येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठा भुकंप होणार.येत्या निवडणुकीची हालचाल सुरू आहे.आणि त्याचे परिणाम वेगळे असतील अस Girish Mahajan म्हणाले. लोकसभा निवडणुक तोंडावर आली आहे आणि त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल आहे. येत्या १० ते २० दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
पडद्या मागचे राजकारण.
महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या राजकारणात अंधारातून अनेक कारनामे सुरू आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो आपला आपला पक्ष सावरण्याच्या तयारीत आहे. मग ते अन्य अन्य मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. या बाबतीत जोरदार हालचाली सुरू झालेल्या दिसून येतात.
Girish Mahajan : देशातील विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजप विरुद्ध इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात महावीकास आघाडीच्याही जागा वाटपासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्याही बैठका आणि हालचाली सुरू झाल्या आहेत.
गिरीश महाजन यांचे वक्तव्य.
राज्यात असे अटीतटीचे राजकारण सुरू असतानाच भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री Girish Mahajan यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ बदल घडून येतील. मोठा भूकंप होणार असे वक्तव्य केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच १० ते २० दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार आहे असा दावा Girish Mahajan यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमा बरोबर चर्चा करत असताना म्हणाले आहेत.की सर्व लोकसभा निवडणुकीच्या आधीच हे बदल होणार आहेत.आणि ते आपल्याला सुद्धा पहायला मिळणार आहे.असे राजकारण या आधी कधीच झाले नाही आणि होणार देखील नाही. असे हे बदल असतील. भयंकर मोठा भूकंप होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजन चर्चेला उधाण.
गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण येत आहे त्याच कारण Girish Mahajan हे भाजपच्या नेत्यांपैकी एक प्रमुख नेते मानले जातात.महत्वाच्या प्रसंगी त्यांनाच समोर केल जात असी त्यांची अख्यायिका आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते अतिशय जवळचे आणि विस्वास पात्र असल्याचे म्हटले जात आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य राजकारणात येत्या काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. २०१८, २०१९ नंतर राज्यात बर्याच घडामोडी झाल्या. २०२२ ला शिवसेनेचे काही आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिंदे गटात सामील झाले. आणि भाजप बरोबर युती करुन शिंदे गटानी सत्ता स्थापन केली.पुढे जुन २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फुटा फुट झाली. अजित पवार तसेच काही आमदारांनी महायुतीला पाठिंबा दर्शविला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले. असेच Girish Mahajan यांनी प्रसारमाध्यमा बरोबर बोलताना खळबळजनक वक्तव्य केले त्यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे.
शरद पवार आमचा विचार करु नये.
बालत असतांना पुढे Girish Mahajan म्हणाले की शरद पवारांनी आमचा विचार करु नये. त्यांनी स्वतःचा विचार करावा. मुळात त्याचांच पक्ष कमकुवत झाला आहे. शरद पवारांनी एक दोन उमेदवार निवडून आणून दाखवावेत. पवारांकडे पक्षच राहीलेला नाही. शरद पवारांना भाजपची जास्त काळजी वाटते पण त्यांनी आमची चिंता करु नये त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी असा खोचक सवाल महाजन यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अयोध्या राम मंदिर प्रसंगी केलेल्या वक्तव्यावर Girish Mahajan यांनी जितेंद्र आव्हाड यांना खडसावले आहे. प्रभू राम आणि राम मंदिर हे संपूर्ण देशवासीयांच श्रद्धास्थान आहे. आणि याच्या विरोधात बोल्ल की प्रसिद्धी मिळते हे आव्हाडांना चांगलच माहिती आहे.अस वक्तव्य करताना आव्हाडांना जरासी तरी लाज वाटायला पाहिजे होती. शिवसेना प्रमुखांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाबद्दल खुलासा करावा अस आव्हानात्मक गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे.
नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान राबवित आहेत.
आमदार रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालय ईडी छापेमारी झाली आहे. यावर बोलतांना Girish Mahajan म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान मोहिम हाती घेतली आहे. यासंदर्भात देशात रोज कारवाया सुरू आहेत. तपास यंत्रणा अचानक धाड घालत नाही त्या अगोदर तपास मोहीम काम करते आणि त्यानंतरच धाड टाकते. अगोदर कागद पत्राची तपासणी केली जाते त्याशिवाय पुढील कारवाई होत नसते. कागद पात्रांच्या सहाय्यानेच पुढचे उचललेले जाते. पण तस काहीच नसेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच गरज नाही.
एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजन यांना आव्हान.
महाराष्ट्र जळगाव रावेर ची जागा राष्ट्रवादीला सुटली तर आपणच उमेदवार असू , Girish Mahajan यांनी पळ न काढता लोकसभा निवडणुक लढवाविच असे खुले आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे.रावेर मतदार संघात कॉग्रेसचा तीस वर्षांपासून मोठ्या फरकाने पराभव होत आला आहे. म्हणून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी असा प्रस्ताव आम्ही केला आहे. येत्या आठ दहा दिवसात जागा वाटप होतील तेव्हाच लक्षात येईल अस खडसे म्हणाले.
राज्यात लोकसभा निवडणूक लागणार आहेत त्या अगोदरच राज्यात एक महाभयंकर भूकंप होणार आहे. त्या प्रकारच्या हालचाली प्रत्येक पक्षात दिसून येत आहेत. महायुतीचे सरकार आता असले तरी पुढे टिकेल याची शास्वती नाही. राजकारणात केव्हाही काहीही बदल होऊ शकतात. भाजप, शिवसेना ठाकरे गट , शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, असे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे समाजात नाराजीचे वातावरण आहे.
Girish Mahajan
नेमक कोणाला चांगल आणि कोणाला वाईट म्हणावे हेच कळेनास झाल आहे.सत्तेसाठी जो तो आपापल्या पक्षाची मनधरणी करत आहे. देशाच राज्याच आणि समाजाच या आताच्या राजकारणी नेत्यांना काही देणंघेणं नाही. स्वतःची भाकरी भाजली पाहिजे बस बाकी मातित गेल असीच सर्वांची वृत्ती आहे.
जितेंद्र आव्हाड वक्तव्यावरून वाद.
पुढारी वृत्तसेवा : जितेंद्र आव्हाड यांनी वादात्मक भाष्य केले की राम प्रभू वनवासा दरम्यान काय सेवन करीत होते. तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की राम प्रभू वनवासा दरम्यान मांसाहार करीत होते, खर्या अर्थाने त्यांना हे न शोभणार वक्तव्य आहे. कारण राम प्रभू हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आणि प्रश्न असा उपस्थित होतो तर मग जितेंद्र आव्हाड हे नेमके हिंदूच आहेत का असा प्रश्न निर्माण होतो.
यावरून असे लक्षात येते की मत मिळवण्यासाठी हे राजकारणी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. अतिशय गलिच्छ राजकारण चालू आहे.जितेद्र आव्हाड यांच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले की जितेंद्र आव्हाड याची डीएनए टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.पत्रकारांशी बोलताना गिरीश Girish Mahajan म्हणाले.
पुढे गिरीश महाजन म्हणाले की महाराष्ट्रात असेही काही लोक आहेत. ते मुळचेच लुच्चाड आहेत. त्यांना देव धर्म काही कळत नाही. हव्यासा पोटी स्वतःच्या भल्यासाठी त्यांना काही सांगा ते करायला तयार होतात. प्रभू राम म्हणजे एकतेच प्रतिक आहे. त्यांनी एकात्मता शिकवली, समानता शिकवली, आणि बंधूता शिकवली त्याच रामाबद्दल असे घाणेरडे शब्द यांना सुचतात तरी कसे.प्रसिद्धी साठी काही पण. पुढे महाजन म्हणाले की यापुर्वी राज्यात दोन भुकंप होऊन गेले आहेत आणि येत्या दहा वीस दिवसात तिसरा महाभुकंप होणार आहे. आता नेमका हा हा भुकंप काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात जल जीवन विस्कळीत.
जन जीवन विस्कळीत झाले असून जल वाहिन्यांचे काम रखडले आहेत.त्या कामांना वेग दिला पाहिजे.ही काम संथगतीने सुरू आहेत. या वेळी जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन कामांना प्राधान्य द्यावे अस गिरीश महाजन म्हणाले.राज्यात या वर्षी कमी पावसामुळे पाणी टंचाई उद्भवत आहे.
