श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा/आळंदी यात्रा-कार्तिकी एकादशी 2023 sant dnyaneshwar maharaj

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा २०२३. या सोहळ्याला अनेक नावाने संबोधले जाते आळंदी यात्रा, आळंदी वारी, आळंदी देवाची, कार्तिकी यात्रा, कार्तिकी वारी, कार्तिकी एकादशी, उत्पत्ती एकादशी, उत्पत्ती स्मार्त एकादशी , समाधी सोहळा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळा, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, kartiki vari, kartik vari, kartiki ekadashi, kartiki ekadashi 2023, kartiki yatra, alandi vari, Alandi yatra, alandi yatra 2023, alandi devachi, utpatti ekadashi, bhagvat ekadashi, sant dnyaneshwar maharaj samadhi, sant dnyaneshwar maharaj mahiti, dnyaneshwar maharaj, sant Dnyaneshwar Maharaj smadhi sohla, dnyaneshwar Maharaj, Dnyaneshwar mauli अशा अनेक नावांनी संबोधले जाते.

ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रसंग

आलंकापुरी हे शिवपीठ | पूर्वी येथे होते निळकंठ | ब्रम्हादिकीं तप वरिष्ठ | येथेची पै केले ||

sant dnyaneshwar maharaj :ज्या वेळेला महादेव आणि पार्वती तिर्थ भ्रमण करीत असतांना अचानकच भगवान शंकर यांना आचार्याचा धक्का बसला आणि भगवान शंकर आणि पार्वती माता त्या ठिकाणी अवतरले आणि भगवान शंकर त्या जागी गडबडा गडबडा लोळू लागले पार्वती मातेलाही कळेना पतिदेवाला अचानकच असे काय झाले.

Dnyaneshwar maharaj :त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारले की देवा तुम्ही असे का लोळत आहात. त्यावेळी भगवान शंकर पार्वतीला सांगू लागले की हे बघ म्हणे पार्वती तुला नाही कळायच मी का लोळतोय ते. तेव्हा पार्वती म्हणाली देवा तुम्ही मला सांगीतले तर कळेल ना, सांगितलेच नाही तर मला पळणार कसे, पार्वती ने आग्रह केला तेव्हा

भगवान शंकर म्हणाले हे बघ पार्वती हे जे ठिकाण आहे ते काही सामान्य ठिकाण नाही. हे ठिकाण अतिशय पवित्र ठिकाण आहे. या क्षेत्राचा महिमा सामान्य माणसाला तर न कळण्यासारखाच आहे. जगात कुठेच असे पवित्र ठिकाण नाही या ठिकाणी अतिशय दैदिप्यमान तेजःपुंज अशा चार मुर्ती अवताराला येणार आहेत.

Shri sant dnyaneshwar maharaj : महान साधू या अवतार घेणार आहेत.निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार विभुती या पवित्र ठिकाणी येऊन मोठ कार्य करणार आहेत त्यावेळी पार्वतीच्या लक्षात आले आणि त्या ठिकाणी पार्वती आणि भगवान शंकरांनी तप केले.आजही त्या पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर भगवान सिद्धेश्वराच मंदिर आहे.

विठ्ठलपंत कुलकर्णी जीवन प्रवास

आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी हे नेहमी ईश्वर भक्तीत रममाण असायचे.अतिशय विरक्त वृत्ती,अत्यंत शांत स्वभावाचे तेजःपुंज मुर्ती तिर्थ भ्रमण करीत असतांना अलंकापुरीत विराजमान झाले सर्वत्र त्यांच्या ईश्वर भक्तीचा प्रसार झाला. सर्व जन त्यांना मानू लागले पाहता पाहता त्यांचा विवाह झाला.

sant dyaneshwar maharaj : आळंदी देवाची सिद्धोपंताची ( श्रीधर पंत) यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा विवाह संपन्न झाला.परंतु त्यांचे मन संसारात रमेना. पत्नीला सारख म्हणायचे रुक्मिणी आग संसारात माझ मनच लागेनास झालय. संन्यास घ्यावा म्हणतोय.संन्यास घेण्याचा विचार ते करु लागले.

विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यास आश्रम 

काही केल्या संसारात मनच रमेना आणि शेवटी त्यांनी घराचा त्याग केला काशीला निघून गेले. काशिला रामानंद स्वामी यांच्याकडून गुरू दिक्षा घेतली. मात्र एक दिवस रामानंद स्वामी आळंदी या गावी आले सिद्धेश्वराच दर्शन करीत असतांना त्याच ठिकाणी रुक्मिणी माता सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या. रामानंद स्वामी सिद्धेश्वराच दर्शन घेऊन सुवर्ण पिंपळाकडे येताच रुक्मिणी मातेने रामानंद स्वामीचे दर्शन घेतले आणि स्वामींनी आशिर्वाद दिला.

dnyaneshwar maharaj samadhi sohla : सौभाग्यवती भव: त्या वेळी रुक्मिणी माता विचलित झाल्या हे स्वामींनी पाहीले आणि विचारले असे का अचंबित झालात आपण त्यावेळी रुक्मिणी मातेने घडलेली सर्व हकीकत सांगितली विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्याशी माझा विवाह झाला पण त्यांचे मन संसारात रमेना संन्यास घेण्याचा विचार करत होतो आणि एक दिवस अचानक घरातून निघून गेले ते आनखीन घराकडे परतलेच नाहीत.

रामानंद स्वामींची भेट

रामानंद स्वामींनी रुक्मिणी मातेला पतीची खुन विचारली आणि रामानंद स्वामी काशीला निघून गेले. एक दिवस विठ्ठलपंत कुलकर्णी सकाळी स्नान करून देवाचे ध्यान करीत बसले असता त्याठिकाणी रामानंद स्वामी आले विठ्ठलपंत उपकरणे गुंडाळून उघडेच बसले होते त्यावेळी रुक्मिणी ने सांगितलेली खुन विठ्ठलपंतांच्या खांद्यावर रामानंद स्वामींना  दिसली त्यावेळी रामानंद स्वामींनी विठ्ठलपंतांना सर्व हकीकत विचारली ओळख पटली आणि

विठ्ठलपंत दुसर्यांदा ग्रहस्थाश्रमात पदार्पण 

विठ्ठलपंतांना माघार घरी पाठवून ग्रहस्थाश्रमात प्रवेश करण्यास सांगितले. विठ्ठलपंत गुरुंचा आदेश समजून परत आळंदीला आले रुक्मिणी मातेलाही आनंद झाला आणि आता सुखात संसार करु लागले. पाहता पाहता त्यांना गोंडस सोज्वळ चार मुल झाले. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई अशी ही भावंडं. पण समाज त्यांना जवळ करेना कारण ही संन्यास्यांची मुल. समाजाने त्यांना वाळीत टाकले.

संन्यास्यांची मुल म्हणून छळ

आता हे सर्व जन आळंदी येथे सिद्धबेटाच्या ठिकाणी झोपडी बांधून वास्तव्य करु लागले. ज्ञानेश्वर महाराज माधूकरी मागण्यासाठी गेले असता विसोबा खेचराने त्यांना माधूकरी मिळवून दिली नाही उलट ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत माती कालवली त्यांच्या अंगावर सेन फेकले.ज्ञानेश्वर महाराज तसेच माघारी आले खंत करु लागले.

dnyaneshwar maharaj
dnyaneshwar maharaj

मुक्ताईचा ज्ञानेश्वरांना उपदेश 

झोपडीचा दरवाजा बंद केला मुक्ताईला हे समजले दादा आत बसलाय आता मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांची समजुत घालू लागल्या माऊली तुम्ही योगी आहात योग्याने असे रागवल्यास कस जमेल आपण बाहेर या ज्ञानाची दरवाजे आपणास खुली करायची आहेत.मुक्ताईचा हा उपदेश ऐकून dnyaneshwar maharaj बाहेर आले.

पुढे मुलांची मुंज करण्यासाठी समाज त्यांना शुद्धिपत्र मिळून देईना.आळंदी बाटवली इंद्रायणी बाटवली असे त्यांना तथाकथित ब्राह्मण हिनवू लागले.

