राज्यातील Anganwadi Sevika कर्मचारी यांनी सर्वत्र संप पुकारला आहे.आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप चालूच राहणार आहे.विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावर उतरल्या आहेत.आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे.नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.👇
अंगणवाडी सेविका संतप्त एल्गार.
गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना कमी पगारावर राबवून घेतल जात आहे.तसेच आमच्याकडून विविध काम करुन घेतले जात आहेत.आत्र आम्हाला आमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही आणि जी पगार मिळते त्यात आमचे भागत नाही.महागाईच्या काळात कमी पगारावर आम्ही आमचा प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न आमच्या पुढे आहे.
याच गोष्टीचा रोष मनात ठेवून Anganwadi Sevika यांनी विविध पंचायत समिती कार्यालयवर धडक मोर्चा वळवला आहे.या वेळी सरकारने ठोस निर्णय न दिल्यास आत्मदहनाचा इशारा निवेदना द्वारे सरकारला देण्यात आला आहे.या आंदोलनात अंगणवाडी सेविकासह विविध कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
अंगणवाडी सेविकांचा आक्रोश.
राज्यात सध्या अंगणवाडी सेविकांनी ठिकाणी चागलाच मागणीचा मुद्दा धरुन ठेवला आहे.सरकारकडे तशा स्वरुपाची याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे.वेतन वाढी संदर्भात ही याचिका आहे.सरकारने आमच्या पगारी वाढवाव्यात तसेच विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या या मागण्या सरकारकडे सोपवण्यात आल्या आहेत. गेले दिड महिन्यांपासून Anganwadi Sevika आणि कर्मचारी मागण्यासाठी आंदोलन, मोर्चे सुरू आहेत.
राज्यातील संपूर्ण Anganwadi Sevika आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी रजेवर आहेत.आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा संप सुरूच राहणार अशी ताकीद करण्यात आली आहे. सध्या आम्हाला ज्या पगारी मिळतात त्यात आमचे भागत नाही. आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित झाला आहे. आमच्या मुलांची शिक्षण कशी करावीत.आणि दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य माणसाला मोठी झळ सहन करावी लागत आहे.
या संदर्भात सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.ग्राम पातळीवरच्या सरकारचे कोणतेही काम आम्ही प्रत्येक घराघरा पर्यन्त पोहचवतो,ग्राम स्वच्छता अभियानापासून ते गरोदर महिलांच्या लसीकरणाची व्यवस्था करण्या प्रयत्न.शाळेतील आहार ,पोषण आहार, आरोग्य व्यवस्थापन, इतर विविध अभिवादन राबविण्या पर्यन्त सर्व काम अगदी चोख पणे सरकार पार पाडून घेत तर मग आम्हाला त्या गोष्टीचा पुरेपूर मोबदला मिळायला सरकार आम्हाला का देत नाही.असा सवाल Anganwadi Sevika आणि मदतनीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. आणि म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी याच कारणामुळे संप पुकारल्याचे सांगितले जाते आहे
प्रलंबित मागण्या पूर्ण करा.
विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष्य देणे गरजेचे आहे.अंगणवाडी, बालवाडी महिला युनियनच्या वतीने धरणे आंदोलन उभारण्यात आले आहे. सरकार निस्काळजी करत आहे.इथुन मागे इतक्या बारकाईने याकडे कोणी लक्ष्य दिले नाही मात्र आता अंगणवाडी सेविका जागृत झाल्या आहेत.आणि सर्व Anganwadi Sevika मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन संप, आंदोलन, मोर्चे, काढले आहेत.
अंगणवाडी केंद्रातील बालकांना योजनेच्या निकषा प्रमाणे दैनंदिन आहार पुरविण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, यात काही वरीष्ठ अधिकारी गैरव्यवहार प्रकरणी अंगणवाडी आहार वाटपातील त्या सर्वांना मानधन सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी Anganwadi Sevika आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. मात्र जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत सेविका संपावरच राहतील अशी ताकीद करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका संपावर.
अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाला आता जवळ जवळ एक महिना होऊन गेला आहे.तरी देखील सरकार या गोष्टींकडे काना डोळा करत आहे. मात्र आता महिला कर्मचारी सेविका आता रस्त्यावर उतरल्या आहेत.चार डिसेंबर २०२३ ला हा संप पुकारण्यात आला होता.म्हणजे एक महिना पूर्ण होऊन गेला आहे.त्यामुळे जवळपास दोन ते तीन हजार अंगणवाड्यांचे कामकाज या संपामुळे ठप्प करण्यात आले आहे.
Anganwadi Sevika : संप पुकारण्यात आला असल्यामुळे लाखो बालकांना घरी बसून राहावे लागत आहे. आणि त्यामुळे त्या बालकांना अंधाराशी सामना करावा लागत आहे.त्यांना आहार मिळत नाही तसेच शैक्षणिक जीवनात बालकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये तातडीने पावल उचलावीत आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
काय आहेत मागण्या.
अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटू आणि अंगणवाडी कृती समितीचे हा संप पुकारला आहे.त्यामुळे संपूर्ण अंगणवाड्या बंद आहेत.Anganwadi Sevika संपावर असल्याने बालकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसह विविध मागण्यांचे सरकारला निवेदन देण्यात आले आहे.त्यामुळे विविध कामांना स्थगिती मिळाली आहे.राज्यात विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालया समोर अंगणवाडी सेविकांचे प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू आहे.या मोर्चाला अंगणवाडी सेविकांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शविली आहे.
Anganwadi Sevika : पण सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे. कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे.कमी पगारात आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, आम्हा अंगणवाडी सेविकांना पगार कमी प्रमाणात मिळत असल्याने आमचे येवढ्या पगारात भागत नाही.आमच्या पगारात वाढ करावी अन्यथा संप चालूच राहणार नुसते आस्वासन आम्ही ऐकून घेणार नाहीत आम्हाला सरकार कडून ठोस निर्णय पाहिजे.
Anganwadi Sevika 2024 : अंगणवाडी सेविकांना २६ हजार तर मदतनीस ला २० हजार मानधन करण्यात यावे. या संदर्भात विविध मागण्या राज्य सरकार आणि केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. याबाबतीत विविध ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आली आहेत मात्र सरकारकडून आश्वासना शिवाय काहीच हाती लागत नाही.
आम्हाला आमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही.आणि जे मानधन मिळत त्यात आमचा उदरनिर्वाह चालवत नाही.आमच्या कुटुंबाच आणि आमच्या मुलाबाळांच भवितव्य धोक्यात आले आहे.मुलांच्या शैक्षणिक गरजा आम्हाला पुर्ण करता येत नाहीत. तर कुटुंबाचे संगोपनही व्यवस्थित पार पडत नाही.
‘ Anganwadi Sevika in Maharashtra ‘
आता सध्या अंगणवाडी सेविकांना प्रती महिना दहा हजार रुपये तर कर्मचारी मदतनीस केवळ पाच हजार रुपये पगार मिळतो आहे. तर सरकारने या मानधनात वाढ करावी अंगणवाडी सेविकांना सव्विस हजार तर मदतनीस वीस हजार रुपये वेतन वाढ करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सरकार ज्यांना खरी गरज आहे त्यांना मिळत नाही आणि ज्यांचे मानधन लाखांच्याही पुढे आहे सरकार आनखिन त्यात वाढ करत आहे. आणि त्यांना रिटायर नंतर पेन्शन पण मिळतो आम्हाला पेन्शन तर सोडाच पण योग्य पगारही मिळत नससल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
बालकांचे शैक्षणिक जीवन
बाल्य अवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा कालावधी या अवस्थेत बाल्य जीवनात झपाट्याने बदल होत असतात.शरीराच्या वाढीबरोबर मेंदुची वाढ, बुद्धीची वाढ, स्मरण शक्ती, सुरुवातीचे पहिले पाच वर्षे अतिशय महत्त्वाचे असतात. त्याच बरोबर त्यांचे आरोग्याचे संगोपन होने महत्वाचे असते.सर्वच बाबतीत बाल्य अवस्थेत वाढ वृद्धींगत होत असते.म्हणून बाल्यावस्थेत योग्य वेळी योग्य बदल शारीरिक दृष्ट्या महत्त्वाचे असतात.
आरोग्यदायी पोषण आहार मिळत असल्याने सर्व सामान्य कुटुंबातील मुला मुलींना पोषण आहारा पासून वंचित राहावे लागत आहे.आणि शैक्षणिक वार्षिक हाणी होत आहे.यामुळे मुलांचे मानसिक दृष्ट्या भयंकर नुकसान होत आहे.त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा वेळ निघून चालला आहे.त्यामुळे आरोग्य अल्पोपहार, शैक्षणिक जीवनावर आयुष्यभराचे परिणाम होत आहेत.
Anganwadi Sevika 2024 : योग्य संस्कार झाले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होते आणि त्या वयातच जर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळाली नाही तर त्यांच पुढील भविष्य धोक्यात येत. आयुष्याची मोठी हाणी होते.वेळ निघून गेल्यावर शेवटी पश्चात्तापा शिवाय काहीच शिल्लक उरत नाही.त्यामुळे सध्या अंगणवाड्या बंद असल्या कारणाने राज्यातील बालकांची मोठ्या प्रमाणात हाणी होत आहे. शैक्षणिक पात्रतेला मुकाव लागत आहे.Anganwadi Sevika आणि मदतनीस कर्मचारी यांच्याही आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.
अंगणवाडी शिक्षण पद्धती.
१९ व्या शतकापासून अंगणवाडी सेवा सुरू करण्यात आली तसेच १८८७ पासून भारत देशात शिशू व्यवस्थापनाची सुव्यवस्था सुरू करण्यात आली.त्या काळात मुलाच हात डोक्यावरुन कानाला पुरला तरच मुलाचे नाव शाळेत घेत असत.म्हणजेच त्यावेळी मुला मुलीचे वय साधारण पाच ते सहा वर्षाचे असायचे.मुल पाच सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांना शिक्षणच घेता येत नसायचे. म्हणण्यापेक्षा तोपर्यंत त्या मुला मुलींना शाळेत प्रवेशच मिळत नव्हता.
पण पुढे शिक्षण पद्धतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. ती काळाची गरज म्हणा नाहीतर आनखी काय. पण असेही म्हणता येईल की त्यावेळी त्यांच्या पालकांनाच शिक्षणाचे महत्त्व त्यावेळी न्यात नसावे किंवा मुलांची त्यावेळी मुलांची मानसिकता तशी नसावी. पण त्यानंतर पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटले आणि बालकांचीही बुद्धिमत्तेची वाढ होत गेली. आणि त्यालाच अनुसरून बाल्य अवस्थेतील मुला मुलींना शिक्षणाची सुव्यवस्था व्हावी म्हणून अंगणवाड्या सुरु करण्याची घोषणा झाली आणि त्यावेळी प्राथमिक शाळेतच वेगळा प्रवर्ग करुन बालवाड्या, अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या.
Anganwadi Sevika andolan
त्यावेळी या वर्गातील बालकांना शिक्षण प्रथमतः बाल गीत, खेळ, गाणे कविता, चित्राची ओळख, प्राण्यांची ओळख, पशुपक्षांची ओळख. इथून सुरुवात करण्यात आली.त्यावेळी काही लोकांनी पुढाकार घेऊन या शिक्षण पद्धतीला चालना मिळावी म्हणून प्रयत्न केले.त्यावेळी काही संघटनांनी एकत्रित येऊन हे काम हाती घेतले आणि कार्याला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात बरेच काही बदल घडून आले आणि बाल्य अवस्थेतील मुला मुलींना या शिक्षणाचा चांगलाच फायदा होऊ लागला. नव्हे नव्हे तर त्यांच्या बुद्धी कौशल्याचीही वाढ होण्यास मदत मिळू लागली, लहान बाल्य वयातच त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले.
या शिक्षणाचे रापटे मात्र त्यावेळी शहरापासून सुरवात करण्यात आले. पण पुढे या शिक्षणाचा फायदा खेड्यापाड्यातील मुला मुलींना देखील व्हावा म्हणून या शिक्षण व्यवस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. आणि काही संघटनांनी आपले पाऊल खेड्याकडे वळवले. १९४५ चा कालावधी त्यावेळी काही संस्था स्थापन करण्यात आल्या तर काही संघटनांची नेमणूक करण्यात आली.पुढे बालकांच्या आरोग्याच्या हेतूने आहाराची सुव्यवस्था करण्यात आली.तसेच बाल्यावस्थेतील मुला मुलीचा मृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बाल विकास संघटनेंनी कार्य केले.
बाल विकास योजनेमार्फत अंगणवाडी, बालवाडी बालकांना जवळ जवळ सहा प्रकारच्या सेवा देण्यात येतात.पुरक पोषण आहार, योग्य वेळी लसीकरणाची व्यवस्था, वेळोवेळी आरोग्य तपासणी, संदर्भातील संदर्भ सेवा, औपचारिक पुर्व शालेय शिक्षण आणि आरोग्य व आहार सुव्यवस्थापन.२०२४ आज तागाईत या बालवाड्या अंगणवाड्या कार्यरत आहेत.
सरकारच्या दारात धडक मोर्चा.
१८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की संबंधित विभागाची बैठक घेऊन चर्चा करतो.त्यावेळी असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र या गोष्टीला जवळपास एक महिना होत आला आहे तरी देखील सरकार या बाबतीत सरकारात्मक दिसून येत नाही.आम्ही आता नुसते आस्वासन ऐकून घेणार नाहीत आम्हाला ठोस निर्णय पाहिजे. सशी अंगणवाडी सेविकांची भुमिका आहे.
Anganwadi Sevika : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर २१ डिसेंबर ला मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुसते आस्वासनच दिले होते. मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांनी आंदोलन जास्त तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सरकारने बांगड्या हातात भरुन फिरावे म्हणून अंगणवाडी सेविकांनी बांगडी आंदोलन केले.तसेच धरणे आंदोलन केले त्यात आयुक्तांच्या पत्राची दहन करुन होळी करण्यात आली.
Anganwadi Sevika : सध्या महाराष्ट्र राज्यात विविध संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहेत.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की या गद्दारांनी माझे सरकार उध्वस्त केले जर कदाचित यावेळी मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हा सर्वांना ही वेळ येऊच दिली नसती.
तर या संदर्भात सरकार कटिबद्ध आहे. सरकार या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. हे सरकार नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लावेल असे दिपक केसरकर यांनी विस्वास वर्तवला आहे.
Anganwadi Sevika : जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पुर्ण करीत नाही तोपर्यंत विविध ठिकाणी आंदोलन होतच राहतील अशी खंत व्यक्त करत सरकारचा निषेध व्यक्त केला जातो आहे.
हे देखील पहा 👇