Alandi yatra 2023 : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा / या वर्षी लाखो वारकरी माऊलींच्या समाधी सोहळ्याला

चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी माऊलींच्या समाधी सोहळ्याला आळंदीला येतात.

Alandi yatra 2023 या वर्षी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला वार सोमवार दि.11/12/2023 ला 727 वर्ष पुर्ण होतात. भाविक मोठ्या उत्साहाने श्रद्धेने समाधी सोहळ्याला येतात. जशी पांडुरंगाची आषाढी वारी मानली जाते तशी माऊलींची कार्तिकी वारी म्हणून मानली जाते.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी इंद्रायणी नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली.कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 दुर्मुखनाम संवत्सर इ.स. 1296 गुरुवार. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. त्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई ने आपले इहलोकीचे जीवन कार्य संपवले.

आळंदी कार्तिकी यात्रा 2023

Alandi yatra 2023 : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून भाविक वारकरी लाखोंच्या संख्येने आळंदी मध्ये उपस्थित राहतात. अतिशय सुंदर मोहक पध्दतीने वेगवेगळ्या फुलांची सजावट, आकर्षक लायटिंग रोषणाई केल्यामुळे मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न वातावरणात दुमदुमून गेला आहे.मोठ्या उत्साहाने भाविक वारकरी या सोहळ्याचा आनंद घेत आहेत.

Alandi yatra 2023 शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर ला उत्पत्ती स्मार्त एकादशी शनिवार 9 डिसेंबर ला भागवत एकादशी. तर वारकरी मंडळी भागवत एकादशीचला प्राधान्य देतात म्हणजेच 9 डिसेंबर ला भागवत एकादशी आहे आणि 11 डिसेंबर ला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा.

समाधी सोहळ्याला 727 वर्ष पुर्ण 

या वर्षी माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला 727 वर्ष पुर्ण होतात.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आद्य प्रवर्तक (जनक) हैबत बाबा आरफळकर यांच्या पायरीचे पुजन करून. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा अभिषेक केल्या जातो.पवमान अभिषेक, धुप आरती, दुधारती, महापुजा, नैवेद्य, नित्यनेमाने पार पडते.या वेळी दर्शन रांगेत उभे असलेल्या पहिल्या दांपत्याला या महापुजेचा मान दिला जातो.नंतर माऊलींच्या दर्शनासाठी दर्शन बारी खुली केली जाते.

Alandi yatra 2023 : या सोहळ्यासाठी पंढरपूर वरुन प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज यांची पालखी आणि या पालखी रथा सोबत लाखो वारकरी आळंदीला दर वर्षी येत असतात. माऊलींच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूर या ठिकाणाहून दरवर्षी येतात. त्याच प्रमाणे नामदेव महाराज विविध संतांच्या पालख्या आळंदी या ठिकाणी येतात. सर्व संतांच्या पादुका संत रुपाने माऊलींच्या दर्शनाला येतात.

कीर्तन,भजन,प्रवचण विविध कार्यक्रम

या निमित्ताने माऊलींच्या मंदिरा मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.किर्तन, संगीत भजन, प्रवचण इतर. आळंदी मध्ये विविध धर्मशाळेत, वेगवेगळ्या फडावर आठ दिवस किर्तन प्रवचन भजनाचे कार्यक्रम होतात. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे किर्तन होतात. या कीर्तनाला लाखोंच्या संख्येने भाविक कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित राहतात.

Alandi yatra 2023 : मोठ्या उत्साहाने श्रद्धेने भाविक कीर्तन ऐकतात.आठ दिवस मनसोक्त आनंद घेतात. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक अन्नदान करतात. तिर्थाच स्नान, आळंदी प्रदक्षिणा, विविध भागातून आलेल्या दिंड्या टाळ मृदंगाच्या ठेक्यावर ज्ञानोबा तुकाराम नामाचा जय घोष करीत आळंदी नगर प्रदक्षिणा करतात.माऊली आऊली लहान असो मोठा असो सर्वांना माऊली माऊली.

ज्ञानेश्वर महाराज दर्शन बारी

ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले भाविक इंद्रायणी चे स्नान करून.दर्शन बारीला उभे राहतात बारा ते आठरा तास दर्शन बारीत उभे राहून दर्शन घेतात. जो पर्यंत माऊलींच दर्शन होत नाही तोपर्यंत त्यांच्या जिवाला चैन पडत नाही.

Alandi yatra 2023
Alandi yatra 2023

 

Alandi yatra 2023 : दर्शन घेतल्याशिवाय मनाला समाधान प्राप्त होत नाही आणि एकदा का दर्शन की मग आठरा तास दर्शन बारीत उभे राहून पाय दुखलेले विसरून जातात, माऊलीला एकदाच डोळे भरून पाहील की आयुष भराच दुःख विसरून गेल्या सारख वाटत.वर्षभर वारकरी या सोहळ्याची उत्सुकतेने वाट बघत असतात.

बळीराजाचे चांगले दिवस येऊदे भाविकांचे माऊलींना साकडे.

