सकाळी दहा नंतर श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक भव्य दिव्य स्वरुपात काढली जाते.

गोंदवले महाराज देवस्थान ट्रस्ट.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुण्यतिथी निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आलेली असून संपूर्ण गोंदवले देवस्थान रामनामात तल्लीन झाले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गोंदवले हे ठिकाण आहे. दरवर्षी या उत्सवाला राज्यातून मोठ्या श्रद्धेने लाखो भाविक gondavalekar maharaj punyatithi निमित्त गोंदवले येथे येतात आणि रामनामाचा मंत्र जप, ध्यान धारणा करतात. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाने धन्य होतात.

गोंदवले येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

आठ ते दहा दिवस गोंदवले या ठिकाणी श्रींच्या समाधी समोर प्रांगणात  कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन, जागर, काकडा, नामस्मरण, विविध धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतात.रोज सकाळी पहाटे काकड आरतीच्या भजनाने दिवसाची सुरुवात होते.रात्री ९ ते ११ कीर्तन आणि त्यानंतर रात्रीच्या जागराच्या भजनाने कार्यक्रमाचा शेवट होतो.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी
gondavalekar maharaj punyatithi

 

आठ दहा दिवस भरगच्च कार्यक्रम होतात.शेवटच्या दिवसी काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप होतो.त्या नंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था असते. मुख्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आठ दहा दिवस अन्नदान होत असते.तसतर या ठिकाणी बाराही महिने अन्नदान सुरुच असते.

श्री gondavalekar maharaj punyatithi निमित्त आलेल्या भाविकांची देवस्थान ट्रस्टच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने व्यवस्था केली जाते.भोजन व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी आलेले भाविक आनंद घेतात, प्रसन्न होतात, भाविक जीवनातील सुख दुःख विसरून जातात.

भाविक मिळेल ती सेवा करतात.

या ठिकाणी आलेले भाविक जी सेवा मिळेल ती सेवा करतात. कोण झाडून घेत, कोण चटया हातरत तर कोण साफसफाई करतात.येथे आल्यावर अहंभाव विसरून जातात. कोण लहान नाही आणि कोण मोठा नाही. आपण सर्व एकच आहोत अशी शुद्ध भावना मनात ठेवतात.

जे जे आश्रमा आले | ते तेथेची स्थिर झाले | पुन्हा परतोनि नाही गेले | नामस्मरणे पावन पावले || अस हे तीर्थक्षेत्र आणि पवित्र ठिकाण आहे. जीवनात एक वेळ तरी गोंदवल्याला गेलच पाहिजे तेव्हा आपल्या प्रत्यक्ष लक्षात येईल की खरोखरच किती सुंदर पवित्र ठिकाण आहे.एक वेळ नक्की बघा, जमलच तर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा डोळ्याने एक वेळ तरी नक्की पहावा.

gondavalekar maharaj punyatithi : ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. या वर्षी ६ जानेवारी २०२४ रोजी गोंदवलेकर महाराजांची ११० वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहून वातुकीत काही बदल केले जातात. सातारा ते पंढरपूर या मार्गावर पिंगळी बु. गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक गावातील आप्पा महाराज चौकापर्यंत वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. यिची येणाऱ्या भाविकांची दक्षता घ्यायची आहे.

श्री गोंदवलेकर महाराज चरित्र.

महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आदी करुन संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे.आणि सातारा जिल्हा म्हटल की शुरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे आणि याच भुमित शोभून दिसतील असे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज.

gondavalekar maharaj punyatithi : गोंदवलेकर महाराजांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यात गोंदवले बुद्रुक हे एक छोटस गाव. पण या छोट्याशा गावात गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या येण्याने हे गाव धन्य झाले. त्यांच्या पदस्पर्शाने हे छोटस गाव भारतभर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाल.गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात सात पिढ्यांपासून पंढरीची वारी आणि विठ्ठलाची भक्ती सुरू होती.अशा या परमार्थिक घराण्यात.

