Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : शिवजयंती साजरी करताय मग हे समजून घ्या? अन्यथा काही उपयोग नाही?

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे.वार सोमवार मराठी महिन्यानुसार माघ शुद्ध दशमी या तिथीला शिवजयंती आहे.संपुर्ण राज्यभरात मोठ्या आनंदात शिवजयंती साजरी केली जाते.तसेच गड किल्ल्यांवर देखील शिवजयंती उत्साहात विशेष करून शिवनेरी किल्ल्यावर महापराक्रमी परम प्रतापी जिजाऊ पुत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.खर्याअर्थाने आज शिवरायांना समजून घेणे काळाची गरज आहे.कोण होते शिवराय? याप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 निमित्त आनखिन काही महत्वाची माहिती पुढील प्रमाणे.

छत्रपती शिवरायांना समजून घेणे काळाची गरज..!

छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते राजे नव्हते तर ते रयतेचे राजे होते.रयतेच्या समस्या ते जाणत होते.प्रजेची देखभाल ते करायचे.रयतेच्या सुखदुःखात ते सामिल व्हायचे.सध्या दुर्दैव या मातीच शिवरायांच्याच रयतेत छत्रपती शिवराय हे आत्ताचे सत्ताधारी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी शिवरायांच्या नावाचा वापर करतांना दिसतात ही शोकांतिका आहे.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : मायबाप शिवराय हे पराक्रमी, शुर वीर नक्कीच होते पण त्यांनी कधीच जनतेचा वापर स्वतःच्या भल्यासाठी केला नाही. किंवा विशिष्ट एका कोणत्याच पक्षाचा तो विषय नाही.किवा कोणत्या विशिष्ट पक्षासाठी मर्यादित नाहीत.किवा विशिष्ट एका जातीसाठी ते लढत नव्हते.त्यांनी जातीभेद कधी केला नाही.म्हणून शिवरायांना एका विशिष्ट जातीत गुंतवून ठेवने ही लाजीरवाणी बाब होईल.स्वाभिमान जरुर बाळगावा पण अहंकार निर्माण होऊ देऊ नये.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : शिव छत्रपतींचा इतिहास तरुणांने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.शिव छत्रपतींची निती, जिजाऊ माँ साहेबांचे संस्कार, शहाजी राजांची छत्रछाया, शिवरायांचा संघर्ष, या सर्व गोष्टी बारकाईने समजावून आमलात आणणे खर्याअर्थाने ही काळाची गरज आहे.शिवरायांचा संघर्ष हा विशिष्ट एका वर्गासाठी मुळीच नव्हता तर शिवरायांचा संघर्ष हा रयतेच्या हिताचा होता.छत्रपती शिवराय हे सकल जाती धर्मांचे पुरस्कर्ते होते.त्यांच्या राज्यात जाती धर्माला थारा नव्हता.

शिवरायांच्या विचारांचा आदर्श अन्य देशांनी घेतला पण?

शिवरायांच्या विचारांचा अन्य देशांनी आदर्श घेतला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात जर शिवरायांच्या देशात जन्माला आलो असतो तर आम्ही त्यांना सुर्य संबोधले असते.पण मात्र याच राष्ट्रात आपल्याला त्यांचे महत्त्व कळेना ही एक अत्यंत घृणास्पद बाब आहे.एक वेळ शिवजयंती साजरी करु नका पण त्यांचे विचार समजून घ्या त्यांच्या नावाखाली गलिच्छ काम करु नका.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : ब्रिटिश सरकारने आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले परंतु जाताजाता इंग्रज गवर्नर त्यावेळी म्हणाले की जर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना जर कदाचित आनखिन दहा वर्षांच आयुष्य मिळालं असत तर आम्हाला भारताचा चेहरा पाहता आला नसता.म्हणून आजच्या तरुण पिढीने या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत नुसती शिवरायांसारखी दाढी मिशा वाढून कपाळावर चंद्र कोर लावून कोण छत्रपती होत नसतो हे विचारात घेणे आज काळाची गरज आहे. शिवरायांच्या विचारा प्रमाणे वर्तणूक असावी, जिजाऊ माँ साहेबांचे ध्येय, शहाजी राजांचे आत्मसमर्पण, वडील धार्यांचा आदर, महिलांचा आदर, गोरगरिबांवर दया, माझ्या प्रिय मावळ्यांनो खर्याअर्थाने आज ही काळाची गरज आहे.हे स्वराज्य माझे आहे आणि मी या स्वराज्याचा आहे ही भावना

छत्रपती शिवरायांचे धोरण..!

शिवरायांची जयंती महाराष्ट्रा पुरती मर्यादित नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केली जाते.या दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम राबविले जातात.गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासाच्या पानांवर शिवरायांची ख्याती आहे.मोडला कणा तरी सुद्धा लढ म्हणा हा शिवरायांचा बाणा होता.मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची ख्याती होती.शत्रू समोर कधीच ते झुकले नाहीत.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 :उलट शत्रूला झुकायला लावणारे छत्रपती शिवाजी महाराज होते.जिजाऊ माँ साहेबांनी जे स्वराज्याचे स्वप्न शिवरायांना दाखवले त्याच प्रमाणे शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली आणि अठरापगड जातीतल्या समाजाला एकत्र घेऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यांनी कधीच जातीभेद केला नाही.उलट जातीभेद करणार्यांना त्यांनी फोडून  काढल. जिजाऊ माँ साहेबांनी तशा प्रकारची शिकवण बालवयातच शिवरायांना दिली होती.

शिवरायांचा जन्म आणि त्यांचे कार्य.

अखंड स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.शिवरायांच्या जन्माने सर्वांना आनंद झाला आईने शिवरायांवर बालवयातच योग्य संस्कार केले. शिवराय हे अवतारी पुरुष होते. अतिशय देखणी मूर्ती चाणाक्ष बुद्धी, शुर, आणि धाडसी होते. शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला आणि दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना निति शास्त्र, गनिमी कावा, शिकायला मिळाले.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तलवार, दानपट्टा, भाला, घोड्यावर स्वार कसे व्हायचे यात तरबेज झाले. आणि वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी शिवरायांनी मावळ्यासोबत भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रायरेश्वराच्या पिंडीला रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी तोरणा किल्ला काबीज केला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.

Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 : आणि मोठ मोठ्या बलाढ्य शत्रू सोबत लढा दिला.औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान, अशा बलाढ्य शत्रूचा शिवरायांनी पराभव केला.आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन माँ जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले. छत्रपती शिवरायांनी वयाच्या केवळ 53 वर्षी अखेरचा श्वास घेतला.शिवरायांना आयुष्य फार थोडे मिळाले पण जेव्हढे मिळाले तेव्हढ्यातच त्यांनी महान कार्य केले ते कोणालाही करता आले नाही असे.

हे पण वाचायला विसरू नका.👇

छत्रपती शिवाजी महाराज जयंती केव्हापासून आणि कोणी साजरी केली जाणून घ्या शिवजयंती निमित्त विशेष थोडक्यात सविस्तर माहिती 

 

Facebook

 

x