Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र/आणि ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला दिलेला संदेश/अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 2023

नमस्कार सर्वांना सप्रेम जय हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज Alandi संपूर्ण जीवन चरित्र अतिशय सोप्या शब्दात आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अगदी बारकाईने मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.तुम्हाला नक्कीच आवडेल.चला तर मग पाहूयात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे 👇

ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्णी हे मुळचे आपेगाव पैठण या ठिकाणचे.पुढे विठ्ठलपंत काही कारणास्तव आळंदी या ठिकाणी आले. विठ्ठलपंत हे ईश्वर भक्तीत रममाण होते. सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा झाली. अतिशय विरक्त वृत्तीचे, शांत स्वभावाचे आणि सतत ईश्वर चिंतन. पुढे त्यांचा Alandi या ठिकाणी विवाह झाला. सिद्धोपंताची कन्या रुक्मिणी हिच्याशी विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा विवाह झाला.

पण काही केल्या संसारात त्यांच मनच रमेना. संन्यास घेण्याचा विचार ते करु लागले.आणि एकदिवस त्यांनी घराचा त्याग केला काशीला निघून गेले. रामानंद स्वामी कडून गुरु दिक्षा घेतली आणि कालांतराने गुरुंना समजले की विठ्ठलपंत हे सांसारिक आहेत. म्हणून गुरुने त्यांना पुन्हा ग्रहस्थाश्रमात प्रवेश करण्यास सांगितले ते आळंदीला आले आता ते सुखाचा संसार करु लागले. पाहता पाहता त्यांना चार अपत्ये झाली निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, आणि मुक्ताई.

आई वडिलांच्या संस्कारात ही मुल लहानाची मोठी होऊ लागली पण समाज त्यांना जवळ करेना कारण ही संन्यास्यांची मुल म्हणून त्यांना समाज हिनवू लागला.Alandi मध्ये वावरु देईनात. आळंदी बाटवली, इंद्रायणी बाटवली असं समाज त्यांना वागणूक देऊ लागला. समाजाने त्यांना वाळीत टाकले. गावापासून बाहेर सिद्धबेटाच्या ठिकाणी वास्तव्य करु लागले. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते. शेवटी समाज त्यांना भिक्षाही मागू देईना.

विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहात प्रायश्चित्त.

पुढे असेच किती दिवस चालायचे म्हणून विठ्ठलपंतांनी मुलांची मुंज करण्याचे ठरवले पण तथाकथित ब्राह्मण समाज त्यांना शुद्धिपत्र मिळू देईना. त्यावेळी त्या तथाकथित ब्राह्मणांनी सांगितले की तुम्हाला जर मुलांच्या मुंजी करायच्या असतील तर एकच पर्याय आहे तो म्हणजे देहांत प्रायश्चित. शेवटी मुलांच्या भल्यासाठी विठ्ठलपंतांनी तथाकथित ब्राह्मणांचा आदेश मान्य केला. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने रात्रीच्या वेळी मुल झोपेत असतानाच Alandi इंद्रायणीच्या डोहात उडी मारुन देहांत प्रायश्चित केले. 

आता आईवडील तर गेले तरी पण आळंदीतील ब्राह्मणांनी त्यांचा छंळ बंद केला नाही.शेवटी त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला जर समाजात वावरायचे असेल तर पैठणच्या पिठाकडे जाऊन शुद्धिपत्र आनावे लागेल तरच आम्ही तुमचा स्विकार करु.

ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्या मुखी वेद बोलविला 

पुढे ही चार भावंडं पैठण गावी गेले असता तेथील समाजही त्यांची चेष्टा करू लागला. पण ही अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे मुल अतिशय हुशार.

