Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेचे काय महत्त्व आहे? का साजरी करतात वटपौर्णिमा अशा अनेक प्रश्नांची माहिती खास तुमच्यासाठी

वटपौर्णिमा हा एक संस्कृती प्रधान सण आहे. वटपौर्णिमेची महिला मोठ्या भक्तिभावाने उपासना करतात, वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्यामागच काही शास्त्रयुक्त कारण आहे. तर वटपौर्णिमेच काय महत्त्व आहे?  Vat Purnima का साजरी केली जाते? आणि वडाचीच पुजा का केली जाते.अशाच काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात पाहायला मिळतील यासाठी नक्की शेवटपर्यंत वाचा…

वटपौर्णिमेचा सण.

खास करून वटपौर्णिमेचा सण म्हणजे महिलांच्या आनंदाचा क्षण आहे. महिला मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने, आनंदाने हा सण साजरा करतात. Vat Purnima हा सण जरी महिलांचा सण असला तरी देखील महिला या दिवशी स्वतःसाठी काहीही मागत नाहीत जे काही मागतात ते आपल्या पतीच्या जीवन साथीदारांच्या दिर्घायुष्यासाठी, जोडीदाराला उदंड आयुष्य लाभावे म्हणून महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवासाचे व्रत करतात.

पत्नीने आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी या गोष्टी आवर्जून कराव्यात. आपण ज्या वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत त्या वटवृक्षाच्या ठिकाणी ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीन देवतांचे निवासस्थान आहे. आणि या वटवृक्षाची पुजा केल्याने या तिन्ही देवता प्रसन्न होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात तर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीला दिर्घायुष्याचे वरदान प्राप्त होते. Vat Purnima साजरी करायलाच पाहिजे.कारण हे सण उत्सव आपले आहेत. ही आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीचे आपणच जतन केले पाहिजे.

वटपौर्णिमेची कथा काय आहे?

वटपौर्णिमेची कथा ही एका तपस्वी पती पत्नीची कथा आहे. देवी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.एक दिवस सत्यवान जंगलात गेला असता सत्यवान जंगलाताच गतप्राण झाला. सत्यवानाची पत्नी सावित्री मागोमाग पतीच्या शोधार्थ जंगलात गेली आसता पाहते तर पतीदेव गतप्राण झाले आहेत हे पाहून सावित्रीला अत्यंत दुःख झाले.त्यावेळी यमदूत सत्यवानाचा प्राण घेऊन जात असता सावित्रीने पाहिले आणि सावित्रीने यमदूतास अडवले आणि सत्यवाचा प्राण घेऊन जाण्यास नाकारले.

Vat Purnima 2024 : सावित्रीच्या तपश्चर्याचे तेज पाहून यमदूत हवालदिल झाले. शेवटी यमदूतांनी सावित्रीचे सामर्थ्य पाहून सत्यवानाचे प्राण वटवृक्षाखालीच परत केला आणि सांगितले सावित्री तु खरोखरच धन्य आहेस. आणि जाता यमदूतांनी सावित्रीस प्रसन्न होऊन वरदान दिले की ज्या महिला भक्तीभावाने श्रद्धेने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतील त्यांच्या पतीला उदंड आयुष्य लाभेल म्हणून महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात

वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे?

वटपौर्णिमेला हिंदू संस्कृती मध्ये विशेष महत्त्व आहे कारण याच महिन्यात आणि जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाला जीवनदान दिले आणि तिच्या सामर्थ्याने सत्यवानास दिर्घायुष्य मिळाले. ज्या झाडाखाली सत्यवान धारातीर्थी पडला होता आणि यमाचे यम दुत सत्यवानाचा प्राण घेऊन जात असताना सावित्रीने पाहिले आणि यमदूतास विनवणी केली की तुम्ही माझ्या पतीस घेऊन जाऊ नका. त्यांचे कार्य अजून अपुरे आहे.

