Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत अशी साजरी कर/मकर संक्रांती संपूर्ण मराठी माहिती

आज आहे मकर संक्रांत, १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांत असून तसेच संपूर्ण भारतवर्षात हा सण साजरा केला जातो,१४ जानेवारी रोजी भोगी, १५ जानेवारी ला makar sankranti आणि १६ जानेवारी ला किंक्रात असा तीन दिवसाचा सण साजरा केला जातो.

या वर्षी मकर संक्रांत १५ जानेवारी २०२४ रोजी आहे. मकर संक्रांती.हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण? तो का करतात काय आहे त्या मागचा इतिहास आणि काय केल पाहिजे मकर संक्रांतीला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मकर संक्रांतीचे वाण.

महिलांचा सर्वात आवडीचा सण कोणता असेल तर तो आहे makar sankranti चा सण कारण या दिवशी महिला.नवनीन साड्या परिधान करून. धार्मिक स्थळ, मंदिर अशा ठिकाणी एकत्रित येऊन हळदी कुंकवाचा समारंभ होतो एकमेकींना हळदीकुंकू दिले जाते.

त्यात वाणाचे साहित्य असते ते असे खण, त्यात बोर, गाजर, उस, हरबरा, ज्वारीचे कणीस, गव्हाची ओंबी, करडीचे फुल, बिबव्याची फुल, इतर असे याचे ताट तयार केले जाते आणि विविध मंदीरात जाऊन हे सर्व देवास अर्पण केले जाते.

मकर संक्रांतीचे महत्त्व.

भारतात या सणाला विशेष महत्त्व आहे.हिंदु संस्कृती मध्ये हा सण साजरा केला जातो.makar sankranti हा सण साजरा करण्यामागे काही परंपरा आहेत.कोणतीही गोष्ट कारणा शिवाय नसते त्याच प्रमाणे मकर संक्रांतीला सुद्धा काहीतरी कारण आहे.भारत हा कृषी प्रधान देश आहे.त्यामुळे शेतकर्यांचे हे सुगीचे दिवस आहेत.या सुगीच्या दिवसांत शेतकरी आपल्या उपास्य देवतेचे पूजन करुन शुभ कार्याला प्रारंभ करतो.त्यातच हा एक मकर संक्रांतीचा सण आहे. या सणाला सुर्याची उपासना केली जाते.

मकर संक्रांत शुभ मुहूर्त.

दर वर्षी मकर संक्रांत ही १४ जानेवारी ला येत असते पण या वर्षी १५ जानेवारी रोजी आली आहे. त्याच कारण मागे दिवसाची तिथीची वाढ झाली आहे त्यामुळे एक दिवसांनी पुढे सरकली आहे म्हणजेच १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे.

१५ जानेवारी २०२४ वार सोमवार makar sankranti आणि १४ जानेवारी रोजी २ वाजून ५४ मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. उत्सव शुभ मुहूर्त पुर्वा शुभ मुहूर्त सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी ते सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटा पर्यन्त मानला जातो तर अत्यंत शुभ काळ हा सकाळी ७.१५ ते सकाळी ९.०० असा समजला जातो.

मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्याची उपासना.

या दिवशी सूर्य प्रकाशीत होण्याआधी स्नान करावे.गंगा स्नान केले तर अती उत्तम.शक्य नसेल तर गंगेच जल आपल्या अंघोळीच्या पाण्यात सोडा आणि स्नान करा तेही शक्य नसेल तर स्नान करते वेळी सर्व नद्यांचे स्मरण करा आणि गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, इतर यान सर्व नद्यांचे स्नान घडेल.त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळसीला पाणी घालून प्रदक्षिणा घाला.आणि सुर्याला नमस्कार करून पाणी सोडा, अक्षदा, फुल, गंथ वहा आणि ओम् सुर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करा.

makar sankranti 2024 : आपल्यावर सुर्याचे अनंत उपकार आहेत.सुर्यच उगवला नाही तर काय होईल लक्षात घ्या, सर्व पृथ्वीचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. सुर्य उगवला नाही तर पृथ्वीवर धनधान्य पिकणार नाही आणि धनधान्यच पिकले नाहीतर काय होईल कल्पना करा म्हणून सुर्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.अशा या सुर्य देवाची उपासना केल्यास सुर्य देव प्रसन्न होऊन आपल्या घरात धनधान्य, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते.

सुर्याचा मकर राशीत प्रवेश.

मकर संक्रांत या दिवशी सूर्य वेवाची सर्वत्र उपासना केली जाते.त्याचे कारण या दिवशी सूर्य देवाच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडून येतात.या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.म्हणजेच सुर्यांचे धनू राशीतून मकर राशीत संक्रमण होते. त्यालाच मकर संक्रांत असे म्हणतात.

