सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक सहर्ष स्वागत मित्रांनो आज आहे मराठा स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती Shivaji maharaj jayanti तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिव जयंती साजरी केली जात आहे. दर वर्षी 19 फेब्रुवारीलाच का? साजरी केली जाते काय आहे या मागचे कारण? तर याही वर्षी राज्यभरात नव्हे नव्हे देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात माहिती.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात साजरी केली शिवजयंती.
मराठा साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही दर वर्षी 19 फेब्रुवारीलाच साजरी होत असते. शिवराय हे महापराक्रमी परम प्रतापी जिजाबाई शहाजी राजे भोसले यांचे सुपुत्र होते.अत्यंत धाडसी, बुद्धिमान, पराक्रमी, शूरवीर, धैर्य,शौर्य, दृढ आत्मविश्वास अशी त्यांची ख्याती होती. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1870 रोजी पुण्यात शिवजयंती साजरी केली.तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्रीमंत श्री छत्रपती Shivaji maharaj jayanti या वर्षी 394 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
Chhatrapati Shivaji maharaj jayanti 2024 :असे म्हटले जाते की 1869 रोजी महात्मा जोतीराव फुले यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड या ठिकाणची समाधी शोधून काढली.त्यानंतर त्यांनी संशोधन केले आणि सर्व प्रथम त्यांनी शिवरायांच्या पोवाड्याची रचना केली.आणि रायगड शिव छत्रपती शिवरायांच्या समाधीची देखभाल सरकारने स्वतः घ्यावी असा अर्ज महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला होता. त्यानंतर पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे या ठिकाणी 1870 रोजी साजरी केली होती.त्या नंतर
लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये राज्यभरात शिवजयंती उत्सव सुरु केला.त्यांचा या मागचा उद्देश हा जनतेच्या मनात राष्ट्र प्रेम जागृत व्हावे, आणि प्रत्येकाच्या मनामनात आदराची भावना निर्माण व्हावी हाच स्वच्छ भाव होता.त्यावेळी फक्त महाराष्ट्रातच शिवजयंती साजरी होत असायची परंतु 20 व्या शतका नंतर शिवरायांची ख्याती बंगाल पर्यंत पसरली आणि पाहता पाहता जगभरात शिवजयंती साजरी होऊ लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म?
छत्रपती शिवरायांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे. छत्रपती शहाजी राजे भोसले हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईसाहेब लखुजीराव जाधवांची कन्या जिजाबाई म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊसाहेब यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.छत्रपती शिवरायांच्या जन्माने सर्वांना आनंद झाला आणि शिवनेरी किल्ल्यावर सर्वत्र आनंद उत्सव साजरा झाला. सनई, चौघड्याचा नाद घुमू लागला.
Shivaji maharaj jayanti 2024 : सर्वांना साखर पान वाटून पाचव्या दिवशी शिवरायांचा नामकरण सोहळा पार पडला आणि छत्रपती शिवरायांचे नाव ‘ शिवाजी ‘ ठेवण्यात आले.शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले हे जास्त करुन वडिलांबरोबर असायचे म्हणजेच शहाजी राजां सोबत असायचे.शहाजी राजांची दुसरी पत्नी ही मोहिते घराण्यातली होती तीचे नाव तुकाबाई मोहिते असे होते.त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव एकोजीराव शहाजी राजे भोसले असे होते.
कसे घडले शिव छत्रपती?
शिवरायांचे पहिले गुरू म्हणजे प्रत्यक्षात भवानी जगदंबेचाच अवतार म्हणजेच जिजाऊ माँसाहेब.ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भात होते त्यावेळी जिजाऊसाहेबांनी शिवरायांना गर्भसंस्कार दिले. शिवराय पोटात असतांनाच जिजाऊसाहेबांना वेगवेगळे स्वप्न पडायचे आणि जिजाऊसाहेबांना वेगवेगळ्या भावना स्पर्श करून जायच्या त्यांना बाळाचे लक्षण काही वेगळेच जाणवू लागले.शिवराय गर्भात वाढत होते आणि जिजाऊसाहेबांना डोहाळे लागले तेही सर्वांन पेक्षा वेगळेच.त्यावेळी कुणाला डोहाळे लागतात ते माती खाण्याचे, आंबट चिंबट खाण्याचे, मात्र जिजाऊ माँ साहेबांना डोहाळे लागले ते हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होण्याचे, दानपट्टा खेळण्याचे, शत्रूशी झुंजण्याचे.आम्हास दोन्ही हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावे असे वाटते.आणि तेच संस्कार त्या गर्भातल्या बाळावर होत होते.
Chatrapati Shivaji maharaj jayanti : आदिलशाही गुलामगिरीतून स्वराज्याची सुटका करण्याचें डोहाळे जिजाऊ माँ साहेबांना लागले होते.आणि त्यांनी सत्यात उतरवण्याचे स्वप्न पाहिले होते.आता दुस्मनांचा कर्दनकाळ जन्माला येणार असल्याचे चिन्ह जिजाऊसाहेब यांना जाणवू लागले.आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ला पुणे जिल्हा या ठिकाणी झाला. शिवरायांच्या जन्माने जिजाऊ माँ साहेब यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शिवरायांची ती गोंडस मुर्ती आणि तीक्ष्ण बुद्धी कौशल्य पाहून जिजाऊ माँ साहेब भारावून जायच्या. लहान वयातच जिजाऊ मातेने शिवरायांवर करडी नजर ठेवली आणि त्यांना शिवराय जसे अपेक्षित आहेत. तसेच संस्कार शिवरायांना त्या देऊ लागल्या.
Shivaji maharaj jayanti in marathi : रामायण, महाभारत, भागवतातल्या कथा, रामाच्या कथा, भगवान श्रीकृष्णाच्या कथा जिजाऊ माँ साहेब शिवरायांना सांगत होत्या शिवराय अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे होते त्यांच्या त्या बाल बुद्धीवर ते संस्कार होऊ लागले.शिवराय हळूहळू मोठे होऊ लागले.जिजाऊ माँ साहेब शिवरायांना तलवार कशी चालवायची,घोड्यावर स्वार कसे व्हायचे,दानपट्टा कसा खेळायचा,भाला कसा फेकायचा रणांगणात कसे उतरायचे, शत्रूला याचे प्रशिक्षण देऊ लागल्या आणि पाहता पाहता जिजाऊ माँ साहेबांना जसे शिवराय अपेक्षित होते अगदी तसेच छत्रपती शिवराय माँ जिजाऊसाहेब यांच्या समोर उभे राहिले.पुढे शिवरायांनी जिजाऊसाहेब यांच्या देखरेखीखाली स्वराज्याची स्थापना केली.
छत्रपती शिवजयंती 2024
महाराष्ट्र पुणे जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर दर वर्षी मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा होतो आहे.तसेच संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या प्रांतात छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव साजरा होतो आहे. मोठ्या स्वाभिमानाने हा आनंद उत्सव साजरा केला जातो. Shivaji maharaj jayanti च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियोजन केले जाते. शुरविरांच्या कथा गायल्या जातात पोवाडे गायले जातात विविध पध्दतीने हा आनंद उत्सव साजरा केला जातो.
हे देखील पहा 👇