राज्यातल तीन इंजिनच सरकार हे खुनी सरकार खासदार सुप्रिया सुळे यांची टीका.आरोग्य मंत्रयांचा राजीनामा घ्या सुप्रिया सुळेंचा आक्रमक पवित्रा.
Aaple sarkar : आणि तीन तीन इंजिन लावून सुद्धा राज्याच आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग सरकार मधील तीन पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र आजारी राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.
तर राज्य सरकार अस्तित्वात नाही. नांदेड मधल्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांचा आरोप. आताच्या सरकारला फक्त जमीनीचे व्यवहार प्रदेश दौरा आणि मानस फोडण्यातच जास्त इंटरेस्ट राऊतांचा घणाघात.
सुपरफास्ट ताज्या घडामोडी..
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लांबणीवर 6 ऑक्टोबर ऐवजी 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार.
Aaple sarkar : दिल्लीमध्ये शिंदे फडणवीसांची शहासोबत अडीच तास बैठक. मंत्री मंडळ विस्तारासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची सुत्राची माहिती.
राष्ट्रवादी पक्षाच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला.अजित पवारांच्या गळ्यात पुणे पालकमंत्री पदाची माळ पडणार सुत्राची माहिती.
अजित पवार गैरहजर कशामुळे ?
राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर आजारी असल्यान अजित पवारांची बैठकीला अनुपस्थिती लड्डा आणि शहांच्या दौर्यावेळी सुद्धा अजित पवारांची दांडी.
sarkar network : तर अजित पवारांचा आजार राजकीय आजार वाटतोय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांच्या कॅबिनेट गैरहजेरीवरुन टोला.
तब्येत बरी नसल्यान अजित पवार गेले नसतील सुनील तटकरेंची माहिती.तर अजित पवारांचा आजार राजकीय नाही भुजबळांच प्रतिउत्तर.
Aaple sarkar : ट्रिपल इंजिन मधला एक नाराज इंजिन फडणवीसांना जाऊन भेटल हनीमून संपन्याच्या आतच नाराजी सुरु झाली सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला.
नांदेड संभाजी नगर मिळून मृतांचा आकडा 45 वर नांदेडमधील रुग्णालयांमध्ये आनखीन चार रुग्ण दगावले 45 मृत रुग्णालयांमध्ये 19 बालकांचा समावेश.
सरकारन 100 कोटींच्या कामांना स्थगिती दिल्याचा आमदार भास्कर जाधव यांचा आरोप. राज्य सरकारला प्रतिउत्तर सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश आज होणार सुनावणी.
खासदार हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल मेडिकल कॉलेजचे डिन यांना सौचालय साफ करायला लावल्या प्रकरणी ही कारवाई.
नांदेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे निर्देश..
नांदेड दुर्घटनेची चौकशी करणार दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधांचा साठा होता मंत्री मंडळ बैठकीनंतर ही माहिती.
Aaple sarkar : रुग्णालयातील विषमतेच रोक थांबविण्याची गरज. 75 वर्षांनंतर सुद्धा सरकारला विस्वास निर्माण करता आला नाही आमदार बच्चु कडू यांचा सरकारला निशाणा.
राजस्थानच्या धरतीवर राज्यामध्ये आरोग्य कायदा करावा नाना पटोलेंची मागणी तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांचा जीव जातोय. महाराष्ट्रातल वेड्यांच सरकार लोकांच्या जीवांवर उठलय अस म्हणत सरकारच्या कामांचाही निषेध.
दसरा मेळावा जाग्यावरुन गदारोळ..
शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी महालक्ष्मी रेसकोसच्या जागेची चाचपणी. याआधी शिवाजी पार्क मैदानाच्या जागेसाठी सुध्दा शिंदे गटाचा अर्ज तर पालिकेकडून अद्याप शिवसेनेच्या कोणत्याही गटाला मैदानाची परवानगी नाही.
Aaple sarkar : शिवरायांची वाघनखं भारतात आणण्यासाठी करार संपन्न. 3 वर्षासाठी वाघ नख भारतात आणण्याचा हा करार. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये करार पुर्ण. 16 नोव्हेंबरला शिवकालीन वाघ नख महाराष्ट्रात येणार.