आई बाबांचे देहांत प्रायश्चित 

आळंदीतील ब्राह्मण समाज त्यांना शुद्धिपत्र देण्यास तयार होईना. तुम्हाला शुद्धिपत्र हवे असेल तर तुम्हाला पैठणच्या पिठाकडे जाऊन शुद्धिपत्र आनावे लागेल तरच तुम्हाला मुंज करता येतील.अन्यथा नाही शेवटी विठ्ठलपंत कुलकर्णी हे पैठणच्या पिठाकडे आले आम्ही तुम्हाला शुद्धिपत्र देऊ पण तुम्हाला देहांत प्रायश्चित द्यावे लागेल.

dnyaneshwar maharaj samadhi sohla 2023 : विठ्ठलपंतांच्या डोळ्यात पाणी आले आणि विचार केला चला काही हरकत नाही मुलांच्या मुंजी होत असतील तर देहांत प्रायश्चितही देऊ. मान्य केल आणि शुद्धिपत्र घेऊन परत आळंदीला आले सिद्धबेटाच्या ठिकाणी आले रात्र झाली मुल झोपले असता रात्रीच्या प्रहरी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी मातेने इंद्रायणीच्या डोहात उडी मारुन देहांत प्रायश्चित केले.

सकाळ झाली मुल उठली बघतात तर आई बाबा दिसत नाहीत. शेजारीच एक पत्र होते निवृत्ती ने पत्र वाचले आणि लक्षात आले आईबाबांनी देहांत प्रायश्चित घेतले.डोळ्यात पाणी आले पण सर्व भार निवृत्तीच्या खांद्यावर पडला आई बाबा गेले निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि छोटीशी चिमुकली मुक्ता मुल परकी झाली.

ज्ञानेश्वर महाराज जीवन प्रसंग 

ज्या वेळी ज्ञानेश्वर महाराज आणि चारही भावंडे सिद्धबेटाच्या ठिकाणी वास्तव्य करीत होते. एक दिवस ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली असता मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना खापर आणण्यास सांगितले असता विसोबा खेचराने त्यांना खापर मिळू दिले नाही.

त्यावेळी मुक्ताईला वाईट वाटले पण Dnyaneshwar Maharaj म्हणाले मुक्ते नाहीना लोकांनी आपल्याला खापर मिळू दिले काही हरकत नाही. मुक्ते तु पिठ मळव आणि त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले. त्यावेळी विसोबा खेचराने बघीतले आणि त्यांना आचार्याचा धक्काच बसला.

पुढे ज्ञानेश्वर महाराज आणि हे चार भावंडं पैठण गावी गेले असता. ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले की सर्वांच्या ठिकाणी एकच परमात्मा आहे त्यावेळी तेथील कर्मठ ब्राह्मणांनी त्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा समोरून एक रेडा चालला होता त्या वेळी ब्राह्मण म्हणाले की तो जो समोरुन रेडा चालला आहे मग त्याचा आणि तुमचा आत्मा एकच आहे तर त्या

रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखवता का? त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु निवृत्ती नाथांचे दर्शन घेऊन पुढे सरकले आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतला त्यावेळी सर्व कर्मठ ब्राह्मणांचा गर्व गळीत झाला. आणि तिथून पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा जय जय कार करु लागले ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय

ब्रम्हगिरी प्रदक्षिणा निवृत्ती गहिनीनाथांची भेट 

तिथून पुढे ते ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता गेले असता घनदाट जंगल लागले आणि प्राण्यांच्या वाघाच्या आवाजाने यांची धावपळ झाली तेव्हढ्यात निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू या जंगलात भरकटले गेले ते पुढे चालत चालत त्यांना एक गुफा लागली निवृत्तीनाथ त्या गुफेत शिरले ती गुफा होती गहिनीनाथांची. निवृत्तीनाथांनी दर्शन घेतले आणि घडलेली सर्व हकीकत निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांना सांगितली.

Sant dnyaneshwar maharaj : गहिनीनाथांच्या लक्षात आले त्यांनी निवृत्तीनाथांना कृपा दृष्टीने पाहिले आणि आता निवृत्तीनाथांकडून विद्यार्जन करुन घेऊ लागले. बाकीचे सर्व जन प्रदक्षिणा करून आळंदी ला आले.

