Ustad Rashid Khan : उस्ताद रशीद खान यांचे दुःखद निधन/संगीत क्षेत्रातला लखलखता तारा हरपला/55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ustad Rashid Khan यांचे दुःखद निधन.अतिशय दुःख:द घटना घडली आहे.वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोलकत्ता या ठिकाणी त्यांनी सोडला देह.संगीत क्षेत्रातला लखलखता तारा हरपला.त्यामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

उस्ताद रशीद खान यांचे दुःखद निधन.

पंडित उस्ताद रशीद खान यांच्यावर कोलकत्ता या ठिकाणी पियरलेस रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते.पण प्रकृती जास्तच गंभीर होत गेल्याने डॉक्टरांनी दिला शेवटचा निर्णय आणि उस्ताद Rashid Khan यांची प्राणज्योत मालवली. ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अस डॉ म्हणाले.दहा जानेवारी २०२४ रोजी त्यांच्यावर कोलकत्ता या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उस्ताद रशीद खान यांची गेल्या काही दिवसांपासून कर्क रोगासी झुंज सुरू होती. अखेर याच रागाने त्यांना घेरले आणि शेवटी उस्ताद रशीद खान यांना या रोगापुढे हार मानावी लागली. Ustad Rashid Khan यांची पत्नी दोन मुल आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखकळा पसरली आहे.

पंडित उस्ताद रशीद खान यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. दोन हजार बावीस साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

उस्ताद रशीद खान यांना भावपूर्ण आदरांजली.

उस्ताद रशीद खान यांच्या अच्यानक जाण्याने अनेकांनी शोध व्यक्त केला आहे.सर्व संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी त्यांना मोठ्या जड अंतःकरणाने आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की उस्ताद Rashid Khan यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हवेत गोळीबार करून उस्ताद रशीद खान यांना अखेरची सलामी देण्यात येणार आहे.

पंडित उस्ताद रशीद खान यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव रवींद्र सदन या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

उस्ताद रशीद खान यांची गायकी.

उस्ताद रशीद खान यांनी अनेक गझल गायल्या आहेत. गझल गायक म्हणून त्यांचे जगभर नाव होते. त्यांच्या गझलचे लाखो फॅन आहेत. गझल म्हटल की रशीद खान यांचीच आठवण होते. रशीद खान यांचे ख्याल म्हणाल तर काय विचारुच नका. Ustad Rashid Khan यांनी अनेक चित्रपटात देखील त्यांनी गायले आहे.जब वी मेट या चित्रपटातील त्यांचे गीत.

‘ आ ओगे जब तुम ओ साजना ‘ ही बंदिश आजही अनेकांच्या स्मरणात आहे.मनाला स्पर्श करून जाते. केव्हाही आणि कितीही वेळा ऐका ते नवीनच वाटते.किवा माय नेम इज खान या चित्रपटातील ‘ अल्लाह ही रहेम ‘ असे अनेक गाणे त्यांनी गायले आहेत.

त्यांचा यमण रागातला ख्याल अईकला की मनुष्य मंत्रमुग्ध होऊन जातो.असे त्यांनी अनेक राग गायले आहेत.त्यांचे गायनाचे कार्यक्रम जगभरात व्हायचे.नव्हे नव्हे तर जगभर त्यांचे फॅन आहेत.आज ते सर्व जन त्यांच्या जाण्याने दुःख सागरात बुडाले आहेत.

उस्ताद रशीद खान यांचा जन्म.

पंडित उस्ताद रशीद खान यांचा जन्म १ जुलै १९६८ रोजी उत्तर प्रदेश बंदायू या गावी झाला.त्यांची गायकी रामपूर सहसवन घराण्याशी निगडित होती.या घराण्याचे मूळ सुप्रसिद्ध उस्ताद इनायत हुसेन खान हे उस्ताद Rashid Khan यांचे आजोबाच होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उस्ताद रशीद खान यांनी शास्त्रीय संगीताची सेवा केरत आपल्या गायकीतून प्रचंड लोकप्रियता मिळवली 

२००६ साली उस्ताद रशीद खान यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पंडित भीमसेन जोशी सुद्धा त्यांच वर्णन करताना म्हणायचे की रशीद खान हा सामान्य गायक नाही. संगीत क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली आहे. एक वेळस उस्ताद रशीद खान यांना पंडित भीमसेन जोशी यांच्या सोबत गायनाची संधी मिळाली होती.

त्यावेळी रशीद खान म्हणाले होते की आझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती की पंडितजी सोबत मला केव्हा सेवा करण्याची संधी केव्हा मिळेल आणि ती आज मला मिळाली मी आज धन्य झालो.तसेच त्यावेळी उस्ताद रशीद खान यानी एक किस्सा सांगितला होता की पंडितजी माझ्यासाठी सातार्याहून खास माझ्यासाठी मला विड्याची पानं पाठवायचे ही खास आठवण त्यांनी त्यावेळी सांगितली होती.

उस्ताद रशीद खान संगीताची आवड.

