Datta Jayanti 2023 : दत्त जन्माची संपूर्ण माहिती/अवतार कार्य कथा भाग/जाणून घ्या सविस्तर माहिती/दत्त जयंती २०२३

datta jayanti 2023 : मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जन्माची सविस्तर कहाणी. दत्तात्रय भगवान अवताराला येण्यामागच कारण काय आहे.त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ब्रम्ह, विष्णु आणि महेश या तिनही गुणांच एकत्रिकरण म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार चला तर मग जानून घेऊयात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.⤵️

अनुसया मातेची एकनिष्ठता आणि अतिथी पुजन 

अत्रिऋषींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतीव्रता धर्माच पालन करणारी आणि धार्मिक वृत्तीची होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतिची उत्तम पद्धतीने सेवा करीत होती. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या आदराने आदर अतिथ्य करीत असे.

datta jayanti 2023 : दारात आलेला पाहुणा कधीही अनुसया मातेने कधीच आश्रमातून उपाशी पोटी माघारी जाऊ दिला नाही.तिला माहिती होत धर्म करणे, धर्म तीला माहित होता. अतिथी देवो भव पितृ देवो भव हे ती जानून होती म्हणून दारात आलेला पाहुणा जर रिकाम्या हाताने माघारी गेला तर तो पाहुणा असंतुष्ट होतो,

Datta Jayanti 2023 : क्रोधित होतो आणि शाप देऊन जातो आणि जाता जाता नुसता जात नाही तर आपल्या पुंण्याची शिदोरी सोबत घेऊन जातो. आपल पुण्य घेऊन जातो – विन्मुख जाय अतिथी | घेऊन जाय पुण्यांची पावती | म्हणून अनुसया माता आश्रमातून विन्मुख कुणालाही जाऊ देत नसायची 

मात अनुसया पतिव्रता धर्माचे पालन

आणि तिच्या त्या पातिव्रत्याला पाहुन सूर्यदेवही तिला घाबरायचे. अग्नी तिच्या पुढे शितल होतसे, पवन तिच्या पुढे नम्र होतसे, तिच्या पातिव्रत्याच्या भयाने सर्व देवलोक भयभीत होत असे. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.

datta jayanti 2023 : पतिबद्दल तिच्या ठिकाणी असलेली श्रद्धा, अनन्य भक्ती, पतिचिया मता अनुसरोनी पतिव्रता. जी कधीच पतिच्या आज्ञ बाहेर वागत नाही तिला पतिव्रता असे म्हणतात. पतिव्रतेच्या ठिकाणी मोठी शक्ती असते. तुका म्हणे पतिव्रता | तिचि देवावरी सत्ता | पतिव्रता स्री देवलोत सत्ता करु शकते. असे पतिव्रतेचे महत्त्व आहे.

नारदांनी बातमी पसरवली.

एकेदिवशी अनुसयाच्या पातिव्रत्याची वार्ता नारदमुनींच्या कानावर पडली. आणि कळ करणार नाहीत ते नारदमुनी कसे. लगेचच ही गोष्ट नारदमुनींनी विष्णुदेवाची पत्नी म्हणजेच लक्ष्मी माता, शंकराची पत्नी पार्वती माता आणि ब्रम्हदेवाची पत्नी सावित्री या तिघिंना अनुसया बद्दल नारदमुनीने सविस्तर सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण जीवन चरित्र आणि ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

datta jayanti 2023 : त्यावेळी तिघिंच्या मनात संकोच निर्माण झाला, आणि त्यावेळी त्या तिघींनीही अनुसयाचे सत्व हरण करावे असा विचार त्यांच्या मनात आला. तिघींनीही आपापल्या पतिकडे हट्ट धरला. आणि अनुसयाची परिक्षा घेण्याकरता ब्रम्ह, विष्णु आणि महेश तिघेही ब्राह्मणांच्या रुपात भगवे कपडे धारण करून, हातात कमंडलू, वेशभूषा करुन मृत्यूलोकास येण्यास निघाले.