त्यामुळे सुर्य या दिवसापासून उत्तरायणाकडे पलायन करतो,म्हणजेच या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू असते.इथुन पुढचा दिवस मोठा आणि रात्र लहान असते. तसेच महाराष्ट्र हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगी, Makar Sankranti, आणि किंक्रात.

मकर संक्रांतीचा सण.

या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडू मध्ये पोंगल असे म्हणतात.वेगवेगळ्या भागात वेगवेगळी प्रथा आहे.महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी तिळ लावून बाजरीच्या भाकरी केल्या जातात.आणि त्या सोबत विविध प्रकारची भाजी म्हणजे वालाची शेंग, पावटा, वांगी, चणा, गाजर, इतर अशा मिक्स भाजी बनवतात.आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो.

दुसऱ्या दिवशी makar sankranti या दिवशी महिला सुर्यची  उपवासणा करतात आणि उपवासाचे व्रत करतात.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. इथुन पुढे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सुर्य शनी राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी शनीची पुजा करावी. तसेच तेल, काळे उडीद, तिळ आणि मिठाचे खडे शनी देवाला अर्पण करून नमस्कार करून ओम् शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करावा.

संस्कृती प्रधान भारत देश.

आपल्या भारत देशात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणा मागे काही ना काही उद्देश आहेत,काही परंपरा आहेत,तर काही रितीरिवाज आहेत.आणि त्या अगदी काळजीपूर्वक जशाच्या तशा जपल्या जातात. हे उत्सव साजरे करण्यामे काहीतरी एक चांगला उद्देश असल्याचे दिसून येते.त्यामध्ये मग अनेक सण आहेत. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, नवरात्र, नाग पंचमी असे विविध सण आहेत.त्यातलाच हा एक मकर संक्रांतीचा सण आहे.

Makar Sankranti नंतर निसर्गात काही महत्त्वाचे बदल घडवून येतात.त्यात महत्त्वाचा बदल घडून येतो तो म्हणजे सुर्याच्या ठिकाणी कारण या दिवसापासून सूर्य हा उत्तरेकडे सरकत सरकत राहतो म्हणजेच सुर्याचे उत्तरायण सुरू होते.आणि या दिवसापासून थंडी कमी व्हायला लागते आणि उणाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते.इथुन पुढचे चार महिने रात्र लहान असते आणि दिवस मोठा.

तसेच हा सण साजरा करण्यामागे काही कारण आहेत. त्यात महत्वाच कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण शेतकऱ्यांशी निगडित आहे.या कालावधीत शेतकर्यांचे कापणीचे मळणीचे, काढणीचे दिवस असतात, ज्वारी, गहू, हरभरा, तुर, इतर शेतकरी जे धन पिकवतो, ते पिकवलेल धान्य त्यावेळी ज्यांनी ज्यांनी मदत केली म्हणजेच पृथ्वी मात, सुर्य देवता, आकाश, या सर्वांचे आभार शेतकरी व्यक्त करतो आणि पुन्हा विनवणी करतो की वर्षानू वर्षे अशीच आमच्यावर कृपा कर आणि आमचे जीवन सुख शांतीने समृद्ध होऊ दे असाही या मागचा उद्देश आहे.

मकर संक्रांतीच्या सणाची पद्धत.

मकर संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी पद्धती आहे. महाराष्ट्र राज्यात मकर संक्रांत असे म्हणतात तर पश्चिम बंगाल मध्ये मकर संक्रांतीला मोकोर सोनक्रांती असे म्हटले जाते तर नेपाळ या ठिकाणी माघे संक्रांती असे म्हटले जाते. या ठिकाणी हस्तांतरण म्हणजे एकमेकांच्या हातात हात दिला जातो. मकर संक्रांत म्हणजे सुर्याचे मकर राशीत मकर संक्रमण होते याच दिवसाला Makar Sankranti असे म्हणतात. सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस पहिला दिवस असतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.दर वर्षी या तिथित थोडाफार बदल होतो. कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी असा असतो. तर या वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला आहे.

मकर संक्रांती हा सण विविध रगांने नटलेला सण आहे.हा सण दर वर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.या दिवशी महिला गाणे म्हणतात.तसेच उखाणे घेण्याची प्रथा आहे. मग उखाणे घेण्यात महिलांच्या स्पर्धा लागतात.उखाणे म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीचे नाव विशेष शब्दात वर्णन करुन शब्दांचे यमक जुळवून घेतले जाते त्यालाच उखाणे असे म्हणतात. आणि मग कोण कस नाव घेत याकडे सर्वांचे लक्ष लागल्याले असते.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला विविध ठिकाणी जाऊन म्हणजे महाराष्ट्रात महिला वाण देण्यासाठी मकर संक्रांतीला धार्मिक स्थळांना देवी देवतांच्या दर्शनाला जाऊन पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर, कोल्हापूर, माहुर, अशा ठिकाणी महिला जातात. आणि या निमित्ताने या मंदिरात या दिवशी फक्त महिलांनाच प्रवेश असतो. या दिवशी पुरुषांना मंदिरात प्रवेश नसतो. अशी ताकीद देवस्थान समितीने दिलेली असते.कारण मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती असते.तसेच देवी देवतेचे दर्शन घेऊन हळदीकुंकू आणि तिळगूळाचा प्रसाद देवतेला अर्पण केला जातो त्याचप्रमाणे महिला एकमेकींना हळदीकुंकाचा समारंभ होतो तिळगूळ एकमेकांना देतात.अशी महाराष्ट्र राज्यात मकर संक्रांतीची परंपरा आहे.

