Manoj jarange patil : आरक्षण देऊ नका सरकार १००% पडलच समजा/लढायला आणि मरायला मराठे भित नाहीत मनोज जरांगे पाटील. 22/01/2024

20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या पदयात्रेत सामिल झाले आहेत.कोणतीच पर्वा न करता, पोटाची चिंता न करता, उन्हा तान्हाची तमा न बाळगता हा मराठा समाज Manoj jarange patil यांच्या सोबत मोठ्या ताकदीने मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने.

आज त्यांच्या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे.आज त्यांनी बिड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात पदार्पण केले आहे. त्यानी दुपारी चारच्या दरम्यान पाथर्डी येथे भाषण केले त्यावेळी ते बोलत होते.छत्रपती शिवरायांना वंदन करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली.आणि एकच आवाजात सर्वांनी टाळ्या वाजवून छत्रपती शिवरायांचा जय जयकार केला,जय भवानी जय शिवराय, एक जरांगे लाख जरांगे अशी घोषणा झाली आणि पुढे भाषणाला सुरुवात झाली 

Manoj jarange patil म्हणाले की मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे.साठ ते सत्तर वर्षांपासून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नव्हता.आता तो लढा अंतिम टप्प्यात आहे.आता पर्यंत या राज्यात 54 लाख मराठा कुणबी असलेल्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा ओबीसी मराठा कुणबी असलेल्या नोंदी सापडलेल्या आहेत. नुसत्या एकट्या अहमदनगर जिल्ह्यात सव्वा दोन लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तेही नवीन नोंदी सापडलेल्या आहेत.

Manoj jarange patil पुढे म्हणाले की मग एव्हढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहेत तर मग सरकार आरक्षण का देत नाही? जवळ जवळ दिड महिना उलटून गेला नोंदी सापडलेल्या तरी देखील प्रमाण पत्र का दिल जात नाही.आणि हा लढा हाती घेऊन जवळपास सात महिन्याचा वेळ सरकारला दिला आहे. तरी देखील सरकार म्हणत आनखिन वेळ पाहिजे.आनखिन किती वेळ घेणार हे सरकार.जरांगे पाटील म्हणाले की त्यामुळे त्यांच आणि माझ काही पटायना आता.आता पर्यंत पटत होत पण आता नाही पटणार.कव्हरक आपणच पटून घ्यायच. कारण आपला जो लढा आहे खरा आहे चुकीच काहीच नाही.

धमक्यांना आम्ही घाबरत नाही जरांगे पाटील.

बाकीच आम्हाला सांगु नका, ह्या धमक्या आणि बिंमक्यांना आम्ही मराठे घाबरत नसतो.बाकी आम्हाला सांगु नका.सरकार एक मतान आहे की नाही आम्हाला त्याच्यासी काही घेनदेन नाही.आणि काय करणार आहेत तेही आम्हाला माहीत नाही.हा मराठा समाजाने संघर्ष उभा केला आहे त्याबाबतीत तुमच्यात एक मत आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही.आणि तुमच्या एक मताचा आम्ही काय ठेका घेतलेला नाही.अस Manoj jarange patil म्हणाले.

माझ्या गोरगरिब मराठ्यांचे लेकर शिकून मोठे झाले पाहिजेत यासाठी हा संघर्ष सुरू आहे.आणि ते तुम्ही आता कस देत नाहीत ते मी आणि माझा मराठा समाज बांधव मुंबईत आल्यावर बघू कस देत नाहीत अशा बेधडक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विधान केले.

आम्हाला आरक्षण का नाही?

माझ्या गोरगरिब मराठा बांधवांनी तुम्हाला वर्षानू वर्षे मोठ करण्याच काम केल होत आहे.आमच्या हाक्काच आरक्षण आम्ही मागतोय. बाकीच्यांच्या नोदी नसतानाही किंवा कोणीही मागास सिद्ध केलेल नसतांना तुम्ही त्यांना आरक्षण दिल आहे.मात्र मराठा समाज हा मागास सिद्ध झाला आणि मराठ्यांच्या तशा नोंदीही सापडलेल्या असतांना तरीही मराठ्यांना आरक्षण नाही.मग मराठ्यांच नेमक चुकल काय? मराठ्यांनी कुणाच घोड मारल मराठ्यांना आरक्षण दिल जात नाही.

तुम्हाला इतका वेळ दिला तिस चाळीस वर्षांपासून आतापर्यंत. आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून सात महिन्याचा वेळ सरकारला दिला गेला आहे.तरीदेखील तुम्ही जर आम्हाला वेळच पाहिजे अस म्हणत असाल तर मराठे आता एक मिनिटही द्यायला तयार नाहीत. आता आम्हाला आरक्षणच पाहिजे अस Manoj jarange patil म्हणाले.