चर्चा सुरू होती चर्चेत ज्ञानेश्वर महाराजांनी विषय मांडला की सर्वा घटी राम देहादेही एक. सर्वांच्या हृदयातला परमात्मा एकच आहे तर तुम्ही असा भेद का? करता. आपण देहाने भिन्न दिसत असलो तरी देखील आपण एकच आहोत.त्यावेळी पैठणच्या पंडितांनी सांगितले की समोरुन रेडा चालला आहे मग त्याचा आणि तुमचा आत्मा एकच आहे का?

तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हो त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. त्यावेळी त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारण्यात आला तर त्या चाबकाचे वण ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर उमटू लागले.

Alandi : शेवटी सांगितले की त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेऊ शकता का? त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हो का नाही आणि त्या क्षणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर प्रत्यक्षात तो रेडा वेद बोलू लागला. त्यावेळी पैठणच्या ब्राह्मणांचा द्वेष नाहीसा झाला आणि ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा जय जय कार करु लागले ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय.

ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत माती कालवली.

एके दिवशी ज्ञानेश्वर महाराज आळंदी मध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले असता. तेथील स्थानिक ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा तर दिलीच नाही उलट त्यांच्या झोळीत कुणीतरी वाढलेल पिठ खाली मातीत मिसळून दिल.आणि त्यांच्या झोळीत माती कालवली आणि अंगावर शेन फेकले. ज्ञानेश्वर महाराजांचा राग अनावर झाला.

तसेच ज्ञानेश्वर महाराज Alandi मधून बेटात माघारी आले आणि झापडीचा दरवाजा बंद करून आत बसले. मुक्ताईच्या लक्षात आले की ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज आत दरवाजा बंद करून बसले त्या अर्थी काही तरी झाले आहे. त्यावेळी मुक्ताई समोर आली आणि ज्ञानेश्वर महाराजांची समजूत घालू लागली.

ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताचा उपदेश 

माऊली आपण योगी आहात समाजाने त्रास दिला म्हणून काय झाले. समाज हा अज्ञानी आहे. तुम्ही तर ज्ञानी आहात ना. तुमच्या सारख्याने असे रागवणे बरे नाही. मुक्ताईचे हे बोल ऐकून ज्ञानेश्वर महाराजांचे अंतःकरण भरुन आले ज्ञानेश्वर महाराजांनी दार उघडले आणि मुक्ताईच्या गळ्यात गळा घालून रडू लागले आणि म्हणू लागले मुक्ताई तु किती समजूतदार झाली आहेस.

आपण या समाजाच काय वाईट केल आहे म्हणून हा समाज आपल्याला इतका त्रास देत आहे. त्यावेळी मुक्ताई म्हणते जाऊदेरे दादा कुणी जीभ दाताने चाविली म्हणून काय बत्तीसी पाडली.मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांची समजूत घालून राग शांत केला. 

संत ज्ञानेश्वर महाराज जीवन कार्य 

संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील विठ्ठलपंत कुलकर्णी वडील आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी आई.ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ आपेगाव ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर पैठण पासून काही अंतरावर.ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म – श्रावण वद्य अष्टमी गुरुवार दि. 22 ऑगस्ट इ.स. 1275 शालिवाहन शके 1197.

Alandi या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ – कार्तिक वद्य त्रयोदशी, रविवार दि. 02 डिसेंबर इ.स. 1296 शालिवाहन शके 1217. संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे कार्य तेराव्या शतकातील आहे. ज्ञानेश्वर महाराजांना अनेक नावाने संबोधले जाते ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, ज्ञानराजा, माऊली अशा अनेक नावांचा उल्लेख केला जातो. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायाचा पाया रोवला आहे.

Alandi dyaneshwar Maharaj : ज्ञानेश्वर महाराजांनी मुख्य चार ते पाच ग्रंथाचे लिखाण केले, ज्ञानेश्वरी, (भावार्थदीपिका) अमृतानुभव, हरिपाठ, अभंग गाथा आणि चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या अनमोल ग्रंथाचे लिखाण केले.आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी काव्य रचना केली ती मराठी भाषेतूनच केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे मराठी भाषेवरच प्रेम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – माझ्या मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजा जिंके | ऐशी अक्षरे रसिके | मेळविण ||

तो पाळतो
तो पाळतो

ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी 

संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी ठिकाण आळंदी देवाची (पुणे – महाराष्ट्र) इंद्रायणी नदीच्या काठावर सिद्धेश्वराच्या शेजारी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मामाचे (आजूळ) गाव Alandi देवाची संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते ठिकाण नेवासा अहमदनगर जिल्हा.

ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक श्री सच्चिदानंद बाबा. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचे नाव परीस खांब आज नेवासा या ठिकाणी या खांबाचे मंदिर आहे.ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण तर त्यांचेच थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज. निवृत्ती नाथांची समाधी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आहे.

एक गुरु एक शिष्य परंपरा मोडीत काढली ती ज्ञानेश्वर महाराजांनी

निवृत्ती नाथांना अनुग्रह गहिनीनाथांनी दिला तिथुन पुढची एक गरु एक शिष्य परंपरा खंडित केली ती ज्ञानेश्वर महाराजांनी.म्हणजेच भगवान शंकरापासून हे ज्ञान एक गुरु एक शिष्य असच चालत आल होत.शंकराने मच्छिंद्रनाथास. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथस. गोरक्षनाथाने गहिनीनाथास. गहिनीनाथाने निवृत्तीनाथास.

Alandi sant Dnyaneshwar Maharaj: आणि निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांना ते ज्ञान दिल आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान अवघ्या जगाला.आणि गुरु कडून म्हणजेच निवृत्तीनाथां कडून आलेल ज्ञानेश्वर महाराजांकडे जे ज्ञान ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व जगाला वाटून टाकल.या ज्ञानाची दरवाजे जगासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी खुले केले. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात | 

श्री दत्त जन्माची संपूर्ण माहिती आणि अवतार कार्य कथा भाग अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव त्यांची समाधी सासवड पुणे या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराजांची बहीण सर्वात शेवटी चिमुकली मुक्ताई. त्यांची समाधी मेहूण जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी.

जगाला संदेश रेड्याच्या मुखातून वेद

पैठणच्या पंडित ब्राह्मणांना ज्ञानाचा अहंकार झाला असता ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या (म्हैसी पुत्र) मुखातून वेद वदवून घेतला त्यावेळी त्या तथाकथित ब्राह्मणांचा गर्व हरण झाला आणि ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा जय जय कार करु लागले.

Alandi : आज त्याच रेड्याची आळेफाटा या ठिकाणी समाधी आहे. रेड्याची समाधी असलेल एकमेव ठिकाण आळे आळेफाटा या ठिकाणी आहे.आज त्याच रेड्याचा समाधी सोहळा भरतो. मोठ्या प्रमाणात दरवर्षी यात्रा होते.

चांगदेव महाराज गर्व हरण

श्री संत चांगदेव महाराज हे सामान्य नव्हते चौदाशे वर्ष जीवन जगले असे चांगदेव महाराज. सहा महिने समाधीस्थ असायचे तर त्या सहा महिन्यांत परिसरातील मेलेले मानस लोक त्यांच्या पुढे आणून टाकयचे आणि ज्यावेळेला सहा महिन्यांच्या नंतर चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून बाहेर यायचे आणि त्या चांगदेव महाराजांनी नुसत त्या मेलेल्या प्रेताकडे नुसत बघीतल तरी प्रेत जिवंत व्हायचे उठून बसायचे आणि आपल्या आपल्या घरी निघून जायचे असे चांगदेव महाराज.

Alandi : एक दिवस ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती नाथ महाराज सोपानदेव मुक्ताबाई फिरत असतांना हा प्रकार दिसला मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांना विचारले म्हणे दादा हा काय प्रकार आहे. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले हे चांगदेव महाराज आहेत. चौदाशे वर्ष तपश्चर्या करून सहा महिने समाधीस्थ असतात.