असे म्हणतात की मकर संक्रांत या दिवशी सुर्य देवता आपल्या मुलाच्या भेटीला जातात. म्हणजेच सुर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.त्या कारणास्तव शनी देवता ही मकर राशीचे प्रतिक मानले जाते.या दिवशी एकमेकातले मतभेद बाजूला सारून एकमेकांना तिळगूळ देऊन वैर विसरून जीवन तिळगूळा प्रमाणे गोड व्हावे असाही या मागचा मुख्य संदेश आहे.लहाना पासून ते वृद्धा पर्यंत सर्वांना तिळगुळ दिले जातात.

मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने?

मकर संक्रांतीच्या दिवशी देव पुजेला आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे विशेष पुण्याची प्राप्ती होते.तसेच या दिवशी गंगा स्नान आवश्य करावे.असे म्हणतात की या दिवशी गंगा स्नान, नद्यांच स्नान केल्याने इतर वेळेस केलेल्या स्नाना पेक्षा हजार पटीने पुण्य प्राप्त होते.आणि हे सर्व शुभ मानले जाते.या कालखंडात केलेले सत्कार्यामुळे सुर्य आणि शनी महाराज प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या जीवनातील अडीअडचणी दुर होण्यास मदत होते. आपले रखडलेले काम पुर्ण होण्यास मदत होते.

Makar Sankranti : म्हणून आपल्याला झेपेल एव्हढेच गरजुंना, गोरगरिबांना, ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना अन्न द्या आणि ज्यांना वस्राची आवश्यकता आहे त्यांना वस्त्र दान करा.आपण एक हाताने केलेली मदत ईश्वर त्यांना दोन हाताने मदत करतो. म्हणून पुण्य प्राप्तीसाठी हा शुभ काळ मानला जातो.

तसेच इतर वेळेस हिंदू धर्मात काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. कारण काळा रंग हा शनी देवाचा आवडीचा रंग मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास सर्व देवी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. आणि त्यांची आपल्यावर कृपा होते.

या वर्षी काळ्या रंगाचे कपडे घालावेत का? नाही?

मकर संक्रांत हा महिलांचा विशेष सण आहे.आणि महिला म्हटल की वस्त्राच्या बाबतीत अतिशय बारकावे बघतात. साडी कोणत्या रंगाची, बांगड्या त्याच कल्हरच्या, त्याच रंगाचे इतर. आजकाल मॅचिंग आणि फॅशन या गोष्टींचा विशेष महत्त्व आहे.मकर संक्रांतीला दर वर्षी वेगळा रंग असतो. तर मग या वर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. हे देवीचे वाहन आणि देवीचे पातळ कोणत्या रंगाचे आहे यावर अवलंबून असते.

Makar Sankranti in marathi : कारण देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार तो रंग आपण परिधान करायचा नसतो.म्हणून या वर्षी देवी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. त्यामुळे या वर्षी काळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे नाहीत.तर या वर्षी लाल रंग शुभ मानला जात आहे.या वर्षी मकर संक्रांतीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशिर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील.असे या रंगाचे मकर संक्रांतीला महत्त्व आहे.

देव तिळी आला | गोडे गोड जीव धाला ||१|| साधला हा पर्वकाळ | गेला अंतरीचा मळ ||२|| पाप पुण्य गेले | एका स्नानेची खुंटले ||३|| तुका म्हणे वाणी | शुद्ध जनार्दन जनी ||४||

तिळ हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते तर गुळ हे आत्म्याच प्रतिक आहे. कारण आत्मा हा सर्वांचा एकच आहे. त्यामुळे तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. प्रेम द्या आणि प्रेमच घ्या. प्रेम दिल तर प्रेमच मिळेल.वाईटातून चांगल घ्या आणि जीवनात गोडवा निर्माण करा.आपुलकी जतन रहावी म्हणून हा सण आहे.प्रेमाचे संवर्धन करा प्रेमानेच सर्व काही होते.म्हणून अशी अनमोल संस्कृती आपल्या भारत देशाला लाभली आहे. ती या सणाच्या रुपाने म्हणून तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

हे देखील वाचा 👇

विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

 

Facebook

 

x