महाराजांचा जन्म.

रावजी आणि सौ. गीताबाई यांच्या पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ इ.स. १९ फेब्रुवारी १८४५ रोजी सुर्योदयाच्या सुमारास श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला.त्यांचे आजी आजोबा लिंगोपंत आणि राधाबाई यांना अतिशय आनंद झाला. पाचविला पाळण्यात नाव गणपती ठेवले.अतियश देखणी मूर्ती सोज्वळ सुकुमार बालक घरातील सर्वांच्या आवडीचे.

gondavalekar maharaj punyatithi : महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. आणि जसेजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांच्या अंतरीक गुणांचे दर्शन होऊ लागले.भगवत भक्तीची आवड, ग्रंथ वाचण्याचा छंद, आणि दिन दुबळ्यांना जेऊ घालण्याची सवय. हे सर्व पाहून आजी आजोबांना आनंद वाटायचा.पुढे योग्य वेळी मुज झाली.

महाराजांचा घरातून काढता पाय आणि विवाह.

वयाच्या नऊव्या वर्षी महाराजांनी घरातुन काढता पाय घेतला गुरुंच्या सोधार्थ घरातुन पळून गेले आणि गुरुकडे राहुन विद्यार्जन करुन घेतले. परमार्थाची ओढ अंतःकरणात निर्माण झाली. पण जेव्हा घरच्यांना कळाले तेव्हा घरच्यांनी घरी बोलावून घेतले.आणि वयाच्या अकराव्या वर्षीच गणुचे म्हणजेच महाराजांचे लग्न झाले. त्यानंतर थोड्या कालावधीत आजी आजोबा स्वर्गवासी झाले.

gondavalekar maharaj punyatithi 2024 : पण संसारात मन लागत नव्हते. गुरुंच्या भेटीची तळमळ अंतःकरणात होती.जन्मताच अतिशय तीक्ष्ण बुद्धी होती.ईश्वर भक्तीचे वेड असल्यामुळे महाराजांनी ध्येयाच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करताना कसलाच विचार केला नाही.आणि शेवटी घरात कुणालाही माहिती न होऊ देता एके दिवशी नुसत्या अंगावरच्या लंगोटीवर घर सोडले.

गुरुची भेट आणि तिर्थ भ्रमण.

आणि गुरुंच्या सोधार्थ भारत भ्रमण केले. या भारत भ्रमण प्रसंगी सर्व तिर्थक्षेत्राला भेट दिली. हरिपुर सांगली येथे साध्वी राधाबाई, मिरज येथील सत्पुरुष आण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोट स्वामी समर्थ, हुमणाबादचे माणिक प्रभू, काशिचे तैलंगस्वामी, आदी सर्वांनी त्यांना अतिअदराने महाराजांना जवळ केले, पण तुझे गुरुपद माझ्याकडे नाही म्हणून सांगितले.

gondavalekar maharaj punyatithi : अखेर गोदातीरी श्री समर्थ संप्रदाय श्रीरामकृष्ण यांनी दर्शन घेऊन येहळेगावच्या श्री तुकाराम चैतन्याकडे जाण्यास सांगितले. पण तेथे गेल्यावर महाराजांना पुर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे महाराजांनी अविरतपणे सेवा केली. गुरु सेवा घडली, त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केल. गुरुनी कठोर परिक्षा घेतली आणि त्यात ते पास झाले. अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह दिला. आणि ब्रम्हचैतन्य असे नाव ठेवले.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी
gondavalekar maharaj punyatithi

 

योग्य गुरुंची भेट झाल्या कारणाने योग्य मार्ग मिळाला. गुरु हा संत कुळीचा राजा| गुरु हा प्राण विसावा माझा || वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी महाराजांना पुर्ण सिद्धअवस्था प्राप्त झाली. कशाचीच आसक्ती राहिली नाही. ईश्वर भक्ती सोडून.आत्मज्ञान अंगी बानण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तिर्थक्षेत्र करुन घरी जावे ही गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून ते निघाले. 

