महिलांनी शिक्षण क्षेत्रात उच्च स्थानी विराजमान व्हावे. स्त्री जातीलाही शिक्षण घेता यावे म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला त्या ज्ञानदायिनी क्रांतीज्योती Savitribai phule jayanti निमित्त त्यांचे जीवन कार्य आणि संघर्ष लढा आपण जाणून घेणार आहोत. अधिक माहिती खालील प्रमाणे.
सावित्रीबाई फुले जयंती 2024
सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सातारा जि. खंडाळा ता. गाव नायगाव या ठिकाणी दर वर्षी मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून. त्यांच्या विचारांना उजाळा दिला जातो. शाळेतील मुलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जयंतीच्या निमित्ताने मुलांचे मुलींचे भाषण ठेवले जातात. वेगवेगळे प्रयोग, खेळ, तसेच निबंध स्पर्धा.
Savitribai phule jayanti : सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका प्राध्यापक झाल्या. सावित्रीबाई फुले यांची आज १९२ वी जयंती त्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एक आदर्श आणि प्रेरणादायी जीवन जगा पुढे ठेवले. शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान त्यांनी दिले. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कठोर परिश्रम घेत लढा सुरू ठेवला.
सावित्रीबाई फुले जन्म आणि विवाह.
महान समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हा, खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी इ.स.१८३१ रोजी झाला. त्यांच्या मातोश्रीच नाव लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे तर पिताश्री खंडोजी नेवसे. त्यांचे पिताश्री गावचे पाटील होते.सावित्रिबाईंचे सासरे गोविंदराव फुले त्यांच मुळ गाव फुरसुंगीचे गोरे.
Savitribai phule jayanti : पण त्यांना पेशव्यांनी पुण्यातील फुल बागेची जमीन बक्षीस दिली आणि ते पुण्याला गेले फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांना फुले म्हणून लागले आणि पुढे त्यांना फुले फुलेच म्हणू लागले असी अख्यायिका आहे.
सावित्रीबाई फुले यांचे संघर्षमय जीवन.
जोतीरावांना मातृत्व लाभले नाही.बाल वयातच आई गेली त्यामुळे मावस आत्या सगुणाऊ यांनीच जोतीरावांचा सांभाळ केला. आत्या सगुणाऊ ह्या शिक्षण क्षेत्रात हुशार होत्या त्यावेळी त्यांना इंग्रजी चागली जमत होती.आणि इंग्रजी बोलताही येत होती.
Savitribai phule jayanti : सगुणाऊ आत्यांनी हे शिक्षण दिले. सगुणाऊ आत्याचे हे संस्कार जोतीरावांवर झाले.पुढे जोतीरावांचे लग्न झाले. नायगावचे खंडोजी नेवसे यांची कन्या सावित्री हिच्याशी विवाह झाला. सावित्रीला एक पुस्तक मिळाले होते. लग्नानंतर त्या ते पुस्तक सोबत सासरी घेऊन आल्या होत्या आणि त्या पुस्तकाचा जोतीरावांना त्याचा फायदा झाला.
शिक्षणाचे महत्त्व आणि खडतर प्रवास.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका प्राध्यापक यांची जयंती. सावित्रीबाई फुले जयंती लाच महिला दिन किंवा बालिका दिन म्हटले जाते.महिलांना शिक्षणाची जाणिव करुन दिली त्यांनी. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि म्हणाल्या की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे वाघीनीचे दूध माझ्या लेकरांना मी देणार. शिक्षण हा मानसाचा तिसरा डोळा आहे.
Savitribai phule jayanti : खडतर प्रवास करत कठीण परिश्रम घेत त्यांनी लढा लढवला. खचून जाने हतबल होने त्यांना माहीती नव्हते.महात्मा जोतीराव फुले सारखा जीवन साथी असल्याने सावित्रीबाईंनी कधीच माघारी फिरुन पाहिले नाही. पतिची साथ आणि मनातली जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
लोकांनी अंगावर शेन फेकले पण माघार नाही हटल्या.
घरोघरी जाऊन मुला – मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून मुला मुलींच्या आईवडीलांना घरोघरी जाऊन शिक्षणाच महत्त्व पटवून देत होत्या.तुमचे मुल शिकले तर प्रगती होईल. मुल शिकून हुशार होतील. मी शिकविन तुमच्या मुला मुलींना. आणि मी माझा लढा सुरू ठेवला. अनेकांनी विरोधही केला पण मी माझी जिद्द सोडली नाही.
