Ashadhi Ekadashi 2024 : कधी आहे आषाढी एकादशी? देवशयनी आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व.

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला अनमोल ठेवा.महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येतात.त्याचप्रमाणे अनेक साधू संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात, लाखो वारकरी आषाढी वारीला विठुरायाच दर्शन घेतात.या एकादशी ला अनेक नावांनी संबोधले जाते महाएकादशी, देवशयनी एकादशी, किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते.आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांची मांदियाळी, चला तर मग जाणून घेऊयात Ashadhi Ekadashi 2024 कधी आहे? आणि आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे. Devshayani Ashadhi Ekadashi 2024

आषाढी एकादशी 2024 कधी आहे? आणि एकादशी उपवास कसा करावा?

आषाढी एकादशी या वर्षी हिंदू पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी ही 16 जुलै ला रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु होणार असून तर 17 जुलै ला रात्री 9 वाजून 33 मिनिटापर्यंत असणार आहे. म्हणून आषाढी एकादशी 2024 या वर्षी  बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे.आषाढ शुद्ध 11 रोजी एकादशी आहे.म्हणजे 17 जुलै ला आपण एकादशीचा उपवास करायचा आहे.एका वर्षात 24 एकादशी येतात, एका महिन्यात 2 एकादशी येतात. एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. त्यानूसार अशा एकूण 24 एकादशी त्या 24  एकादशी पैकी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी ला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात मुख्यतः आषाढी एकादशीला विठ्ठलाची पुजा केली जाते.

Ashadhi Ekadashi 2024 Date : आषाढी एकादशी कशी करावी? तस तर एकादशीचा उपवास हा वेगळा आहे, एकादशी दिवशी ईश्वराचे स्मरण करावे, ध्यान करावे, नामस्मरण करावे, कीर्तन, भजन, करावे ईश्वर चिंतनात रममाण होऊन कामात असाल तर

Ashadhi Ekadashi 2024 : “हाताने काम आणि मुखाने नाम” कामामध्ये काम काही म्हणा राम राम किंवा हरी बोला गाता हरी बोला खाता | सर्व कार्य करता हरी बोला. आणि दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी एक टाईम जेवण करायच आणि एकादशीला निऱ कारी उपवास करायचा अन्न सेवन करायचे नाही. शक्य नसल्यास फलाहार करावा किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. आणि दुसर्या दिवशी द्वादशी ला सकाळी लवकर एकादशीचा उपवास सोडला जातो. असा हा एकादशीचा उपवास आहे.

पंढरपूर चे महत्व.

पंढरपूर हे पुरातन स्थान असल्याचा उल्लेख आहे. पृथ्वीतलावर जगात अजरामर दोनच स्थान आहेत एक म्हणजे काशी आणि दुसर पंढरपूर.कारण या क्षेत्राचा महिमा अविनाशी असा उल्लेख आहे.

Ashadhi Ekadashi 2024 : गेल्या अठ्ठावीस युगांपासून भगवान पंढरीस परमात्मा विटेवर उभा आहे. ” युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ” म्हणजेच पंढरपूरचा इतिहास अनंत कालापासूनचा आहे. जेव्हा कोठेच नव्हते काही | चंद्र सूर्य तारा नाही | अवघे शुन्यची होते पाही | कान्होबा तेरे तेरे ते ||१|| जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर | जेव्हा नव्हती गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा ||२|| जेव्हा ही पृथ्वी शुन्य स्वरुपात होती त्या अगोदर पंढरपूर होतो. जेव्हा चंद्र सूर्य नव्हते तेव्हा पंढरपूर होते. जेव्हा या पृथ्वीवर चराचरातला कोणताच जीव नव्हता तेव्हा पंढरपूर होते. जेव्हा गोदावरी आणि गंगा नव्हती तेव्हा  होती चंद्रभागा. स्वर्गातले देव सुद्धा या सुखाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छीताती देवा | मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा || असे या पंढरपूरचे महत्व आहे

Ashadhi Ekadashi 2024 : त्या नंतर गेल्या अठ्ठावीस युगांपासून भगवान पंढरीस परमात्मा विटेवर उभा आहे.आता तो विटेवर का उभा आहे? पंढरपूरला का आला कोठुन पंढरपूरला आला, कोणामुळे आला, पंढरपूरला येण्याच पहिल कारण म्हणजे पुंडलिका कारणे वाळवंटी उभा | चैतन्याचा गाभा शोभतसे | किंवा उभा हा भाविकांसाठी | विठू कैवल्याचा गाभा | भक्त पुंडलिक हा आईवडिलांची सेवा करत होता त्याची भक्ती पाहून प्रत्यक्ष भगवान परमात्मा गोकुळातून पंढरीस आला. पुंडलिकाच्या भावार्था | गोकुळीहूनी झाला येता ||

आषाढी एकादशी आणि चातुर्मास शुभ काळ.

कारण आषाढी एकादशी ला सर्व भक्त मंडळी देवाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. आणि भगवान सुद्धा म्हणतात आषाढी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुज पांडुरंग || कारण देवाला सुद्धा भक्ताशिवाय आणि भक्ताला सुद्धा देवाशिवाय करमत नाही. देव भक्ताचा संगम म्हणजे आषाढी एकादशीची वारी. आषाढी एकादशी पासून चातुर्मास प्रारंभ होतो.

Ashadhi Ekadashi 2024 : चातुर्मास हा योगी, तपी, संन्यासी, आणि साधक यांच्यासाठी हा चातुर्मासाचा काल शुभ मानला जातो. या कालावधीत काही गोष्टीचा त्याग करायचा तर काही गोष्टी ग्रहण करायच्या असतात. स्त्री आणि पुरुष यांनी काही नियमाच पालण करायच आहे त्यात महत्त्वाचे ब्रम्हचारी पदाचे पालण करायचे आहे. त्याचे आनखीण अनेक नियम आहेत.तर योगी तपी संन्यासी यांनी या कालावधीत ध्यान, धारणा, योग साधना, ज्ञानार्जन करण्यासाठी चातुर्मास हा शुभ मानला जातो. आणि चातुर्मासाच्या काळात त्यांनी क्षेत्राच्या ठिकाणी निवास करावा अस म्हटल जात. इतरत्र कुठेही थांबू नये. आणि हा चातुर्मास चार महिने असून त्याची समाप्ती कार्तिक महिन्यातील एकादशीला होते.त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात.

हे पण पहा 👇

Ashadhi wari 2024 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024, चला माऊली वारीला | झाली का वारीची तयारी?

Pandharpur wari 2024 : आतुरता पंढरीच्या वारीची | वारी म्हणजे काय? का करावी वारी? काय होत वारी केल्याने?

 

Telegram

 

x