पंडित उस्ताद रशीद खान यांना लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली होती कारण त्यांचे आजोबाच प्रख्यात गायक होते त्यामुळे संगीताच प्राथमिक शिक्षण त्यांना त्यांच्या आजोबांकडूनच मिळाल आणि पुढे Ustad Rashid Khan निसार हुसेन खान आणि गुलाम मुस्तफा खान यांच्या कडे त्यांनी गायनाचे धडे गिरवले.

वयाच्या आठ दहा वर्षांपूर्वी त्यांनी पहिला स्टेजचा कार्यक्रम केला आणि वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी कोलकत्ता येथील ITC म्युझिक रिसर्च अकादमीमध्ये प्रवेश घेतला. कमी वयातच त्यांचे लाखों चाहते निर्माण झाले होते.

उस्ताद रशीद खान विषयी अधिक माहिती.

उस्ताद रशीद खान यांनी गायकी क्षेत्रात उच्च स्थान पटकावले. सुरवातीच्या काळात अतिशय परिश्रमाने त्यांनी हे सर्व साध्य केल होत. मुळात बालपणी त्यांना संगीताची आवड नव्हती पण घरातच त्यांचे आजोबा प्रख्यात गायक होते. त्यामुळे त्यांच्या आजोबाची इच्छा होती की रशीदने सुद्धा ही कला शिकावी असा त्यांचा आग्रह होता.त्याप्रमाने ते रशीद ला संगीताची आवड निर्माण कशी होईल याचे प्रयत्न करत होते. हळूहळू Rashid Khan यांना संगीताची आवड निर्माण झाली पुढे संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोबांकडूनच त्यांना मिळाले.

पुढे रशीद खान यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच पहिला प्रोग्राम केला आणि इथूनच त्यांच्या गायकीची सुरवात झाली. १९७८ मध्ये त्यांनी दिल्लीच्या ITC कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले. १९८० ला जेनिसार हुसेन खान आयटीसी संगीत संशोधक अकादमी मध्ये सामील झाले त्यावेळी त्यांचे वय फक्त चौदा वर्षाच होत. १९९४ पर्यन्त त्यांना संगीतकार म्हणून मान्यता प्राप्त झाली.

त्यांची गायकी रामपूर – सहस्वान घराण्याची होती.ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित होती. ज्या मध्ये मध्यम-मंद टेम्पो पुर्ण गळा आणि परस्पर तालबद्ध नाटक आहे. Rashid Khan यांची गायकी विलंबित ठेका अशी होती. मुळ ते ख्याल गायनाला जास्त महत्त्व देत होतं. अगदी विलंबित लयबद्ध, तालबद्ध, स्वरबद्ध या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला होता.एकी काळ त्यांच्या गायकीने अनेकांना वेड लावले होते.त्यांनी जवळपास तीस ते पस्तीस वर्षे संगीताची सेवा केली.

उस्ताद रशीद खान यांचा जीवन प्रवास.

उस्ताद रशीद खान यांची गायकी रामपूर-सहसवान घराण्याची होती.या घराण्याचे आद्य प्रवर्तक इनायत हुसेन खान हे, पुढे Rashid Khan यांनी या घराण्याची जोपासना केली.उस्ताद रशीद खान यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, बंगभुषण, ग्लोबल इंडियन अकादमी, अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.रविंद्रनाथ टागोर यांचा गीतसंग्रह प्रख्यात ठरला.उस्ताद रशीद खान यांचा नेहमी हसतमुख चेहरा आणि गोड स्वभाव अशी त्यांची ओळख आहे.

उस्ताद रशीद खान यांनी अनेक राग गायले देस राग, यमण, यमण कल्याण, मारु बिहार, दरबारी कानडा, भिमप्लास, भुकंप, चारुकेशी, अहिर भैरव, भैरवी, अशा विविध रागावर त्यांच प्रभुत्व होत. ख्याल, ठुमरी, चीज, अनेक प्रकारात त्यांनी गायले. आयोगे जब तुम ओ साजना, किंवा नैना पिया से, तोरे बिना मोहे चैन, किंवा तु बन जा गली असे अनेक त्यांनी गायललेले गित आहेत.आजही सर्वांच्या मनात घर करून आहेत.उस्ताद रशीद खान यांचा आवाज म्हणजे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकायचा.काही मराठी चित्रपटालाही त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे.त्याच प्रमाणे अनेक हिंदी चित्रपटात त्यांचा आवाज आहे.तसेच त्यांनी गायललेले अनेक गाणे आजही सुपरहिट आहेत.

ज्यांनी आपल नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेउन पोहचवल असे जगप्रख्यात महा गायक उस्ताद Rashid Khan शास्त्रीय संगीताची जोपासना करता करता उप शास्त्रीय गायनातही तेवढ्याच तोलामोलाची कामगिरी त्यांनी केली.दरबारी गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतीत आपल नाव केल तसेच किराणा घराण्याशी निगडित असल्याने चित्रपट क्षेत्रातही पार्श्वगायनाची त्यांना संधी मिळाली आणि तेथेही त्यांनी उत्तम कामगिरी केली.हे सर्व त्यांनी तेवढ्याच उमेदीने आणि जिद्दीने पुर्णत्वास नेले.