ब्रम्ह,विष्णु,महेश अनुसयाकडे इच्छा भोजन मागण्यास 

आणि थेट अत्रिऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचले. दुपारची वेळ होती अशा वेळी आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी बघुन अनुसया मातेने त्या तिघांना मोठ्या आदराने बसण्यास आसन दिले. त्यांचे चरण धुतले, व भक्तीभावाने त्यांचे पुजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले.

datta jayanti 2023 : त्यावेळी अतिथी म्हणाले आम्ही लांबून आलो आहोत. आणि तुझे सुंदर स्वरुप पाहुन आम्हास इच्छा झाली आहे की तु आम्हाला इच्छा भोजन द्यावे. अनुसया म्हणाली कसले इच्छा भोजन त्यावेळी ते ब्राह्मण म्हणाले की तु आम्हाला नग्न अवस्थेत आम्हास भोजन वाढावे – आसनी बैसता सत्वर | म्हणती क्षुधा लागली फार | नग्न होऊनी निर्धार | इच्छा भोजन देईजे |

पतिव्रतेची परिक्षा

हे बोल ऐकताच अनुसया मनात विचार करु लागली आणि म्हणाली हे कुणीतरी माझी परिक्षा पाहण्यासाठी आलेले अतिथी असावेत. आणि यांना जर विन्मुख माघारी पाठवले तर माझे पातिव्रत्य भंग पावेल. माझे मन तर निर्मळ आहे. आणि माझ्या पतिची शक्ती माझ्या सोबत आहे.

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023

 

datta jayanti 2023 : अनुसया म्हणाली थांबा पतिची आज्ञा घेऊन येते आणि घरात गेली तर पतिदेव ध्यानस्थ बसले होते. पतिला सर्व हकीकत सांगितली त्यावेळी अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व ओळखले.

त्यावेळी अत्रिऋषींनी अनुसया जवळ एका पात्रात गंगाजल दिले आणि म्हणाले हे जल त्यांच्या अंगावर शिंपड व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणोनिया मानसी | तीर्थगंडी देई कांतेसी | गंगा प्रोक्षुणी तिघांसी | भोजन देई जाण पा ||

ब्रम्ह विष्णु महेश अनुसयाच्या मांडीवर

आणि पतिच्या आज्ञेवरून ती गंगाजलाची पंचपात्री हातात घेऊन त्या तिघांच्या समोर आली आणि हातातले गंगाजल त्या तिघांच्या अंगावर शिंपडले. पाहते तर काय त्या गंगाजलाचा स्पर्श होताच ते तीन ब्राम्हण तीन लहान लहान बालके झाले आणि पायाजवळ लोळू लागले.

datta jayanti 2023 : आणि त्यावेळी अनुसयाने त्या तिनही छोट्या छोट्या गोजिरवाण्या बालकांना आपल्याजवळ उचलून घेतले.आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे – कंचुकोसहित परिधान | फेडूनि ठेवी न लगता क्षण | नग्न होवोनिया जाण | बाळका जवळी बैसतसे || – बाळे घेऊनी मांडीवरी | स्तनी लावी जेव्हा सुंदरी | पान्हा फुटला ते अवसरी | देखोनी सती आनंदे || 

अशा तऱ्हेने ते तीन ब्राम्हण लहान लहान बालके झाली भुकेने व्याकूळ झाले म्हणून रडू लागले अनुसयाने उचलून घेतले आणि स्तनपान केले. आणि थापटुन झोपी घातले.असे अनेक वर्षे निघून गेले.

ही गोष्ट लक्ष्मी पार्वती आणि सावित्रीच्या कानावर

एक दिवस नारदमुनी अत्रिऋषींच्या आश्रमात आले. आश्रमात रितीरिवाजा प्रमाणे नारदमुनींचे आदर आथीत्य झाले नारदमुनींना बसण्यास आसन टाकले.तेव्हा त्याठिकाणी ती तीन लहान लहान मुल ब्रम्ह विष्णु आणि महेश रांगत खेळत नारदमुनींनी पाहिले.

Datta Jayanti 2023 : नारदांनी त्या मुलांना ओळखले. पण तिथे ते काहीच बोलले नाहीत. अत्रिऋषींचा निरोप घेऊन नारदमुनी थेट देवलोकात आले आणि ही गोष्ट लक्ष्मी, पार्वती आणि सावित्रीला नारदमुनींनी सांगितली. तेव्हा त्या तिघी चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रम्हपुत्र | तिघी मिळाल्या एकत्र | जोडोनिया करपात्र | नारदासी विचारिती ||

datta jayanti 2023 : तेव्हा त्या तिघींनीही हात जोडून नारदांना विनंती केली की आम्हाला त्या अत्रिऋषींच्या आश्रमात येऊन चला. म्हणजे आम्ही आमचे नवरे पती सोधुन परत घेऊन येऊ.तेव्हा नारदांनी त्यांना अत्रिऋषींचा आश्रम दाखवला आणि निघून गेले. तेव्हा त्या तिघी जणी लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री अत्रिऋषींच्या आश्रमात आल्या. तर अनुसया माता त्या तीन लहान लहान बालकांना खेळवीत होत्या.