Savitribai phule jayanti 2024 :लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेन फेकल, शिव्या दिल्या, दगडफेक केली पण मी शांत राहिले.माझ्या सहनशीलतेचा अंत लोकांनी बघितला पण मी शांत बसणारी नव्हते मलाही खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि ज्योतिरावांची पत्नी म्हणतात अस त्या म्हणायच्या.
चुकीच्या रुढी परंपरा बंद केल्या.
त्या काळी मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता.मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे अस्पृश्य समजले जायचे.घरातले करते पुरष मुलींना शिक्षण घेण्यास नकार देत होते. मुल आणि चुल इतकच त्यांना माहीत होते.या व्यतिरिक्त काही करण्यास मुभा नव्हती.जाती भेद केला जायचा.खालच्या वर्णातल्यांना तुच्छ समजले जायचे. गोरगरिब, बहुजन – वंचित, दलीत समाजाला गलिच्छ वर्तणूक दिली जायची.पण? या सर्व गोष्टींना आळा घालण्याचे काम सावित्रीबाईंनी केले.
Savitribai phule jayanti : सावित्रीबाईंनी निरक्षर मुला मुलींच्या हातात लेखणी दिली आणि शिक्षणाचे धडे त्यांच्याकडून गिरवून घेतले. दिवसा मागून दिवस निघून गेले.आता अंधार नाहीसा होऊन प्रकाशाचे किरण पाहण्याचे स्वप्न त्या पाहत होत्या.लोकांना शिक्षणाचे महत्त्व गळी उतरवण्याचे कार्य त्यांनी केले. पुढे त्यांनी ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या.
सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या, सती जाण्यास प्रतिबंध आणि विधवेचा पुणर्विवाहाची मोहीम हाती घेतली.महिलांनवर होणारे अत्याचार त्यांनी थांबवण्याचे काम त्यांनी केले. बाल विवाह थांबले पाहिजेत,पती मरण पावला तर त्याकाळी महिलांनी सती जाण्याची प्रथा होती. ती त्यांची खंडीत केली. अशा अनेक चुकीच्या रुढी परंपरेला त्यांनी आळा घातला. असे अनेक समाज कार्य त्यांनी केले. समाज कल्याणार्थ सतत कार्यरत राहिल्या असा आगळा आणि वेगळा ठसा त्यांनी समाजात उमटवला.
सावित्रीबाईंचे शिक्षण.
पुढे जोतीरावांनी आणि सगुणाऊ आत्याने सावित्रीबाईंना शिक्षण दिले.१ मे इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाई फुले यांनी एक ग्रामीण भागात शाळा सुरू केली ही त्यांची पहिली शाळा. या शाळा सगुणाऊ च्या ताब्यात दिली आता सगुणाऊ मुलांना शिकवू लागल्या.काही कारणास्तव ही शाळा बंद पडली.पुढे १ जानेवारी १८४८ ला पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सावित्रीबाई आणि जोतीरावांनी मुलींची शाळा सुरू केली.
Savitribai phule jayanti : पण हे सर्व करत असताना काही कर्मठांना देखवत नव्हते पण त्यांनी या विरोधाला जुमानले नाही आणि त्यांनी त्यांच कार्य सुरुच ठेवले.सावित्रीबाईंनी लग्नानंतर शिक्षण घेतले आणि प्राध्यापक होऊन शिक्षण दिले. पुढे चारच वर्षात जवळ जवळ आठरा शाळा उभ्या केल्या.
सामान्य मुला मुलींना शिक्षण घेता यावे.
आणि बहुउद्देशीय मुलींसाठी ही प्रथम शाळा ठरली. या सर्व शाळेवर सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहु लागल्या. त्याचवेळी मुंबई गीरगावात कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींची शाळा सुरू केली.
Savitribai phule jayanti : कालीकृष्ण हायस्कूल अशा अनेक शाळा सुरू केल्या. तसेच पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुल आणि मुलींची शाळा काढली पण पुढे काही दिवसांनी या शाळेचे दोन भाग पडले एक मुलींची आणि दुसरी मुलांची अशा दोन शाखा झाल्या.
सावित्रीबाई फुले यांच्या वर्गात सुरवातीला फक्त सहा मुली शिक्षण घेत होत्या पण पुढे वर्षभरात मुलींची संख्या चाळीस पंचेचाळीस वर गेली.पण टिंगल करणारे पण होते आता शिकुन काय होणार आहे. अंगावर शेण फेकायचे, काहींनी तर आरेतुरे करत अंगावर हात उचलन्याची भाषा केली. पण सर्वांना तोंड देत त्यांनी हा लढा सुरूच ठेवला.
स्वतःला सावरत अन्यायाच्या बाजुने लढा.
घर सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली, पुढे सगुणाऊ निघून गेल्या. दुःखाचे सावट पसरले पण तसेच सावरले स्वतःला. अनेक संकट आले पण धीर सोडला नाही लढत राहिल्या.
Savitribai phule jayanti : समाजात असलेला भास त्यांनी ओळखला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची पावल उचलली. चुकीच्या रुढी परंपरेला आळा घातला, अन्यायाच्या बाजुने लढा दिला.मुला मुलींचे कमी वयात लग्न व्हायचे आणि मग मुल मरण पावले तर त्या मुलीला बालवयातच विधवा म्हणून राहावे लागयचे.
किंवा सती जावे लागायचे.त्या विधवेचा समाज छळ करायचा तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे. आणि असा महिला कुणाची तरी शिकार व्हायच्या आणि मग त्या विधवा मुली गरोदर राहायच्या.अशा वेळी त्या मुली आत्महत्या करायच्या नाहीतर भ्रूणहत्या करायच्या.
Savitribai phule jayanti 2024 : या आत्महत्येला सावित्रीबाईंनी आळा घातला. या विधवा मुलीच्या पुणर्विवाहाचा विचार त्यांनी समाजाला समजावून सांगितला आणि विधवा मुलींचा पुणर्विवाह व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समाजात या मुलींना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले.तरी देखील समाज त्रास द्यायचा.तुच्छ वर्तनुक, अनेक त्रासाला सामोरे जावे लागायचे हे सावित्रीबाईंना पाहवत नव्हते.
शिक्षणाची चळवळ आणि विवाह.
Savitribai phule jayanti : सावित्रीबाई यांचा जन्म झाला आणि शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.महिलांना शिक्षणाचा अधिकार नसलेल्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई नेवसे या वयाच्या अवघ्या नऊ वर्षांच्या असतांनाच त्यांचा विवाह इ.स.१८४० मध्ये त्यांचा विवाह १३ वर्षे वयाचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना लहान पणापासूनच शिक्षण आणि समाज कल्याणाची आवड निर्माण झाली.
लेक शिकली पाहिजे सावित्रीबाईंचे स्वप्न.
सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्रात पारंगत होत्या. तर त्या उत्तम कवि देखील होत्या. पहिल्या महिला प्राध्यापक म्हणून गौरवित होत्या. पती महात्मा ज्योतिबा फुले बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी मोठी क्रांती केली. त्यानी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. महिला शिकली पाहिजे महिला शिकली तर देशाचा विकास होईल.
Savitribai phule jayanti : बेटी बचाव आणि बेटी पढाव असा त्यांचा मुख्य आग्रह होता.लेक शिकली आणि प्रगती झाली.असी सुव्यवस्था महिलांसाठी मोठी चळवळ उभा केली. त्यामुळे त्यांना ज्ञानदायिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे संबोधले जात आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा ओपन केली. इ.स. १८४८ मध्ये पुणे या ठिकाणी भिडे वाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. मुलींची शाळा ही देशातील पहिलीच शाळा सुरू करण्यात आली.
सावित्रीबाई फुले समाज कार्य.
महाराष्ट्र राज्य सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची भुमिका त्यांनी बजावली. त्यांनी समाजातील मतभेद, महिलां विषयी गैरसमज दूर करून महिलांना प्राधान्य दिले. महिलांसाठी शिक्षण क्षेत्रात एक व्यासपीठ मिळवून दिले.स्री जातींवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी मोठे बंड पुकारले.