तर वाघ नख ही कायम स्वरुपी महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.मुदत संपल्यानंतर वाघ नख ही इंग्लंडला परत करावी लागणार हे वेदनादायी संभाजी राजे छत्रपती यांची प्रतिक्रिया.
शिधापत्रिका धारकांना दिवाळीमध्ये विशेष शिधा..
शिधापत्रिका धारकांना दिवाळीमध्ये 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार.आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोह्यांचा ही समावेश मुख्यमंत्र्यांची माहिती.
राज्यातील जनतेची सरकारकडून लूट आनंदाचा शिधा हा केवळ कमिशनचा व्यवहार.आनंदाच्या शिध्याच्या नावावर गरिबांना अमिष दाखवण्याचा प्रकार नाना पटोलेंचा आरोप.
Aaple sarkar : तर नाना पटोलेंची पत दिल्लीमध्ये काय ते सांगाव सुनील तटकरेंची टिका.तर माझ दिल्लीमध्ये किती वजन हे सगळ्यांना माहीत.मात्र तटकरे आणि पटेलांच पवारांकडच वजन कमी झालंय नाना पटोलांचा पलटवार.
मध्यान्न भोजन आहारातील पदार्थ लवकरच बदलणार शालेय शिक्षण मंत्री दिकक केसरकरांची माहिती.
नांदेड मधील घटनेनंतर तानाजी सावंत यांनी राजीनामा दिलाच पाहिजे रोहित पवारांची मागणी तर सावंत केवळ जाहिरात देतात आणि मोठे मोठे फोटो लावतात रोहित पवारांची टीका.
दिल्लीला जाण्यापेक्षा सरकारन नांदेडला जायला हव होत रोहित पवारांची सरकारवर टीका.
चंद्रकांत खैरे कडाडले
मुख्यमंत्री काय झोपले होते का? तानाजी सावंत हे केवळ कमाई करणारे मंत्री. मंत्र्यावर गुन्हे दाखल करा चंद्रकांत खैरे यांची माहिती.
sarkar network : विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे नांदेडच्या रुग्णालयाला भेट देणार.आणि त्यानंतर पत्रकार परिषदही होणार.
तर नांदेड मधल्या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली रुग्ण वाहीकेतून औषधांचा तातडीन पुरवठा.व्हिडीओ व्हायरल.बाहेरच्या जिल्ह्यांतून औषधांचा साठा या ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती.
देवेंद्र फडणवीसांच मोठ विधान..
तीन पक्षाच्या सरकारमध्ये भाजपच मोठा भाऊ,मोठा भाऊ म्हणून त्याग करावा लागेल अस देवेंद्र फडणवीसांच विधान.
भाजप नक्कीच मोठा पक्ष आहे मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बॉस अब्दुल सत्तारांच वक्तव्य.
Aaple sarkar : तर मग भाजप बॉस आहे फडणवीसांच वक्तव्य खर. आता ज्यांना माहिती नसेल त्यांना काय सांगाव सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला.
माझ्या मतदार संघात भाजपाचाच जास्त त्रास बच्चु कडूंचा भाजपवर निशाणा.तर मैत्री करतांना सर्व अनुषंगाने निभावली गेली पाहिजे. सोबत असणार्या मानसा विरोधात फिंडिंग लावण बंद केल पाहिजे बच्चु कडूंनी व्यक्त केली भुमिका.
बंद दार आड चर्चा करणार्यांनी आम्हाला शिकवू नये फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला.
विधान सभेत अध्यक्षांची टाईमपास सिरीज चालू खासदार संजय राऊतांचा विधान सभा अध्यक्षावर निशाणा तर आम्ही न्युझीलंड हाउसची वेबसीरीज काढायची का? नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार.
ठाकरे गटाची आज लोकसभा आढावा बैठक दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे उत्तर मध्य मुंबई विभागाचा आढावा घेणार.
ग्रामपंचायत निवडणूक वेळापत्रक जाहीर
नागपूर जिल्ह्यातील 365 ग्रामपंचायतीमध्ये 5 नोव्हेंबरला निवडणूक. निवडणूकीमध्ये बानकुळे, अनिल देशमुख, सुनील केदार, सुधीर पारवे यांची प्रतिष्ठा पणाला.
