भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२८ वी जयंती आहे.देशभरात दरवर्षी हा दिवस थोर क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा केला जातो.कोण होते सुभाषचंद्र बोस त्यांची मुख्य भूमिका काय होती.भारत देशासाठी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती क्रांती केली. Subhash Chandra Bose Jayanti निमित्त थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे…
सुभाषचंद्र बोस जयंती 2024.
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.शाळा, महाविद्यालया मध्ये मोठ्या उत्साहाने भाषण करतात.शिक्षक वर्ग मुलांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती करून देतात.आणि या विचाराने शाळेतील लहान लहान मुलांच्या मनामध्ये प्रेरणादायी उर्जा निर्माण होते.त्यांचे विचार जनमानसांच्या मनावर रुजवले जातात.
Subhash Chandra Bose Jayanti : तसेच विविध स्पर्धेच आयोजन केल जातात.आणि त्यांच्या प्रतिमेला फुलांचा हार, गुलाल वाहून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आदरपूर्वक त्यांना सलामी दिली जाते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस याचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसा कटक या ठिकाणी झाला.भारत देशासाठी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली गेली.त्यांचा मुख्य नारा एकच होता ‘ तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा ‘ अशी त्यांची घोषणा होती.याच अनमोल विचारांने आजही लोक त्यांना विसरत नाही.
Subhash Chandra Bose jayanti: सुभाषचंद्र बोस यांचे पुर्वज तसे माहिननगर बंगाल या ठिकाणचे. सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ. सुभासचंद्र बोस यांचे वडील वकील होते.पण नोकरीच्या उद्देशाने कटक ओडिसा या ठिकाणी आले.आणि त्याच ठिकाणी त्यांनी वास्तव केल.पुढे कालांतराने सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.सुभाषचंद्र बोस यांच्या मातोश्री प्रभावतीदेवी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर बालवयातच योग्य संस्कार केले.
Subhash Chandra Bose Jayanti : शालेय शिक्षणात मुख्याध्यापक बेनी माधवदास यांचाही सुभाषचंद्र बोस यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला.शिक्षणा करता त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण यशस्वी पार पाडले.शिक्षण झाल्यावर १९२१ ला ते भारतात परतले.
सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची सुरुवात.
त्यांना देश शेवेची आणि राष्ट्र सेवेची आवड होती. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी एक संघटना स्थापन केली आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांनी चळवळीला सुरवात केली.देशावरचे आक्रमण आणि परप्रांतीयांचा वाढता कल पाहून त्यांना वाईट वाटले.काही काळ त्यांनी कॉग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळले,१९३८ ला सुभाषचंद्र बोस बहुमताने विजयी झाले.पण पुढे महात्मा गांधी आणि त्याच्यात मतभेद निर्माण झाले.
Netaji Subhash Chandra Bose Jayanti : काही नेते मंडळींनी त्यावेळी महात्मा गांधी यांना पाठिंबा दर्शविला त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.त्या नंतर सुभाषचंद्र बोस यांनी विदेशी दौरा केला आणि नुसता दौराच केला नाही तर त्याठिकाणीही त्यांनी नेतृत्व केले काही महत्वपूर्ण भूमिका बजावत.आजाद हिंद सेना बळकट करण्याचे काम त्यांनी केले.
सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय जीवन.
पुढे परप्रांतीयांची आणि आझाद हिंद सेना यांच्यात वाद निर्माण झाला मारा मार्या झाल्या त्यात आझाद हिंद सेनेची काही फौज दगावली गेली.त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा जास्तच पारा चढला आणि इथून पूढे त्यांनी स्वतःला देशसेवेसाठी पुर्णपणे झोकून दिले.
Subhash Chandra Bose Jayanti 2024 : चिरंतन दास यांनी सुभाषबाबूंचे देश प्रेम पाहून त्यांच्यावर अधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. कोलकत्ता महापालिकेचे महत्वाचे पद सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपविण्यात आले.त्याच वेळी इंग्रज सरकारने त्यांच्यावर काही आरोप करुन सुभाषचंद्र बोस यांना मंडालेच्या तुरुंगात अटक करण्यात आले.
सुभाषचंद्र बोस यांना नेताजी पदवी.
सुभाषचंद्र बोस यांना क्रांतिकारी कार्यात लोक त्यांना नेताजी या नावाने संबोधू लागले.आणि नंतर त्यांचे नाव नेताजी Subhash Chandra Bose jayanti असेच प्रचलीत झाले.भारत स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी लढा प्रसंगी जय हिंद असा नारा सर्वात प्रथम सुभाषचंद्र बोस यांनीच दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ तर मृत्यू १९४५ रोजी तैहोको तैवान या ठिकाणी झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आयुष्य केवळ ४८ वर्षाच लाभल पण या ४८ वयोमर्यादेत त्यांनी जी क्रांती केली ती अविस्मरणीय कामगिरी आहे.
Subhash Chandra Bose jayanti : त्यांचे भारत स्वतंत्र चळवळीतले योगदान महामोलाचे आहे.खर्या अर्थाने भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात या थोर महापुरुषांचा सिंहांचा वाटा आहे आस म्हणायला काहीच हरकत नाही.
सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान.
प्रभावशाली विचार कणखर भूमिका,आणि दमदार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. ब्रिटिश राजवटीला त्यांनी पळून लावले आणि अनेकांच्या सहकार्याने त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या ताकदीने काम केले.आजही तरुणांच्या मनात त्यांच्या कार्या बदल आदर आहे. त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. जगण्याची उर्जा निर्माण करुन देतात.
Subhash Chandra Bose Jayanti : देशासाठी धर्मासाठी त्यांच बलिदान देश आजही त्यांना विसरत नाही.या थोर महापुरुषांनी अविरत देशाची सेवा केली. कठीण काळात देश सांभाळला अशा क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन जय हिंद…जय भारत.
हे देखील पहा 👇