सरकार नुसत्या बैठकाच घेतय.

सरकार वेळोवेळी नुसत्या बैठकाच घेतय.आणि ह्या बैठका घेऊन करतय तरी काय हे त्यांची त्यांनाच माहीत.बैठका घेऊन घेऊन सरकार वेळ मारुन नेतय हे सत्य आहे आणि ते आमच्या लक्षात आल आहे.तुमच्या बैठका संपणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे.तुम्ही काय करता हे पण आम्हाला माहीत आहे.

मी करतो हे सर्वांना माहीत आहे.समोर जमलेल्या लाखोंच्या संख्येनने उपस्थित असलेल्या समाजाकडे बोट करत मनोज जरांगे पाटील म्हणाले की हे आघ्या मोहळ काय करीन याची कल्पना सरकारने करावी.Manoj jarange patil म्हणाले आता सुट्टी नाही बप्पा हो..h..h..!

मुंबईला निघालो नंतर मी असेल किंवा नसेल…!

मराठ्यांचे लेकर आता या आरक्षणा पाई सुशिक्षित बेकार नाही झाले पाहिजे.तुमच राजकारण जरा थोडे दिवस बाजूला ठेवा.एकदा आमच्या लेकरांना आयुष्याच आरक्षण द्या. तुम्हाला जे राजकारण करायच ते नंतर करा.नसता पुन्हा हे आपल्यावर डाव टाकतील पण आता त्यांचा हा डाव आपण यशस्वी नाही होऊ द्यायचा.Manoj jarange patil

समाजाला हात जोडून विनंती करुन सांगतो मी आता तुमच पाठबळ आणि तुमच्या सर्वांचा आशिर्वाद घेऊन मुंबईकडे निघाललो आहे. आणि मी जर एखांदी गोष्ट ठरवली तर ती मी करतोच. मी पुन्हा माघारी फिरुन येईल का नाही मला माहीत नाही.पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला आजच हाक मारतो की जर सरकारने काही त्रास देण्याचा दगाफटका करण्याचा प्रयत्न केलाच तर हे आंदोलन वर्षांनी वर्षे बंद राहता कामा नये अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षण नाही दिल्यास ?

राज्य, जिल्हे, तालुके, गाव आपले आहेत. फिरुन यांनी पुन्हा कायमचच ईकडे यायच नाही.आणि यांना राजकीय आयुष्यातून कायमच उठवायच म्हणजे उठवायचच यांना. आपल्या मुलांना नाहीतर कुणालाच नाही.आणि ते आपल्या हक्काच आहे. आणि ते मिळवायचच अस Manoj jarange patil म्हणाले.

आता मुंबईकडे निघालोय ते तुमच्या पाठबळामुळे आणि आशिर्वादामुळेच आता माघ नाही हटणार. मी एकदा समाजाला दिलेला शब्द मी मागे हाटत नाही. मी माझ कुटुंब सुद्धा बाजूला सारलय, माझ्या कुटुंबाची मी परवा केली नाही. मी या समाजालाच मायबाप मानल आहे.तुमच आणि माझ नात माय लेकराच आहे.आता फक्त तुम्ही ऊघड पडु देऊ नका.

ही संघर्षाची लढाई कोणत्या टोकाला जाईल मला माहीत नाही.आमचा संघर्ष शांततेत आहे पण सरकारन जानून बुजून काही षडयंत्र रचल आणि मोडकळीस आनण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या तुमच्याच लेकराच्या पाठीशी ताकदीने उभ राहाव लागणार आहे.कारण आपली मागणी काही चुकीची नाही आणि इथून मागेही आपण कधी चुकीच पाऊल उचललेल नाही.

मराठ्यांचा अंत पाहू नका आणि नादी लागू नका.

मराठा समाजाने प्रत्येकाला प्रत्येक वेळी सांभाळून घेतल आहे.आज वेळ आरक्षण देण्याची आली तर आपलेच आपल्या विरोधात षडयंत्र रचायला लागले आहेत.पण आता लक्षात ठेवा मराठा समाज एकत्रित झालेला आहे.एक जुटीने एकवटलेला आहे आणि आता या आग्या मोहळाला रोखण्याची दम कुणात नाही. कुणाच्या डोक्यात वेगळी मस्ती असेल तर ती मराठ्यांना आजच उतरावी लागेल अस Manoj jarange patil यांचे विधान.