अनुसया मातेची करुणा 

लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री अनुसयाकडे गेल्या आणि हात जोडून विनवणी करू लागल्या, करुणा भाकू लागल्या,हात जोडून क्षमा मागू लागल्या, म्हणू लागल्या आम्हाला माफ करा.घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा अनुसया मातेला तिघिंची दया आली. तेव्हा अनुसयाने पतिकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व वृत्तांत अत्रिऋषींना सांगितला.

datta jayanti 2023 : तेव्हा अत्रिऋषींनी अनुसयेस पुन्हा गंगाजल देऊन त्या बालकांच्या अंगावर शिंपडण्यास सांगितले. अनुसया माता ते गंगाजल घेऊन त्या बालकां जवळ येतात सांगितल्याप्रमाणे पंचपात्रीतील जल शिंपडले आणि तेव्हा ती बालके पुर्ववत देवस्वरुपात प्रगट झाले. ब्रम्ह, विष्णु, महेश इतक्यात अत्रिऋषी बाहेर आले आणि त्यांनी तिन्ही देवांना साष्टांग नमस्कार केला.

ब्रम्हा विष्णु महेश प्रसन्न होऊन वर दिला.

त्यावेळी ब्रम्ह विष्णु महेश प्रसन्न झाले आणि म्हणाले हे अनुसये माता आम्हाला क्षमा कर आम्ही तुझी भक्ती पाहून तुजवर प्रसन्न आहोत. तुझ्या इच्छेप्रमाणे वर माग. त्यावेळी अनुसयाने वर मागितला की तुम्ही तिघांनीही ब्रम्ह विष्णु महेश बालक रुपाने एका स्वरुपात माझ्या उदरी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे.तेव्हा देवांनी तथास्तु म्हणून अंतर्धान पावले.

datta jayanti 2023 : पुढे अनुसया माता पतिची सेवा आणि ईश्वराची भक्ती नित्यनेमाने करत होती.काही दिवस लोटले पुढे अनुसया माता गरोदर राहिल्या मनात प्रसन्नता होती. ईश्वर भक्तीचा संकेत अनुसया मातेला जानवू लागला. आणि

दत्तात्रय भगवंताचा जन्म.

मासामाजी मार्गशीर्ष | उत्तम महिना प्रियकर | तिथीमाजी तिथी थोर | चतुर्दशी शुद्ध पै || वार बुधवार कृत्तिका नक्षत्र | ते दिनी ब्रम्हा विष्णु महेश | तिघे मिळोनी एकत्र | शुद्ध सत्व निवडीले || त्रैमुर्तीचे सत्व मिळोन | मुर्ती केली असे निर्माण | ठेविते झाले नामकरण | दत्तात्रय अवधूत ||

datta jayanti 2023

धरी अवतार विश्व तारावया | अत्रिची अनुसया गरोदर ||१|| ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी | शुक्लपक्ष दिनी पुर्ण तिथी ||२|| तिथी पोर्णिमा मास मार्गशीर्ष | गुरु तो वासर उत्सवकाळ ||३|| एका जनार्दनी पुर्ण अवतार | निर्गुण निराकार आकारले ||४|| अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रय भगवंताचा जन्म झाला. सायंकाळच्या वेळी दत्तात्रय भगवान प्रगट झाले.जन्माला येताच तिन शिरे सहा हात तया माझे दंडवत.

Datta Jayanti 2023 : अशी तेजःपुंज मुर्ती पाहून अनुसया मातेला अत्यानंद झाला.अनुसया मातेला धन्यता प्राप्त झाली. आणि तेव्हा पासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्लपक्ष पोर्णिमेला प्रदोषकाली दत्तात्रय भगवंताचा जन्मोत्सव जगभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे होतात. महाराष्ट्र गाणगापूर या ठिकाणी दत्तात्रयाचा मोठ्या प्रमाणात दत्त जन्मोत्सव दर वर्षी साजरा होतो. पोर्णिमेला दर वर्षी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.

datta jayanti 2023 : तसेच दत्त भक्त घरोघरी दत्तात्रयांच्या फोटोला, मुर्तीला हार घालून पुजन करतात. तर कोणी आठ दिवस गुरुचरित्राचे मोठ्या श्रद्धेने पारायण वाचण करतात आणि त्यांच्या मनोकामना आजही पुर्ण होतात. 

