Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पुजा विधी ही खास माहिती आपल्यासाठी

हिंदू संस्कृती मध्ये अनेक सण आहेत त्यामध्ये एक सण तो म्हणजे वट सावित्री पौर्णिमा तस पाहता हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा येतात त्या पैकी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.या वर्षी Vat Purnima 2024 जेष्ट महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षी वटपौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पुजा विधी पुढीलप्रमाणे खास माहिती आपल्यासाठी

वटपौर्णिमेचा सण.

वटपौर्णिमेचा सण हा वट सावित्रीच्या नावानेही ओळखला जातो आहे. या दिवशी सत्यवान सावित्रीची पुजा केली जाते. भारतात हा सण विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पश्चिम भारतात हे व्रत जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात जेष्ठ अमावास्येला साजरा केला जातो. हा सण पावसाळ्याच्या सुरुवातीचा पहिला सण आहे. निसर्गात नव्याने बदल होताना दिसतात सर्वत्र प्रसन्नतेच वातावरण आणि त्या हा वटपौर्णिमेचा आनंदमय क्षण.

Vat Purnima 2024 : या दिवशी सुवासिनी वडाच्या पुजेला विशेष महत्त्व देतात. आणि महिलांच्या जीवनातला हा एक आनंदाचा सण आहे. सुवासिनी स्त्रिया या दिवशी नवीन वस्त्र आणि सुशोभित अलंकार परिधान करतात. या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्याची मनोकामना व्यक्त करतात. आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत करतात.

वटपौर्णिमा तिथि 2024

या वर्षी vat Purnima 2024 हा सण जेष्ठ महिना दिनांक २१ जून २०२४ वार शुक्रवार रोजी आहे. वटपौर्णिमा शुभ मुहूर्त २१ जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी प्रारंभ तर २२ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. या प्रमाणे हा शुभ मुहूर्त असेल असे सांगण्यात येत आहे.या शुभ मुहूर्तावर हा सण साजरा करण्यात येणार आहे.

Vat Purnima 2024 Date : म्हणजेच या वर्षी २१ जून २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते २२ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजून ३७ मिनिटा पर्यंत असणार आहे. या कालावधीत वटपौर्णिमेचा सण आहे.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे?

वटपौर्णिमेला महिला वट वृक्षाची पुजा करतात. वट वृक्षाच्या पुजेला विशेष महत्त्व आहे. महिला मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने हा उत्सव साजरा करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त २१ जून २०२४ रोजी सकाळी पहाटे ५ वाजून २४ मिनिटा पासून सुरू होत असून तो १० वाजून ३० मिनिटा पर्यंत असणार आहे.

Vat Purnima 2024 : त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होत असून तो दुपारी २ वाजून ७ मिनिटा पर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर सुवासिनी स्त्रियांनी वडाची पूजा करुन घ्यावी असे सांगण्यात येत आहे.

वटपौर्णिमेचे विशेष महत्व.

हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या सणाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि उपवास करतात. वडाचे झाड हे सर्व झाडापेक्षा वेगळे आहे. या झाडाला मरण नाही. ते कधी लोप पावत नाही.वडाच्या झाडाचे आयुष्य हे १००० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महिला वटपौर्णिमेच्या दिवशी या वटवृक्षाची विधिवत पूजा करतात.

Vat Purnima 2024 : आणि महिला या झाडाकडे मागणी घालतात की हे वडा तुझ्या प्रमाणेच माझ्या पतीला आयुष्य मिळूदे.या झाडामध्ये तिन देवतांचा वास आहे. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचा निवास या वृक्षात असतो असे मानले जाते. आणि याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाला जीवदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वृक्षाला धार्मिक महत्त्व आहे.

वटपौर्णिमेची पुजा कशी करावी?

Vat Purnima 2024 :

  • वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून विधिवत स्नान करावे.
  • त्या नंतर वटपौर्णिमेच्या उपवासाचा संकल्प करावा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करून किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून त्या नंतर सुशोभित अलंकार परिधान करावेत.
  • त्या नंतर घरातील देवतांची पूजा करावी वडील धार्या मंडळीचे आशिर्वाद घ्यावेत.
  • त्या नंतर वटवृक्षाच्या पुजेसाठी सुंदर ताट तयार करावे. त्यासाठी ताटात फुले, अगरबत्ती, कापसाची माळ, अक्षदा, हळदी कुंकू, पंचारती, पाणी तांब्याचा गडवा, पांढऱ्या दोर्याची गुंडी, ( रिळ) मिठाई, पेढा, साखर, आंबा, जांभूळ, करवंद, फणस, इतर.
  • हे सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्या पैकी कोणतेही एक फळ असावे. शक्यतो आंबा असावाच.
  • सुरवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी कुंकू वाहावे कापसाची माळ, फुले, त्या नंतर गंध अक्षदा साखर पेढा ठेवावा त्या नंतर वटवृक्षाचे औक्षण करून घ्यावे.
  • त्या नंतर पांढरा दोरा वडाला बांधून ७ फेरे पुर्ण करावेत आणि वटवृक्षाचे दर्शन घेऊन मागणी करावी की हे वडा नाही जन्मोजन्मी किमान ७ जन्म तरी मला हाच पती मिळूदे असी मनोकामना करावी.
  • पतीच्या दिर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी आणि

 

येथे क्लिक करा 👇

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे थोडक्यात संपूर्ण चरित्र आणि जीवन कार्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदी यात्रा सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Facebook

 

 

x