नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा टॉपिक लिहिणार आहोत ते म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या रोजी जे तुम्हाला भाषण करायच आहे त्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत.26 January Bhashan Marathi लहान लहान मुलांसाठी हे आपण पाहणार आहोत.त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यापुढे मांडणार आहे.26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
भाषण करताना घ्यावयाची काळजी.
बाकीच तुम्ही तुमच्या कौशल्याने म्हणजे बोलण्यातली स्पष्टता,शब्द उच्चार, सुरवात कशी करायची आहे.बोलताना कोणती काळजी घ्यायची आहे, मी कोणत्या वर्गात आहे, माझे गुरुजी कोण आहेत,गुरुजनांचे आभार कसे व्यक्त करायचे आहेत,प्रस्तावणा कशी करायची आहे,महत्त्वाच्या विषयावर कशी सुरवात करायची आहे.
26 January Bhashan Marathi : आणि भाषणाचा शेवट कसा करायचा आहे हे सर्व मुद्ये सविस्तर पद्धतीने मांडणार आहोत.आम्ही सांगितलेला एक एक मुद्दा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, आणि सारख सारख घोकणपट्टी करून पाठ करायचे आहेत.चला तर मग जानून घेऊयात 26 जानेवारी ला भाषण कसे करायचे आहे ते.त्या अगोदर काही महत्त्वाच्या टिप्स.
26 जानेवारी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून कोटी कोटी शुभेच्छा खर तर हा एक आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पसरलेले असते.तसेच शालेय जीवनातला हा एक अविस्मरणीय क्षण असतो.नवीन इस्री केलेला गणवेश,बुट स्वाक्स सर्व काही टापटीप मध्ये.
26 January Bhashan Marathi 2024 : 26 जानेवारी रोजी संपुर्ण देशात, शाळा, महाविद्यालय, कॉलेज, शासकीय विद्यापीठ विद्यालय, राज्य, जिल्हा, परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका विविध ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.आणि त्या निमित्ताने शाळेतील मुलांची ग्राम मिरवणूक, त्यामध्ये देशभक्तीचे नारे दिले जातात.
26 January Bhashan Marathi : तसेच शाळेत मुला मुलींचे भाषण होतात.मुल मुली गाण्यांवर डान्स करतात. विविध खेळ घेतले जातात, धावण्याच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा वलहान लहान मुलांना खाऊचे वाटप केले जाते.अशा विविध रंगाने हा उत्सव साजरा केला जातो.
26 जानेवारी मराठी भाषण.
भाषणाला सुरुवात करते वेळी तुम्ही व्यवस्थित सावधान अवस्थेत उभे राहायचे आहे.त्यानंतर आपली दृष्टी सरळ ठेवून भाषणाला सुरुवात करायची आहे.तुम्ही जर एक पाच या वर्गात शिकत असाल तर सर्वात प्रथम कशी सुरवात करावी.
26 January Bhashan in Marathi : आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, आणि माझे प्रिय बाल मित्र.त्यानंतर तुमचे नाव त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात ते त्या नंतर इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्या समोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती करुन नमस्कार करायचा आहे.
26 January Bhashan Marathi : त्या नंतर मला या ठिकाणी जी भाषण करण्याची संधी दिली त्या गुरुजनांचे आभार व्यक्त करायचे आहेत.वडील धार्या मंडळींचे आभार व्यक्त करायचे आहेत.आणि गुरुजनांन् बद्दल दोन शब्द बोलायचे आहेत.त्या नंतर पुढील प्रमाणे व्यवस्थीत कुठेही न अडखळता अगदी सुटसुटीत मोजक्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे.
1950 रोजी भारत प्रजासत्ताक दिन घोषित.
15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या नंतर 1950 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान बहाल केले.आणि त्या दिवसापासून दर वर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो आहे.आज भारताला स्वातंत्र्य मिळुन 77 वर्षे पुर्ण झाले आहेत.आणि भारताला संविधान मिळाले त्याला 74 वर्षे पुर्ण झाले आहेत ही आपल्या सर्वांच्या गर्वाची बात आहे.
26 January Bhashan Marathi : 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला. या निमित्ताने दर वर्षी हा दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आहे.भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक थोर महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, स्वातंत्र्य वीर सावरकर, मोहनदास करमचंद गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले.मला भारत मातेचा अभिमान आहे आणि मी या भारत देशाचा नागरिक असल्याचा स्वाभिमान आहे. आपण सर्व जण देव, धर्म आणि देशाची तन मन धनाने सेवा करु आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करु.
भारताचा तिरंगा कशाचे प्रतीक आहे?
या दिवशी आपल्या देशाचा तिरंगा ध्वज फडकवला जातो.आणि तिरंगा ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली जाते.या तारंगा ध्वजाचे रंग काय दर्शवितात. काय आहे या मागचा इतिहास. ‘ 26 January Bhashan Marathi ‘
तिन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे.तिरंग्याचा पहिला रंग आहे तो केशरी या रंगाचे प्रतिक आहे – त्याग, आणि शौर्य, दुसरा रंग आहे पांढरा, पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. तिसरा रंग आहे हिरवा म्हणजे खालच्या बाजूचा हिरवा रंग हे समृद्धी चे प्रतिक आहे. तर मधल जे चक्र आहे त्याचा रंग आहे निळा ते आहे अशोक चक्र.यात गोलाकारात 24 रेषा आहेत, हे चक्र पृथ्वी चे प्रतिक आहे 24 तास गतिमान तसेच एखता आणि सुसंवादाचे प्रतिनिधित्व म्हणून याकडे पाहिले जाते.असा हा आपल्या भारत देशाचा प्रिय ध्वज तिरंगा आहे.
26 January Bhashan Marathi : भाषणाच्या शेवटी किंवा मध्यंतरी तुम्ही थोर महापुरुषांचे जीवन कार्य, किंवा भारत देशासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले आहे अशा क्रांतिकारी, पुरुषाचे थोडक्यात जीवन चरित्र सांगु शकता यात तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडेफार बदल करु शकता, मात्र हे सर्व करत असताना वेळेच भान ठेवूनच अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त किचकट करायच नाही. सरते शेवटी मी माझे दोन शब्द संपवतो…जय हिंद…जय भारत…
हे देखील पहा 👇