मराठ्यांच्या नादी लागन ऐव्हढ सोप नाही हे त्यांनी बघीतल.या राज्यात तरी मराठ्यांच्या नादी लागन ईतक सोप समजू नका.मराठ्यांनी जर मनावर घेतलच तर आयुष्यभर मराठे अंगाला गुलाल लागू देणार नाहीत आयुष्यभर…!

आता ही लढाई जिंकायची ही लढाई आरपारची लढाई आहे.तुम्ही असताल त्या ठिकाणी, तुम्ही असताल त्या कामात, तुम्हाला जर वाटलच मुंबईकडे गेलेल्या पोरांना काही त्रास व्हायला लागला तर हातातले काम टाकून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठ्यांनी रस्त्यावर उभा राहा,न्याय मिळेपर्यंत त्या पोरांच्या पाठीशी उभे राहा,

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही.

आम्हाला कितीही त्रास जरी झाला आणि सरकारने आमच्या छाताडावर गोळ्या जरी घातल्या तरीही तुम्हाला शब्द देतो तुमचा हा Manoj jarange patil तुमचा मुलगा गोळ्या जरी लागल्या तरी एक इंचही मागे हटणार नाही.हा तुम्हाला माझा शब्द आहे.मी माझ्या जिवाची पर्वा करत नाही कारण हा समाजच माझ कुटुंब आहे.आणि मी माझ्या कुटुंबाशी एक तिळमात्रही गद्दारी करु शकत नाही.

आणि माझ्या या कुटुंबानी माझ्यावर टाकलेला विश्वास हीच माझी ताकद आहे.समाजाने मला मुलगा मानलय त्यांचा विस्वास घात कदापी शक्य नाही.कारण आज सात महिने झाले माझ्या मुलाबाळांची आणि माझी गाठभेट नाही.घराचा उंबरठा देखील ओलांडला नाही. आणि आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घराच तोंडही पाहणार नाही अस मनोज जरांगे पाटील म्हणाले.Manoj jarange patil

आता आपल्याच कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. या समाजाची प्रगती होण्यासाठी आपल्याला पावल उचलावी लागणार आहेत.समाजासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे.पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच आपल्याला शेवट पर्यंत द्यावी लागणार आहे.

Manoj jarange patil : आतापर्यंत या राज्यकालीन देशात वेळ सरकारला कोणीच दिला नसेल.आपल्या मराठा समाजाने सरकारला आतापर्यंत सात महिने वेळ दिलाय.आनखिन मराठ्यांचा किती दिवस अंत पाहणार हे सरकार.

54 लाख नोंदी सापडून आरक्षण नाही.

साधा आणि सोपा प्रश्न आहे लय किचकट नाही. 54 लाख नोंदी सरकारने सापडवल्या आहेत.देणार कोण? सरकार, नोंदी सापडवणार कोण? सरकार, मग अडचण काय आहे.त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजेत तो तर कायदाच सांगतो. त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला दिल पाहिजे.

Manoj jarange patil : बिड जिल्ह्यात एक गाव अस आहे त्या गावात एकाच पत्रावर 250 नोंदी मिळाल्यात एकाच नोंदीवर.इतक कुटुंब त्याच मोठ होत.तर त्या गोरगरिबांच्या लेकराच कल्याण होत असेल तर कुठे बिघडल.54 लाख नोंदी तुम्ही सापडवल्यात मग द्यायला अडचण काय आहे.यावर त्यांच एकच उत्तर आहे मागासवर्ग काम करतो आणि फेब्रुवारी आल्यावर देतो. जरांगे पाटील म्हणाले फेब्रुवारी नाही मार्च ला द्या पण ह्या नोंदीच काय झाल ते तर सांगा ना?

आरक्षण संदर्भात सरकारचे धोरण.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईल तेव्हा येईल, सुप्रीम कोर्टाला ज्या तृटी भरायच्या सांगितल्यात त्या भरायच्या तेव्हा भरल्या जातील, भोसले समितीने तृट्या भरल्यात आणि सरकारने तो अहवाल स्वीकारला आहे. पण पुढे सरकारने तो अहवाल सुप्रीम कोर्टात दाखल केला का नाही हे सरकारलाच माहिती.

मराठा समाज मागासवर्ग सिद्ध करण्यासाठी तेव्हा आयोग नेमला गेला ते होत राहील ती बाजू वेगळी आहे.सरकार आपल्यात फक्त संभ्रम निर्माण करायला लागलय. ते आरक्षण वेगळ आणि आपण म्हणतोय ते वेगळ.मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या आहेत. आणि हे आरक्षण राज्या पासून केंद्रा पर्यंत आहे. या नोंदीचे प्रमाण पत्र देण्या ऐवजी बैठका घेऊन ते एकच सांगतेत आम्ही तुम्हाला फेब्रुवारी पर्यंत टिकणार आरक्षण देणार आहेत.