नऊ वर्षांनी घराची वाट.

श्री तुकामाईच्या सांगण्यावरून तीर्थाटन करून ९ वर्षांनी घरी गोंदवले या ठिकाणी परत आले. सर्वांना ही बातमी कळताच आनंदी आनंद झाला.नऊ वर्ष वाट पाहणारी पत्नी माहेरी गेलेली असता तीला घेऊन आले. पुढे पत्नीला सोबत घेऊन गुरु दर्शनाला गेले. तिथे सहा महिने पत्नीसह राहीले गुरु सेवा आणि नामस्मरण,

gondavalekar maharaj charitra : ध्यान धारणा केली आणि नंतर पुन्हा गावी आले पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली पण लवकरच पुत्र मरण पावला.आणि पाठोपाठ पत्नीही देवाज्ञा झाली. त्यानंतर महाराजांनी आईच्या आग्रहास्तव काही काळाने दुसरे लग्न केले.पण दुसरी पत्नी जन्मताच अंध होती. यांना पुढे भक्तमंडळी आईसाहेब म्हणू लागले.

नामस्मरणाची साधना.

त्यानंतर महाराजांनी श्रीराम नामाचा प्रचार आणि सर्वसामान्य माणसाला पचेल रुचेल अशा परमार्थ मार्ग दाखविण्याचे कार्य अगदी जोमात केले. रामनामाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि सर्व जातीच्या लोकांकडून रामनामाचा जप करून घेतला. महाराज श्रीरामांचे भक्त होते. राम नाम अतिशय प्रिय होत.

gondavalekar maharaj punyatithi : नामस्मरण, सद्विचार, सख्य भक्ती, दास्य भक्ती, कीर्तन भक्ती भक्तीचे सर्व प्रकार आणि ईश्वर भक्ती सर्वसामान्यांच्या गळी उतरवली. सर्वांबद्दल प्रेम भाव आणि भुकेल्या जीवाला अन्नदान सन १८९० पासून महाराजांचे गोंदवल्यातच वास्तव्य राहीले. त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली.महाराज  सगुणाची उपासना करायला सांगायचे.

श्रीराम मंदिर आदी करुन मंदिरांची उभारणी.

गर्दी खुप वाढली म्हणून आलेल्या भाविकांची सोय व्हावी म्हणून महाराजांनी आपल्या राहत्या वाड्यातच राम लक्ष्मण सीता तसेच मारोतीची स्थापना केली.पुढे भक्तमंडळीची संख्या अधिकच वाढल्याने महाराजांनी गावात आनखीन एक राम मंदिर,

gondavalekar maharaj punyatithi : एक दत्त मंदिर, आणि एक धर्मशाळा बांधून आलेल्या भाविकांची राहण्याची सोय केली.त्यानंतर शनी मंदिराची स्थापना केली. शिवाय गावोगावी खेड्यापाड्यात रामनामाचा महिमा वाढवला. अनेक ठिकाणी राम मंदिराची स्थापना केली.

आई सोबत तीर्थयात्रा.

gondavalekar maharaj punyatithi : पुढे महाराजांनी इ.स. १९०१ मध्ये मातोश्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी सोबत घेऊन काशीयात्रा केली. त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला इ.स.१८७६ व १८९६ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात महाराजांनी आपल्या शेतातल नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारी पासून लोकांना वाचवले.

महाराज समाधी अवस्थेला प्राप्त झाले.