आळंदी कार्तिकी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना साकड घातल की शेतकऱ्यांचे चांगले दिवस येऊदे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव सरकारने देऊ दे. सरकारने शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेऊ दे.आणि धर्माच रक्षण होऊ दे. सरकारला अशी सद्बुद्धी होऊ दे असे साकडे आळंदी यात्रेला आलेल्या वारकऱ्यांनी माऊलींना घातले आहे.

Alandi yatra 2023 : जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संकटात सापडला आहे. त्याची वाली कोणी नाही. म्हणून आता माऊली तुम्हीच या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि बळीराजाच, धर्माच, आणि देशाच रक्षण कराव. अशा स्वरूपाच हे व्याकुळ झालेल्या जीवाच माऊलींना साकड होत.

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी दुकान सजली 

Alandi yatra 2023 या सोहळ्यात वेगवेगळ्या भागातून विविध व्यावसायिक दुकानदार प्रसादाचे स्टॉल, टाळ मृदंग, हाराफुलाचे दुकाने, खेळण्यांची दुकाने, स्वेटरचे मोठमोठे दुकान, घोंगड्यां विकणारे, रथपाळणे, महिलांसाठी कटलरी बांगड्या विविध प्रकारचे व्यावसायिक या सोहळ्यात टेला लावून बसतात. आणि मग आलेले भाविक मोठ्या उत्साहाने खरेदी करताना दिसून येतात कोण काय कोण काय जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार खरेदी आनंद घेतात.

आळंदी यात्रे निमित्त ज्यादा बसेस सेवा

पंचक्रोशीतील भाविक या सोहळ्याचा मोठा आनंद घेतात आणि या सोहळ्यासाठी मोठी व्यवस्था करतात. पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात असतात. या वर्षी या सोहळ्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. विविध भागातून ज्यादा बसेस सेवा सोडण्यात येतात.यात्रे दरम्यान 342 ज्यादा बस सेवा सोडण्यात आल्या आहेत.

Alandi yatra 2023 : 8 डिसेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 या दरम्यान चार दिवसांत रात्रीच्याही बस सेवा सोडण्यात आल्या असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.यात्रे दरम्यान गावातील बस स्थानक हे काटे वस्तीकडे हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून वेगवेगळ्या भागाच्या बसेस सोडत असल्याची माहिती आहे. 

कार्तिकी यात्रे निमित्त इंद्रायणी घाट 

Alandi yatra 2023 : आळंदी इंद्रायणी घाटाची रोषणाई, विश्व शांती केंद्र, माऊली दर्शन बारी, वारकऱ्यांची मांदियाळी सर्वत्र माऊली माऊली चला माऊली घ्या माऊली या माऊली महिला असो किंवा पुरुष असो सर्वांच्या मुखात माऊली आणि फक्त माऊलीच.

आळंदी यात्रा परतीचा प्रवास

यात्रे निमित्त आलेले भाविक तिन चार दिवस या सोहळ्याचा आनंद घेतात.किर्तन, भजन, प्रवचण माऊलींचे दर्शन मित्र मंडळींच्या गाठी भेटी. एकदशीचा उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडतात.

Alandi yatra 2023 : आणि त्यानंतर माऊलींना हात जोडूनह जड अंतःकरणाने माघारी निघतात.तर काही भाविक माऊलींच्या समाधी सोहळ्याला थांबतात समाधी सोहळा हा त्रयोदशीला असतो त्यामुळे अनेक भाविक त्रयोदशी पर्यंत थांबतात त्या नंतर माघरी फिरतात.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सविस्तर माहिती 

महाराष्ट्र पुणे : इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आळंदी हे गाव अतिशय रमणीय आहे.आणि याच इंद्रायणी नदीच्या काठावर ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे.मंदिराला मुख्य चार द्वार आहेत मुख्य द्वार एक शनी द्रार दोन गणेश द्वार तिन आणि इंद्रायणी द्वार चार.

Alandi yatra 2023 : मंदिरात प्रवेश करताना मुख्य महाद्वारात सुरवातीला कासव आहे. कासव हे स्वतः चे संरक्षण करण्यासाठी जसे आपले सर्व अवयव आत खेचून घेत. त्याच प्रमाणे आपणही मंदिरात भगवंताकडे जात असताना सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.आपले मन कुणीकडे भरकटू नये. याकरता प्रत्येक मंदिराच्या समोर कासव असते.

महाद्वाराच्या पहिल्या पायरीला हैबत बाबांची समाधी आहे. हैबत बाबा आरफळकर हे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आद्य प्रवर्तक मानले जातात.आता महाद्वारातून आत गेल की दोन्ही बाजूला गरुड हणुमंत उभे आहेत.त्या पुढे विणा मंडप आहे. त्या ठिकाणी बाराही महिने अखंड विणा चालू असतो.आत कारंजा मंडप आहे आणि त्याच्याच समोर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे.

आता मागे फिरून विणा मंडपाच्या तिथून डाव्या बाजूला गेल की हैबत बाबांच मंदिर आहे. तिथन खाली आल की नाथ महाराजांचा पार आहे तीथे नाथांच्या पादुका आहेत आणि त्या पारावर पिंपळ आहे. तिथे सेजारीच संत भोजलींग काकांच समाधी मंदिर आहे. तिथेच दर्शन बारी आहे माऊलींच्या समाधी कडे जाण्यासाठी.

Alandi yatra 2023 : तिथून आनखी पुढे आल की गणपती मंदिर आहे आणि तिथेच गरुड खांब आहे तिथेच सेजारी माऊलीच साज घर आहे. तिथून थोड पुढे या आता आपण माऊलींच्या समाधीच्या मागच्या बाजूला आहोत. तिथे मागच्या बाजूला ज्ञानेश्वर महाराजांची बहीण आदिशक्ती मुक्ताईच मंदिर आहे. तिथेच समोर सिद्धेश्वराचा नंदी आहे आणि त्या नंदीपासुनच ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळी जाण्यासाठी भुयार आहे. नंदीच्या सेजारी. उठविला नंदी शिवाचा तो ढवळा | उघडली शिळा विवराची ||

त्या नंदी पासून खाली आल की सिद्धेश्वराच पुरातन मंदिर आहे. आळदी हे गाव पुण्य भुमी ठाव | दैवताचे नाव सिद्धेश्वर ||१|| तिथून बाहेर आल की समोर पिंपळ आहे तिथून सिद्धेश्वराच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस दिसतो. तिथून पुढे आले की वर पायर्या चढताना हणुमंतराय आहेत

Alandi yatra 2023 : वर आले की अजानवृक्षाची झाड आहेत त्या अजानवृक्षाच्या छायेखाली अनेक भाविक बाराही महिने ज्ञानेश्वरी ग्रंथाच पारायण करीत असतात. तिथून पायर्या उतरुन खाली आले की विठ्ठल रखुमाईच मंदिर आहे त्याच पुढे माऊलींची पालखी आहे. तिथून पुढे आल की सुवर्ण पिंपळ आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण जीवन चरित्र अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ. त्याच पिंपळाला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने म्हणजेच रुक्मिणी मातेने सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. आणि आजही तो पिंपळ आहे. म्हणून आजही भाविक त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आता तिथून पुढे मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.

आळंदी येथील पवित्र ठिकाण 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी आळंदी. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली ते ठिकाण आळंदी प्रदक्षिणा रोड वडगाव चौक या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराजांनी पाठिवर मांडे भाजवले ते ठिकाण प्रदक्षिणा रोड दुराफे विद्यालया समोर. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जुनी ज्ञानेश्वर महाराज मंदिरा सेजारी. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था नवीन चाकण रोड आळंदी या ठिकाणी.

Alandi yatra 2023 : आळंदी इंद्रायणी नदीच्या घाटावर सद्गुरू जोग महाराज समाधी आहे. गुरूवर्य मामासाहेब दांडेकर यांची समाधी याच ठिकाणी आहे तसेच गुरूवर्य ह.भ.प. पांडुरंग महाराज वैद्य यांची समाधी याच ठिकाणी आहे. गुरुवर्य ह.भ.प विठ्ठल बाबा घुले यांची समाधी याच ठिकाणी आहे. गुरूवर्य निकम बाबा यांची समाधी याच ठिकाणी आहे. असे हे पवित्र ठिकाण आहे 

नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ आळंदी चाकण चोक. ज्ञानेश्वरी मंदिर गोपाळपुरा आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे. सिद्धबेट आळंदी केळगाव या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण आहे. गुरुवर्य ह.भ.प. जयराम महाराज भोसले (बाबा) संस्था आळंदी सिद्धबेट या ठिकाणी आहे. विश्वशांती केंद्र आणि स्तंभ आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर हे ठिकाण आहे. विश्रांत वड वडगाव रोड आळंदी या ठिकाणी आहे. तसेच आळंदी या ठिकाणी अनेक धर्मशाळा आहेत. 

जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी 

आळंदी देवाची तसेच अलंकापुरी असेही म्हटले जाते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या ठिकाणी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थे मध्ये अनेक विद्यार्थी आध्यात्माच चार वर्षे ज्ञान ग्रहण करतात.

Alandi yatra 2023 : साधना करतात आणि चार वर्षाचा अभ्यास करून किर्तनकार होतात. जोग महाराज वारकरी संस्थे मध्ये आतापर्यंत लाखो विद्यार्थी विद्यार्जन करुन बाहेर पडले आहेत. या संस्थेमध्ये गुरुवर्यांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही. अशी निष्काम सेवा गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था करत आली आहे.

Alandi yatra 2023

आळंदी हे गाव पुण्य भुमी ठाव | दैवताचे नाव सिद्धेश्वर ||१|| चौर्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा | हा सुख सोहळा स्वर्गी नाही ||२|| विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव | स्वर्गाहुनी देव करिताती ||३|| नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ||४||

Alandi yatra 2023 ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा…🙏

येथे पण पहा 👇

श्री संत ज्ञानेश्वर महारा संजीवन समाधी सोहळ्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Facebook 

 

x