Vat Purnima : तुमचे अनंत उपकार माझ्यावर होतील यम दुत ऐकत नव्हते पण सावित्रीचे सामर्थ्य आणि केविलवाणी विनवणी ऐकून यमदूतांचा सेवटी नावीलाज झाला आणि यमदूतांनी सावित्रीचे म्हणने ऐकले. आणि सत्यवानाचा प्राण याच वटवृक्षाच्या झाडाखाली यमदूतांनी परत केला. आणि वरदान दिले की ज्या महिला वटपौर्णिमेला या वटवृक्षाची पुजा करतील त्यांच्या पतीला दिर्घायुष्य प्राप्त होईल. म्हणून अशा पद्धतीने सावित्रीने आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणले तो दिवस म्हणजे जेष्ठ पौर्णिमेचा म्हणून तेव्हा पासून ही प्रथा पडली अशी अख्यायिका आहे. तेव्हा पासून महिला वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात, पतीच्या नावाचा उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी मनोकामना व्यक्त करतात. असे या वटपौर्णिमेच महत्त्व आहे.

वटपौर्णिमा का साजरी केली जाते?

भारत देश हा एक संस्कृती प्रधान देश आहे. या जगतात कोणतीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. त्याचप्रमाणे भारत देशात अनेक सण आहेत. प्रत्येक सणाचे वेगवेगळे कारण आहेत.त्यातच हा एक वटपौर्णिमेचा महत्त्वाचा सण आहे. Vat Purnima हा सण महिलांचा आहे.या सणाला महिला आपल्या पतीला भरभराटीच आयुष्य मिळाव म्हणून सुवासिनी महिला वडाची पूजा करतात, पतीच्या नावाचा उपवास करतात.आपल्या पतीला दिर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी मनोभावे इश्वराकडे प्रार्थना करतात.आणि सात जन्म मला हाच पती मिळावा अशी मागणी करतात.

त्याला वटसावित्री पौर्णिमा असे म्हणतात किंवा वटपौर्णिमा असेही म्हटले जाते.आणि ही एक परंपरा आहे ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आणि या परंपरेची पुढच्या पिढीनेही जोपासना करावी आणि ही एक वर्षानूवर्षा पासून हिंदू संस्कृतीची जपवणूक आहे. म्हणून अशाच काही कारणांमुळे Vat Purnima साजरी जाते.

वडाच्या झाडाची पूजा का करतात?

पहिले शास्त्रीय कारण याच वडाच्या झाडाखाली सत्यवान गतप्राण झाला त्यावेळी यमदूत त्याचा प्राण घेऊन जात असता सत्यवानाच्या पत्नीने त्या यमदूतास अडवले आणि पतीला घेऊन जाण्याचे कारण विचारले असता यमदूत म्हणाले हे आमच काम आहे ते आम्ही करत आहोत. त्यावेळी सावित्रीने यमदूतास विनवणी केली की तुम्ही माझ्या पतीला घेऊन जाऊ नका तुमचे माझ्यावर अनंत उपकार होतील. कारण त्यांच कार्य अजून अपुर आहे. सावित्रीची ही विनवणी ऐकून यमदूत प्रसन्न झाले आणि सावित्रीच्या सामर्थ्याने सत्यवानास जीवदान मिळाले. म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vat Purnima 2024 : दुसरे कारण वडाच्या झाडाची आयुष्य मर्यादा सर्वाधिक आहे. ते अनेक वर्षे अबाधित रहाते. दिर्घायुषी वृक्षाचे संवर्धन निसर्गतः जसे होत रहाते त्याच प्रमाणे आमच्या साथीदाराला सुद्धा दिर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि भारतीय संस्कृतीने काही परंपरा जशास तशा स्विकारलेल्या आहेत. ही एक पद्धत आहे. ही एक परंपरा आहे, ही हिंदू संस्कृती आहे.

हे देखील वाचा 👇

वटपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पुजा विधी केव्हा कशी करावी ही खास माहिती तुमच्यासाठी 

 

Facebook

 

x