राजमाता जिजाऊसाहेब यांची आज ४२६ वी जयंती आहे.तारखेनुसार १२ जानेवारी आणि मराठी महिन्यानुसार पौष पौर्णिमेला म्हणजेच पौष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.एक आदर्श माता, एक आदर्श पत्नी म्हणून त्यांची ओळख आहे. दोन कुळांचे नाव त्यांनी रोशन केले.आणि त्यांनी एका महापराक्रमी परम प्रतापी पुत्रास जन्म दिला अशा त्या rajmata jijau jayanti date आज आहे. त्यानिमित्ताने थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत.
राजमाता जिजाऊ यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.त्यांच्या मुर्तीस अभिवादन करून,फुल पुष्प अर्पण करून,त्यांच्या विचारांची मशाल पेटवली जाते. तसेच देशात आणि देशाबाहेर ही राजमाता जिजाऊंची जयंती साजरी केली जाते. सिंदखेडराजा या ठिकाणी देखील मोठ्या थाटामाटात rajmata jijau jayanti साजरी केली जाते. तसेच विविध ठिकाणी…
राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म.
छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या ठिकाणी १२ जानेवारी म्हणजेच पौष पौर्णिमा इ.स. १५९८ रोजी त्यांचा जन्म झाला. म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई लखुजीराव जाधव यांच्या पोटी जिजाबाईचा जन्म झाला.म्हणजेच जिजाबाई लखुजीराव जाधवांची कन्या. पुढे राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या.आज हे स्थळ एक ऐतिहासिक स्थळ नसून ते एक भव्य पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जात आहे.
rajmata jijau jayanti : लखुजीराव जाधव आणि मालोजीराव जाधव हे दोघे भाऊ. लखुजीरावांना चार मुल दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाबाईला चार भाऊ होते.जिजाऊसाहेब यांचा एका भुईकोट राजवाड्यात जन्म झाला.अत्यंत देखणा हा राजवाडा सिंदखेडराजा या ठिकाणी मुंबई – नागपूर महामार्गाला लागूनच आहे.आजही पहायला मिळतो आहे.
सिंदखेडराजा येथे प्राचीन कालीन वास्तु.
या वाड्या समोर त्याकाळचे प्राचीन कोरीव बांधकाम आहे.आणि लखुजीराव जाधव यांचे समाधीस्थळ आहे.असी महान भव्य आणि दिव्य वास्तु त्या ठिकाणी आहे. त्याच महालात शहाजीराजे भोसले आणि जिजाऊंच्या विवाहाची विवाहाची बोलणी करण्यात आली होती.त्या ठिकाणी निलकंठेश्वराच प्राचीन मंदिर आहे.
rajmata jijau jayanti : अतिशय कोरीव शिल्प कला या ठिकाणी पहायला मिळते. लखुजीराव जाधवांनी या मंदिराची पुनर्रचना केल्याचे उल्लेख आहेत.आणि या मंदिरा समोरच एक बारव देखील आहे.तर ८-१० व्या शतकातील त्या ठिकाणी हेमाडपंथी रामेश्वराचे मंदिर आहे.तसेच इतर काही भव्य वास्तू आहेत.
शहाजी राजांचा काळ.
छत्रपती शिवरायांच्या जन्मापुर्वी राज्यात महाराष्ट्राच्या प्रजेचे अतोनात हाल झाले,राज्यावर अनेकांनी हल्ले चढवले, या लढ्यात राज्यातील प्रजेला अतोनात झळ सहन करावी लागत होती.धनधन्यांनी फुललेली शेत जमीन पायदळी तुडवली जात होती.हे चित्र शहाजी राजे उघड्या डोळ्यांनी बघत होते त्यांना हे सहन होत नव्हते. प्रजेचे हाल आणि गुलामगिरी त्यांना पसंत नव्हती.
rajmata jijau jayanti 2024 : शहाजी राजे भोसले हे अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी, स्वतंत्र राज्यकारभार तसेच युद्धप्रसंगाची कला त्यांच्याकडे होती.पण त्यावेळी प्रजेची एक जुट नव्हती, प्रजा संघटन नव्हते त्यामुळे त्यांना काही दिवस गुलामगिरी पत्कारावी लागली.पुढे शहाजी राजे भोसले यांचा विवाह सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधवांच्या मुलीशी झाला.म्हणजेच जिजाबाई लखुजीराव जाधव यांच्याशी झाला.
rajmata jijau : यावेळी लखुजीराव आणि मालोजीराव हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे दुर्दैवाने मालोजीराव जाधवांचा मृत्यू झाला.पुढे जिजाऊसाहेब आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह इ.स.१६०६ रोजी झाला. त्यावेळी शहाजीराजे हे निजामशाहीची सरदारकी करीत होते.दिवसा मागून दिवस आले तसे निघून जात होते.जिजाऊसाहेब यांना ही गुलामगिरी पसंत नव्हती वेगळ राज्य स्थापन करावे अशी त्यांची इच्छा होती.