ज्ञानेश्वरांचे प्राकृत भाषेतील ग्रंथ लिखाण

निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांचा जन्म श्रेष्ठ वर्णात झाला असला तरी समाजाने त्यांना वाळीत टाकले.हिन म्हणून वागणूक देऊ लागले.आणि बहुजन समाजालाही असेच चटके सहन करावे लागतात ते चटके सहन करावे लागू नयेत म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतील श्रीमद् भगवद्गीता ही सर्वसामान्य माणसाला कळावी, सर्वांना हे गीतेच ज्ञान घेता याव म्हणून dnyaneshwar maharaj यांनी प्राकृत भाषेत गीतेच लिखाण केले.

अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारख्या अनमोल ग्रंथाला जन्म दिला. यावरुनच त्यांच्या बुद्धी कौशल्याचा अंदाज घेऊ शकता. मराठी साहित्यातले महान संत म्हणून त्यांचा गौरव झाला. आध्यात्माचे ज्ञान सर्वांना घेता यावे हा कुणाचा वयक्तीक अधिकार नाही जन्माला आलेल्या प्रत्येकाला हा अधिकार आहे असा संदेश त्यांनी जगाला दिला. सर्व सामान्य माणसाला भक्तीचा मार्ग त्यांनी मोकळा केला. असे मोठे समाज कार्य त्यांनी केले.

तीर्थयात्रा करीत करीत पैठण, आपेगाव, पुढे नेवास्याला आले त्या ठिकाणी ग्रंथ लिखाण केले.ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव यासारख्या विविध ग्रंथांच लिखाण झाले.

नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तिर्थ यात्रा

ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची भेट.संत नामदेव महाराज हे भगवंताचे अतिशय जवळचे लाडके भक्त होते नामदेव महाराज यांच चौदा मानसांच कुटुंब हे विठ्ठलाची भक्ती करणारे होते. dnyaneshwar maharaj आणि नामदेव महाराज तिर्थ यात्रेला गेले पाहता पाहता त्यांनी भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत नेली. संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते.भागवत धर्माचा मोठ्या कल्पवृक्षात रुपांतर झाले.

dnyaneshwar maharaj
dnyaneshwar maharaj

ज्ञानेश्वर महाराज समाधी निर्याण 

अस म्हणतात की साधू हा कार्य संपल्यानंतर जास्त दिवस थांबत नाहीत. त्याच प्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना ईश्वर साक्षात्कार झाला आणि त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. तर ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार म्हणून त्यांच्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा स्वतः रुक्मिणी ला सोबत घेऊन आले. आदिकरून सर्व संत, मुनी, ऋषी, आळंदी आले, सर्वांनी ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला. आता dnyaneshwar maharaj समाधीस्थ होणार.

सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी रडू लागले. त्यावेळी रुक्मिणी माता विचार देवा तुम्ही का रडताय त्यावेळी देव म्हणाले रुक्मिणी ज्ञानेश्वरांसारखा योगी मी आनखीन बघीतला नाही.हे ऐकून रुक्मिणी माता रडू लागल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

भगवान पांडुरंग परमात्म्याचे उद्गार 

देव म्हणती रुक्मिणी | हा एकची योगी देखीला नयनी | हेची ज्ञान संजीवनी | जान त्रैलोक्याशी || आता देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर | जातो ज्ञानेश्वर समाधीस्थ || उठविला नंदी शिवाचा तो ढवळा | उघडली शिळा विवराची || पुष्प वृष्टी झाली

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी

नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ ||

पुढे भगवंताने सर्वांना आग्रह पुर्वक सांगितले की दर वर्षी जसे तुम्ही सर्व जन आषाढी एकादशीला पंढरपूरला येता तसेच कार्तिकी एकादशीला म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला सर्वांनी यावे.देव म्हणतात जर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला आलेच तर

आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||

जो करील याची यात्रा | तो तारील सकळ गोत्रा | सकळही कुळ पवित्रा | याचेंनि दरुषने होती ||

|| यात्रे अलंकापुरा येती | ते आवडती विठ्ठला ||

हे देखील पहा 👇

ग्रामीण भागात करता येतील असे १० व्यवसाय कमी गुंतवणूक करुन भरपूर नफा मिळवून देणारे व्यवसाय अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Facebook

x