संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी प्रस्थान होणार आणि माऊलीचा पहिला मुक्काम गांधी वाड्यात होणार आहे ashadhi wari 2024, 30 जून ला हा सोहळा पुण्याच्या दिशेने वाटचाल करणार असून 16 जुलै ला हा सोहळा पंढरपूर या ठिकाणी पोहचणार आहे. सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारी वारी म्हणजे आषाढी वारी. चला तर मग पाहुयात वारी निमित्त काही महत्त्वाच्या अपडेट पुढीलप्रमाणे…
उत्सूकता आषाढी वारीची.
आषाढी वारी म्हटल की सर्वत्र एकच उत्सूकता असते ती म्हणजे आषाढी वारीची.वारी जवळ आली की वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. सर्वांच्या मुखात एकच चला माऊली वारीला, माऊली यायच नाही का वारीला, झाली का माऊली वारीची तयारी, आम्ही निघालो माऊली वारीला तुम्ही कधी येताय माऊली असीच चर्चा सर्वत्र सुरू असते.
Ashadhi Wari 2024 : जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठेच पहायला मिळत नाही.असा हा आषाढी वारीचा सोहळा.अस म्हटल जात की जगात भारी पंढरीची वारी किंवा माऊलींची वारी.सर्वत्र आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची उत्सूकता पहायला मिळते.आषाढी वारीला निघायच म्हटल्यावर त्या अगोदर जो तो आपापले काम धंदे आटपून वारीला निघायची तयारी करत असतो.वारीला जाण्याची ती उत्सूकता काही वेगळीच असते.या वर्षी शेतकरी वर्ग वारीला येण्यासाठी उत्सुक आहे कारण पाऊस या वर्षी वेळेवर पडला असल्यामुळे पेरण्या समाधान कारक झाल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आषाढी वारीची परंपरा.
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला अमुल्य असा ठेवा.आषाढी वारी म्हणजे वारकरी परंपरेचा जनू काही चैतन्य उत्सव. वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा अभुतपुर्व सोहळा.वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा.गेल्या काही दशकांपासून हा सोहळा सुरु आहे.इ.स.1831 पासून हैबत बाबा अरफळकर यांनी या सोहळ्याची सुरुवात केली.म्हणून त्यांना या सोहळ्याचे आद्य प्रवर्तक संबोधले जाते.
Ashadhi Wari 2024 : भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सुरवातीच्या काळात हैबत बाबांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन आळंदी ते पंढरपूर अशी वारी सुरू केली.त्यानंतर हा सोहळा बैल गाडीने होऊ लागला.आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी रथात ठेऊन रथ दोन बैल आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करत रथ ओढतात.आज हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे.. इवलेसे रोप लावियेले द्वारी | तयाचा वेलु गेला गगनावरी ||
आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी.
आषाढी पायी वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर पायी केलेली पदयात्रा.या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने दिंड्या सहभागी होतात.महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. 20 ते 25 दिवस घरदार विसरून या सोहळ्याचा आनंद घेतात. इतर वेळेला आपण थोड सुद्धा चालत नाहीत. एक दोन कि.मी. चाललो तर पाय दुखतात पण या सोहळ्यात 20 ते 25 दिवस रोज 30, 35 कि.मी.चालतो पण पाय दुखत नाहीत, अंग दुखत नाही ही किमया माऊलींची आहे.वारीत मानस वयाने म्हातारे असतात पण मनाने मात्र तरुण असतात. नाचत नाचत पंढरीला जातात. वृद्ध होती तरणे रे…कीर्तन, भजन, टाळ मृदंगाच्या नादात ” ज्ञानोबा तुकाराम” चा जय घोष करीत. स्त्री असो पुरुष असो एकच जयघोष माऊली…
Ashadhi Wari 2024 : सकळांसी येथे आहे अधीकार किंवा यारे यारे लहान थोर | याती भलती नारीनर | न करावा विचार | नलगे चिंता कवनासी || लहान असो मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणताच भेदभाव या ठिकाणी नाही.या सोहळ्याला सगळ्याच जाती धर्माचे लोक येतात कारण या ठिकाणी कोणत्या एका जातीलाच प्राधान्य नसून नारी आणि नर असा भेदभाव नसून सर्व आपण एकच आहोत प्रभुची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी किंवा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असा हा अभुतपुर्व सोहळा आहे.
Ashadhi Wari 2024 वेळापत्रक
आळंदी संस्थान समितीच्या वतीने आषाढी वारी 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 29 जून 2024 रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 30 जून ला पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, अशा अनेक संतांच्या पालख्या समाधी स्थळावरुन पंढरपूरकडे निघतात.
Ashadhi Wari 2024 Date : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग – पहीला मुक्काम आळंदी, दुसरा पुणे, नंतर सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापुर, भंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर, 16 जुलै 2024 रोजी म्हणजे दशमीला हा सोहळा मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूर या ठिकाणी पोहचणार आहे. तर 20 जुलै पर्यंत माऊली पंढरपूर मध्ये थांबतात त्या नंतर 21 जुलै ला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास होणार आहे.
Ashadhi Wari 2024 रिंगण सोहळा
- पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब 8 जुलै रोजी.
- पहिले गोल रिंगण पुरंदवडे 12 जुलै रोजी.
- दुसरे गोल रिंगण खडुस फाटा 13 जुलै रोजी.
- तिसरे गोल रिंगण ठाकुर बुवा समाधी 14 जुलै रोजी.
- दुसरे उभे रिंगण बाजीराव विहीर 15 जुलै रोजी.
- चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर 15 जुलै रोजी.
- तिसरे उभे रिंगण वाखरी 16 जुलै रोजी.
Ashadhi Wari 2024 : आपणही या सोहळ्याचा आनंद घ्यावा. येण्याच्या विचारात असाल तर विचार सोडा आणि वारीला या कारण वारी कायम राहणारी आहे पण आपला भरवसा नाही. म्हणून जीवनात जो पर्यंत शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत एकदा तरी वारी करावीच. जोवरी हे सकळ सीद्ध आहे | हात चालावया पाहे | तव तू आपुले स्वहीत पाहे | तीर्थ यात्रे जाय चुकवू नको ||
!!जय जय राम कृष्ण हरी !!
हे पण वाचा 👇
वारी म्हणजे काय? का करावी वारी? काय होत वारी केल्याने? अशा अनेक प्रश्नांची माहिती खास तुमच्यासाठी