Manoj jarange patil ryali: मागच आरक्षण 5 में 2021 रोजी रद्द झाल.50% च्या वर गेल्यावर आरक्षण नाही राहात.आता सरकारने क्युरेटी पीटिशन दाखल केलय रिव्ह्यू तुमचा फेटाळलाय, क्युरेटी पीटिशन ओपन कोर्टात घेतले जाणार का? तर याच उत्तर आहे नाही. तर मग घेतले जाणार नाहीत.असा हा काहीतरी सगळा गोंधळ सुरू आहे.

बाकीच्यांचा विचार सोडा आता जरांगे पाटील.

बाकीच्यांचा विचार सोडा आता बाकीच्यांचा कार्यक्रम सगळा उलटा सुलटा सुरू आहे. म्हणे 50 % च्या वर घ्या आणि खाली घ्या म्हणल कुणीकडूनच घुसू द्यायनास आणि कुठुन घेऊ रे वरुन घेन् खालुन घे. आणि तु एकटाच कव्हर खातो. आमचच असुन आम्हालाच म्हणतो वरुन घेन् खालुन घे. सार्या दुनियाच चघळीतो आता खाय कागद..

Manoj jarange patil ; मी माझ जीवन समाजासाठी अर्पण केलय मी मरायला घाबरत नाही.आणि जे मरणा भेतेत ते मराठे कसले.मरायला आणि लढायला मराठे कधीच भित नाहीत.

मनोज जरांगे पाटील प्रकृती बद्दल?

बोलत असतांना Manoj jarange patil म्हणाले की माझ शरीर आता मला साथ देत नाही कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झाल आहे. एक सतरा दिवसाच आणि एक नऊ दिवसाच.त्यामुळे आता माझ शरीर मला साथ देत नाही.तरी देखील मराठा समाजाच्या कल्याणासाठी एक इंचही मागे नाही सरकलो.

Manoj jarange patil : मला गाडीत केव्हा झोप लागते हे सुद्धा मला कळत नाही.कधी कधी तर रात्र रात्र झोप लागत नाही.सहा सात महिन्या पासून झोपीचा आणि माझा आवमेळ आहे.आणि माझ्या मराठा समाजालाही झोपू देत नाही कारण आता पुन्हा अशी संधी कधी येणार नाही. आता जागे व्हा अस घरोघरी जाऊन सांगतो.

मनोज जरांगे पाटलांचा सर्वांना इशारा.

आम्ही मुंबईकडे निघालोत तुम्ही मागे लक्ष ठेवा कारण आपली मुल आरक्षण मागण्यांसाठी चाल्लेत.पाचसे ते सहाशे किलोमीटरचा हा प्रवास आहे.पाठीमागे बारकाईने लक्ष असु द्या त्यांना काही त्रास होतोय का तसा काही प्रयत्न झाला तर आपल्या गेलेल्या मुलांच्या पाठीशी ताकदीने उभे रहा असे आवाहन Manoj jarange patil यांनी केले आहे. 

आता मात्र आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्या शिवाय माघार नाही.तुम्ही सर्वांनी जागे व्हा आरक्षण आता अंतिम टप्प्यात आहे.सरकारने कितीही त्रास देऊ द्या आणि काहीही करु द्या आपण मात्र आता मागे हटायच नाही.

खोके आपल्याला लागत नाहीत जरांगे पाटील.

सरकारला माझी एकच अडचण आहे मी त्यांना मॅनेज होत नाही फुटतही नाही.माझ्या सारखा खडतर नमुना त्यांना मिळालाय कारण आपल्याला खोके लागतच नाहीत. खोक्याचा आणि माझा छत्तीसचा आकडा आहे. कारण  शाच आणि माझ कधी जमलच नाही.मी कायम कर्ज बाजारी आहे.जस हिंदीच आणि माझ जमत नाही तस.पुढ जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही जर माझी हिंदी ऐकली तर तुम्हाला चक्कर ऐईल.कारण आपल आणि हिंदीच कधीच पटल नाही आणि पटणार देखील नाही.

Manoj jarange patil : 25 तारखेला जेव्हढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी मुंबईला या अस मागे राहिलेल्या बांधवांना विनंती.शेवटी जरांगे पाटील म्हणाले की आता सर्वांना हात जोडून विनंती आहे की ताकदीने हा लढा लढू लागा कसलाच विचार करु नका. आरक्षणच घेणार हा मनोज जरांगे पाटील यांचा अंतिम निर्णय आहे.

हे देखील वाचा 👇

अंगणवाडी सेविका संप

Facebook

 

x