लोकांचे जलजीवन विस्कळीत होऊ नये त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे अस राज्याचे ग्रामविकास मंत्री Girish Mahajan म्हणाले आहेत. सरकार मार्फत जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे.राज्यात काही गावात या योजनेचे काम पुर्ण झाले आहे. आगामी काळात पाणी टंचाई समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडले कामे तात्काळ पुर्ण करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने ठोस पावल उचलावीत या बाबतीत कसलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. असही महाजन म्हणाले.
जिल्हा परिषद शाळांना निधी उपलब्ध.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि अस्तित्वात असलेले स्वच्छता गृहाच्या दुरुस्ती करता पाच कोटी बावन्न लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषद शाळांना उपलब्ध करून दिला आहे.आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही या कामांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे स्वच्छता गृहाचे काम तातडीने पूर्ण घेण्याचे आवाहन Girish Mahajan यांनी केले आहे.
यावेळी अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते त्यावेळी महाजन बोलत होते. तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत साल २०२४ -२०२५ अंतर्गत ३३२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे असे ते म्हणाले.तसेच अनुसूचित जाती जमाती उपाययोजनेंतर्गत १२४ कोटी रुपये आणि अनुसूचित जाती जमाती उपाययोजनेंतर्गत तीन कोटी सतरा लाख ईतकी तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी वर्षा ठाकूर, घुगे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी असलम तवडी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेडी, तसेच विविध विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथून बैठकीत सहभागी झाले.
लातूर पालकमंत्री पदाची निवड.
जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी नेहमीच सत्ताधारी पक्षाकडून केली जात आहे. पण पक्षासाठी नेहमीच कराव्या लागणाऱ्या तरतूदी, पदाचे वाटप अशा वेळी बर्याचदा बाहेरून पालकमंत्री आमंत्रित केले जातात. राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो ही पद्धत कायम आहे. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा अमित देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी भाजप नेते नेहमीच टीकात्मक भाष्य करताना दिसत होते.
पण आता तसे राहिले नाही तर आत राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि त्यामुळे आताचे असलेले पालकमंत्री Girish Mahajan यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात सर्वत्र नाजारी दर्शवली जात आहे.बाहेरचा पालकमंत्री नको असी स्थानिक मंत्र्यांची भावना होती.आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार या दोन नेत्यांच्या घडामोडीत जिल्ह्याला पालकमंत्री पदापासून वंचीत राहावे लागले होते.
ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली आणि गिरीश महाजन यांच्याकडे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की दर विस दिवसाला लातूर मध्ये येईल.पण त्यांनी हे दिलेले आश्वासन निस्फळ करुन दाखवले आहे.केवळ झेंडा फडकवण्यासाठी येणाऱ्या यादीत त्याचे नाव घ्यावे की काय? असी परिस्थिती आहे. आज तरी ते जिल्हा नियोजन बैठकीला हजर राहतील असे वाटले होते पण त्यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती दाखवली. असी खंत व्यक्त केली जात आहे. स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे.
दिवसभरातील ठळक घडामोडी.
पक्षाचे अवस्था डगमगीत न होऊ देता पुन्हा एकदा त्याच ईर्षेने आणि त्याच उमेदीने शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षबांधणी करता पुन्हा एकदा कंबर कसली आहे.लोकसभा निवडणूकीसाठी ते स्वतः मैदानात उतरले आहेत. नवीन चेहर्यांना संधी देत जुन्या गद्दारांना बाय बाय करत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सुरंग लागण्याची शक्यता आहे. बिड जिल्ह्यातही ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्या जिल्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चांगलीच लढत होण्याची शक्यता दाखवली जात आहे.
Girish Mahajan
मागील काही महिन्यांपासून दोनही गटात मोठी उलथापालथ सुरू आहे.मात्र शिवसेना ठाकरे यांनी यावेळी अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गद्दारांना आमच्याकडे थांबण्याचा अधिकार नाही अशाच शब्दात पक्ष प्रमुखांनी खडसावत नवीन चेहर्यांना संधी देत पक्षात सामील करून घेतले जात आहे.
दे देखील पहा 👇
मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा