superfast news 2023 महाराष्ट्र झटपट बातम्या/दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी – Latest news

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह वादविवाद 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार.

निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि घड्याळ चिन्हावर अजित पवार गटाचा दावा.अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये 24 पानांच प्रतिज्ञा पत्र सादर.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात आलाय.मात्र शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा दावा.

कागद पत्र बोगस हा दावा करण आणि ते सिद्ध करण यात फरक आहे. तर कोर्टकचेरी करणार नाही अस म्हणणारे पवारच आज आयोगा समोर हजर होते असा छगन भुजबळांचा टोला.

superfast news : अजित पवार गटाच शपथ पत्र बोगस नाही. शरद पवार गटाचा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला. मुलाच शपथ पत्र जोडल्याचा अजित पवार गटाच्या वकीलाच स्पष्टीकरण.

शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात अजित पवार गटाचा युक्तिवाद तर पक्षाची स्थापना शरद पवारांकडून त्यामुळे अधिकारही त्यांच्याकडेच शरद पवार गटाच उत्तर.

चिन्ह संदर्भातला निर्णय होई पर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा त्याच बरोबर चिन्ह गोठवू नका शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी.

superfast news : राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग लवकरच निर्णय देईल चिन्ह गोठण्याची परिस्थिती नाही उज्ज्वल निकम यांच वक्तव्य.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटीलांची नियुक्ती बेकायदेशीर राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच पाटलांची निवड अजित पवार गटाकडून युक्तिवाद.

तर माझ्या नियुक्तीनंतर विधान सभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनच एबी फॉर्म दिले जयंत पाटीलांच प्रतिउत्तर.

9 ऑक्टोबरला अजित पवार गटाच्या अपात्रता प्रकरणांवर सुनावणी जयंत पाटीलांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.

superfast news : शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी. कारवाई संदर्भात विधान सभा अध्यक्षांना सुचना करावी याचिकेमध्ये मागणी.

निवडणूक आयोगान कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया.

बारामती ॲग्रीवर झालेली कारवाई ही राजकीय द्वेशापोटी कारवाई.कारवाईमध्ये अधिकार्यासोबत आलेली गाडी ही कुणाची रोहित पवारांचा सवाल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक तयारी 

राज ठाकरेंनी विरोधात बोलू नये यासाठी नेते त्यांना भेटतात. सर्वच पक्षांच्या प्रमुखांना राज ठाकरे या नावाची भिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांच विधान.

Latest news : लोकसभा निवडणुकांसाठी मनसेची तयारी कल्याण डोंबिवलीमध्ये लोकसभेच्या जागेसाठी राजु पाटलांच नाव चर्चेत. पुण्यासाठी वसंत मोरे तर ठाण्यासाठी अभिजित पानसेंच नाव चर्चेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुक लढवणार मनसेची लोकसभा मतदार संघामध्ये चाचपणी सुरू संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर.

तीन पक्षाच सरकार निधी वाटप

शिंदे, फडणवीस, अजित पवार करणार जिल्हा नियोजन निधीच वाटप तीन पक्षातील संख्याबळानुसार निधीच गुणोत्तर निश्चित करणार. निधी वाटपा संदर्भात तक्रारी आल्यानंतर महायुती सरकारचा हा निर्णय.

superfast news : कल्याणमध्ये पुन्हा शिंदे गटाकडून भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न. शिंदे गटाचे महेश गायकवाडांचे भावी आमदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर तर कल्याणमध्ये भाजपा, शिदे गटाचा सोशल मीडियावर सुद्धा आरोप प्रत्यारोप.

मतदान अस करा की पवार, ठाकरे, गांधींना 440 चा करंड लागला पाहिजे चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र.

राजकीय घडामोडी लाइव्ह अपडेट 

दोन महिन्यात 1300 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याच स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारचे आदेश. जबाबदारी झटकू नका रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारल्या नंतर सरकारला जाग.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील सर्व इमारतींचा आग प्रतिबंधक सर्वेक्षण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना.एका विशेष अधिकार्याची नियुक्ती केली जाणार संरक्षणात्मक परिक्षण होणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

superfast news : नागपुरात पुर ग्रस्तांची मदत लाटण्यासाठी 7 हजार बोगस अर्ज 23 सप्टेंबरला पुरात नुकसान झालेल नसतांना सुद्धा मदतीसाठी अर्ज प्रशासनाकडून मदतीसाठी आलेले खोटे अर्ज बाद.

मालाड गोरेगाव आणि कांदिवली मध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणी पुरवठा बंद. मालाड टेकडी जलाशयातील इंन्ट्रेल आणि आऊट लेट वरील 10 झडपाच्या कामामुळे हा निर्णय.

कल्याण पुर्व भागामध्ये पाणी टंचाई नांदिवली टेकडी मोहाची वाडी आणि मधला पाडा परिसरात पाणी टंचाई नागरिकांना टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू.

नंदुरबार महत्वाच्या अपडेट

नंदुरबार जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त.

नंदुरबार मध्ये पपई पिकावर मोझॅक आणि डावनी रोगाचा प्रादुर्भाव या रोगाचा पिकावर प्रभाव पडल्यान शेतकरी अडचणीत.

Latest news : वाशीम जिल्ह्यातील पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम देण्याची जिल्ह्याधिकार्यांची आधी सुचणा. दिवाळी पुर्वी शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार.

दिवाळी आधी शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळणार. पिकाच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी आधी 25 % रक्कम मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती.

राज्यात 2027 प्रर्यंत 17 हजार 360 मेगावॉट अपारंपारिक ऊर्जा निर्माण करण्याच उदिष्ट मुख्यमंत्री कृषी सौर वाहीनीतुन 7 हजार मॅगावॅटची उर्जा निर्माण केली जाणार.

superfast news : पुणे महापालिकेन शहरी गरीब योजने साठीची उत्पन्नाची अट वाढवली एक लाखावरुन एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत वाढ पालिकेकडून परिपत्रक जारी.

पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी स्थानकापर्यंत मेट्रोची ट्रायल रन पुर्ण. ट्रॅकची कार्यक्षमता इलेक्ट्रीकल सिस्टिम तपासणी तर ही मेट्रोची ट्रायल रनची चाचणी यशस्वी रित्या संपन्न.

सातारा कराड येथील अपडेट 

सातार्यातल्या कराडमधील मलकापूर शहरातील कारखाना बंद करण्यासाठी रहिवासी आक्रमक. कारखाना नागरिवस्तीमध्ये असल्यान स्थानिक रहिवाशांना त्रास प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा.

Latest news : धुळे शहरातील शासकीय कर्मचारी वसाहतीची मोठी दुरावस्था. कर्मचाऱ्यांना पगारातून भाड देऊन सुद्धा गैरसोय बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष.

मुंबईच्या अंधेरी कुरैशी प्रोडक्शन हाऊसवरील इडिची छापेमारी एकुण पाच ठिकाणांवर इडीकडून छापेमारी महादेव बटिंग ॲप प्रकरणी इडिची ही मोठी कारवाई.

शिर्डी साईबाबा नवीन दर्शन बारी खुली करावी

साईभक्तांच्या सुविधेसाठी वर्षापासून तयार असलेली दगडी दर्शन बारी तातडीने खुली करा. उद्घाटनाला पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर वर्षानुवर्षे गैरसोय होऊ देणार का जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र.Latest news

थोरातांच मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणजे हे फक्त राजकारण. साईबाबांच्या नगरीमध्ये राजकारण करु नका विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरातांना सल्ला.

मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा

बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटलांची सभा मध्यरात्री झालेल्या सभेला सुद्धा तुफान गर्दी आणि हे माझ गाव आहे माझ्या हक्काचा जिल्हा आहे. जरांगे पाटलांच भाषणा दरम्यान वक्तव्य.