स्वराज्य स्थापन करावे ही श्रींची इच्छा.
पुढे शहाजी राजांना आणि जिजाऊसाहेब यांना आठ अपत्ये झाली.सहा मुली तर दोन मुल असी एकूण आठ अपत्ये झाली. त्यात शिवाजी राजे पोटात असतांना जिजाऊसाहेब यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.मराठा साम्राज्याच्या संस्थापक राजमाता जिजाऊसाहेब यांनी शिवरायांच्या जन्माची संगोपनाची महत्वपूर्ण भूमिका बजावली.
rajmata jijau jayanti bhasan : शिवराय पोटात असतांनाच जिजाऊसाहेब यांना डोहाळे लागले ते आम्हास स्वतंत्र स्वराज्य निर्माण करावेसे वाटते,आम्हास घ्योड्यावर स्वार व्हावेसे वाटते,आम्हास हातात तलवार घेऊन लढावेसे वाटते , दानपट्टा खेळावासा वाटतो आणि शिवराय पोटात वाढत होते त्यावेळी जिजाऊसाहेब शिवरायांवर गर्भ संस्कार करत होत्या.
छत्रपती शिवरायांचा जन्म.
आणि शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. जिजाऊसाहेब यांनी शिवरायांना लहानपणापासूनच धडे शिकवायला सुरुवात केली.भागवतातल्या कथा, रामायणातल्या कथा, भगवान श्रीकृष्णाच्या कथा, रामप्रभूंच्या कथा, युध्दाच्या गोष्टी शिवरायांना सांगत होत्या.राजमाता जिजाऊसाहेब शिवरायांवर बालसंस्कार करत होत्या.
rajmata jijau jayanti : त्यांचे स्वप्न त्यांना शिवरायांच्या हातून पुर्ण करायचे होते.शिवाजी महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. शहाजीराज्यां सोबत घोड्यावर फेरफटका मारु लागले. आणि शिवरायांची चलाखी पाहुण जिजाऊसाहेब धन्य होत. ती घोड्यावर टांग मारुन स्वार होतांना. तलवार फिरवताना, ही सर्व विद्या जिजाऊसाहेब शिवरायांना शिकवत होत्या.आणि जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवराय सर्व युद्ध कला शिकले.
दिनदुबळ्यांच्या रक्षणार्थ स्वतंत्र स्वराज्य स्थापन करावे ही श्रींची इच्छा.मात्र पुढे काळाणे घात केला २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजी राजे भोसले यांचे निधन झाले. जिजाऊसाहेबांना अतिशय दुःख झाले. त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती जिजाऊसाहेब सति जाण्यास निघाल्या पण शिवरायांनी त्यांना सति जाऊ दिले नाही.वडलांचा आधार गेला किमान आई तरी असावी म्हणून शिवरायांच्या आग्रहास्तव जिजाऊसाहेब सती गेल्या नाहीत.
कोण होत्या राजमाता जिजाऊसाहेब?
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणार्या, हजारो वर्षाची काळरात्र संपवून स्वराज्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे भाग्य ज्या मातेमुळे बघायला मिळाले त्या स्वराज्याच्या जगद् जणनी राजमाता जिजाऊसाहेब या हिंदवी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब होत्या.मातृत्व काय असते हे फक्त जिजामाता यांच्याकडे बघितल्यावरच समजते.
rajmata jijau jayanti 2024 : कसे घडवले शिवराय जिजाऊ मातेने.नसत्या घडल्या राजमाता तर नसते घडले शिवराय, शंभुराजे, नसते घडले शिवराय, शंभुराजे तर नसते घडले स्वराज्य आणि नसते घडले स्वराज्य तर नसते लढले मावळे नसते लढले शिवराय तर राहिले कुंकु कपाळी, नसते घडले शिवराय तर नसत्या राहिल्या लेकी बाळी नसत्या राहिल्या लेकी बाळी तर नसतो राहिलो आज आम्ही. म्हणून अशा महान जिजाऊसाहेबांना जन्म दिनाचा मानाचा मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..!