Alandi devachi : आणि सहा महिने सुप्त अवस्थेत असतात आणि हे जे मेल्याले प्रेत त्यांच्या समोर कशामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मुक्ताई चांगदेव महाराज समाधी तून बाहेर आल्यावर चांगदेव महाराजांनी नुसत त्या प्रेताकडे बघीतल तरी ते प्रेत जिवंत होतात मुक्ताई म्हणाली दादा बस इतकच ना मुक्ताईने समोर पडलेल एका कुत्र्याच हाड उचलून नुसत त्या प्रेतावरुन ओवाळून फेकल तर सर्वच मेलेले प्रेत जिवंत होऊन निघून गेले.

ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेवाचे कोरे पत्र.

पुढे चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि पाहतात तर एकही प्रेत समोर दिसेना.चांगदेव महाराजांनी त्यांच्या शिष्यांना विचारले काय कारण आहे एकही प्रेत नाही त्यावेळी चांगदेव महाराजांना त्यांच्या शिष्यांनी सांगितले Alandi येथून ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती, सोपान, मुक्ताई आले होते आणि मुक्ताईने एक हाडूक उचलून फिरवून टाकले तर सर्वच्या सर्व प्रेत उठून निघून गेले.

Alandi – dyaneshwar Maharaj  : त्यावेळी चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहण्याकरता घेतले तर चांगदेव महाराजांना त्या पत्रात काय लिहावे तेच कळेना कारण साष्टांग नमस्कार लिहावा तर ज्ञानेश्वर महाराज वयाने लहान आहेत आणि नमस्कार बाळांनो लिहाव तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाने मोठे आहेत. काय लिहाव काय लिहाव शेवटी.

Alandi : चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना कोरच पत्र पाठवल. त्यावेळी मुक्ताई म्हणू लागली चांगदेवाने चौदाशे वर्ष तपश्चर्या केली पण चांगदेव शेवटी कोराच राहीला.त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मुक्ताई चांगदेव महाराजांनी कोर पत्र पाठवल किमान आपल्याला तरी त्यात लिहिता येईल आणि त्याच कोर्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना 65 ओव्या लिहून पाठवल्या.आज त्याचेच नाव चांगदेव पासष्टी असे आहे.

निर्जीव भिंत आणि चांगदेवाचा अहंकार

पुढे चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना निरोप पाठवला की आम्ही तुम्हास भेटायला येत आहोत तर चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला वाघावर बसून आणि एका हातात साप अशा अवस्थेत आले आहेत असे समजता Alandi येथे ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती नाथ सोपानदेव आणि मुक्ताई सकाळी सकाळी ही चार भावंडं कोवळ उन खात भिंतीवर बसले होते.

चांगदेव महाराज वाघावर बसून येतात हे समजल्यावर मुक्ताई म्हणते दादा आता कस त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले  मुक्ताई आपण कशावर बसलेलो आहोत मुक्ताई म्हणते दादा आपण भिंतीवर बसलेलो आहोत. त्यावेळी

Alandi dyaneshwar Maharaj samadhi  : ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आपण याच भितिंला आज्ञा करु चालण्याची आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतिंला आज्ञा करताच भिंत चालायला लागते आणि हे समोरुन चांगदेव महाराज जेव्हा बघतात तर काय निर्जीव भिंत आणि तेही चांलते. चांगदेव महाराजांचा चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेला अहंकार नाहीसा झाला वाघावरुन खाली उतरले आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले. आजही ही भिंत आपल्या Alandi या ठिकाणी पाहायला मिळते.शेवटी चांगदेवांनी मुक्ताईला गुरु करुन शिष्यत्व पत्करले. अशी ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती आहे.

हे देखील पहा 👇

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2023 / या वर्षी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला 727 वर्ष पुर्ण आळंदी कार्तिकी यात्रा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

 

फेसबुक 

 

x