बीडच्या आष्टी शहरामध्ये मनोज जरांगे पाटलांच जंगी स्वागत तर 75 जीसीपीच्या साह्याने फुलांची उधळण तसेच स्वागतासाठी हजारो मराठी बांधव रस्त्यावर उभा.

superfast news : कुणबी प्रमाण पत्र समितिचा 11 ते 23 ऑक्टोबर पर्यंत मराठवाडा दौरा. कुणबी नोंदी असलेले पुरावे देण्याच नागरिकांना आवाहन.

2000 हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपनार उद्यापासून बॅंकेमध्ये किंवा आरबीआयच्या कार्यालयामध्ये दोन हजारांच्या नोटा जमा कराव्या लागणार.

अजित पवार नाशिक दौऱ्यावर

नाराजीच्या चर्चानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर कळवण मध्ये आज शेतकरी मेळावा घेणार तसेच नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन चर्चा करणार.

Latest news: अजित पवार नाराज राहुन हव ते साध्य करुन घेतात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार असच करायचे असी वडेट्टीवार यांची अजित पवारांवर टीका.

नाशिक दिंडोरी मध्ये अजित पवारांच जंगी स्वागत करण्यात आल आज पहिल्यांदाच अजित पवारांनी नाशिक दौरा करुन शेतकर्यांसी संवाद साधला.

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न. शेतकर्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर कांदे टोमॅटो फेकले आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.

शरद पवार आणि राहुल गांधी पक्षाची बैठक

दिल्लीमध्ये राहुल गांधी शरद पवार खर्गेमध्ये बैठक इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीबाबत तसेच महाराष्ट्रातील जागा वाटपा बाबत चर्चा सुत्राची माहिती.

Latest news : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यातील 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांची हक्काल पट्टी करा असी वडेट्टीवारांची मागणी.

उद्धव ठाकरे आरोप प्रत्यारोप

नागपूर बुडाल तेव्हा मुख्यमंत्री सिनेतारंकासोबत फोटो काढण्यात व्यस्त होते. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा. फिरायला आणि जाहीराती साठी सरकारकडे पैसा मात्र औषधांसाठी सरकारकडे पैसा नाही ठाकरेंचा सरकारला टोला.

कोरोना काळात त्यांनी मृतांच्या टाळुवरच लोणी खाल्ल त्यावेळी उद्धव ठाकरे घरामध्ये बसून नोटा मोजत होते असं एकनाथ शिंदेंच ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर.

Latest news : ठाकरे मुख्यमंत्री असताना आरोग्य यंत्रणा फार चांगली नव्हती गेल्या 75 वर्षांमध्ये राज्याची आरोग्य यंत्रणा ढासाळलेलीच बच्चु कडू यांच वक्तव्य.

ठाकरे मुख्यमंत्री असताना कोण सरकार चालवत होत हे जग जाहीर आहे. मंत्री शंभू राजे देशाईंची उद्धव ठाकरेंवर टिका.

ठाकरेंची फ्रेश कॉन्फरन्स ही फ्रस्ट्रेशन कॉन्फरन्स होती. ठाकरेंनी फ्रेश कॉन्फरन्स मध्ये कोणताही मुद्दा स्पष्ट केला नाही संजय शिरसाटांची टिका.

कोविडच्या काळात उद्धव ठाकरे होते म्हणूनच देवाचे उपकार माना नाहीतर तुम्ही लिहायला आणि वाचायला सुद्धा शिल्लक राहिले नसता सुषमा अंधारेंची बावनकुळेवर टिका.

उद्धव ठाकरे आज संभाजी नगर जालना आणि शिर्डी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार.

मुंबई उपनगरातील ताज्या घडामोडी

गोरेगावच्या पश्चिमेच्या समर्थ सृष्टी इमारतीच्या पार्किंग मध्ये भिषण आग 8 जनांचा मृत्यू तर 40 ते 50 जनांना धुराचा त्रास जखमींवर क्रोमा केअर रुग्णालयात उपचार सुरू.

Latest news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून गोरेगाव मधल्या जखमींची विचार पुस तर रुग्णांच्या वारसांना पाच लाखांची मदत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटू न दिल्यामुळे नागरिकांनी व्यक्त केली नाराजी. पिडीत व्यक्तींना मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्याने नागरीकांनमध्ये संताप व्यक्त.

गोरेगाव दुर्घटना स्थळाला आदित्य ठाकरे कडून पाहणी तर दुर्घटनेतील जखमींना तातडीने मदत देण्याची केली मागणी.

शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरेंनी KDMC अधिकार्यांना झापल रस्त्यांवरील खड्ड्यावरुन शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरेंचा संताप. दोन दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर अधिकार्यांच्या तोंडाला काळ फासणार मोरेंचा इशारा.

महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत गळ्यातील मंगळसूत्र चोरल डोंबिवलीच्या टिळक नगर पोलीस स्टेशन परिसरातील घटना कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा महिलांचा प्रश्न ऐरणीवर.

पुणे शहरातील ठळक बातम्या

पुण्यामध्ये झड ब्रीज जवळ मोठा अपघात चार चाकी वाहनान तीन ते चार वाहनांना उडवत पादचाऱ्यांना दिली धडक. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर तीन ते चार जन जखमी मद्यपी चालकाला पोलिसांकडून अटक.Latest news

पुण्यामध्ये डिजे आणि लेझर मुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार तर शहरातील विविध मंडळ आणि डिजेचा वापर न करण्याचा प्रयत्न केला जाणार.

खरी शिवसेना कोणाची

खरी शिवसेना आमचीच शिंदेची सेना म्हणजे चायना माल अशा शब्दांत संजय राऊतांचा हल्लाबोल.

फडणवीस डंबरु वाजवतात आणि दोन माकड नाचतात. संजय राऊतांची टिका राऊतांकडून फडणवीस मदारी असा उल्लेख.

Latest news : राज्य सरकारची नाडी दिल्लीत शिंदे कधीही दिल्लीमध्ये जातात, मध्य रात्रीही त्यांना दिल्लीला जाव लागत. काय आहे दिल्लीला सारख काय आहे तिथे संजय राऊतांचा शिंदेसह फडणवीस आणि अजित पवारांवर हल्लाबोल.

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का?

राजकारणात काहीही होऊ शकत फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हाव ही कार्यकर्त्यांची इच्छा अस बावनकुळेंच वक्तव्य.Latest news

अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील मात्र ते भविष्य 20 ते 25 वर्षांनी असु शकत. मुख्यमंत्री शिंदेंच राहणार अस फडणवीसांनी जाहीर केलय अतूल सावेंची प्रतिक्रिया.

राजकीय ठळक बातम्या

लोकशाही प्रेमींनी एकवटलच पाहिजे हुकुमशाही गाडली नाही तर देश राहणार नाही उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.

उत्तर मध्य मुंबईचे भाजप सचिव ॲढोकेट सुधीर खातू कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बांधल शिवबंधन.

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार आणि निवडूनही येणार प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया.

मिंधे गटासोबत झाल तेच अजित पवार गटासोबत होणार भुजबळ भाजपमध्ये गेल्यान सुरक्षित फडणवीसच त्यांना सांभाळून घेतील चंद्रकांत खैरेंचा निशाणा.

superfast news  : Rpi ला लोकसभेच्या दोन जागा द्या तीन पक्षाच सरकार म्हणता rpi चही नाव घेत चला रामदास आठवलेंकडून नाराजी व्यक्त.

भाजपकडून शिवरायांच होर्डिंग ते वाघ नखाच राजकारण अफजल खाना प्रमानेच सरकारवर वाघ नखांचा हल्ला होणार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.

अंजली दमानिया यांची भुजबळा विरोधात कोर्टात याचिका भुजबळांच्या संस्थानसी संबंधित चौकशी कधी होणार याचिकेतुन सवाल.

 

येथे क्लिक करा 👇

सरकार ठणठणीत महाराष्ट्र आजारी सुपरफास्ट बातम्या ताज्या घडामोडी लाइव्ह अपडेट 

 

Facebook

 

x