त्याच बरोबर ख्याल गायकी मध्ये तर काय विचारुच नका. विलंबित ख्याल त्यांचा आजही सर्वांच्या स्मरणात आहे.सर्वांच्या मनात घर करून ठेवल त्यांनी.जगभरात त्यांचे फॅन्स आहेत.हे सर्व करीत असताना त्यांनी काळजी पुर्वक घराण्याची परंपरा जोपासली या कारणामुळेच ते सर्वांच्या स्मरणात राहतील असे कार्य त्यांनी केले.

त्यांच्या गायकी मध्ये छोट्या छोट्या गोष्टी अगदी बारकाईने पाहायला मिळत होत्या.गायनातील बारकावे आणि स्वरांचा चढउतार त्यांच्या गायनात होता.रसीक श्रोत्यांना ते अगदी मंत्रमुग्ध करुन सोडायचे आणि रसीकही अगदी मोहित होऊन जायचे.हि पण एक प्रकारची कला त्यांच्याकडे होती. Rashid Khan साहेब म्हणजे संगीत क्षेत्रातल्या सर्वांच्या गळ्यातला ताईतच. रसीकांची दाद मिळवण्यात अगदी नेहमीच ते यशस्वी ठरले.

उस्ताद रशीद खान यांचा कार्यकाळ.

9 जानेवारी 2024 रोजी त्यांनी आपली यात्रा संपवली. आणि संगीत क्षेत्रातल्या सर्व श्रोत्यांना एक दुःखद धक्का बसला. संगीत क्षेत्रातील प्रत्येकाच्या मनामनात घुमणारा आवाज काळाच्या पडद्याआड झाला.त्याचा जन्म १ जुलै १९६८ ते २०२४ वयाचे ५५ वर्षाच आयुष्य त्यांना मिळाल. ५५ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी संगीत क्षेत्रात उच्च भरारी घेऊन शास्त्रीय संगीताला त्यांनी उच्च ठिकाणी नेऊन ठेवल.

रशीद खान यांचे आजोबा इनायत हुसेन खान आणि त्यांचे काका उस्ताद गुलाम मुस्तफा खान. उस्ताद Rashid Khan यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या आजोबांकडूनच मिळाले.खरतर उस्ताद रशीद खान यांना संगीताची आवडच नव्हती पण त्यांचे काका उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या आग्रहाखातर त्यांना हे संगीताच क्षेत्र निवडाव लागल.

उस्ताद रशीद खान यांचा अखेरचा श्वास.

कालांतराने उस्ताद रशीद खान यांची आवाजाची पारख करून त्यांना काकांनी मुंबई सारख्या ठिकाणी बोलावून घेतले.आणि त्या ठिकाणी त्यांना संगीताचे धडे शिकवले. आणि मग पाहता पाहता उस्ताद Rashid Khan यांची संगीत क्षेत्रात एक चांगलीच ओळख निर्माण झाली.काका आणि आजोबांच्या देखरेखीखाली उस्ताद रशीद खान हे केव्हा सुरांच्या जाळ्यात अडकले हे त्यांनीही कळाले नाही.

पुढे उस्ताद रशीद खान यांनी आपल्या गायकीने अनेकांना वेड लावले. त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले आपल्याकडे असलेल ज्ञान सर्वांना वाटुन दिल.जगात एखच गोष्ट अशी आहे ती दुसर्याला दिल्याने कमी होत नाही उलट त्यात वाढ होत ते म्हणजे ज्ञान, धनही दिल्याने वाढते पण काही अंशाने कमी होते मात्र ज्ञानाच तस नाही उलट ते अधिक वाढते.पुढे संगीत आळवता आळवता त्यांची वयाची ३० ते ३५ वर्ष संगीताची सेवा करण्यात गेले.संगीत क्षेत्रात त्यांनी एक आगळा आणि वेगळा ठसा उमटवला, जगात नाव रोशन झाले सर्वांच्या स्मरणात त्यांचा आवाज राहिल यात काही शंकाच नाही.पुढे त्यांना रोगानी ग्रासले आणि अखेर 9 जानेवारी 2024 हा दिवस त्यांच्या जीवनातला शेवटचा दिवस ठरला.

उस्ताद रशीद खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारतीय शास्त्रीय संगीत जगातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व उस्ताद Rashid Khan यांच्या निधनाने दुःख झाल आहे.त्यांची अतुलनीय प्रतिभा आणि संगीताच्या समर्पणाने आमचे सांस्कृतिक जग केले आणि पुढच्या पिढीला त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली ती भरुन निघणे कठीण आहे.त्यांच्या कुटुंबाला, शिष्य परिवाराला आणि असंख्य चाहत्यांना माझ्याकडून मनःपूर्वक संवेदना.

महाराष्ट्र राज्यातील गवर्नर या सुद्धा उस्ताद Rashid Khan यांना ट्विटर द्वारे आदरांजली अर्पण केली ते म्हणाले की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे गायक उस्ताद रशीद खान यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच अतिशय दुःख झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

हे देखील पहा 👇

थोर संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी आणि त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Facebook

x