राजमाता जिजाऊसाहेब एक महान स्री होत्या, एक आई तर एक कर्तव्यदक्ष पत्नी तर एक लढाऊ योद्धया होत्या.त्यांनी बाल छत्रपती शिवाजी राजांना जे बाल कडू दिले त्यातूनच स्वराज्याची स्थापना केली. बाल वयातच शिवरायांचे देश प्रेम, धर्म प्रेम जागृत केले.
जिजाऊ माँ साहेब यांचा जन्म म्हणजे शत्रूचा काळ.
rajmata jijau jayanti 2024 : राजमाता जिजाऊसाहेबांचा जन्म झाला आणि जनू काही मोगल आदिलशाही, निजामशाहीचा काळच जन्माला आला. जिजाऊसाहेब यांच्या रक्तातच लढणे हा गुण होता ते रक्त सामान्य कस. राजनिती, युद्धनीती, शत्रूचा कसा खात्मा करायचा हे त्या जन्मताच सोबत घेऊन आल्या होत्या.जनू काही धैर्य, शौर्य,दृढ आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच आंदणच लखुजीराव जाधवांनी शहाजी राजांच्या पदरात घातल होत.तळपत्या तलवारी प्रमाणेच त्यांची देह क्रांती.स्वतंत्र स्वराज्याचे स्वप्न पाहिल आणि ते सत्यात उतरवल त्या राजमाता जिजाऊसाहेब.संकट काळातही खचल्या नाहीत आणि मागे हटल्याही नाहीत.
rajmata jijau jayanti : स्वराज्याच्या रक्षणार्थ स्वराज्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर ठेवली ते एक नाही तर दोन( वाघांच्या बछड्यांना)शुर वीरांच्या हाती सोपावल आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते पुर्णत्वास नेण्याची शपथ वाहिली निष्ठा, जिद्द, संयम, प्रेम, कठोरता, समता, बंधुता, मित्रता, आपुलकी,
न्याय आणि अन्यायाविरुद्ध मैदानात उतरण्याची ताकद दोन छत्रपतींच्या मनगटात पोलादासारखी भरणाऱ्या राष्ट्रमाता, rajmata jijau यांच्या कारकिर्दीने इतिहासातल्या पाणावर सुवर्ण अक्षरांनी नाव कोरल.शहाजी राजा सोबत घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन वेळ प्रसंगी युद्धासाठी स्वतः मैदानात उतरण्याची हिंमत त्यांच्यात होती.केवळ जाहागीरी सांभाळण्यात संकुचीत विचार त्यांनी केला नाही तर प्रजेला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची व्यापक दृष्टी होती.या मातृ वात्सल्याने दोन खंबीर रत्न स्वराज्याच्या अधिन केले त्या मातृत्वाच्या चरणी स्वर्ग फिका पडतो. वात्सल्य, प्रेम, अशा अनेक गुणांनी त्या परिपूर्ण होत्याच यात कसलीच शंका नाही.असे महान कार्य ज्यांनी केले आज त्या rajmata jijau jayanti आहे.
आहे.
FAQ – rajmata jijau jayanti 2024
१) राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला?
राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा जन्म १२ जानेवारी इ.स.१५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला, लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाबाईचा जन्म झाला.राज घराण्यात त्यांचा जन्म.
२) राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?
राजमाता जिजाऊ यांचे आईवडील विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई जाधव. भोसले घराण्याची सुन राजमाता जिजाऊसाहेब शहाजी राजांची पत्नी आणि शिवरायांच्या आईसाहेब तर शंभु राजांच्या आजीबाई.
३) शहाजी राजे भोसले आणि जिजाऊसाहेब यांचा विवाह कधी झाला?
शहाजी राजे भोसले आणि राजमाता जिजाऊसाहेब यांचा विवाह राजघराण्यात मोठ्या थाटामाटात विदर्भ बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा देवगिरी किल्ला (दौलताबाद ) या ठिकाणी इ.स. १६१०-११ मध्ये शहाजी राजे भोसले यांच्याशी तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्याची सुन त्या झाल्या.शहाजी राज्यांच्या पहिल्या पत्नी जिजाऊ आणि दुसर्या तुकाबाई होत्या.
४) राजमाता जिजाऊ यांना किती मुले होती?
राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले यांना एकुण आठ अपत्ये होती त्यात सहा मुली आणि दोन मुल अशी एकूण आठ अपत्ये त्यांना होती असे ऐकण्यात आहे.काही ठिकाणी सहा असेही ऐकण्यात आहे.
५) जिजाबाई कोणाची मुलगी होती?
जगद् जननी राजमाता जिजाऊ साहेब लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई जाधव यांची कन्या होती तर भोसले घराण्याची एक आदर्श सुन त्या होत्या आणि शिवरायांच्या मातोश्री होण्याच सौभाग्य त्यांना लाभल.
६) जिजाबाई यांनी शिवरायांना कसे घडवले?
स्वराज्याच्या रक्षणार्थ माँ साहेब जिजाऊ यांनी शिवरायांना गर्भात असतांनाच गर्भ संस्कार दिले. शिवाजीराजे गर्भात असताना जिजाबाई धर्म ग्रंथांच वाचण करत होत्या. त्याच वेळी त्यांना घोड्यावर स्वार व्हावे हातात तलवार घ्यावी आणि शत्रूला आव्हान करावे असे डोहाळे त्यांना लागले होते.
rajmata jijau jayanti : आणि ज्या वेळी शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी जिजाऊसाहेब शिवरायांना शुर वीरांच्या कथा, रामायण महाभारतातल्या कथा, रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी, सांगत होत्या, शिवराय तिन चार वर्षाचे असताना त्यांना तलवार कशी चालवायची, घोड्यावर स्वार कसे व्हायचे, दानपट्टा कसा खेळायचा. असे प्रशिक्षण जिजाऊ माँ साहेबांनी शिवरायांना दिले आणि स्वराज्याची स्थापना केली.
जिजाऊ माँ साहेबांना मानाचा मुजरा.
मुजरा माझा त्या मॉं जिजाऊला | घडविले त्यांनी त्या शुर शिवरायांना || साक्षात होती ती आई भवानी | जन्य घेतला तिच्या पोटी शिवबांनी || मराठी मातीत ज्यांनी केला गनिमी कावा | तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा || सांभाळले त्यांनी सर्वांना प्रेमाने | घडले स्वराज्य त्यांच्याच आशीर्वादाने || त्यांच्या मायेच्या छायेत नव्हता जात भेद | सर्व धर्म समभाव हा एखच त्यांचा धर्म || तिच्याच राज्यात होती सर्व सुखी प्रजा | धन्य धन्य जिजाऊ माता | धन्य धन्य शिवाजी राजा | धन्य धन्य शंभु राजा || rajmata jijau jayanti च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
शिवनेरीच्या पायर्या रडतील तुमच्या आठवणीने | जिथे जन्म दिला एका वाघाला एका वाघीनीने || कासावीस होतो रायगड तुमच्या भेटीसाठी | दाखविले शिवबांना तिथेच तुम्ही चार स्वप्न मोठी || पाचाडचाही जीव होई थोडाथोडा तुमच्या मायेपोटी | सह्याद्रीही हिरमुसेल जो होता अखंड तुमच्या पाठी || भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल मागे पुढे | अखंड स्वराज्याचा मुजरा तुम्हाला तुमच्या चरणी नतमस्तक || राष्ट्रमाता rajmata jijau jayanti निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा..!
मागील जन्माची पुण्याई म्हणून हा जन्म तुझ्या गर्भात मिळाला | जग पाहिलं नव्हत पण नऊ महिने स्वास तुझ्या गर्भी स्वर्गात घेतला || आई हरवलेल्या कृष्णाची फिरुन पुन्हा साठवण | आज अचानक झाली आईची आठवण || राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
राजमाता जिजाऊसाहेबांचा अखेरचा निरोप.
पुढे शहाजी राजांच्या निधनानंतर जिजाऊसाहेब यांनी हार मानली नाही. शिवरायांना युक्तीच्या गोष्टी सांगत लढत राहिल्या.पुढे स्वराज्य स्थापन झाल शिवरायांनी त्यांच स्वप्न पूर्ण केल.
rajmata jijau jayanti : स्वराज्य स्थापन करण्यामागे जिजाऊसाहेबांचा सिंहांचा वाटा आहे.पुढे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याच भाग्य त्यांना लाभले नाही. आणि १७ जुन १६७४ रोजी जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा अखेरचा निरोप घेतला.
हे देखील पहा 👇