स्थानिक स्वराज्य सस्थेसह ओबीसी आरक्षणावर 28 नोव्हेंबरला सुनावणी दिड वर्षात सुनावणी न झाल्यान या सुनावणी कडे सगळ्यांचच लक्ष.
Aaple sarkar : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 2 हजार 950 ग्रामपंचायत सदस्य आणि 130 सरपंचाच्या रिक्त पदाची पोटनिवडणूकही याच दिवशी होणार.
नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयांमध्ये गेल्या 24 तासात 25 रुग्णांच्या मृतांची नोंद. खासगी रूग्णालयातील अत्यावश्यक रुग्ण येत असल्यान मृतांचा आकडा जास्त असल्याच रुग्णालयाच स्पष्टीकरण.
मुंबई ताज्या घडामोडी लाइव्ह..
ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी झालेल्या दुचाकी स्वाराच्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
sarkar network : मध्य रेल्वे वरील दादर नंतर आता पनवेल स्थानकातील उपनगरीय फलाटांचे क्रमांक सुद्धा बद्दले. जुना फलाट क्रमांक 1 आता 3 म्हणून ओळखला जाणार.
दादर स्थानकात फुकट्या प्रवाशांकडून वसुली करण्यात आली. 4 लाख 27 हजार रुपये 1 हजार 647 फुकट्या प्रवाशांवर ही कारवाई.
जळगाव दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
जात प्रमाणपत्रासह विविध मागण्यासाठी जळगावात आदिवासी टोकरी कोळी समाज आंदोलनाच्या पावित्र्यात. 10 ऑक्टोबर पासून जळगावात जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्न त्याग सत्याग्रह आंदोलन.
जळगावातील धरणगाव तालुक्यात विविध गावांमध्ये ठाकरे गटाचा होऊ द्या चर्चा कार्यक्रम तर भाजप सरकारच्या कामांचाही लेखाजोखा मांडला जाणार.
जळगावात बहुजन विकास परिषदेची बैठक.मातंग समाज बांधवांनी मांडल्या समाजाच्या विविध अडचणी.
Aaple sarkar : सोलापूरच्या इचलकरंजी येथे साखर वाहतूक सौरप राजू शेट्टी यांनी रोखली भुये चौकातील साखरेचे चार ट्रक स्वाभिमानीने अडवले.
वाशिमच्या आडोळी शेती शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस. सोयाबीन आणि संत्र्या पिकांच अतोनात नुकसान शेतकरी त्रस्त.
गडचिरोली वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
गडचिरोली मध्ये वादळी वारे आणि पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांच उभ पीक झाल आडव.
गडचिरोली मध्ये दक्षिण भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दोन महिन्यात डेंग्यूचे 700 रुग्ण आढळले.
Aaple sarkar : पुण्यामध्ये गणपती मिरवणुकीत मोठ्याने डिजे लावणे पडले महागात ध्वनी प्रदुषण प्रकरणी गणेश मंडळ आणि स्पीकर चालकावर 8 गुन्हे दाखल.
पंकजा मुंडे समर्थक 1 लाख रुपयांचा धनादेश आणि 1 लाख रुपये रक्कम घेऊन नगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या GST कार्यालयामध्ये दाखल. जप्त कारखाना सोडवण्यासाठी समर्थकांचे प्रयत्न.
एक महिन्याच्या आत टेंभूला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच फोनवरून रोहित पाटील यांना आश्वासन.
12 आमदार फॉर्म्युला जाहीर.
महायुतीच्या विधान परिषदेच्या 12 आमदारासाठीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 6 शिंदे गटाला 3 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता.
शिवसेना विधान परिषदेच आमदार अपात्रता प्रकरणी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार. पक्ष कुणाचा याची कागद पत्र कार्यालय निवडणूक आयोगाला मागणार.
Aaple sarkar : अजित पवार यांच्याकडे पुण्याच पालकमंत्री पद जाणार सुत्राची माहिती. सद्ध्या पुण्याच पालकमंत्री पद चंद्रकांत पाटलांकडेच.
नांदेड ताजी अपडेट
नांदेड मधील मृतांचा आकडा 35 वर तर त्यात 19 बालकांचा समावेश. तर नुकत्याच जन्मलेल्या 20 चिमुकल्यांची स्थिती चिंता जनक सुत्राची माहिती.
sarkar network : आपचे राज्य सभा खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरी इडिचा छापा अपकारी धोरण प्रकरणी छापे मारी असी माहिती.
