ayodhya ram mandir 2024 : श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा/भारतवासीयांचे स्वप्न पुर्णत्वाकडे

ayodhya ram mandir अयोध्येतील श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे काम हे आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. किरकोळ राहीलेल्या कामाला वेग दिला जातोय. श्रीराम प्रभूंच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

१४२ कोटी भारतवासीयांचे हजारो वर्षांचे स्वप्न पुर्णत्वाकडे जातांना आपण पाहणार आहोत. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्या जीवनातल्या या महत्त्वाच्या क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत.  अधिक महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे…!

राम मंदिराचा सुप्रीम कोर्टात खटला

अयोध्या ही प्रभू रामचंद्रांची जन्म भुमी आहे. वाल्मिकी रामायणात वाल्मिकी ऋषींनीही सांगितल आहे की अयोध्या रामप्रभुंची जन्मभूमी आहे.अनेक वर्ष अयोध्येमध्ये रामप्रभुंच राज्य होत. रामप्रभुंच्या नंतर अनेक वर्षांचा कालावधी लोटला गेला त्यानंतर अनेक वर्षांनी उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता.

ayodhya ram mandir : त्याने या भुमिवर काही परिक्षण केले. आणि त्याला त्या भुमित काही चमत्कार पाहायला मिळाले.आणि विक्रमादित्य राज्याने त्या ठिकाणी खोदकाम सुरू केले.अनेक प्रयोग केले आणि विक्रमादित्य राजाला त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचे अस्तित्व असल्याचे लक्षात आले.आणि त्यानंतर विक्रमादित्य राज्याने त्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर बांधले.

आणि विक्रमादित्य राजा त्या ठिकाणी नित्यनेमाने प्रभुरामांची पुजा अर्चा करु लागला. त्या नंतर अनेक राजे होऊन गेले. १४ व्या शतकात मुघलांचे राज्य आले. १५२५ मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने श्रीरामाचे मंदिर उद्ध्वस्त केले. आणि त्याच ठिकाणी मशिद बांधली.त्याच मशिदीला बाबरी मशीद असे म्हणत होते.आणि मग तेव्हापासून बाबरी मशिद,

ayodhya ram mandir sohla : आणि राम मंदिराचा वाद सुरू झाला. नंतर मशीदही पाडली गेली त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल. अखेर सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी राममंदिरच असल्याचे घोषित केले. आणि मग त्यानंतर राम मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. आणि आता त्याच राम प्रभूंच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापण सोहळा २२ जानेवारी २०२४ ला होत आहे.

श्रीराम प्रभूंचा प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा

कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान २२ जानेवारी ला रामजन्मभूमीत श्रीराम प्रभूंचा प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

ayodhya ram mandir : २२ जानेवारी ला होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेसाठी देशविदेशातून अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या सोहळ्यासाठी देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नसल्याचे समजते.

या सोहळ्यासाठी फक्त उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती.

विशेषकरून या सोहळ्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, डॉ मनमोहन सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय मोहन भागवत,  कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, यांच्यासह राजकीय राज्यकर्ते आणि देशविदेशातून पाच दहा हजार साधू संतांना निमंत्रण देण्यात आले आहे.

ayodhya ram mandir : या सोहळ्याला देशभरातून श्रीराम भक्त, भाविक उपस्थित राहणार आहेत.विशेषकरुन सांधु, संत, महंत, योगी, संन्यासी, जोगी, त्यागी, तपस्वी असे महात्मे प्रचंड प्रमाणात उपस्थित राहणार आहेत राम प्रभूंच्या सासुरवाडीचा आहेर.

मुर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त.

१६ जानेवारी पासून होम हवनाचा कार्यक्रम होणार आसल्याची माहिती आहे. या होम हवनासाठी देशातून वेदपठण, वेदमुखोद्गत विशेष ब्राह्मण, पुजारी उपस्थित राहणार आहेत. नेहमी बारा महिने रामप्रभुंच्या पादुकांचे पूजन करणार्यास विशेष मान दिला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात मंत्रोच्चार होणार आहे. श्रीराम प्रभुंच्या मुर्तीची महापुजन राज्यभिषेक करुन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ayodhya ram mandir : २२ जानेवारी ला १२ वाजून २९ मिनिट आणि ८ सेकंदानी संजीवनी मुहूर्त सुरू होत आहे. आणि मुहूर्त १२ वाजून ३० मिनिट आणि ३२ सेकंदापर्यंत असणार आहे. असा हा ८४ सेकंदाचा सुक्ष्म मुहूर्त आहे. संजीवनी मुहूर्ताच्या वेळेनुसार अवघ्या १ मिनिट आणि २४ सेकंदाचा मुहूर्त साधून रामप्रभुंच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त असल्याचे ज्योतिषांचे म्हणने आहे. या संजीवनी मुहूर्ताचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात नऊ पैकी सहा ग्रह आपल्या घरात अनुकूल ग्रह म्हणून राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या आधी २० जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान संपूर्ण मंदिर बद राहणार आहे. आणि २३ जानेवारी पासून रामभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुल होणार असल्याचे कळते आहे.

ayodhya ram mandir : या सोहळ्याला देश आणि विदेशातील सात हजार पाहुण्यांना आमंत्रण पाठवले आहे.प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्या आरतीचा मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. २०२० मध्ये कोरोणाच्या काळात राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

नरेंद्र मोदींनी २२ जानेवारीची भुमिका स्पष्ट केली.

अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी ला संपन्न होत आहे. याच दिवशी प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची स्थापना होणार आहे.या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. त्या निमित्ताने विविध वास्तुंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.नवीन प्रकल्पांचे भुमी पुजन मोदींच्या हस्ते झाले.

ayodhya ram mandir : तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिराचे बांधकाम संपूर्ण होत आहे. त्यामुळे आता सर्व राम भक्तांच्या मनात एकच आस्था आहे ती म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची. २२ जानेवारी २०२४ रोजी हा सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला विविध देशांतील नामवंतांना आमंत्रित केले आहे. तसेच धर्म रक्षक, समाज हितार्थ कार्य करणारे, थोर थोर साधू संत उपस्थित राहुन या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या भाविकांचा अंदाज लक्षात घेऊन हॉटेल, गेस्ट हाऊस, आता पासुनच बुक होत आहेत. बस सेवा, ट्रेन, ट्रॅव्हल्स, याचीही सुव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासन सर्व जबाबदारीने कटीबद्ध करण्यात आले आहे.कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आता प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे.

ayodhya ram mandir 2023 : या संबंधित वेळोवेळी विशेष बैठका घेतल्या जात आहेत. मोदींनी हेही सांगितले की विनाकारण गर्दी कोणीही करु नये कारण या सोहळ्याला आमंत्रित मान्यवरच प्रचंड प्रमाणात आहेत. जरी आपल्याला या सोहळ्याला येण्याची इच्छा असली तरी देखील. तुम्ही नंतर येऊन राम प्रभुंचे दर्शनाची तुमच्यासाठी व्यवसाय होणारच आहे. हा सोहळा आपण घरी राहूनच बघायचा आहे.

२५, २६ जानेवारी २०२४ नंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. २२ जानेवारी ला येणाऱ्या पर्यटकांनी आपली ट्रीप रद्द करावी. आणि २५ जानेवारी नंतरच आपण अयोध्येला यावे असही या वेळी सांगण्यात आले आहे

राम प्रभुंच्या सासुरवाडीचा आहेर.

श्रीराम प्रभुंच्या सासुरवाडी जनकनगरी नेपाळ या ठिकाणाहून कपडे, सुका मेवा, अनेक भेट वस्तू, तसेच सोन ,चांदी, सजवलेल्या एक हजार शंभर प्लेट येथून येणार असल्याचे कळते. दागिने, भांडे, कपडे, भेट वस्तू, मिठाई, नेपाळमधून ५१ प्रकारच्या मिठाई दही,लोणी, सोन्या चांदीचे दागिने येणार असल्याचे समजते.

ayodhya ram mandir : अष्टधातुची २१ किलोची घंटा उत्तर प्रदेशातून श्रीराम प्रभुंच्या दरबारात पोहचत होणार आहे. या घंटेची किंमत सरासरी २५ लाख असल्याचे समजते. आठ धातूपासून बनवलेली ही घंटा आहे. १५ फुट रुंदी आणि आतला घेर हा पाच फुटाचा असल्याचे समजते.

रामप्रभूंसाठी देशविदेशातून मौल्यवान वस्तू.

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी देशविदेशातून विविध ठिकाणांहून अनेक वस्तू पोहोचवल्या जात आहेत.काल सोशल मीडियावर मंदिराचे फोटो सोडण्यात आले होते. मंदिराचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारीच्या अगोदर सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

ayodhya ram mandir : या सोहळ्यासाठी देशविदेशातून रामभक्तांनी विशेष वस्तू पाठवल्या जात असल्याची माहिती आहे. छत्तीसगडवरुन एका आजीबाईने तब्बल तीन हजार क्विंटल तांदूळ पाठवणार असल्याचे समजते.

हे देखील वाचा 👇

Datta Jayanti 2023 : दत्त जन्म वेळ कधी कुठे ठिकाण सर्व काही माहितीसाठी येथे क्लिक करा – दत्त जयंती २०२३

दत्त जन्माची संपूर्ण माहिती.अवतार कार्य आणि दत्तात्रयांचे जीवन चरित्र अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अशा अनेक वस्तू अयोध्येच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत.त्या मग होम हवनाच्या वस्तू. विशेष पंचगव्य अगरबत्ती धुप, कापूर, संपूर्ण देशातील पवित्र नद्यांचे जल, पवित्र ठिकाणाची माती, पवित्र वस्तू अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाठवल्या जात आहेत.

श्रीराम प्रभूंची भव्य मिरवणूक.

अयोध्येमध्ये सध्या श्रीराम प्रभूंची मुर्ती घडविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरच्या अखेरीस मुर्ती बनवून पुर्ण तयार होईल. एकुण तीन मुर्ती बनवल्या जात आहेत. श्रीराम प्रभूंची मुर्ती ही बाल अवस्थेतील मूर्ती असणार असल्याची माहिती आहे.तीन मुर्त्या पुर्ण तयार झाल्यानंतर तीन मधून एका मुर्तीची निवड करण्यात येणार असल्याचे समजते.

ayodhya ram mandir : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही मुर्ती शरयुमध्ये अभिषेका करता नेण्यात येईल.कोणत्या तारखेला हे अजून स्पष्ट झालेल नाही.पण जानेवारी च्या पहिल्या किंवा दुसऱ्याच आठवड्यात संपन्न होईल.भव्य स्वरूपात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

रामप्रभुंचे धार्मिक स्थळांना भेट.

अयोध्येतील ठराविक धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार असून. श्रीराम प्रभूंच्या मुर्तीची भव्यदिव्य प्रमाणात मिरवणूक असणार आहे.परिसरातील ठराविक मंदिराला भेट देत श्रीराम प्रभुंच्या मुर्तीची ही मिरवणूक असेल.

ayodhya ram mandir : आणि या मिरवणुकीनंतर श्रीराम प्रभुंची मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेसाठी मुख्य मंदिरात येईल तसेच भाविकांसाठी मंदिराचे पश्चिम द्वार खुले राहणार आहे.आता राम प्रभूंच्या मुर्तीला धान्यांत ठेवले जाणार आहे.

डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे. जो पर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ही पट्टी डोळ्यांवर असणार आहे. त्या अगोदर मुर्तीची पुजा होईल, २२ जानेवारीला रामप्रभुंचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातील नामवंत मान्यवरांना आमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहोत.

अयोध्येत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात.

राम मंदिर उद्घाटन आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापन सोहळ्या निमित्ताने राम जन्मभूमी मध्ये अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे. या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. फक्त निमंत्रित केलेले मान्यवरांनाच प्रवेश असणार असल्याचे समजते आहे.

ayodhya ram mandir : अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्या निमित्त वेळोवेळी बैठका सुरू आहेत.या सोहळ्याला कसलेही विघ्न येऊ नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे. या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहचले आहेत.

सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी सांगितले की ठराविक आमंत्रितांनाच अयोध्येत प्रवेश असणार आहे. आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होते.ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी सुरक्षा रक्षक अतिशय चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

श्रीरामाच्या पादुका देशभर रथयात्रा.

सध्या श्रीराम प्रभुंच्या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. प्रत्येक राज्यात या पादुकांची भव्य रथयात्रा चालू आहे. श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांच्या नियोजनात ही यात्रा सुरू आहे.आणि या पादुका १९ जानेवारीला अयोध्या या ठिकाणी पोहोचतील.

ayodhya ram mandir : श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी रामचंद्रांच्या पादुकासह ४१ दिवस अयोध्येची प्रदक्षिणा केली होती. त्यानंतर या पादुका रामेश्वर ते बद्रीनाथ, केदारनाथ, काशीविस्वनाथ अशा विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन महापुजन करण्यात येत आहे.

२२ जानेवारी ला दिवाळी साजरी करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतवासीयांना आवाहन केले आहे की आपण सर्व भारतभर २२ जानेवारी २०२४ या दिवशी आपल्या घरापुढे दारात दिवे लावा, घरावर रोषणाई करा, फटक्या वाजवा, फराळाचे पदार्थ करा, आणि घरावर गुढी उभारा आणि आनंद उत्सव साजरा करा.

ayodhya ram mandir : पुन्हा एकदा तो दिवस आला आहे. झाले राम राज्य आम्हा काय उणे आम्हा | धरणी धरी पिक गाई ओळल्या म्हसी || हा दिवस भारतवासीयांच्या जीवनातील आनंदाचा दिवस आहे. आणि या अभुतपुर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. आपण सर्व जण खरच भाग्यवान आहोत. कारण हे सर्व आपल्या डोळ्या देखत पार पडणार आहे.

 

हे देखील वाचा 👇

दत्त जयंती २०२३ आणि भगवान दत्तात्रयांचा जन्म काळ, २४ गुरु कसे, कामधेनू, चार कुत्रे कशामुळे, औदुंबर वृक्ष सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

 

Facebook

 

x