AFQ – ( Datta Jayanti 2023 )

1) दत्त जयंती ला काय करावे?

दत्त जयंती ला भगवान दत्तात्रयांचे पुजन करावे.या दिवशी दत्त जन्माला उपवास करावा. दत्त मंत्राचा जप करावा, दत्त मंदिर जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन दत्तात्रयांचे दर्शन घ्यावे. नाहीतर प्रतिमेचे पूजन करुन नमस्कार करावा, दत्तात्रयांची प्रतिमा नसेल तर भगवान विष्णूचे पुजन करावे कारण दत्तात्रय हे भगवान विष्णूचे अवतार आहेत.तुळसी पत्र, फुल,फळ, अक्षदा, सुंठवड्याचा प्रसाद, नैवद्य, आरती करुन दर्शन घ्यावे.

2) दत्त जन्म किती वाजता आहे?

भगवान दत्तात्रयाचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला आहे. सायंकाळी ६ चा दत्तात्रयांचा जन्म मानला जातो. म्हणून दत्त जयंतीच्या दिवसी दत्तात्रयांचा जन्म काळ समजला जातो. दत्त जयंती निमित्ताने दत्तात्रयांचा जन्म उत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातो.या वर्षी वार मंगळवार दिनांक २६/१२/२०२३ रोजी दत्त जयंती आहे.

३) दत्त जयंती कधी आहे?

भगवान दत्तात्रयांची जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेलाच असते. भारतवर्षात दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी दत्तात्रयांचा जन्म उत्सव साजरा केला जातो.यालाच दत्त जयंती असे म्हणतात. तर या वर्षी दत्त जयंती २६ डिसेंबर २०२३ वार मंगळवार रोजी आहे. या निमित्ताने दत्त भक्त मोठ्या उत्साहाने श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात.या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

४) महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र कोणते?

महाराष्ट्रात असे दत्तात्रयांचे अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत. गाणगापूर हे भगवान दत्तात्रयांचे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी दर वर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली जाते. तसेच गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी, अक्कलकोट, माहुर, असे अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत.

५) दत्त जयंतीचे व्रत कसे करावे?

दत्त जयंतीचे व्रत हे एकादशी प्रमाणे पुर्ण दिवसभर उपवास, या दिवशी पहाटे पवित्र नदीचे स्नान किंवा प्रसिद्ध जलाशयाचे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पवित्र्याता राखीवी. दत्त प्रतिमेचे पूजन करावे. फुल,फळ, अक्षदा, सुंठवड्याचा प्रसाद, नैवद्य, आरती करुन, दर्शन घ्यावे, दत्त मंत्राचा जप करावा, शक्य असल्यास गुरुचरित्राचे पारायण करावे, दत्त विचारांचा प्रभाव आपल्या अंगी बाणावा, ध्यान, धारणा, दत्त स्तोत्राचे पठण करावे, अशा रीतीने दत्त जन्माचे व्रत केले जाते.

६) दत्तात्रयांचा जन्म कुठे झाला?

दत्तात्रयांचे जन्म स्थळ तसे संभ्रमात आहे. कोही ठिकाणी म्हणतात. रेणुका माता शिखरापासुन जे दुसरे शिखर आहे तेच म्हणजेच माहुर या ठिकाणी दत्तात्रयांचा जन्म झाला आहे. तर काही ठिकाणी नेपाळ नर्मदा परिक्रमा करताना हे ठिकाण लागते चित्रकुटा जवळील अनुसया पर्वत ही दत्तात्रयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. त्यामुळे नक्की दत्तात्रयांचे जन्म ठिकाण कोणते हा संभ्रम आहे. आपल्याला माहिती असेल तर नक्की कळवा..!

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

 

हे देखील वाचा 👇

थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा संपूर्ण जीवन चरित्र आणि त्यांनी जगाला दिलेला संदेश अधिक माहितीसाठी येथे क्लिक 

 

Facebook

 

x