सिक्कीमच्या लाचेन खोर्यातील तिस्ता नदीला महापुर लष्कराचे 23 जवान बेपत्ता. पाण्यासह गाळ वाहून घर आणि गाड्यांच देखील मोठ नुकसान.
राज्यातील राजकीय महत्वाच्या घडामोडी
राज्यातील प्रमुख महामंडळ वाटपाचा फॉर्मुला ठरला 25-25 आणि 50 असा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती. येत्या आठवड्यामध्ये महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार.
अजित पवारांचा रुसवा कशासाठी होता तो आता समजला राजु शेट्टी यांची अजित पवार यांच्यावर टीका.
मुंबई सत्र न्यायालयाने सुजीत पाटकर विरोधात आरोपपत्र स्वीकारल जवळ पास सात हजार पाचशे पानांच्या आरोप पत्राची कोर्टाकडून दखल. सुजीत पाटकरसह एकुण सहा आरोपींना दिली आरोप पत्राची प्रत.
ईडीचे लोक गुंडासारखे घरात येतात आणि अटक करतात कुठलही कारण दिल जात नाही ईडी कारवाईवर संजय राऊतांची टिका.
Aaple sarkar : तुम्ही पैसे खाऊन गब्बर झाले त्यामुळे ईडी असी कारवाई करणारच संजय राऊतांच्या टिकेवर संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया.
अभिनेता रणबीर कपूरला ईडीचं समन्स. ऑनलाईन गेमिंग प्रकरणात ईडीचं समन्स सहा ऑक्टोबरला ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच समन्स.
विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीची महापुजा कोण करणार फडणवीस की अजित पवार विधी व न्याय विभागाची चर्चा करुन पुढील आठवड्यामध्ये निर्णय होणार मंदिर समितीची माहिती.
नांदेड मधील घटनेची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल. नांदेड घटने प्रकरणी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश.
abp news : नांदेडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये पत्नीसह मुलगी गमावलेल्या पित्याला अश्रू अनावर. चाळीस ते पन्नास हजार खर्च करूनही दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला संताप अनावर.
नागपूरच्या मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा नाही. तीन महिने पुरेल एवढा औषध साठा उपलब्ध मेडीकलचे डीन राज गजबी यांची माहिती.
डॉक्टरच्या हातुन नवजात बाळ पडल्यामुळे बाळाचा दुर्दैवी मृत्यू नाशिकच्या वसंतराव पवार रुग्णालयातील धक्का दायक घटना. नवजात बाळाच्या नातेवाईकांचा रुग्णालयांमध्ये गोंधळ.
आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या मतदार संघात आरोग्य योजनेचे तीनतेरा. धाराशिवच्या भुम ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.
दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा पहिला हप्ता देण्याबाबत आमच नियोजन सुरु. दिवाळी पुर्वी मदत पोहचवण्याचा मानस असल्याची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.
पॉकेट मनी मिळावी म्हणून घरच्या खात्यातून काम दिल राजु पाटलाची श्रीकांत शिंदेवर नाव न घेता टीका तर काही लोकांचा माज उतरविण्यासाठी ट्वीट केल्याचा राजू पाटील यांच म्हणणं.
abp news
आमदार अपात्र प्रकरणावर विधिमंडळ शिवसेनेच्या दोन्हीही गट प्रमुखांना आज नाटीश जारी करणार तर शिवसेना नेमकी कोणाची हे ठरवण्याआधी दोन्ही प्रमुखांना आपल मत मांडता येणार सुत्राची माहिती.
ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणार्या व्यक्तीला महिलेने चोपल. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामधील व्हिडिओ समोर.
वैद्यनाथ कारखान्यासाठी पंकजा मुंडे समर्थकांचा मदतीचा ओघ तर आतापर्यंत 10 कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती. कारखाना अडचणींत आल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सरसावला मदतीचा हात.
हे देखील पहा 👇
नांदेड मध्ये मृत्यूच तांडव २० नवजात बालकांची प्रकृती चिंताजनक तर ३५ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू