gram panchayat election 2023 : महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल जनतेचा कल कुणाच्या बाजूने / वर्चस्व कुणाचे – गुलाल कुणाचा

gram panchayat election live result: राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची निवडणूक काल पार पडली. २०२३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी जनतेचा कल हा महायुतीच्या बाजूने पाहण्यास मिळाला आहे.२ हजार २६९ ग्रामपंचायतीची काल मतदान प्रक्रिया पार पडली. कुणाचा गुलाल तर कुणाचे वर्चस्व पहा सविस्तर खालील प्रमाणे…👇

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा कल पाहता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत निवडणूक भाजप १ नंबर चा पक्ष ठरला आहे. तर २ नंबर ला अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तीन नंबरवर शिंदे ठाकरे गट आहे चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस तर पाचव्या स्थानी राष्ट्रवादी शरद पवार गट, प्रत्येक पक्षाने आपापल्या विजयाचा जोमात जल्लोष साजरा केला आहे.

gram panchayat election २०२३ ग्रामपंचायत निवडणूक निकाल बघीतला तर हाती आलेल्या माहितीनुसार जनतेचा कल हा महायुतीला असल्याचे लक्षात येते. भाजपला ११३, शिंदे गटाला ७८, अजित पवार गटाला ९७, कॉंग्रेस ५३, शरद पवार गट ४०, ठाकरे गट ४२, इतर ५८ जागा मिळाल्या आहेत.

राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती तर त्यात २९३ ग्रामपंचायतींचे निकाल बिनविरोध लागले आहेत.

  • भाजप – ६६
  • शिंदे गट – ५५
  • ठाकरे गट – २५
  • कॉंग्रेस – २०
  • शरद पवार गट – २०
  • अजित पवार गट – ६९

भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे.

  • ५ जागा राष्ट्रवादी काँग्रेस
  • ४ जागा शिवसेना शिंदे गट
  • सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

मावळ मध्ये अजित पवार गटाला कौल..

gram panchayat election : मावळ तालुक्यातील डोने गावात भाजपची सत्ता तर दिवड गावात अजित पवार गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले आहे. डोने गावात भाजपचे हृषीकेश खारेक सरपंचपदी तर दिवड गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश राजीवडे यांची सरपंचपदी निवड झाली.

दक्षिण सोलापूर भागात भाजपची सत्ता…

gram panchayat election २०२३: सर्वस्व दक्षिण सोलापूर भागात सर्वांचे लक्ष लागले होते कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व ठेवले आहे. भाजपचे यशपाल वाडकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.कॉंग्रेसची गेल्या २५ वर्षांपासूनची जागा भाजपने उलटी पालटी करुन टाकली आहे. कासेगाव ग्रामपंचायतीवर ११ पैकी ९ जागांवर भाजपने खनखणित विजय मिळवला आहे. तर सरपंचपदी भाजपच विराजमान आहे. तसेच कॉंग्रेसला केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सरशी…

  • बीड जिल्हा ग्रामपंचायत जागा – १५८
  • बिनविरोध – ११
  • बहिष्कार – १६
  • भाजप – १५
  • शिंदे गट – ००
  • ठाकरे गट – ००
  • अजित पवार गट – २०
  • शरद पवार गट – ०३
  • कॉंग्रेस – ००
  • इतर – ०५

gram panchayat election : या वर्षाचा ग्रामपंचायत निवडणूक निकाल हा सरपंच पदासाठी राष्ट्रवादी बरोबर भाजप तसेच शिंदे गट देखील सरपंच पदासाठी सर करतांना अजित पवार गटाला टक्कर देताना दिसुन आला मात्र असे असले तरी देखील अजित पवार गटाचे प्राबल्य सरस असल्याने भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटाच्या आव्हानासमोर टिकू शकले नसल्याचे या निकालावरून दिसून येते.

अहमदनगर पाथर्डी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात…

पाथर्डी ग्रामपंचायत संपूर्ण निकाल हाती आलेल्या माहितीनुसार जाहीर. पाथर्डी ग्रामपंचायतीवर भाजपने भाजपने वर्चस्व राखले.१५ पैकी ११ जागा भाजपच्या ताब्यात.

gram panchayat election 2023 

शिंदे गट – १

ठाकरे गट – १

शरद पवार गट – १

तर अपक्षला – १

जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व…

जळगाव जिल्ह्यात एकूण १६७ ग्रामपंचायती पैकी तब्बल १३३ ग्रामपंचायती मध्ये महायुतीला वर्चस्व मिळवण्यात यश मिळवता आल आहे. निवडणूक निकालावरून जिल्ह्यात भाजपचे नेते गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच वर्चस्व कायम असल्याचे पहायला मिळाले आहे.

जालना चार ग्रामपंचायत मतमोजणी…

जालना जिल्ह्यात चार gram panchayat election निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्याचबरोबर चार वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये चार जागांसाठी पोटनिवडणूकका घेण्यात आल्या, या निवडणूकी मध्ये शिंदे गटाला एक तर कॉग्रेसला दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. तर भोकरदन तालुक्यातील विटा रामनगर ही ग्रामपंचायत अपक्षांच्या ताब्यात गेल्याची माहिती आहे.

पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाचे पाटण तालुक्यात वर्चस्व…

पाटण तालुक्यातील पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाने अनेक ठिकाणी सत्तांतर करत वर्चस्व राखले. तर बहुचर्चित मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सत्तांतर करीत ठाकरे व शरद पवार गटाला धक्का दिला. या निकालादरम्यान पाटणकर गटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.

कर्जत जामखेड मध्ये रोहित पवाराला धक्का तर राम शिंदेची बाजी…

gram panchayat election अहमदनगर : कर्जत व जामखेड तालुक्यातील ९ पैकी ५ ग्रामपंचायती जिंकून भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे. रोहित पवार यांच्या समर्थकांना ९ पैकी फक्त २ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. एक गावात अजित पवार गट तर एका ठिकाणी स्थानिक आघाडीने विजय मिळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायती पैकी १६ ग्रामपंचायतींवर नारायण राणेंच वर्चस्व…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणूकीत वर्चस्व कायम राखत आले आहेत. याही वर्षी हे चित्र पुन्हा पहायला मिळाले आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाला सहा ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे.

gram panchayat election: जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायती पैकी भाजप सोळा ग्रामपंचायती तर ठाकरे गटाला सहा ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉग्रेसला खातही खोलता आले नाही. आणि ग्राम विकास पॅनलकडे दोन ग्रामपंचायती आल्या आहेत.

नागपूर नितीन गडकरी यांच मुळ गाव…

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच मुळ गाव असलेल्या धापेवाडा येथे १७ पैकी १० कॉंग्रेस, भाजप सहा तर अपक्षला एक जागा मिळाली आहे. यात भाजप निशा खडसे यांचा पराभव, तर कॉंग्रेसच्या मंगला शेटे यांचा विजय.

नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक…

gram panchayat election : नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी पुर्ण झाली असून शहादा तालुक्यात भाजपच वर्चस्व राहिले. तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीच्या देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडणून आल्या आहेत. १६ पैकी भाजपला ९ ग्रामपंचायतीमध्ये यश आले आहे. तर सात जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

बारामती ग्रामपंचायत निवडणूक निकाल…

बारामती तालुक्यातील एकुण २८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे तो असा २६ ग्रामपंचायतीचा निकाल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे, तर दोन ठिकाणी भाजपचे वर्चस्व.

अजित पवार गटाची ‘ क्लीन स्वीप ‘ घौडदौड भाजपने रोखली…

अजित पवार गटाची क्लीन स्वीप घौडदौड भाजपने रोखली, बारामतीत पहिला सरपंच चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचासह ९ सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली. यापैकी सरपंच पदासह भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. gram panchayat election

दिलिप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षाच्या सत्तेला शिंदे गटाकडून सुरुंग. वळसे पाटील यांच्या गावातच त्यांचा पराभव.

बारामती २४ ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे…

भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळे वाडी, उंडवडी कप, काळभैरेवाडी, चौथरवाडी, वंजारवाडी, करंजे पुल, धुमाळवाडी, कर्हावागज, सायंबाचीवाडी, कोराळे खुर्द, शिर्सुफ, मेडद,

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व…

धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर भाजपने राखले वर्चस्व शिंदखेड्यात जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व, जयकुमार रावल यांच्या कार्यालयीन प्रमुखाचा दारुण पराभव.

gram panchayat election: छत्रपती संभाजी नगर – संभाजी नगर तालुका – अंजनडोह रामेश्वर ग्रामविकास पॅनल ९ जागा १ सरपंच, रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे ७ उमेदवार आणि सरपंच यांचा विजय. विरुद्ध पॅनलचे २ विजयी, भाजप समर्थक रामेश्वर दौलतराव शेजोळ सरपंचपदी.

इंदापूर बावडा भाजप आणि पवार गटात जंगी लढत..

इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतींवर भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याची निर्विवाद सत्ता आली असून बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांच असून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात कंबर कसली होती.

gram panchayat election 2023 : मात्र १७ पैकी पाचच सदस्य निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश आले आहे. तर १७ पैकी १२ सदस्य भाजपचेच निवडून आले आहेत.

परळी मतदार संघात पंकजा मुंडेना धक्का…

परळी मतदार संघामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. परळी मतदार संघात राडी ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या गटाच्या ताब्यात गेली आहे तर उर्वरित पाच ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भाजप ५५ ग्रामपंचायत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ग्रामपंचायत यांच्याकडे ६५ जागा मिळाल्या आहेत.

बारामती तालुक्यात भाजपचा दुसरा सरपंच…

बारामती तालुक्यात भाजपचा दुसरा सरपंच विजयी, बारामती तालुक्यातील पारवडी येथे भाजपचा सरपंच विजयी. बारामती तालुक्यात आतापर्यंत २६ पैकी जागी राष्ट्रवादीचा सरपंच तर २ जागी भाजपचा सरपंच.

छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायत निकाल…

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायतचा निकाल हाती. शिंदे गटाने खाते उघडले गोलवाडी ग्रामविकास पॅनल पुर्ण ७ जागा विजयी, शिंदे गट समर्थक भारती रमेश कनिसे सरपंचपदी.

gram panchayat election: ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यावर भाजप समर्पित रत्नाकर ठाकरे यांनी थेट घोड्यावर बसून आनंद साजरा केला. नागपूर ग्रामीण तालुक्यातील लोणारा ग्रामपंचायत जिंकली.

जालना, वाघरुळ जहांगीर ग्रामपंचायतीचा निकाल कॉंग्रेसचे आई भवानी माता पॅनल ३०० मतांच्या लिडने विजयी.

gram panchayat election: जालना तालुक्यातल्या वाघरुळ जहांगीर ग्रामपंचायत कॉंग्रेसचा पुढारी. शिंदेंची शिवसेना आणि भाजपा पक्षाच्या उमेदवाराला धक्का. विलास खरात यांची वाघरुळ जहांगीर ग्रामपंचायत सदस्यपदी निवड. आई भवानी माता पॅनलमधील विजेत्यांना खांद्यावर बसून कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा.

कोकणात दिपक केसरकरांना धक्का.

कोकण सावंतवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. दोडामार्ग मध्ये तीन ग्रामपंचायती आणि वेंगुर्ले मध्ये चार ग्रामपंचायतींवर भाजप आणि ठाकरे गटाच्या सेनेने सत्ता काबीज केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकही जागा न मिळाल्याने दिपक केसरकर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

नागपूर काटोल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता.

नागपूरच्या काटोल तालुक्यात भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. काटोल तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ३६ ग्रामपंचायती पैकी २६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्या गटाने एक हाती सत्ता काबीज केली आहे.

सिंधुदुर्ग कणकवलीत ठाकरे गटाला धक्का…

सिंधुदुर्ग कणकवली तालुका ओटव ग्रामपंचायत निवडणूकीतील सरपंचासह ७ ही उमेदवार विजयी, या ठिकाणी भाजपचे वर्चस्व तर ठाकरे गटाला मोठा धक्का.

Garm panchayat election 2023 : कणकवली तालुक्यातील हळवल, वारगाव पोट निवडणूकीत भाजप विजयी, भाजपचे आमदार नितेश राणे यांच वर्चस्व. सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत हळवलमधून प्रभाकर श्रीधर राणे २३६ मत मिळवत विजयी ठरले, त्यांच्या विरुद्ध असलेले सुभाष भीवा राणे यांना १६७ मत मिळाली तर नोटाला ३ मत मिळाली.

ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वस्व पणाला…

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाल्याचे कळते. भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, कॉंग्रेस अनेकांनी या निवडणुकीत आपापला सक्रिय सहभाग दर्शविला आहे.

gram panchayat election : राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह अनेक बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवसेनेतील कोणता गट आणि राष्ट्रवादीतील कोणता गट वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

येथे क्लिक करा 👇

मनोज जरांगे पाटीलांनी उपोषण मागे घेतल खर पण आरक्षणाच काय येथे क्लिक करा आणि पहा सविस्तर 

 

Facebook

 

x