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला | जयाने सदा वास नामात केला | जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती | नमस्कार त्या ब्रम्हचैतन्य मुर्ती || ब्रम्ह स्वरुपात सतत रममाण झालेले महाराज संतत्वाला प्राप्त झाले.स्वत:च्या देहाची तमा न बाळगता अहोरात्र एकच ध्यास ईश्वर भक्ती आणि मनात दिन दुबळ्यांचा कळवळा. मी पणाचा विसर त्यांना पडला होता. आचार विचार आणि उच्चार संपन्न.

gondavalekar maharaj punyatithi : माऊली ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात ना – मी आणि माझी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण | पार्था तोची संन्यासी जान निरंतर | हे खरे साधुचे लक्षण आहे. त्यालाच संत म्हणतात, त्यालाच साधू म्हणतात. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात – जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा | देव तेथेची जानावा || रंजल्या गांजल्यांना जो आपल म्हणतो तोच खरा साधू. असेच महाराज होते.

जनकल्याणार्थ आयुष्य खर्ची.

स्वथासाठी जगतो तो सामान्य जीव आणि जगाच्या कल्याणाचा विचार करतो तो साधू. हे सर्व लक्षण महाराजांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले होते. जनकल्याणासाठीच ते जीवन जगले. ईश्वर भक्तीचा महिमा तळागाळातल्या लोकांना पटवून दिला.आपण जो ब्रम्हानंद सेवन करतो तोच ब्रम्हानंद सर्व सामान्यांना घेता यावा म्हणून महाराजांनी नामस्मरणाला जास्त प्राधान्य दिले. स्वतः नामस्मरण केले आणि जनतेकडूनही नामस्मरण करुन घेतले.

gondavalekar maharaj punyatithi : सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे. शेवटच्या श्वासापर्यंत जगाचे कल्याण चिंतिले. महात्म्याचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी असतो – जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टविती परउपकारे || किंवा येथे उपकारासाठी | आले घर ज्या वैकुंठी || म्हणजेच संत महात्मे स्वतः करता जीवन जगत नाहीत.नव्हे नव्हे ते जे जन्माला येतात ते जगाच हित (कल्याण) घेऊनच येत असतात.शोधोनीया आले संत | हिताहीत जगाचे || असेच महाराजांचे कार्य होते.

सरते शेवटी महाराजांचे उद्गार.

जनहितार्थ आपले आयुष्य वेचून सर्वस्व भगवंताला अर्पण केले. आणि आयुष्याचे शेवटचे क्षण भगवंताच्या नामस्मरणाच घालवले.आयुष्यभर भगवंताचे नाम मुखाने गायले. कानाने ऐकले, डोळ्यांनी पाहिले,  मनात त्याचच चिंतन, काया वाचा मनाने एका भगवंताच्या नामाशिवाय सत्य आणि खर दुसर काहीच नाही.आयुष्यभर या देहाला माझ माझ म्हणतो तो देह सुद्धा आपला नाही.

gondavalekar maharaj punyatithi : पंच महा तत्वात विलीन होतो.हा देह सुद्धा नास पावनारा आहे. म्हणून या देहाचा न धरावा भरवसा. हे नासक शरीर एक दिवस प्रत्येकाला धोका देणार आहे अस महाराज म्हणायचे. म्हणून सत्य फक्त भगवंत आहे.आणि सरते शेवटी महाराज म्हणाले की आता माझीही जाण्याची वेळ जवळ आली आहे.आता महाराजांचे कार्य पुर्ण झाले महात्मा कार्य संपल की जास्त दिवस थांबत नसतो.साधू जन्माला येतांना स्व इच्छेने येतो आणि जातांना स्व इच्छेने जातो.

gondavalekar maharaj punyatithi : जेथे नाम, तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खुण. हे शेवटचे शब्द उच्चारुन महाराजांनी सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५ – इ.स. २२ डिसेंबर १९१३ या दिवशी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी महाराजांनी देह ठेवला. जगाला प्रकाशित करणारा सुर्य मावळावा त्या प्रमाणे महाराज अनंतात विलीन झाले. 

 

हे देखील पहा 👇

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संपूर्ण जीवन चरित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

फेसबुक

 

x