नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ” पीएम किसान सम्मान निधी योजना ” काय आहे.नवीन नियम काय आहेत आणि नवीन नियम जाणून नाही घेतल्यास pm kisan yojana वार्षिक 6,000 रुपये तुम्हाला मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यासाठी काय केले पाहिजे चला तर मग पाहूयात सविस्तर माहिती. ही माहिती शेवटपर्यंत वाचा..!
प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधी योजना.
पीएम किसान सम्मान निधी योजना सुरू करण्या मागचा मुख्य उद्देश देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. अशातच शेतकऱ्यांना दर वर्षी काहीना काही संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेक समस्या शेतकऱ्यांन पुढे असतात म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून हा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेक योजना राबवत आहे. प्रधानमंत्री पीएम किसान सम्मान निधी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे.खास करुन ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच प्रमाणे ही एक योजना आहे
” पीएम किसान सम्मान निधी योजना ” या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. pm kisan yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हा लाभ शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्ता 2,000 रुपये प्रमाणे वार्षिक 6,000 रुपये लाभ घेता येतो. हा लाभ डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.साधारणपणे पीएम किसान सम्मान निधी योजनाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जमा होत असतो, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 31 नोव्हेंबर दरम्यान जमा होत असतो आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान जमा होत असतो.
पीएम किसान योजना लागू नियम.
बर्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत असतील तर शेतकऱ्यांनी काही नियमांच पालण करणे अनिवार्य आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेत सरकारने कोणताच अधिकृत बदल केलेला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यात महत्त्वाचे तुमचे बॅंक खाते तुमच्या आधारसी लिंक असणे गरजेचे आहे.
pm kisan yojana 2024 : त्याच प्रमाणे वेळोवेळी kyc करणे आवश्यक असते. ज्या शेतकऱ्यांनी kyc केली नाही त्यांचा हप्ता अडकू शकतो. दुसरी गोष्ट नोंकरी करते वेळी अचूक कागद पत्रांची पुर्तता करणे गरजेचे असते. चुकीचे किंवा डुब्लीकेट कागद पत्रांची पुर्तता केल्यास हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. हप्ता मिळण्यास काही अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या बॅंकेसी संपर्क साधू शकता. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीची व्यवस्तीत काळजी घ्यावी.
पीएम किसान सम्मान निधी योजना आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे पात्र लाभार्थी.
pm kisan yojana : जर पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे असणे अत्यावश्यक आहे.
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- मतदार I D, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
- जमिनीची कागदपत्रे ( खसरा खनौती )
- शेताचा तपशील ( लाभार्थ्यांकडे किती जमीन आहे )
- बचत बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर आधार लिंक असणे गरजेचे
- पासपोर्ट साईज फोटो
pm kisan yojana : सुरवातीच्या काळात या योजनेचा लाभ फक्त 2 हेक्टर क्षेत्र किंवा अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता. परंतु आता सरसगट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो आहे.त्यासाठी शेतकरी हा भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरी करत नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे कारण या योजनेची रक्कम त्याच्या बॅंक खात्यावरच हस्तांतरित केली जाईल.
पीएम किसान सम्मान निधी योजना ऑफलाईन अर्ज.
pm kisan yojana चा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी ऑनलाईन अर्ज करु शकत नाहीत.त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.ऑफलाईन नोंदणीसाठी तुम्हाला त्याचा अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि तुम्हाला स्वतः अर्ज भरावा लागेल आणि तुम्हाला तो अर्ज तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जमा करावा लागेल.
त्या नंतर तुमच्या अर्जाची सेवा केंद्रांतून छाननी केली जाईल. त्या नंतर तुमची pm kisan yojana योजनेअंतर्गत नोंदणी केली जाईल. त्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणे सुरुवात होईल.
पीएम किसान सम्मान निधी योजना ऑनलाईन अर्ज.
- pm kisan yojana या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम त्यांची अधिकृत वेबसाईट https:/pmkisan.gov.in/ वर जावे.
- या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला फॉर्मर्स कॉर्नर अंतर्गत नवीन शेतकरी नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे.
- त्या नंतर तुमच्या पुढे नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडलेला असेल.
- येथे तुम्हाला दोन पर्याय असतील ग्रामीण आणि शहरी.
- तुम्ही कोणत्या विभागात आहात शहरी किंवा ग्रामीण तो विभाग निवडून क्लिक करावे.
- त्या नंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर भरून राज्य निवडावे.
- त्या नंतर तिथे दिलेला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि सेंड OTP च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल तो OTP तुम्हाला OTP बॉक्स मध्ये भरून सत्यापित करावा लागेल.
- पुढे असलेल्या पानावर तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल तसेच जमीनीचे सविस्तर तपशील भरावे लागतील.
- या प्रमाणे तुम्ही pm kisan yojana चा ऑनलाईन अर्ज करण्याची नोंदणी पुर्ण कराल.
येथे क्लिक करा 👇
घर बसल्या व्यवसाय सुरू करा आणि कमवा लाखो रुपये महिना : अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