Savitribai phule jayanti : सावित्रीबाई फुले महान लेखिका देखील होत्या. मराठी भाषेत त्यांनी कादंबरी लेखन, कविता संग्रह, लेखनाची आवड त्यांना होती त्यांनी त्यांच्या लेखनातून समाज प्रबोधन केले. समाज कल्याणार्थ अनेक कार्य त्यांनी केले.
प्लेगची साथ त्यामध्ये सावित्रीबाईंचे जाने
१८९७ साली देशात एक सावट पसरले ते म्हणजे प्लेगची साथ. त्यावेळी राज्यात सर्वत्र थैमान घातले.अनेकांना त्या प्लेगच्या साथीने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यात ज्यांना प्लेगची लागण झाली त्यांच्यासाठी सावित्रीबाईंनी सहकार्याची भूमिका बजावली.
Savitribai phule jayanti 2024 : सावित्रीबाई फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाज कार्य केले.त्याकाळी राज्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले.मुंबई पुण्यात या रोगाच्या भयंकर प्रमाण वाढले आणि ९ फेब्रुवारी १८९७ ला समाज कार्यात वावरणारे नारायण मेघाजी लोखंडे याच निधन झाल. ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतले ते एक मुख्य होते. लोखंडे यांना कामगार जळवळीचे जनक म्हटल जात.
पुण्यात ज्योतिबांना महात्मा पदवी पुरस्कार देण्यास लोखंडेंचा मोलाचा वाटा होता. पुढे काही कारणास्तव महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले आणि सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला. त्याच वेळी प्लेगची साथ सुरू होती आणि लोकांना प्लेग विषयी जास्त काही माहिती नव्हती आणि त्यामुळे लोक पटापट मरण पावायचे.
त्यावर उपचारही होत नसायचा. लोक हा देवीचा कोप समजायचे. आणि त्यामुळे समाजात अतिशय भयंकर भितिचे वातावरण निर्माण झाले. पुणे सिटी सोडून लोक खेड्या पाड्यात जाऊन एकांतात राहू लागले.उंदरा मार्फत ही प्लेगची साथ पसरायची असे म्हणतात की ताप येऊन काखेत गाठ यायची आणि लोक कोलमडून पडायची. हे सावित्रीबाई फुले उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या.
Savitribai phule jayanti 2024 : त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचा मुलगा बाहेर देशात शिक्षण घेत होता. सावित्रीबाईंनी त्याला पत्र पाठवून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटिश मिलिटरी मध्ये नोकरी करत होते. सावित्रीबाईंनी या रोगाचा वाढता प्रभाव पाहून यशवंतच्या साह्याने कामाला सुरुवात केली. हा संसर्गजन्य आजार आहे आणि यात आईने जोखीम घेऊ नये अस यशवंत म्हणत होता. पण त्याप्रसंगी सावित्रीबाईंना वाटले की आज जर जोतीराव असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते.प्लेगच्या साथीने लोक पटापट मरतायत. जवळ कोण येत नव्हत पण सावित्रीबाईंना जिवाची पर्वा नव्हती.
त्यावेळी यशवंतच्या मदतीने दवाखाना सुरू केला. परिसरात कुणाला ताप आली तर तीथे उपचार सुरू केले. देवीचा कोप म्हणून आजारी माणसाला घरात कोंडून ठेवल जायच. रोगाच्या भितिमुळे लोक मदतीलाही धावत नसायचे. त्यावेळी सावित्रीबाईंनी गोरगरीब दिनदलीत, बहुजन वंचित समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः हे काम हाती घेतल.
Savitribai phule jayanti : दलित वस्तीत एका पांडुरंग बाबाजी गायकवाड महार या अकरा वर्षाचा मुलगा त्याला प्लेगची लागण झाली तर सावित्रीबाईंनी स्वतः जाऊन खांद्यावर उचलून त्याला आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या दवाखान्यात आनले आणि त्यांच्यावर उपचार केले त्यावेळी पांडुरंग बाबाजी गायकवाड वाचला पण या धावपळीत सावित्रीबाई फुले यांना देखील या प्लेगच्या साथीने घेरले. आणि १० मार्च इ.स. १८९७ मध्ये सावित्रीबाई फुले यांची ज्योत अनंतात विलीन झाली.
हे देखील पहा 👇
अयोध्या राम मंदिर उद्घाटन आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा